(ढेस्क्लेमर: या लेखातून माझा कुणालाही हिणवण्याचा अथवा दुखावण्याचा हेतू नाही. याउलट 'हसण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी हसणे' हा माझा हास्य'बाना' सर्वांपर्यंत पोचविण्याचा एक किंचीतसा प्रयत्न आहे! तरीही कुणाला माझ्या लेखातील/काव्यातील काही जागांना आक्षेप असल्यास कळवावे, दुरूस्ती किंवा तो भाग काढून टाकण्यासाठी संमंना सांगून प्रयत्न केला जाईल!)
न्मसर्कार म्हणडलि!
तर महाराजा, शीर्षक आणि पहिली ओळ वाचून पुढे काय वाचायला मिळणार आहे याचा एक अंदाज मिपाकरांना आलाच असेल! तुम्ही बरोबर विचार करताय, सदर लेख "त्याच" काव्यचमत्काराला वाहिलेली एक शब्दांजली आहे. ज्याने कित्येक वर्ष मरगळलेल्या चेहऱ्यावर हसू फुलविले तसेच नवीन काव्यप्रकाराची अनमोल भर मायमराठीच्या चरणी वाहिली!
ब-याच सदस्यांच्या तोंडून या काव्याची वेळोवेळी आठवण निघत असते. यावरूनच मिपाच्या प्रवासातील हा एक मैलाचा दगड आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये!
या काव्यचमत्कारावर मी पामर काय लिहू शकेन या शंकेत असतानाच असा एक मनात विचार आला की, लिहित तर राहूच पण थोडा अभ्यासही आवश्यक आहे. चांगल वाचन किंवा उच्च (सुज्ञांनी 'हुच्च' असेच वाचले असेल याची खात्री आहे) साहित्याचा अभ्यास आपल्या लेखनप्रकृतीला ठणठणीत ठेवतो! म्हणूनच आज मी या काव्याचा अभ्यास/रसग्रहण करायचे ठरवले आहे.
ह्या काव्यचमत्काराविषयी आणखी सांगायचे म्हणजे ह्या कवितेने अनेक कवींना विडंबनकार होण्यास प्रवृत्त केले. तर अनेक रसिक वाचकांना नवीन काव्यप्रकाराचा आस्वाद चाखण्यास दिला. म्हणजे (कणेकर ष्टाईलमध्ये सांगायचं झाल तर) मराठीसारख तर दिसतंय, मराठी तर नाहीये, इतपत नाविन्यपूर्ण अनुभूती!
प्रमाण मराठी बाजूला सारून आपण जसे बोलतो तसेच लिहावे का नाही याबद्दल वाद-प्रवाद बरेच दिवस चालू आहे. आणी तसे लिहून बरेच लेखक/कवी आपापली पोटे भरण्यात (किंवा मोठी करण्यात) यशस्वीही झालेली आहेत. पण आपण सहजासहजी बोलूही शकत नाही आणि आधी कुठे ऐकलेही नाही अशा मराठीचा उपयोग काव्यात करून तिच्यातून अचाट, अफाट अशी विनोदनिर्मिती करणं हे फक्त ह्या आणि ह्याच काव्यचमत्कारालाच जमलेल आहे आणि तेच त्याच्या यशाच गमकही आहे!
मोकलाया…चे रसग्रहण करताना:
नाविन्यपूर्ण शब्दांनी नटलेली ही कविता आपल्याला शब्दांच्याच तालावर नाचवते त्यामुळे माझ्याही रसग्रहणाचा भर 'ते' शब्दच असणार आहेत!
