एक उनाड उन्हाळी दिवस - सीपीचा सेन्ट्रल पार्क आणि अमलतास
मे आणि जुने ह्या दोन महिन्यात सूर्य क्रोधाने लाल होऊन आग ओकीत असतो. या आगीत जिथे धरणी माताच होरपळून जाते, तिथे पृथ्वीवरील प्राण्याची काय बिसात. दिल्लीत रस्त्यावर फिरणार्या आवरा गायी व कुत्रे दिवसभर सूर्याच्या क्रोधापासून स्वत:ला वाचविण्यासाठी सावली आणि पाण्याच्या शोधात भटकत राहतात. दुपारच्या वेळी तर झाडावर पक्षी ही झाडाच्या कोटरात दुबकून राहतात.