दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले
उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले
वृंदगान : दु दु दु दु
काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले
खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले
वृंदगान : ऑ अच्च जालं तल
नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर
कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर
वृंदगान : नाच गं घुमा
तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी
गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी
वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम्
श्वेतलाजरी गिर्जा नाचे, बिरुटे आले धागा टाके
खट्टू होऊनि भरभर धावे, धागा उडवा कन्या बोले
वृंदगान : आयला गो गौरीचा काका
कैची घेऊनि संमं आले, टवाळातुनि कार्टे बोले
"गुर्जी नाही मंमं केले?", धागा हाले धागा हाले
वृंदगान : जुळू नये ती रेशीमगाठी
काकेमामेमावसझिंगे, जल की रानी कन्या पेंगे
अहंकार जा घेऊन संगे, हमरा धागा हम ना देंगे
वृंदगान : भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
लालेलाली चुटुकच धागी, एश्यन पेंटी डब्बा संपे
आंतरजाले आत्मनहत्ये, धागा जाई धरणी कंपे
वृंदगान : साय साय, फळा फळा
(हरदिनी पहाणीकर)
२२-०५-२०१५
प्रतिक्रिया
22 May 2015 - 3:45 pm | सदस्यनाम
अययायाया. प्रचंड व्यापक आणि शिघ्र काव्यप्रतिभा.
नाव सार्थ केलेस हो.
कोरस सिलेक्शन साठी खास टाळ्या सूडराव._____/\_______
22 May 2015 - 3:45 pm | जेपी
जमलाय अभंग...
टाळकर्याच्या प्रतिक्षेत..
22 May 2015 - 3:49 pm | मदनबाण
हा. हा .हा..................................................................................
ज >> ब >> रा >> ट ! ;)
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
22 May 2015 - 3:52 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
टेम्पोमाजी जरा बसविले
22 May 2015 - 3:56 pm | मदनबाण
"नी" डि़झायनरी फॅशन ज्वेलरी मनी मनी
दगड शोधुनी फास गोफुनी ज्वेलरी फनी फनी...
वृंदगान :
{रोजंदि"नी" लिहणीकर} ;)
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
22 May 2015 - 3:57 pm | अनुप ढेरे
हा हा, वृंदगान कहर!
22 May 2015 - 4:02 pm | अजया
शब्द बोचरे अबलख साचे
सूडमुखी शरदिनी का नाचे!!
22 May 2015 - 5:02 pm | सस्नेह
=))
22 May 2015 - 5:06 pm | टवाळ कार्टा
ख्याक
24 May 2015 - 5:28 am | स्पंदना
हरदिनी नाव काय झकास शोधले आहे.
सूड कुठे लपवली होती ही कला?
22 May 2015 - 4:05 pm | नाखु
कोणचा रस्ता सापडेना ! साठी +११
निगुतीने धर पकड
22 May 2015 - 4:08 pm | टवाळ कार्टा
सूड्राव....लै म्हंजे लैच झ्याक...भ..ह..न..ना..ट
इतकी प्रतिभा येते कशी? का काहितरी अंगात आल्यावरच असा भस्सकन प्रतिभेचा बहार येतो? =))
22 May 2015 - 4:09 pm | स्वप्नांची राणी
भारी वंगाळ बाई ...हिच्या नादी लागू नाई...आरं जा जा जा जा जा
अभंग कसला लिहिताय, अक्षि जोरदार लावणी हुन जाऊदेत...
22 May 2015 - 8:27 pm | हाडक्या
स्वरा तै.. करा सुर्रवात. आमी हैच ढोलकी, तुणतुणं घेऊन.. ;)
22 May 2015 - 9:19 pm | टवाळ कार्टा
असे अजून कोणाकोणाला नाचायला लावले आहे ;)
22 May 2015 - 4:13 pm | प्रसाद गोडबोले
कहर =))
=)) द्वयर्थी कहर =))
22 May 2015 - 4:21 pm | प्रचेतस
=))
22 May 2015 - 4:30 pm | बॅटमॅन
अगागागागागाङ्ग्गाङ्ग्ग्गा.....ठार झाल्या गेले आहे =))
डंब विडंबी टुम्म हो आज
दु.दु.लगावी धागंदाज
सैरावैरा लावुनि कामा
पोट खपाटी हसुनि रामा
सोळापारी अनेक सारण
भुरग्यांना दे करुनि घावन
रेखन डुंबन देखन चुंबन
आज गटारी गटगट तुंबण
लुल्लुलुल्ल्लुलू अत्मरंजनी
शोणितरंगी श्रोणितरंगी
अनाकंपिणी बहुलदुहिता
क्लिद्य आणखी सनावृता
22 May 2015 - 4:59 pm | अन्या दातार
डबलबारच काढलास कि रे ब्याट्या.