'कुन्वित' हा शब्द, हे कुवेतच्या आसपासच एखाद गाव असाव असा भ्रम निर्माण करतो. 'माझ्ह्या' शब्द कोकण/मालवणातील प्रेमळ, आपुलकीने ओतप्रोत अशा 'मायझया' या हाकेचीच आठवण करून देतो. 'कवदसे' ही कुणा 'अवदसे'ची बहिण असल्यासारखी वाटते जी याआधी कुणाला माहित नव्हती. तिची सर्वांना विडंबनकाराने ओळख करून दिलेली आहे त्याबद्दल विडंबनकाराचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत! 'बन्दा' शब्द 'बंदा' असा न लिहून विडंबनकाराने रसिकाकडून कौतुकाचा एक बंदा रुपाया मिळवला आहे यात तिळमात्र शंका नाही! 'फुलाचे तातवे' तर फुलांच्या अनेक तातांचा (तीर्थरूप, वडील) मेळा भरल्याचे दृश्य जणू दाखवीत आहे!
हे आणि असे अनेकविध शब्द (शब्दांचे वध) हेच या काव्यचमत्काराची खरी ओळख आहेत! हा प्रकार सध्यातरी आंतरजालापुरताच मर्यादित असला तरी तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी शालेय अभ्यासक्रमात अभ्यासासाठी हा प्रकार (बापुड्या) विद्यार्थ्यांसमोर ठेवला जाईल!
इथे यानंतर माझा अभ्यास सांख्यिकीय स्वरूपात मी तुमच्यासमोर मांडत आहे. (यातून बरयाच लोकांचा असा गैरसमज होणार आहे की लेखकास (म्हणजे मलाच!) आजिबातच कामधंदा नाहीये याची मला पूर्ण कल्पना आहे पण जित्याची खोड…!) खूप नाही पण काही कष्टाने ही माहिती मी जमविली आहे जिचा आणखी नवकवी/विडंबनकार/लेखक यांना काहीतरी उपयोग होईल असा मला विश्वास वाटतो!
वर्जीनल काव्य - मोकळ्या दाही दिशा
प्रकाशित झाल्याची तारीख - NA# (खरे तर, माहित नाही)
मूळ कवी : सुरेश्चन्द्रा जोशि (संपर्कासाठी दूरध्वनी क्र. ९५२५१२४९१५१३ (१२ अंकी असल्याने हा भ्रमणध्वनीयंत्र क्रमांक नसावा आणि असल्यास अतिशय आधुनिक, विशेष ध्वनियंत्र/भ्रमणध्वनियंत्र लागत असावे असा अंदाज आहे))
प्रतिक्रियांची संख्या : NA# (खरे तर, माहित नाही)
काव्याची लिंक : NA# (नसावी असा अंदाज!)
विडंबनकाव्य १ - मोकलाया दाही दिशा
मिपावर प्रकाशित झाल्याची तारीख - २८/२/२००९
विडंबनकार : सतिश (ठाणे)
प्रतिक्रियांची संख्या : २०१ (दि. ०६/१०/१५ पर्यंत)
विडंबनकाव्य २ - बोंबलाया दाही दिशा
मिपावर प्रकाशित झाल्याची तारीख - २८/२/२००९
विडंबनकार : परीकथेतील राजकुमार (पुणे)
प्रतिक्रियांची संख्या : २० (दि. ०६/१०/१५ पर्यंत)
विडंबनकाव्य ३ - वाढल्या दाढी मिशा
मिपावर प्रकाशित झाल्याची तारीख - १/११/२०१२
विडंबनकार : खान (पुणे)
प्रतिक्रियांची संख्या : ४० (दि. ०६/१०/१५ पर्यंत)
विडंबनकाव्य ४ - हादडाया दाही डिश्या
मिपावर प्रकाशित झाल्याची तारीख - ८/५/२०१३
विडंबनकार : बॅटमॅन (गोथम सिटी)
प्रतिक्रियांची संख्या : ४४ (दि. ०६/१०/१५ पर्यंत)
विडंबनकाव्य ५ - खोकल्या धाई दिशा
मिपावर प्रकाशित झाल्याची तारीख - २०/१/२०१५
विडंबनकार : चुकलामाकला (माहित नाही)
प्रतिक्रियांची संख्या : १८ (दि. ०६/१०/१५ पर्यंत)
विडंबनकाव्य ६ - सोडल्या दह्यात मिशा
मिपावर प्रकाशित झाल्याची तारीख - १/८/२०१५
विडंबनकार : पाटीलअमित (माहित नाही किंवा http://kahihikasehi.blogspot.in/)
प्रतिक्रियांची संख्या : २१ (दि. ०६/१०/१५ पर्यंत)
यात आता मी माझेही नाव जोडून या अजरामर कलाकृतीचा एक भाग होऊ इच्छितो!
