Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 08/10/2015 - 12:09
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
इतिहास
वाङ्मय
भाषा
व्याकरण
शब्दक्रीडा
शुद्धलेखन
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
मंडळी आपुन समदे जन ल्हानाचे मोट्ये हुताना काय ना काय लै भारी चालुपणा करत मोटे जालेलो असतो. तुमी तुमच्या आविष्यात कंदी काय चहाटळपणा केला आसल, काय बाय चंमतगं क्येली आसल, कुनाची टोपी उडवली आसल तर त्ये समदे आणुभव लै भारी असत्याती बगा…. आमी तरी काय कमी हुतो म्हन्ता काय? लै इपितर सोभाव हुता पगा आमचाबी… येकदा तर लै भारीच गमजा केली बगा.. त्येचं आसं जालं बगा कालेजच्या पयल्या का दुसर्‍या सालात शिकत असताना आमी सोलापुरला इज्यापुर नाक्यापाशी रायचो बगा. रोजच्याला बसनं कालिजात जायचु. आपली ७ लंबरची सम्राट चौकापत्तुर जाणारी बस वो. आयटीयापाशी बसाचु आन थेट पांजरापोळ चौकात उतराचो. एका दिशी काय जालं, आमच्या मागच्या शीटावर (म्हंजी बशीतल्या वो) दोन चिकण्या पोरी बसल्या व्हत्या. आता आमाला एक ले इचित्र सवय हाये बगा.. म्हंजी दिसलं देवाळ की जोड हात, दिसलं देवाळ की जोड हात ! पोरी जरा चालु व्हत्या, आमची खोड लक्षात आली आन त्येनी क्येलं की चालु चिडवाया. आमी देवाळ बगुन नमस्कार क्येला की त्याबी उटायच्या आन खिडकीत वाकुन नमस्कार कराच्या आन वर फ़िदी फ़िदी हासाच्या पण बगा. आमाले तर लैच कसंतरी वाटाया लागलं ना यार. तेवड्यात काय जालं एका ष्टापवर बस थांबली. ष्टापकडं पायलं (ष्टाप कसला वो, खांबाला लटकवलेली पाटी नुसती) आमचीबी कळी खुलली (आयव मलाबी ते काव्याट्मक की काय ते लिवता अलं की) तर ष्टापच्या म्हागं ध्यान ग्येलं आन आमी पटकनी हुबे रायलो आन झटकनी नमस्कार क्येला बगा.. तशा त्या पोरीबी हुब्या रायल्या आन त्येनी मी नमस्कार क्येला.. आता हासायची बारी आमची हुती… आमी लै (आक्षी रावणावानी) हासाया लागलो की द्येवानु… बस हालली, पण हालता हालता पोरींना त्ये दिसलंच… ज्येला आमी नमस्कार क्येला हुता त्यो एक बोर्ड हुता. त्येच्यावर लिवलं व्हतं… “सरकारमान्य देशी दारुचा गुत्ता” पोरी अशा काय त्वांड करुन बसल्या की ज्याचं नाव त्ये! लै मजा आली राव… तुमी बी क्येला आसलच की आसला चालुपना कंदी ना कंदी.. मंग सांगा की राव आमाला बी ! इरसाल म्हमईकर
  • Log in or register to post comments
  • 7975 views

प्रतिक्रिया

Submitted by दा विन्ची on Mon, 08/10/2015 - 12:23

Permalink

मी पयला

मी पयला. आवडली पर भाषा जरा जास्तच गावठी वाटाय लागलीय. बहुतेक तुमचे नाव आधी वाचल्यामुळे.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 08/10/2015 - 15:04

In reply to मी पयला by दा विन्ची

Permalink

काय कर्नार द्येवा. समदं जग

काय कर्नार द्येवा. समदं जग फिरलु पर गावाकल्डी भाषा कशी इसरल म्हन्तू मानुस ? सोलापूरापास्नं सवाशेक किलोमिट्रावर गाव हाये आम्चं. करमाळा तालुक्यात घोटी म्हनुन्शान. लै नाय पर थोडी श्येती हाय ततं. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सामान्यनागरिक on Mon, 08/10/2015 - 16:21

In reply to काय कर्नार द्येवा. समदं जग by विशाल कुलकर्णी

Permalink

जास नाय फकस्त.........

