ऑटो रायटिंग पशुपतीनाथ मंदिरात
कथन – विवेक चौधरी, जळगाव. (नेपाळ यात्रेतील ओकसरांचे सहकारी)
23-26 मार्च 2015 मधे भृगुसंहितेच्या शोधात ओक सरांचे व माझे गमन झाले. त्याचा संक्षिप्त अहवाल आपल्याला अन्यत्र वाचायला मिळेल. त्या प्रवासात ज्या अदभूत घटना घडल्या त्यातील एक होती ती पशुपतीनाथाच्या मंदिरपरिसरात अचानक उद्भवलेले ऑटोरायटिंग...! टीप - आमच्या यात्रेनंतर 25 एप्रिल 2015ला नेपाळमधे धरणीकंप झाला होता.
त्याचे असे झाले की आम्ही आमची नेपाळयात्रा संपवून काठमांडौच्या त्रिभुवन विमानतळाकडे जात असताना पशुपती नाथाचे मंदिर लागते तेथे दर्शन घ्यावे असा आमच्या नेपाळ यात्रेतील सनातन संस्थेच्या काठमांडौमधील सानू थापा नामक साधिकेने बेत ठरवला होता.
त्यानुसार आम्ही मंदिरातील विविध देवतांचे दर्शन घेऊन पुढे सरकत होतो. या मंदिराच्या शिवांची पिंड नेहमीसारखी नाही ती एक तर खूप उंच आहे शिवाय त्याच्या पिंडीच्या दंडावर चार दिशांच्या व उर्ध्व दिशेला एक आकृती आहे.
तिचे दर्शन घेऊन एका यज्ञकुंडापाशी धुनी पेटलेल्या ठिकाणी एक साधू ओणवा पहुडला होता तिथे आम्ही गेलो. तर त्याने तत्परतेने उठून आम्हाला कपाळाला विभूती लावली. जणू तो आमची वाट पहात असावा!
ओकसरांची भावदशा पालटली व आम्ही त्यांच्यासह तिथेच एका हिरव्या जाजमावर मांडी घालून बसलो आणि मी ज्या अनुभवाची वाट पहात होतो ते घडले. सर मला म्हणाले, ‘कागद आहे का?’ मी तत्परतेने डायरीतील पाने फाडून त्यांच्या हातात सरकवली व त्यांची हालचाल निहाळत राहिलो. सरांचे पेन डायरीतील पानाच्या सुरवातीला टेकले. थोड्या अवकाशानंतर ते हलायला लागले. गोलगोल फिरत राहिले. व तो गोल मोठा होत होत गेला अन अचानक पेन पुढे सरकले. आणि ॐ ने सुरवात होऊन नमः शिवाय असा मजकूर येऊ लागला. पुढल्या ओळीत ‘अद्यकाले प्रथम दर्शनाय परांन्त त्वाम अहम दर्शनम देश्यामि’ अशी अक्षरे अवतरित होताना पाहून मला खात्रीने वाटले की हे ऑटोरायटिंग चालू आहे. ते सानू थापांना सांगावे, म्हणजे त्यांनाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला मिळेल पण त्या ध्यानावस्थेत गेल्या होत्या. नंतर सावकाश ते लेखन चालू राहिले. ओक सरांचे मराठीतील हस्तलेखन कसे दिसते याची कल्पना मला आहे पण जे लेखन सावकाश चालले होते ते शब्द टप्पोरे व त्यांच्या नेहमीच्या वळणापेक्षा नक्कीच वेगळे होते. एकदम बराच गोंगाट जवळ यायला लागला. एक बाई जोरजोरात ओरडून, असा दंगा करायला लागली की तिच्या आवाजांचा कर्कशपणाने सर्वांची मानसिक शांतता बिघडली. मी सरांकडे यावर काय प्रतिक्रिया होतेय ते पहात होतो. लेखन थांबल्यासारखे वाटले.... ते खरोखरच थबकले .... त्यांचे पुढील शब्द प्रतिक्रियात्मक होते की... अति दूषणाम.... न चलितः जणु असे सुचवत होते की नाडी ग्रंथावरील अशी ओरड हळू हळू कमी होत होत संपुन जाईल जशी त्या कर्कश आवाजाच्या बाईचा दंगा हळू हळू दूर होत संपला होता. या वाक्यानंतर आशीर्वादात्मक हातात दोन फुलाचे दांडी जागा सोडून पेन पुढे सरकले वाटले आता काय लिहिले जाणार? पाहतो तो ते साकार व्हायला लागले, पशुपती नाथांच्या मंदिरातील पिंडीचे प्रतीकात्मक चित्र...