सूड - भारीच रे.
23 May 2015 - 11:05 am | नाखु
बॅट्याला
बुकलायलाच पाहिजे !!!!!! आधीच सुडने आठवडी बाजार उठवला त्यात तुझा धुरळा.(जरा वेळ जावू द्यायचा तरी)
एकाच तिकिटात दोन सिनूमे पहायला मिळालेला
जॅकपॉट नाखु
22 May 2015 - 5:34 pm | आदूबाळ
गटगट तुंबण =))
22 May 2015 - 4:57 pm | अत्रुप्त आत्मा
=)) जोरदार टाळ्यांचा कडकडाट!
=))))))
22 May 2015 - 5:02 pm | मधुरा देशपांडे
कहर. :)))
22 May 2015 - 5:02 pm | खटपट्या
खफ वाचू की मेन बोर्ड वाचू, काही केल्या कळेना माय
मिपावर आल्याशिवाय दीस जाईना गं माझे आय.
वृंदगान :सन सनन साय साय...
22 May 2015 - 5:05 pm | सस्नेह
टेंपो भाड्याचा का तुमचाच ?
22 May 2015 - 5:12 pm | बॅटमॅन
यातली प्रथम व्यक्ती नक्की कोण म्हणे? =))
22 May 2015 - 8:41 pm | सूड
हे टँजंट गेलं!! इस्काटून सांगतांव क्कांय?
22 May 2015 - 10:28 pm | सस्नेह
कुणाला डैरेक्ट टेंपोत बशिवताना तुमाला आजून बगिटलं न्हाय..
22 May 2015 - 10:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
डायरेक ट्यांपुत बसवलं तर मज्जा नै. आधी वरात काढुन मग टेंपोत चढवल्यावर अक्षी बरं वाटतं.
22 May 2015 - 10:58 pm | टवाळ कार्टा
टेंप्यु कोनाचा आनी डायवर कोन
22 May 2015 - 11:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
भाड्याचा हा शब्द चालवा. ४ मार्क.
22 May 2015 - 5:07 pm | नीलमोहर
पोट खरंच दुखायला लागलंय ह्सून हसून..
कामं करू द्या ओ लोकांना,
अफाट चालू आहे हे सगळं !!
22 May 2015 - 5:14 pm | पिलीयन रायडर
क ह र!!!!!
___/\____
शरदिनी शिवाय हे कुणी लिहुच शकत नाही असं वाटलं होतं... पण तुम्ही त्यावर कडी केली!
22 May 2015 - 5:22 pm | किसन शिंदे
=)) =))
जबराट रे सूड!
22 May 2015 - 5:30 pm | खंडेराव
थोडा वेळ लागला कळायला आणि मग बत्ती पेटली!!
मस्त :-)
22 May 2015 - 5:33 pm | आदूबाळ
बाकीचं सगळं "तार"सप्तक जाऊदे - नुसती कविता म्हणूनही जबरदस्त लयबद्ध आहे.
22 May 2015 - 6:35 pm | बबन ताम्बे
सॉल्लीड कोटी :-)
सूडरावांची तारेवरची कसरत अफलातून.
22 May 2015 - 6:47 pm | बॅटमॅन
तार-सप्तक >>> ठ्ठो =)) =)) जबरीच _/\_.
22 May 2015 - 6:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
लय भारी म्हंजे जंक्शन भारीच की वो !!!! =)) =))
बॅट्टमनचा षटकार पण येक लंबर !!
22 May 2015 - 6:15 pm | स्रुजा
कहर ..हहपुवा
22 May 2015 - 6:31 pm | इशा१२३
कहरच...
