झोपलेले नशिब

खंडेराव's picture
खंडेराव in जनातलं, मनातलं
5 May 2015 - 1:42 pm

आटपाटनगरात एक कोळी रहायचा. रोज सकाळी उठुन मासे पागायला जायचा. जे काय मासे मिळायचे ते बायकोच्या ताब्यात देउन दुपारी आराम करायचा, पोराशी खेळायचा. बायको काही मासे घरासाठी ठेवुन उरलेले विकायची, घरी येतांना टोपल्यात बाजार भरुन आणायची.

अशीच काही वर्षे गेली. घरात अजुन एक बाळ आले. कोळ्याला वाटायला लागले, सभोवताल बदलतच नाहीये. तीच झोपडी, तेच जुने कपडे. रात्रीची झोप उडाली. एक दिवस स्वप्नात एक म्हतारा आला. स्वप्नात आला कि खरोखर आला हे काय कोळ्याला कळाले नाही. त्याने कोळ्याला सांगितले, की तुझे नशिब झोपलेले आहे. ते जोपर्यंत जागे होत नाही, काहीही बदलणार नाही. मात्र, एकदा जागे झाले की परत झोपणार नाही.

झाले, कोळी नशीब शोधायच्या मागे लागला. एका पहाटे त्याला झोपडीमागे झोपलेले नशीब सापडले. कमरेत एक लाथ घालुन त्याने नशिबाला उठवुन शिव्या घातल्या. दुसर्या दिवशी त्याचा शेजारी त्याला भेटायला आला, तो शहरात नोकरीला निघालेला. कोळयानेही लगेचच त्याच्याबरोबर शहराचा रस्ता पकडला.

शहरात छोटीशी नौकरी मिळाली. कोळी कामसु होता, त्याने भरपुर प्रगती केली, बायका-पोरांनाही बोलावुन घेतले. एका दुरवरच्या उपनगरात छोटेसे खुराडे घेतले. रोज सकाळ संध्याकाळ मिळुन ४ तास प्रवास सुरु झाला. पोरांशी खेळणे तर सोडा, ती दिसणेही अवघड झाले, हा निघायचा आणि परत यायचा तेव्हा पोरे झोपलेली. बायकोही बदलली. दिवसभर पोरे संभाळणे आणि टिव्ही पहाणे ह्यातच ती गुंग असायची.

कोळी पुन्हा दुखी झाला. आयुष्याला सुख असे नव्हते. आजही तो आपले नशिब शोधतोय ज्याला झोपी लावुन त्यालाही शांत झोप येईल.

( तर्री ताईच्या रुपक कथांवरुन आठवली. हिंदु मधे आहे का ही? )

धोरणवाङ्मयकथामुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मंदार दिलीप जोशी's picture

5 May 2015 - 3:07 pm | मंदार दिलीप जोशी

खंडेराव जिकडे तिकडे पकवतात

खंडेराव's picture

5 May 2015 - 3:19 pm | खंडेराव

हुकलेले आहात कि काय तुम्ही डोक्याने? मी लिहिलेय काय, तुमचा प्रतिसाद काय :-)

हिंदु मधे आहे का ही?

काय खंडेराव! तुम्ही तर नायक ना 'हिंदू'चे? ;-)

खंडेराव's picture

5 May 2015 - 3:42 pm | खंडेराव

आत्ता, उगीच चुकीचा संदर्भ नको जायला :-)

राजाभाउ's picture

5 May 2015 - 7:50 pm | राजाभाउ

हिंदु मधे आहे का ही?

हो. आगदी अशीच्या अशी नैये, पण आहे.