भिकबाळी
मला ह्या दागिन्याबद्दल माहिती हवी आहे. ह्याबद्दल असलेल्या काही शंका/ प्रश्न.
१) 'भिकबाळी' हा योग्य शब्द आहे की ह्या दागिन्याचं मूळ नाव काही वेगळं आहे?
२) ह्याचा नेमका इतिहास काय आहे? ह्याला 'भिक'बाळी असंच का म्हणतात?
३) हा दागिना एखाद्या मुलाला/ पुरूषाला विशिष्ट वयानंतरच घालता येतो किंवा एखाद्या खास प्रसंगानंतरच घालता येतो असा काहि नियम आहे का? ( प्रसंग - उपनयन संस्कार किंवा लग्न )
४) ह्या दागिन्यामधे मोती, पोवळा आणि सोने ह्याव्यतिरिक्त कोणता धातू वापरतात किंवा फक्त ह्याच गोष्टी वापरून भिकबाळी बनविली जाते का?