विडंबनकाव्य ७ - भटकाया दाही दिशा!
मिपावर प्रकाशित झाल्याची तारीख - ०६/१०/१५
विडंबनकार : संदीप चांदणे (पुणे)
प्रतिक्रियांची संख्या : NA#(रामभरोसे!)
हा माझाही विडंबनाचा एक प्रयत्न मूळ कवी श्री सुरेश्चन्द्रा जोशि (सुरेशचंद्र जोशी) यांची माफी मागून मिपाचरणी समर्पित:
भटकाया दाही दिशा!
ब्सथंबयवर उबी तई कधिचहई मल कुन्वित आहे
मी अस सहादआ भओळा गहब्रून वरकलई पाहे
णआज्कु तईची बओटे पिहरतई मउ बतातुनी
शवासत त्पत वायउ फुर्रफुरए मझया नकतऊनी
हरष म्नी अस कई ग्ळती सऊखची आसवे
भहासए माज, मई झआलओ भरमार तया पुश्पासवे
क्रती नआद गरजून्नी छयातीत तई स्पन्दने
नआ शब्दनई नआ डवळआतुनई, देतई तीज आमन्त्रने
फऊट्पात, गट्र हई कच्रकउंडई भस्ती माज फुलआंचए तातवे
व्हाटे माज इथएच धऊंद ह्वून अज निजावे
मधच्च अठव्ले, माजजभव्ती माज बयकोचए पाश होते
येयईल तया ब्समधूनई घ्राला जणए कर्मपराप्त होते
मई अच्नक तेवहा वैचराइंच्या जणज्ळातवून मुक्त झालो
जेवह मझयाही न्कळत मई तईचया पठईमगे बगहा चाललो
आकश झले थेन्गने म्नी उकाल्या फुटल्य जराश्या
मई अज बनदा तईचा माज मओक्ळ्या भटकाया दाही दिशा!
- संदीप चांदणे (०६/१०/१५)
प्रतिक्रिया
6 Oct 2015 - 3:43 pm | विजुभाऊ
अगडबंब्.शब्दबंबाळ.
मोकलाया ची सर अज्याबात आलेली नाहिय्ये
6 Oct 2015 - 4:01 pm | चांदणे संदीप
खूपच जास्त कृत्रिमपणा आलाय का?
शेवटी वर्जिनल ते वर्जिनलच!
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे!
Sandy
6 Oct 2015 - 5:31 pm | बॅटमॅन
प्रयत्न चांगला आहे. थोऽडेसे अजून प्रीप्रोसेसिंग पाहिजे होते मग एकदम मुळाबरहुकूम झाले असते.
बाकी या निमित्ताने मोकलायाची इतकी विडंबने एकाच ठिकाणी कलेक्ट करून तुम्ही मिपाइतिहासाकरिता अतिशय मोलाचे काम केलेले आहे त्याबद्दलही धन्यवाद.
6 Oct 2015 - 5:42 pm | चांदणे संदीप
धन्यवाद बॅटमॅन!!
(चला, काहीतरी करू शकलो!)
6 Oct 2015 - 6:25 pm | जव्हेरगंज
+१ हेच म्हणतो.
6 Oct 2015 - 6:50 pm | सौंदाळा
+१
6 Oct 2015 - 6:29 pm | अभ्या..
भारी रे सॅन्डी.
साक्षात विजूबौंचा पहिला प्रतिसाद मिळाला हेच भाग्य समज.
चांगलाय अप(वरचा)शकुन.
आता पळणार गाडी तुझी जोरात. ;)
6 Oct 2015 - 6:42 pm | चांदणे संदीप
हे…हे…
ततर ततर…
6 Oct 2015 - 6:45 pm | प्यारे१
मोकलाया हे पहिलं विडंबन नसून तेच वर्जिनल आहे असं णम्रपणे णमूद कर्तो.