उंच पिंड बुडख्यात चौकोनी वरच्याभागी चारी दिशांना शिवांचे मुखवटे आणि शिरोभाग गोलाकाराऐवजी चपटा व त्यावर काही आकृती असा मोहरा असलेले चित्र साकार होता होता, ॐ असे लिहून जरा मोठ्या आकारात शङ्कर शुभाशीषः असे लिहून एक सरळ रेषा येऊन सरांच्या हातातून पेन सटकले. जणू काही गळून पडले. मी ते न्याहाळत असताना माझे लक्ष सानूंकडे गेले. त्या ध्यानसाधनेत इतक्या मग्न होत्या की मगाशी कर्कश्य आवाजाचे त्यांच्यावर काही आघात झाले नसावेत असे वाटले! नंतर सर तर नॉर्मल झालेले वाटले. पण सानूंना डोळे उघडायला पुढे 5 -7 मिनिटे लागली. फारच छान साधनेत आनंद मिळाला असे त्यांनी शांत आवाजात म्हटले. (तिथे फोटो काढायला सक्त मनाई आहे. मी तरीही हिय्या करून ओक सरांचा फोटो काढायला लागलो तर लगेच कोणीतरी फटकारले, ‘ फोटो लेना बंद करो’ कोणी म्हटले तरीही त्या धांदलीत क्लिक झाला)
या लेखनाचा सार अर्थ सरांना जो वाटला तो त्यांनी आमच्याशी बोलताना म्हटले की असे संस्कृत मधून प्रथमच लेखन घडले. ते व्याकरणदृष्ट्या किती शुद्ध आहे याची कल्पना नाही. ‘शङ्कर’ असा उल्लेख आला तेंव्हा त्यांना वाटले की ते आदि शंकराचार्य असावेत. नंतर आम्ही शंकराचार्यांनी स्थापलेल्या पीठाच्या परिसरातील आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे दर्शन झाले. मग पक्के झाले की हे लेखन कोण करवते आहे ते.
लेखनाचा सार अर्थ - आत्ता पशुपतीनाथाचे प्रथम दर्शन झाल्यावर तुला मी (आदिशंकराचार्य) दर्शन देईन. यानंतर भृगुंचे विराट दर्शन करावे. (दि. 27 ते 29 मार्च या काळात आमच्याकडून भृगु संहितच्या वाचकांच्याशी झालेल्या प्रदीर्घ संवादातून ते भृगु संहितेचे विराट दर्शन झाले.) दीनानाथ म्हणजे (भगवान) रामचंद्रांचे दर्शन झाल्यावर तुझ्या मनातील उद्देश फलित होईल. (ते दर्शन नंतर, 28 मार्चच्या रामनवमीला अनायास घडले.) आता (यापुढेही) अगस्त्यादि अन्य महर्षींचे आशीर्वाद तुम्हाला मिळोत. तुझ्यासाठी जे लोक (नाडी) ग्रंथांच्याप्रती श्रद्धाभावाने मदत करतात अशांच्या मनोकामना पुर्ण होवोत. तुझा महर्षींच्या साहित्यसाधनेप्रती श्रद्धाभाव वर्धित होत जाईल.... खंड पडल्यानंतरचे लेखन.... (आत्ता जसे) अती दूषणे देणे ऐकायला येतयेत क्षीण झाले तसे कालांतराने नाडीग्रंथाना नावे ठेवणाऱ्यांचा कोलाहल क्षीण होत शांत होईल.