मंजी या हिकडे धूतल्या अंगाला ईस ईस यकराचे दोन टुकडे ; आन त्या खादल्ल्या हाताला ईस न पाच यकराचे दोन टुकडं अशी इतकुशी जिमीन हाय बगा....जातो कदी मधी बोल्लेरो घिऊन फेरी माराला . आ
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 08/10/2015 - 12:55

Permalink

खिक्क

खिक्क
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाजी on Mon, 08/10/2015 - 13:59

Permalink

चालूगिरी!

कथा आवडली. तुमच्या समयसूचकतेचे कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा योगिराज on Mon, 08/10/2015 - 15:10

Permalink

हा हा हा

येक लम्बर..... हान तिच्या मारी......
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Mon, 08/10/2015 - 15:21

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 08/10/2015 - 16:24

Permalink

देवळात पर्साद घ्याया न्याचं

देवळात पर्साद घ्याया न्याचं की पावन्यांना. समदी भक्तमंडळी खुश झाली आस्ती की! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जडभरत on Mon, 08/10/2015 - 16:51

In reply to देवळात पर्साद घ्याया न्याचं by प्यारे१

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Mon, 08/10/2015 - 17:39

Permalink

वा !!

वा !!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 08/10/2015 - 18:07

Permalink

नको विशाल नको.

नको विशाल नको. तुझ्या नेहमीच्या दर्जेदार लेखनाला असली ठिगळं लावू नको. ही ना सोलापुरची ना बार्शीची ना कम्प्लीट करमाळ्याची भाषा वाटते. उगी नको असे लिहूस प्लीज. (आणि त्या आक्ख्या रोडवर म्हणजे विजापूर नाका ते पांजरापोळापर्यंत रंगभवन वरुन गेले तर मेन रस्त्यावर एकपण देशी दारुचे दुकान नाही रे. स्टेशनमार्गे आहे पण बंदय आता. तपशीलात नाही गंडायचे आपण ;) ) . . तुझाच सोलापुरी मित्र. अभ्या..
  • Log in or register to post comments

Submitted by जडभरत on Mon, 08/10/2015 - 18:16

In reply to नको विशाल नको. by अभ्या..

Permalink

त्या आक्ख्या रोडवर म्हणजे

त्या आक्ख्या रोडवर म्हणजे विजापूर नाका ते पांजरापोळापर्यंत रंगभवन वरुन गेले तर मेन रस्त्यावर एकपण देशी दारुचे दुकान नाही रे. स्टेशनमार्गे आहे पण बंदय आता क्काय पाठांतर!!! ;) गंमतीत घ्या!!!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 08/10/2015 - 18:40

In reply to नको विशाल नको. by अभ्या..

Permalink

त्ये कालिजात आस्ताना आसंल

त्ये कालिजात आस्ताना आसंल-बिसंल. तुमी दुकानाचे इनिसपेक्टर जनूं, आँ ;) :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 08/10/2015 - 19:46

In reply to त्ये कालिजात आस्ताना आसंल by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

व्हय.

व्हय. त्येनी नमस्कार कर्तेत, आमी इनस्पेक्षन कर्तो.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 08/10/2015 - 21:37

In reply to नको विशाल नको. by अभ्या..

Permalink

नजर लागते अभ्याशेट, चला

नजर लागते अभ्याशेट, चला माझ्याबरोबर एक दिवस . एक नाही किमान सहा दाखवतो. भाषेबद्दल म्हणाल तर ती त्या भागातली कुठलीच बोली भाषा नाहीये, मी लेखाखाली वापरलेले टॅग्स वाचले असतेत तर त्यातली खोंच लक्षात आली असती. असोच.... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 08/10/2015 - 21:43

In reply to नजर लागते अभ्याशेट, चला by विशाल कुलकर्णी

Permalink

आणि हो मी, ९३ साली डिप्लोमा

आणि हो मी, ९३ साली डिप्लोमा पासआऊट झालो, तुम्ही किती साली होतात?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 08/10/2015 - 23:35