-'दिव्य'मराठी फ्रॉम 'औरंगाबाद'. :)
6 Oct 2015 - 6:47 pm | चांदणे संदीप
ते आहेच हो!
6 Oct 2015 - 6:53 pm | बोका-ए-आझम
हे मुक्तपीठ, ज्ञानपीठ, थालिपिठ, उप्पीट वगैरे सगळं मिळण्याच्या लायकीचं काव्य आहे. असंच रसग्रहण बाकी मैल्याच्या, आपलं मैलाच्या दगडांचं पण येऊ द्या!
6 Oct 2015 - 7:23 pm | चांदणे संदीप
बोका-ए-आजम तुम्ही कल्जि क्रु नै!
इथे मंथन क्रुन सगली रत्नेच बाहेर काढतो! ;)
धन्यवाद!
Sandy
6 Oct 2015 - 7:33 pm | बॅटमॅन
बोकोबांशी सहमत आहे. भांडे का लपविता नामक कवितेचेही असेच अद्भुत रसग्रहण येऊ द्यावे ही विनंती.
(भांडेप्रेमी) बट्टमण्ण.
6 Oct 2015 - 9:01 pm | चांदणे संदीप
सुप्पारी घेतल्या गेली आहे! ;)
6 Oct 2015 - 9:50 pm | प्रचेतस
अगदी अगदी.
परम अद्भूत अशी कविता आहे ती.
6 Oct 2015 - 11:24 pm | बोका-ए-आझम
वाल्गुदस्वामी किंवा प्रचेतसभाऊ - कोणीपण द्या.
7 Oct 2015 - 8:55 am | प्रचेतस
http://www.misalpav.com/node/23240
ही घ्या.
त्यावरील सर्व प्रतिसाद सुद्धा आवर्जून वाचा.
7 Oct 2015 - 9:24 am | श्रीरंग_जोशी
रसग्रहण व विडंबन दोन्ही आवडलं.
बादवे ९५२५१२४९१५१३ हा क्रमांक म्हणजे +९१ ०२५१ - २४९१५१३ असा आहे.
जुन्या काळी एसटीडी कनेक्शन नसताना लोकल कॉल करण्यासाठी ९५ चा वापर करता येत असे. तो इथे केला गेला आहे.
7 Oct 2015 - 10:19 am | चांदणे संदीप
ओह्ह…ओके
बरोबर, कळालं!
धन्यवाद!
7 Oct 2015 - 1:21 pm | सनईचौघडा
रंगा तु फोनच्या क्रमांकाची फोड करुन सांगितल्यानंतर आज मी त्यांना सहज फोन करुन पाहिले , आणि फोन लागला. त्यांच्याशी संवाद झाला असता असे समजले की त्यांनी कविता खरडल्यावर मिपाकडे पुन्हा वळुन पहिलेच नाही आहे. तेव्हा मी त्यांना सांगितले की एकदा मिपाला भेट देवुन पहा की या कवितेने एक इतिहास रचला आहे ते.
तेव्हा त्यांनी सांगितले की हे तर टंकन चुकीने झाले असावे. मला खरे तर तसे लिहायचे नव्हते आणि खरी कविता ही माणुस निवृत्त झाल्यानंतर त्याला जे वाटते की आता तु काही बंधनात नाहीयेस तर तुझ्यासाठी दाही दिशा मोकळ्या आहेत यावर लिहली आहे. ते स्वतः नोकरीतुन निवृत्त झाले आहेत.
दुसरे असे की त्यांचा "मोकळ्या दाही दिशा" नावाचाच कविता संग्रह असुन त्याचे आत्तापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमात २०० वेळा वाचन झालेले आहे तसेच या कविता दै. नवकाळ मध्येही छापुन येतात.
आता बोल.
