दि. ७ जून रोजी पुण्यात होणारा कट्टा
पुण्यातल्या आगामी कट्ट्यांवर जोरदार चर्वण होऊनही घोळ काही मिटेना, म्हणून पुनश्च धागा.
हा धागा फक्त दि. ७ जून, रविवार रोजी होणाऱ्या कट्ट्यासाठी आहे. ६ जूनच्या कट्ट्याचे कबाब इथे भाजू नयेत, ही नम्र विनंती.
तर, ७ जूनला कट्टा करायचा हे ठरले आहे.
१. आधीच्या द्वि की त्रिशतकी धाग्यात आनंदी डायनिंग हॉलचे नाव फायनल झाले आहे. तिथल्या थाळीबद्दल शंका असली तरी तेच नाव फायनल करायचे का? तिथे जवळपास भेटण्यासाठी उद्यान असेल तर उत्तम. साधारण ११ वाजता भेटून १२.३० ला जेवायला जायचे, हा एक पर्याय आहे.