लेखन असे होते – ॐ नमः शिवाय
अद्य काले प्रथमः दर्शनाय परान्त त्वाम अहम् दर्शनम् देश्यामि ।
उपरांन्ते भृगु विराट दर्शनम् करिष्ये। दीनानाथ दर्शनम् त्वाम मतितः उद्देश्यो फलितस्मि।
अथ अगस्त्यादि अन्य महर्षिणाम् आशीर्वादः पान्तु। त्वम् सहितः लोकेण मनोकामनाम फलितः। त्वाम् महर्षीणाम् साहित्य साधना प्रति श्रद्धाभाव वर्धिष्णु..... गताः ।........... अति दूषणाम् चलितः काले काले शान्त करिष्यामिः। ॐ शङ्करम् शुभाशीषः
आशीर्वादात्मक हस्तमुद्रा असून त्यानंतर पशुपतीनाथाच्या शिवपिंडीची आकृती.
समाप्त.
ओक सर गेली कित्येक वर्षे ऑटो रायटींग करतात. पुर्वी ते शिकवतही असत परंतु आता त्यांना ऑटोरायटींगमधून आलेल्या आदेशा अनुसार ते सध्या थांबवले आहे. त्यांच्या या ब्लॉगवर काही अधिक माहिती मिळते. त्यांचे अन्य 14- 15 ब्लॉग या वेब साईटवरून पाहता येतात. त्यातील काही मी ही अद्याप पाहिलेले नाहीत.
प्रतिक्रिया
1 May 2015 - 12:32 am | एस
राग मानू नका, पण ही शुद्ध अंधश्रद्धा आहे. असो. तुमची शोधयात्रा निर्विघ्न पार पडली याचा आनंद वाटला.
1 May 2015 - 12:55 am | यशोधरा
.
5 May 2015 - 12:08 pm | खंडेराव
मान्य.
1 May 2015 - 12:46 am | योगविवेक
आपल्या मताबद्दल...
1 May 2015 - 5:21 am | कंजूस
!!!!!!!!!!
!!!!!!!!!!
1 May 2015 - 11:37 am | आदूबाळ
माझ्या परीक्षेचे पेपर कोणीतरी ऑटोराईट केले असते तर काय मजा आली असती...
1 May 2015 - 1:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सी.ए.चे पेपर शुद्ध संस्कृतमधे बघुत परि़क्षक मुर्च्छित झाले असते. =))
1 May 2015 - 1:26 pm | सतिश गावडे
ऑटोरायटींगमध्ये "स्पिरिट" लिहितो असे म्हणतात. इथे ओककाकांकडे आलेल्या स्पिरिटला संस्कृत येते म्हणजे ते आदुबाळ यांच्याकडे येणार्या स्पिरिटला संस्कृत येत असेल हे कशावरुन?
1 May 2015 - 1:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वर गेल्यावर खंपल्सरी संस्कृत शिकायला लागतं त्यामुळे "टोटल रिकॉल" झाला की डायरेक्ट संस्कृतात लिहिता येतं असावं. ;)
शिवाय सी.ए. चा पेपर असल्यानी आदुबाळ थेट अर्थशास्त्रवाल्या पाणिनीला कौटिल्याला रिकॉल करणार नाहित का =))
1 May 2015 - 1:45 pm | सतिश गावडे
पाणिनी व्याकरणकार होते. अर्थशास्त्र कौटिल्याचे. बघा, अशाने चुकीचा स्पिरिट यायचा. आणि अर्थशास्त्राच्या पेपराला देव शब्द चालवायचा.
1 May 2015 - 1:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
स्वारी स्वारी. कौटिल्याचे. बाकी कौटिल्य, चाणक्य आणि पाणिनी हे एकाचं शाळेत शिकायचे आणि पार्ट टाईम चंद्र्गुप्त मौर्याला धडे द्यायचे असा घोळ डोक्यात असल्यानी गडबड झाली. संपादित करतोय. लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद :)
1 May 2015 - 1:55 pm | सतिश गावडे
विनोद बाजूला, यावर एक पुस्तक वाचले होते. दि लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड
3 May 2015 - 10:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पीडीएफ असेल तर द्याल का?
1 May 2015 - 1:56 pm | पैसा
खूप शांततेने ध्यान होते.
मात्र ऑटो रायटिंग आणि ते करतात/शिकवतात यात विरोधाभास वाटत नाही का?
1 May 2015 - 2:04 pm | सतिश गावडे
मी यावर थोडेसे वाचले होते. मन "ट्रान्स"मध्ये गेल्यावर "अनकॉन्शियस" विचार आपोआप लिहिले जातात अशी काहिशी संकल्पना आहेत ती. जे ही संकल्पना मानतात त्यांच्या मते "आत्मा" येऊन त्यांच्याकडून लिहून घेतो.