7 Oct 2015 - 1:44 pm | खटपट्या
हायला
7 Oct 2015 - 3:11 pm | बॅटमॅन
आयला जबरीच!!!!!!!! त्यांना पहा म्हणावे, व्याक्रणचुकीनेही कसा इतिहास घडतो ते पहाच म्हणावं. झालंच तर 'सतिश' साहेबांनाही जरा सांगा ;)
7 Oct 2015 - 3:47 pm | एस
क्या बात है! इतिहासाची उकल इथे घडते आहे हा एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. :-)
7 Oct 2015 - 5:12 pm | चांदणे संदीप
कवी सुरेशचंद्र जोशी यांची मूळ कविता उत्कृष्टच होती याबद्दल काही शंकाच नाही!
पुन्हा एकदा अभ्यास:
'मोकलाया'वरचे काही प्रतिसाद पाहता असे लक्षात येईल की पहिल्यांदा "सुक्या" या सदस्याने तसेच नंतर ब-याच दिवसांनी बहुगुणी सर यांनी मूळ कवितेला ख-या स्वरूपात सर्वांसमोर उभे करून न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला!
या काव्याच्या विडंबन परंपरेचा शोध घेतला असता असे लक्षात येईल की सखाराम गटणे या सदस्याने जाहीर आव्हान दिल्यानंतरच "परीकथेतील राजकुमार" यांनी त्या आधीच मुसक्या आवळलेल्या सुंदर काव्याचे पुन्हा एक विनोदी विडंबन करून एक परंपराच सुरू केली. पण माझ्या मते एक मिपापिढी त्यांची ऋणी राहील, कारण हसण्याचे नवे-नवे खजाने वाचक/रसिकांपुढे ओतले गेले!
"इरसाल" यांचा इरसाल प्रतिसाद तर असा होता की:
श्रीयुत बॅटमॅन यांचा प्रतिसाद म्हणजे कहरच (आयडी नव्हे!) होता!
तसेच श्रीरंग जोशी यांनी याआधीही त्या फोन नंबरची फोड केली होती पण त्यावरही बरेच विनोद झाले! माझाही थुकरट एक!
असो, यानिमित्ताने का होईना काही जणानंकडून खरेच उत्तम विनोदनिर्मितीचा प्रयत्न झाला, बरेच सदस्य खळखळून (आणि ब-याच प्रकारे, सगळच इथ सांगत बस्लो तर संध्याकाळ व्हायची) वगैरे हसले, हेही नसे थोडके!
पुन्हा एकदा श्री. कवी सुरेशचंद्र जोशी यांची मूळ कविता इथे डकवतो :
निसटले सुर ओंजळीतुन ते मला खुणवीत आहे,
श्वास घेतो मोकळे की मी आता निवृत्त आहे
ऐकु द्या मज बासरी त्या बांबुच्या बेटातुनी
मृदुगन्ध मोहक एकदा भरुद्या मला श्वासातुनी
रात्रीच्या तिमिरात होती ढाळली जी आसवे
दवबिंदु होउन भेटली मज उमलत्या पुष्पासवे
पानाफुलातुन निर्झरातुन सृष्टीची ही स्पन्दने
उत्तुंग लाटा रानवारा देती मज ही आमंत्रने
हळुच ते ढग चुंबुनी जाती फुलाचे ताटवे
ओठ ओल्या पाकळ्याचे धुंद होउन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्षितिजासही माझ्या मनाचे कवडसे ठाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकटीतुन मुक्त झालो
सोहळे ऋतुचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले ठेंगणे अन चांदण्या झुकल्या जराश्या
आता न मी बंदा कुणाचा मज मोकळ्या दाही दिशा
-- कवि सुरेशचंद्र जोशी
सोबत माझ्याही मूळ (विडन्बनच) कवितेचे मूळ रूप इथे सादर करतो. (कदाचित आणखी वेगळा फील येईल!)
