तुकाराम होणे
आज तुकाराम बीज. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी
विनम्र अभिवादन.
तुकाराम होणे
विठ्ठल होणे सोपे आहे
कठीण तुकाराम होणे
मंबाजीची काठी खाणे
त्याचे हात कुरवाळणे
कठीण दुष्काळ सोसणे
रोखे इंद्रायणी बुडविणे
गोदाम जनात लुटविणे
आपुले दिवाळे काढणे
कठीण भंडारी एकांत
सोयरे वनचरा होणे
अंगी वृक्षवल्ली होऊन
डोई पाखरू बसणे
कठीण दैवासी हासणे
आई बाप गमावणे
पत्नी पुत्रा अग्नी देणे
विठो चरणी विसावणे