पूर्वी काही मनोविश्लेषक हा प्रकार मनोविष्लेषणासाठी वापरायचे. मात्र याला काहीही वैज्ञानिक आधार नाही.
1 May 2015 - 2:30 pm | पैसा
आम्ही लहान असताना प्लँचेटचा खेळ करायचो. पाटावर एबीसीडी काढायची आणि नाणे ठेवून त्याला तीन जणांनी बोट टेकवायचे. ते नाणं आपोआप हलत अक्षरांवरून फिरायचे असलं काहीतरी आठवतंय. एकदा आम्ही गांधीजींना बोलावले आणि मग घाबरून काही न विचारताच परत पाठवले! मग कितीतरी दिवस गांधीजी दिसतील का काय म्हणून भीती वाटत होती!
1 May 2015 - 3:07 pm | कवितानागेश
पैसाकका, तू गांधीजींना घाबरतेस? ;-)
1 May 2015 - 4:00 pm | पैसा
मला तर लहानशा चित्रातले गांधीजी फारच आवडतात!
2 May 2015 - 7:01 pm | विकास
एकदा आम्ही गांधीजींना बोलावले आणि मग घाबरून काही न विचारताच परत पाठवले!
काहीही... बिचारे गांधीजी, त्यांना तुम्ही (पक्षी: लहानपणच्या पैसाताई आणि तशीच इतर मुले) दिसल्यावर तेच घाबरून निघून गेले असतील.
2 May 2015 - 7:36 pm | पैसा
शक्यता नाकारता येत नाही!
2 May 2015 - 6:47 pm | योगविवेक
सुंदर रेसिपी बनवणे व इतराना ती कशी करायची हे शिकवणे असा काही प्रकार आहे कि काय? वरील प्रतिसादातून हे प्रकरण नक्की काय असावे असा अंदाज हसत खेळत बांधला जात आहे...
ऑटोरायटींग सुरू करताना ओक सरांचा विषय "ऑटोरायटिंग म्हणजे काय?" हाच आहे त्यामुळे साहजिक अनेक संकल्पनांवर त्यातून प्रकाश पडतो. ऑटोरायटिंग कोण करतो? ते प्रत्येकाला करता येईल का? ऑटोरायटिंग करताना हस्ताक्षरात फरक पडतो का? कोणत्या भाषेत ते होते? कार्ल, अवतार मेहेरबाबा वगैरे त्यात कोण कोण व कसे सामिल होते? त्याचे फायदे काय? ऑटोरायटिंग हे भविष्य कथनाचे माध्यम आहे काय? वगैरे वगैरे...
सरांच्या ब्लॉगवरून ही माहिती मिळते. वेबसाईट व ब्लॉगची लिंक धाग्यात सादर केली आहे.
या ब्लॉगवरील माहिती बरेच दिवसात पुढे सरकली नाही असे दिसते कदाचित उत्सुकता वाटणाऱ्यांनी तिथे विचारणा केल्या तर आणखी माहिती सरांकडून मिळू शकेल...
2 May 2015 - 7:37 pm | पैसा
प्रकरण काय आहे ही शंका आहेच, पण ऑटो म्हणजे आपोआप होणारे. ते "करता" कसे येईल? हा माझा प्रश्न आहे. आपोआप होणारे असेल तर ते करायला शिकवता कसे येईल?
2 May 2015 - 9:25 pm | विशाखा पाटील
पेन व्यक्तीच्या हातातच असते ना ? मग कसले ऑटो!
लहान मुलेही गृहपाठात, कच्च्या वहीत आणि परीक्षेत वेगवेगळे हस्ताक्षर काढतात.