22 May 2015 - 7:22 pm | पैसा
शरदिनी तै र्हाऊ द्या. विंदा करंदीकरांची आठवण आली.
बॅट्या, कॅरॅ कॅरॅ करण्यापेक्षा जरा डोकं असं चालव. पहिली दोन कडवी चांगली असल्यामुळे तुझ्या कवितेच्या शेवटच्या कडव्याकडे तूर्तास दुर्लक्ष करत आहे. ;)
22 May 2015 - 7:36 pm | बॅटमॅन
कॅरॅ कॅरॅ म्हणजे काय? अम्हांस ज्ञात असलेल्या कुठल्याच भाषेत असे कधी ऐकल्याचे आठवत नाही.
22 May 2015 - 7:45 pm | पैसा
पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली मधे आजीबद्दलचे लिखाण आठव. तिच्या तोंडी एक म्हण आहे "कीरान कॅर्र केले" म्हणजे पोपटाला गोड बोलायला किती शिकवलं तरी तो मधेच "कॅर्र" असा आवाज काढतोच!
22 May 2015 - 7:47 pm | बॅटमॅन
चालुद्यात निरर्थक अत्मरंजन!
22 May 2015 - 7:58 pm | पैसा
हे घ्या.
22 May 2015 - 8:09 pm | बॅटमॅन
आपणास मुद्दा कळालेला नाही.
22 May 2015 - 8:34 pm | पैसा
तो तुमचा समज आहे.
22 May 2015 - 8:47 pm | बॅटमॅन
तो तुमचा भ्रम आहे.
22 May 2015 - 8:51 pm | पैसा
चालू द्या निरर्थक आत्मरंजन! =))
22 May 2015 - 8:58 pm | बॅटमॅन
मूळ सुवचनांत चुका करू नका.
चालु द्या निरर्थक अत्मरंजन!
अक्षराअक्षराला महत्त्व आहे इथे.
22 May 2015 - 9:00 pm | पैसा
आपणास मुद्दा कळालेला नाही!
(अता पुरे का रे? कधी थांबायचं? )
22 May 2015 - 9:06 pm | प्रचेतस
तुम्ही दोघेही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात.
22 May 2015 - 9:21 pm | पैसा
तो तुमचा समज आहे.
22 May 2015 - 10:49 pm | बॅटमॅन
चालुद्यात निरर्थक अत्मरंजन!!!! ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ
22 May 2015 - 10:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या सगळ्या गोंधळावर आपलं काय मत आहे??
(भांडायचे क्लासवाले जोशी)
23 May 2015 - 2:27 am | स्वप्नांची राणी
आपणास मुद्दा कळालेला नाही...??
मलाही नाही...
23 May 2015 - 6:30 am | स्रुजा
तुम्हाला काय वाटतं? (जोशांची एक विद्यार्थिनी)
23 May 2015 - 8:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमचा काय अंदाज आहे?
23 May 2015 - 9:34 am | अजया
जो तुमचा अंदाज आहे तोच!
23 May 2015 - 9:41 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तो तुमचा (गै गै गै गै गै)रसमज आहे.
23 May 2015 - 9:51 am | अजया
निरर्थक अत्मरंजन हेच बहुतेक!
23 May 2015 - 9:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
भ्रमाचे बळी म्हणतात ते हेच्च....सरांचे लेख वाचा चार शिक्षा म्हणुन :P
जोशीबुवा लिंका चिकटवा. ;)
23 May 2015 - 10:07 am | टवाळ कार्टा
त्या "अ"जया आहेत हे विसरलास कै?
23 May 2015 - 10:43 am | अजया
काय रे टक्या तुला काय म्हणायचे आहे?
23 May 2015 - 2:22 pm | टवाळ कार्टा
अजया म्हणजे ज्याच्याबरोबर कोणीही जिंकू शकत नाही अशी व्यक्ती ना? आणखी कोणता अर्थ मलातरी माहीत नै*
*चोराच्या मनात चांदणे llllluuuullllluuuuu
23 May 2015 - 3:08 pm | अजया
मग ठिक आहे :)
23 May 2015 - 10:08 am | श्रीरंग_जोशी
ज्यांना वाचायचे असेल ते बिंगून शोधतील की. गरज नसताना दुवे कशाला द्यायचे उगीच.