बसथांब्यावर उभी ती कधीची मला खुणवीत आहे
मी असा साधा भोळा घाबरून वर-खाली पाहे
नाजूक तिची बोटे फिरती मऊ बटातुनी
श्वासात तप्त वायू फुर्फुरे माझ्या नाकातुनी
हर्ष मनी असा की गळती सुखाची आसवे
भासे मज, मी झालो भ्रमर त्या पुष्पांसवे
करती नाद गर्जुनी छातीत ती स्पंदने
ना शब्द, ना डोळ्यातुनी, देती तिज आमंत्रणे
फुटपाथ, गटार ही कचराकुंडी भासती मज फुलांचे ताटवे
वाटे मज इथेच धुंद होऊन आज निजावे
मध्येच आठवले, मजभोवती मज बायकोचे पाश होते
येईल त्या बसमधुनी घराला जाणे कर्मपराप्त होते
मी अचानक तेव्हा विचारांच्या जंजाळातून मुक्त झालो
जेव्हा माझ्याही नकळत मी तिच्या पाठीमागे बघा चाललो
आकाश झाले ठेंगणे मनी उकळ्या फुटल्या जराशा
मी आज बंदा तिचा मज मोकळ्या भटकाया दाही दिशा!
एका लेखाइतका प्रतिसाद लिहिल्यामुळे सर्वांनी मला एक्सक्युजावे!
धन्यवाद! ____/\____
Sandy
7 Oct 2015 - 8:25 pm | श्रीरंग_जोशी
संदीप, या प्रकल्पासाठी (केवळ धागा म्हणणे आता योग्य वाटत नाही) तुमचे मनःपूर्वक आभार.
7 Oct 2015 - 8:06 pm | श्रीरंग_जोशी
मिपाच्या इतिहासात अजरामर झालेल्या कवितेच्या कविला (जे स्वतः इथे प्रकाशित करणारे नव्हते) कुणा मिपाकराने इतक्या वर्षांनी प्रथमच संपर्क साधून मिपाकरांच्या वतीने पोचपावती दिली ही खूपच स्पृहणीय कामगिरी आहे.
यासाठी सनईचौघडा उर्फ पम्या यांचे हार्दिक अभिनंदन.
7 Oct 2015 - 8:40 pm | चांदणे संदीप
धन्यवाद श्रीरंग जोशी!
7 Oct 2015 - 2:44 pm | इरसाल
इत्स तु मच वी विल बी दिलाय्तेड तु हॅव हिम हिअ !
7 Oct 2015 - 6:03 pm | बॅटमॅन
मोकलायाचा विषय निघालाच आहे तर त्या अजरामर कवीची अजूनेक कविता इथे वाचता येईल.
http://misalpav.com/node/5019
सचिनमुळे अन्य ट्यालेंटवर अन्याय झाला म्हणतात त्यातलीच ही गत. तरी मिपाकरांनी ह अन्य्य क्मि क्रव अशि विनन्ति.
7 Oct 2015 - 6:07 pm | चांदणे संदीप
ही आणखी एका अर्थाने ऐतिहासिक कविता आहे, याच्यावर मिपाचे महान लेखक "रामदास" यांचा प्रतिसाद आलेला आहे!
जो माझ्या मते दुर्मिळ असावा! :)
जाणकार उजेड पाडतीलच!
7 Oct 2015 - 6:18 pm | बॅटमॅन
इंडीड!
7 Oct 2015 - 8:33 pm | श्रीरंग_जोशी
मोकळ्या दाही दिशा या कवितेचे कवी श्री सुरेशचंद्र जोशी हे स्वस्तिक सोसायटी विष्णू नगर, डोंबिवली येथे राहतात (संदर्भ). योगायोगाने डोंबिवली येथेच मिपाचे सर्वाधिक कट्टे आयोजित होतात. डोंबिवलीतल्या पुढच्या कट्ट्याला सुरेशचंद्र जोशी यांना आदरपूर्वक आमंत्रित करावे. तसेच त्यांच्या कविता इथे प्रकाशित करणारे ठाण्याचे श्री सतिश गोडबोले यांनाही आमंत्रित करावे.
7 Oct 2015 - 8:29 pm | टवाळ कार्टा
दणकून अनुमोदन
7 Oct 2015 - 8:49 pm | चांदणे संदीप
मलाही यायला आवडेल!