In reply to आणि हो मी, ९३ साली डिप्लोमा by विशाल कुलकर्णी

Permalink

नाही राव तुमच्यासारखि नजर

नाही राव तुमच्यासारखि नजर आमची. आणी तुमच्यासारख इंजीनियर बी नाही झालो. उगी चार वर्षे एक बार चालवला फ़क्त. ते बी सोडल. आता हाव निवांत. ते काय टयाग पन कळत नाहीत म्हणून मापी असावी बरका. जाता जाता सांगताव. कंट्रीचे लायसन आता २ कोटाच्या वर जातय. आन नवीन बंद हाय द्यायचे. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 08/11/2015 - 00:03

In reply to नाही राव तुमच्यासारखि नजर by अभ्या..

Permalink

2 कोटी????? बाब्बो!

2 कोटी????? बाब्बो! बाकी आमच्या गावच्या 'माननीयां'चा स्वत:चा असा 'राष्ट्र'-वादी बार आहे. त्यांना मनुष्यबळाची गुंतवणूक फार कमी लागते. काही 'कार्यकर्ते' उजाडायची वाट पाहत असतात. उजाडलं आणि दुकानवाला माणूस चावी घेऊन आला की यांची गड़बड़. साफ सफाई करतील, सडा घालतील, दूकान मस्त आवरतील, रिकाम्या चपटया बाजूला जातील, क्रेट कोपर्यात जातील, सगळां सुशेगात. तोवर दुकानदार दिवाबत्ती करुन घेतो. हे चुळबुळ करत कधी एकदा पॉवर प्ले सुरु होतो याची वाट बघत थांबलेले... हे झालं की काचेचे ग्लास भरले जातात. अगरबत्तीचा वास नाकात आणि ग्लास तोंडात रिकामा एकदम च. अतिशय कडू औषध एका घोटात संपवलं जावं अशा पद्धतीनं पेला एका घोटात रिकामा. एक झटका आणि गड़ी कामाला! सकाळचे 7-7.30 वाजत असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on Mon, 08/10/2015 - 18:36

Permalink

अबे विशल्या कुठल्या कॉलेज ला

अबे विशल्या कुठल्या कॉलेज ला होता बे तु. ये बे समाधान ला जाऊत.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 08/10/2015 - 21:39

In reply to अबे विशल्या कुठल्या कॉलेज ला by भीमराव

Permalink

दादा, चंडकला होतो,

दादा, चंडकला होतो, इलेक्ट्रोनिक्सच्या डिप्लोमाला.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 08/10/2015 - 20:03

Permalink

हे भारी आहे!!!! आता एक किस्सा

हे भारी आहे!!!! आता एक किस्सा वर्हाड़ीत लिवणे आले !!! :D
  • Log in or register to post comments

Submitted by तीरूपुत्र on Mon, 08/10/2015 - 22:12

Permalink

भारी आहे.

भारी आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Mon, 08/10/2015 - 22:30

Permalink

=)) =))

=)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by Pain6 on Tue, 08/11/2015 - 10:45

Permalink

शेवट कळला नाही.

शेवट कळला नाही. दारूची दुकाने ही हात जोडण्याचीच ठिकाणे नाहीत का?
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 08/11/2015 - 10:58

In reply to शेवट कळला नाही. by Pain6

Permalink

अर्थातच आहेत, अगदी कोपरापासून

अर्थातच आहेत, अगदी कोपरापासून हात जोडण्याचीच ठिकाणे आहेत ;)
  • Log in or register to post comments

Submitted by gogglya on Tue, 08/11/2015 - 15:15

In reply to अर्थातच आहेत, अगदी कोपरापासून by विशाल कुलकर्णी

Permalink

आणी जास्त झाली

तर लोटांगण पण घालतात भावीक जन...
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Tue, 08/11/2015 - 18:26

In reply to आणी जास्त झाली by gogglya

Permalink

सही :-)

समाधीत पण जातात !
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 08/11/2015 - 18:32

Permalink

हाहाहा!

लै भारी किस्सा!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com