23 May 2015 - 10:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
कर्तव्यामधे कसुर केल्याबद्दल तुम्हाला कारणे दाखवा नोटिस बजावणेत येत आहे.
23 May 2015 - 10:42 am | अजया
त्यापेक्षा दागिन्यांच्या दुकानात पाठवा.
23 May 2015 - 10:44 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
गुन्हा एवढा गंभीर नाही. ;)
23 May 2015 - 10:56 am | अजया
असा तुमचा भ्रम आहे :)
23 May 2015 - 12:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे हो हो... अक्षरे उजव्या कड्यावरून ढकलण्याचे अनेक प्रयोग आधीच झाले आहेत. आता परत तेच तेच नको, दुसरे काहीतरी करा बघू :) ;)
23 May 2015 - 1:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
उजव्या विचारांच्या मंडळींमधे इ.ए. आणि अजयातैंच स्वागत.
23 May 2015 - 1:41 pm | नाखु
सांग की डो़क्याला डोके लावायचेय म्हणून इतका आटापिटा.
22 May 2015 - 7:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
क ड क रे.....जब्राट..स्वर्गवासी झालोय.
22 May 2015 - 8:12 pm | अजया
=))अगदी अगदी!!
22 May 2015 - 7:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगगगगगगगगगगग!!!!!! =))
22 May 2015 - 8:11 pm | बॅटमॅन
अफाट कोटी जमली आहे.
22 May 2015 - 8:37 pm | हाडक्या
सुडराव..
या एका अमोघ काव्यासाठी तुमची सगळी (आधीची) पापे माफ केल्याचे जाहिर करण्यात येत आहे.
(स्वगत : मठाचे भावी वारसदार कोण याबद्दल आता प्रत्यवाय नाही!)
हे घ्या __/\__
22 May 2015 - 8:40 pm | सूड
तात्या, तांबीय मठ हा फक्त परसाकडल्या विडंबनासाठी आहे. उगाच नसतं झेंगाट नको. ;)
22 May 2015 - 9:19 pm | हाडक्या
हा मठाचा घोर अपमान..!! आमच्या मते तांब्या सर्वव्यापी सर्वसमावेशक आहे. अरेरे सुडा, असे कसे बोलू धजलास रे तू.. (तुझ्या जिलब्या झाल्या अळणी मेल्या.. )
22 May 2015 - 9:25 pm | टवाळ कार्टा
तुम्ही कागद वाले दिस्ताय
22 May 2015 - 10:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
किंवा निसर्गपुजक दगडवाले.
22 May 2015 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा
24 May 2015 - 3:08 am | हाडक्या
नै हो निसर्गपूजेत फक्त पाने फुले.. बाकी कै चालत नै.. ;)
(बाकी, बुवा लै हसताय जनु.. दगडी निसर्गपूजेचा अणुभव दिस्तोय बरीक.. )
:D
22 May 2015 - 9:37 pm | संदीप डांगे
तलवारीने एका झटक्यात शीर धडावेगळं करण्याएवजी रेझर ब्लेड घेऊन शांतपणे एक एक नस कापण्याची ष्टाईल भयानक.
22 May 2015 - 10:32 pm | श्रीरंग_जोशी
शीर्षक पाहून बराच वेळ उघडले नव्हते. पण जेव्हा उघडले तेव्हा मिपाकर असण्याचे सार्थक झाले.
बाकी मूळ धागा का गायबला बुवा. अत्रुप्तबुवांना कधी नव्हे ते मी कच्चा माल उपलब्ध करून दिला यासाठी. अन आता तो कच्चा मालही गायबला :-( .
22 May 2015 - 10:59 pm | सस्नेह
लपविला जरी मूळ धागा
विडंबने परि लपतील का ?
नी लपवुनी लपेल का ?
22 May 2015 - 11:12 pm | श्रीरंग_जोशी
निघाले कहाणीचे तीन धागे
दोन दिसे, एक दिसेची ना, दिसेची ना, दिसेची ना.....
बाकी मिपावर सहा वर्षे अन आठ महिने जुना झालो की मी ही असेच वागीन काय अशी भिती वाटू लागली आहे... ;-) .