3 May 2015 - 10:19 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
माझा ह्याच्यावर अनुभव घेतला नसल्याने विश्वास नाही. पण बहुधा समाधिअवस्थेत म्हणा किंवा ज्याला इनर पीस म्हणलं जातं अश्या शारिरिक अधिक मानसिक स्थितीमधे आपले विचार अधिकाधिक स्पष्ट होतं जातात. कदाचित अश्या विशिष्ट अवस्थेमधे "अनकाँशस" स्टेट ऑफ माईंड मधे लिहिलं जातं असावं. एका खुप जुन्या लेखकाच्या अनुभव लेखनामधे त्याला रायटर्स ब्लॉक आलेला असताना अश्या अवस्थेमधे देवी सरस्वतीचं दर्शन झाल्याचा आणि साक्षात देवीनी लिखाण पुर्ण करुन घेतल्याचा उल्लेख कुठेतरी वाचल्याचा आठवतो. नावं आठवलं तर देईनचं.
ऑटो रायटिंग वर नसला तरी माईंड सुपरस्टेट वर माझा संपुर्ण विश्वास आहे कारण स्वतः अनुभव घेतलेला आहे. कधीतरी वाटलं तर लिहिन ह्याच्यावर.
3 May 2015 - 12:17 pm | प्रकाश घाटपांडे
मनोरंजन झाले.
5 May 2015 - 12:28 pm | स्पा
काहीच समजले नाही
5 May 2015 - 6:55 pm | प्रसाद गोडबोले
अच्चा अचं जालं तल !
=))
5 May 2015 - 7:06 pm | बॅटमॅन
दू..दू मोड ऑन
पां...डुब्बा आणि गिर्जा..का का?>> (महाभयानक स्मायल्यांचा नायगारा धबधबा)
दू..दू मोड ऑफ
5 May 2015 - 7:09 pm | सूड
दू..दू मोड ऑन
पां...डुब्बा आणि गिर्जा..का का?......हाका नाका हाका नाका>> (महाभयानक स्मायल्यांचा नायगारा धबधबा)
दू..दू मोड ऑफ
.हे असं हवं ते!! ;) बाकी का ने संपणारे कोणतेही शब्द चालतील म्हणा, मला ऐनवेळी आठवलं ते लिहीलं.
5 May 2015 - 7:22 pm | बॅटमॅन
अर्र हो की! धन्यवाद!
विद्युन्माला वृत्ताचे वरिजिनल उदा.
"विद्युन्माला ऐसे बोला | जेथे मामा गागा आला|" असे असताना गडकर्यांनी त्याचे
"पाला नाला जोडा फोडा | बाबा काका मामा आत्या|" असे रूपांतर केले होते ते आठवले. अगोदरच्या वृत्तलक्षणात फक्त मामा होता, इथे सर्वचजण आहेत, असे कारणही दिले होते. ;) तद्वतच इथेही.
5 May 2015 - 11:35 pm | स्वप्नांची राणी
मामा गागा नाय हो...लेडी गागा..!!
5 May 2015 - 11:37 pm | सतिश गावडे
हा स्पिरिट अंगी संचारल्याचा परिणाम असावा काय?
6 May 2015 - 5:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही हा झोप संचारल्याचा परिणाम. स्पिरिट संचारल की स्व.रा. सिक्सर वर सिक्सर मारतात. रेफ्रन्स ऐलवनी धागा =))
6 May 2015 - 12:29 pm | बॅटमॅन
गोविंदाग्रज गडकरी १९२० सालीच वारले हो. त्यामुळे लेडी गागाची आजीदेखील तेव्हा जन्मली असेल किंवा नाही याबद्दल अंमळ डौट आहे.
6 May 2015 - 5:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
व्याकरणशिरोमणीपंडितरावबॅट्टुकभट्ट्गॉथमहळ्ळीकरम्हाराजकीजय!!!
5 May 2015 - 2:15 pm | सूड
जे 'ऑटो' आहे, ते शिकवता येऊ शकतं?
5 May 2015 - 7:38 pm | स्पा
टॅक्सी रायटींग बद्दल कोठे माहिती मिळेल?
5 May 2015 - 8:57 pm | सूड
मला विमान रायटिंग बद्दल हवंय, उडून जायला बरं !! ;)
5 May 2015 - 10:39 pm | सतिश गावडे
माझा इथला एक प्रतिसाद उडवण्याचे कारण काय असावे बरे?
ज्या प्रतिसादाला मी उपप्रतिसाद दिला तो मुख्य प्रतिसाद उडवला म्हणून माझाही प्रतिसाद उडवला का?
माझ्या प्रतिसादात आक्षेपार्ह असे काही नव्हते.
