मुंबई, काव्य आणि ललित साहित्यातील, 'ये है बम्बई मेरी जान'
काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई हा मराठी विकिपीडियावर ज्ञानकोशीय लेखाचा विषय असू शकतो; पण चर्चा पानावरील चर्चेचा विषय असू शकत नाही. अशा चर्चांना वाव देण्याचे काम मिसळपाव सारख्या मराठी संस्थळांचे. पण मराठी विकिपीडियाच्या बर्याच वाचकांना विकि प्रकल्पांच्या परिघाची नेमकी जाण नसते आणि म्हणूनच मराठी विकिपीडियाच्या चर्चा:मुंबई पानावर एका मागून एक मुंबई विषयी गाणी दाखल होण्याचा अंदाज दिसतो आहे.
सी आई डी (C.I.D.) चित्रपटात गायक - मोहम्मद रफ़ी गातात