यानिमित्ताने श्री सुरेशचंद्र जोशी यांच्या आणखी कविताही ऐकायला मिळतील! (तसेच 'प्रतापी' पुतण्यालाही भेटता येईल! ;) )
Sandy
7 Oct 2015 - 8:52 pm | चांदणे संदीप
मला आणखी एक प्रश्न पडला आहे…म्हणजे तो तसा पहिल्यांदा मोकलाया…वाचली होती तेव्हाच पडलेला, तो म्हणजे. सतीशभाउंनी 'संमं'ना सांगून कवितेत दुरुस्ती का करून घेतली नसावी??
8 Oct 2015 - 9:22 am | सनईचौघडा
@ सँडी:- जोशीसाहेबांना मी विचारले की तुम्ही मग तेव्हाच का नाही टंकन चुक सुधारली तर ते म्हणाले की मला काहीच माहित नव्हते की कोणाशी संपर्क करायचा. त्यामुळे ती कविता तशीच राहुन गेली. आणि इतिहास घडला.
मी त्यांना विचारले की तुम्ही कधी कट्याला नाही का जात तर ते म्हाणाले की मी आमच्या जेष्ठ नागरिकांचे कट्टे होतात त्याला जातो आणि तेथे कविता वाचन करतो. मला मिपाच्या कट्ट्याची काहीच कल्पना नाही आहे.
मी फोन केल्यावर त्यांनी तो जुना संग्रह शोधुन काढला आणि मला त्या मुळ कवितेच्या पहिल्या चार ओळी म्हणुन दाखवल्या. मग म्हणाले की मोकळा वेळ मिळाला की फोन करा मी मुळ कविता पुर्ण वाचुन दाखवेन.
तेव्हा सुरेशचन्द्र जोशी यांच्या अजुन अनेक कवितांचे वाचन झाले पाहिजे ह्याला सहमती.
8 Oct 2015 - 9:40 am | चांदणे संदीप
सनईचौघडासाहेब!
तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.
तुमच्या एका फोन कॉल मुळे या काव्याला पक्षी मिपालाच नवचैतन्य आल्यासारखे भासत आहे. श्री. सुरेशचंद्र जोशी यांना भेटून 'मोकळ्या दाही दिशा' या काव्यवाचनाचा मोठा उत्सवच झाला पाहिजे असे मला मनापासून वाटत आहे.
अजून एका गोष्टीबद्दल तुमचे अभिनंदन करायला हवे ते म्हणजे तुम्हाला खुद्द त्यांच्या कडून चार ओळी ऐकायला मिळाल्या, वा!
डोंबिवलीकरांना यानिमेत्ताने पुढाकार घेण्यासाठी मी इथे विनंती करतो.
धन्यवाद!
Sandy
7 Oct 2015 - 9:44 pm | बॅटमॅन
अतिशय जोरदार अणुमोदण!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
8 Oct 2015 - 1:44 am | एस
फारच छान कल्पना आहे!
7 Oct 2015 - 8:37 pm | पैसा
लै भारी प्रकार! या निमित्ताने मूळ कवीना त्यांचे श्रेय दिले हे छान झाले.
7 Oct 2015 - 10:03 pm | अजया
या डोंबिवली कट्टयाला मला जायचेच आहे! डोंबिवलीचे आणि जोशी!
8 Oct 2015 - 9:09 am | नाखु
सारं खरं आहे पण कट्टेसम्राट आणि मध्यवर्ती केंद्र प्रशासक कुठेत? या परमश्रेष्ठ स्थानाचा विषय निघाला आणि ते नाहीत. ए ना चॉल बे !
दोंदीवली कट्ट्याला यायची तयारी असलेला
नाखु सुरक्षीत अंतरवाला.
8 Oct 2015 - 12:54 pm | बॅटमॅन
मलाही!!!!!!!!!!!!!!!!!
बाकी ते दोम्बिवलीचे जोशि आहेत हे नमुद कर्ने अवश्यक अहे.
10 Oct 2015 - 3:12 pm | बोका-ए-आझम
एवढ्या डोंबोली कट्ट्याच्या वार्ता होऊन राहिल्या आणि तुम्ही कुठेतरी गायबलात!नंदी पॅलेस बंद पडेल हं अशाने! ;)