प्रतिसाद काहिसा असा होता:
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेल्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकात नाडीग्रंथांवर एक स्वतंत्र प्रकरण असून त्यामध्ये डॉ. दाभोलकर, जयंत नारळीकर आणि ओक काका यांच्यातील पत्रव्यवहार तसेच नाडीग्रंथांच्या सत्य-असत्यतेविषयी उहापोह केला आहे.
5 May 2015 - 10:47 pm | पैसा
गल्ली चुकलांव काका!
5 May 2015 - 11:01 pm | सतिश गावडे
गल्ली चुकलीच.
स्पिरिटाने दोन ठिकाणी ऑटो रायटिंग केले असेल हे आधी माझ्या ध्यानीच आले नाही.
मात्र शिळ्या कढीला उत आणलाच आहे तर हा ही प्रतिसाद असू द्या ही विनंती.
5 May 2015 - 11:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
इतकं 'स्पिरिट' अंगात 'घेणे' बरं नव्हं ;) :)
5 May 2015 - 11:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हे जब्राट होतं.
5 May 2015 - 11:14 pm | सतिश गावडे
माझे प्रतिसाद हे इतरांना शहाणे करण्यासाठी असतात. त्यामुळे माझा प्रतिसाद अप्रकाशित झाला आहे या कल्पनेनेच मी कासाविस होतो. माझे प्रतिसाद अप्रकाशित झाले तर लोक शहाणे कसे होणार ;)
5 May 2015 - 11:17 pm | पैसा
हा धन्या बोलतोय का एका आयडीचे स्पिरिट?
5 May 2015 - 11:20 pm | सूड
मला एक प्रश्न आहे? आयडीचा स्पिरीट स्पिरीट प्यायला असेल तर ऑटो रायटिग नागमोडी होतं, विमानं उडतात की तो स्पिरीट आडनाव सार्थ करतो?
5 May 2015 - 11:21 pm | सतिश गावडे
कोण धन्या? धन्यवाद.
5 May 2015 - 11:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ब्लॅक होल थिअरीचा इथे काय संबंध आहे? फार फार तर थिअरी ऑफ रिलेटीव्हिटीचा थोडासा रेफ्रंस घेता येईल. बाकी कांदा स्वस्त झाला हे ऐकुन फार बरं वाटलं बघं.
चायला कैच्या कै लिहिलं जात हल्ली आपोआप ;)
5 May 2015 - 11:25 pm | सतिश गावडे
ब्लॅक होल थिअरी आणि थिअरी ऑफ रिलेटीव्हिटी यांच्यात काही संबंध आहे का?
5 May 2015 - 11:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
बोलविता धनी असा एक वाक्प्रचार मराठीला बहाल करायचा का? :P
5 May 2015 - 11:22 pm | सतिश गावडे
ते "लिहविता पेनी" असं अधिक योग्य दिसेल.
5 May 2015 - 11:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तसबी चाललं.
6 May 2015 - 1:42 am | चौथा कोनाडा
सुरस अन चमत्कारीक !
खंडोबा नंतर याच्या वर टीव्ही सिरियल काढता येइल.
6 May 2015 - 5:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
खंडोबाचं लगिन झालं म्हनं दुसरं? हायला, तीन बायका फजिती ऐका नामक अनासपुरेपट पाहिला नसावा देवानी.
6 May 2015 - 12:15 pm | टवाळ कार्टा
वाईच थांब...आत्ताशी दुस्रे लगीन झालेय :)
6 May 2015 - 1:59 pm | सूड
आत्ताशी नाय रे, बानूशी दुस्रे लगीन झालेय.
6 May 2015 - 8:50 pm | कंजूस
भृगुसंहितेचं काय झालं?
6 May 2015 - 9:02 pm | सूड
नीट वाचलंत तर ते 'शडःकरम' आहे. विसर्ग कसा दिलंनीत?
6 May 2015 - 9:59 pm | विकास
ही चर्चा चालू आहे का ऑटो rioting चालू आहे? ;)
6 May 2015 - 10:38 pm | पैसा
आटोम्याटिक!
7 May 2015 - 12:02 am | चैदजा
आधी मला वाटल, नेपाळ मध्ये ऑटोरिक्शावर केलेल रायटींग, जस ट्रकच्या मागे लिहलेल असते तस.