रेषांसंगे चालत आलो, रेषांसोबत चालत राहू,
गति नाही, स्थिती नाही, केवळ लय, चालत राहू.
उठल्यावरती सूर्य नाही, थकल्यावरती चंद्र नाही
कुठला देश, कुठले घरटे, आपली कुडी, चालत राहू.
जंजाळाशी रडणे नाही, गुंत्यापाशी थटणे नाही,
कोण आले, कोण गेले, कुणी न उरले, चालत राहू.
दार लोटले अंधार नाही, दार उघडले प्रकाश नाही,
आला दिवस, गेला दिवस, आत्ताचा क्षण, चालत राहू.
नाव उलटली आक्रोश नाही, नाव तरली जल्लोष नाही,
कुठली लाट, कुठली वाट, आपला किनारा, चालत राहू.
प्रतिक्रिया
20 Oct 2015 - 8:24 pm | प्रचेतस
सुंदर
20 Oct 2015 - 8:27 pm | शिव कन्या
होय बाई, विंग्रजी शब्द न घालता जिलबी घातली!
20 Oct 2015 - 8:31 pm | प्रचेतस
तेव्हा जे खटकले ते स्पष्टपणे सांगितले इतकेच.
20 Oct 2015 - 11:05 pm | शिव कन्या
:)
20 Oct 2015 - 8:26 pm | पैसा
आवडली!
20 Oct 2015 - 8:28 pm | मांत्रिक
सुंदर!!!!!!!!!!!
20 Oct 2015 - 11:13 pm | रातराणी
आवडली कविता.
21 Oct 2015 - 4:48 am | चाणक्य
चांगली आहे
21 Oct 2015 - 6:05 am | दमामि
वा!
21 Oct 2015 - 7:08 am | निनाद
दार लोटले अंधार नाही, दार उघडले प्रकाश नाही,
आला दिवस, गेला दिवस, आत्ताचा क्षण, चालत राहू.
हे जास्त आवडले.
21 Oct 2015 - 7:25 am | प्राची अश्विनी
सुंदर!
21 Oct 2015 - 8:16 am | अजया
आवडली कविता.
21 Oct 2015 - 11:26 am | नाखु
एक निर्मोही कवीता
21 Oct 2015 - 11:39 am | चांदणे संदीप
कविता आवडली!
21 Oct 2015 - 12:05 pm | अभ्या..
जॉनी वॉकर साठी सुरेख स्क्रीप्ट आहे.
मस्त
21 Oct 2015 - 3:10 pm | वेल्लाभट
सद्ध्याच्या समाजाची अवस्था.
21 Oct 2015 - 3:59 pm | एक एकटा एकटाच
छान आहे
21 Oct 2015 - 4:03 pm | अविनाशकुलकर्णी
९० एम एल अवस्था
21 Oct 2015 - 4:32 pm | मनीषा
ध्य्येयहीन , दिशाहीन असे नुसते चालत रहाण्याचा काय उपयोग आहे ?
सुख नाही दु:ख नाही , आशा आणि निराशा नाही .. या स्थितीलाच स्थितप्रज्ञता म्हणतात ना ?
21 Oct 2015 - 5:40 pm | जव्हेरगंज
वॉव...!
22 Oct 2015 - 5:33 am | शिव कन्या
सर्वांचे आभार.