गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३७

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
8 Apr 2015 - 2:12 am

मागिल भाग..

"तुमच्या मधली प्रीती अविच्छिन्न राहो." भावार्थ तर कळला होताच..पण त्यातल्या प्रीती.., या शब्दाचा मतितार्थ कळण्यासाठी, मी माझ्या सुभगेसह..एका सर्वस्वी अनोळखी..परंतू जगण्याला नवी दिशा आणि आनंद देणार्‍या नव्या जीवनाच्या वाटेवर निघालो होतो.
पुढे चालू...
=====================

"गगन...सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश.... देई अभय...गगन...सदन..."

"आत्मू... अरे तुझी ती गाणी किती वस्तू कुठे कुठे विसरायला लावतात रे........!!! हा टॉवेल घे..!तसाच(?) गेलायस अंघोळिला!,आणि वास्तु(शांति)ला न्यायच्या पिशवीत ते कलश कधी..उद्या टाकणारेस का??? नायतर पर्वा सारखा येशील परत अर्ध्यावाटेतून दर्भ विसरलेले न्यायला आलावतास तसा..!"

झाssलं!...सलग तीन/चार वाक्यांचा भडीमार करून,माझ्या मस्त मुडात आलेल्या गाण्याचा, हिनी नेहमीप्रमाणे बाथरुमच्या दारावरुन टॉवेल फेकुन सत्यानाश केला! सत्यानाशच म्हणायला हवं ना हो? सत्य उमगत असतानाच कुणितरी मधे येतं..आणि मग ते प्राप्त होत नाही. म्हणजे एकंदर बरोबर बोललो ना मी!? अहो काय आहे माहित्ये का? मला हे गाण्याचं वेड तिकडे त्या कोकणात होतो ना,तेंव्हाही होतच हो. पण आता इकडे पुण्यात बदली झाल्यापासून ना ,हे एक बाथरूम नामक ४बाय्३फुटाचं कोंडाळं सोडलं..तर कुठेही मोकळ्या(सोडलेल्या..)गळ्यानी आणि मुक्त कंठानी गाता येत नाही हो. तिकडे कोकणात कसं..,हे असलं 'खोलित(म्हणजे रहायच्या!) केकाटू नका'..असं बायका नवर्‍यांना कध्धिही ओरडत नाहित. (म्हणजे असा माझा एक नम्र समज आहे. ;) ) फक्त कधितरी भांडणात अगर इतर कारणानी..नवर्‍याला, 'रेडा बरा हो..यापेक्षा!' किंवा 'कॉफि दिल्याशिवाय रफि'चं भूत उतरणार नाही' अश्याच माफक प्रतिक्रीया येतात. एरवी कोणाला कोणाकडे सकाळी उठल्यापासून बघायला वेळच नसतो. त्यामुळे मी तिकडे माझे पाठशालीय जीवन वजा जाता एरवी हवं तेंव्हा सहज कोकलत असे. मग ते आमच्या शाळेखालच्या हाटेलात असो..किंवा रामाच्या देवळाबाहेरिल पार असो. किंवा अगदी गावात कुणाकडे भर दुपारि श्राद्धाला पायीपायी जात असताना असो. शिवाय कुठे कोणतं गाणं गावं? अगर काय कुणी बोलावं? याला कोकणात एकंदरितच कुठेही विशेष असा विधिनिषेध नसतो. फक्त मर्तिकाला लग्नासारखं,आणि लग्नाला मर्तिकासारखं काहिच वागू/बोलू नये,एव्हढा जनंरितीचा सामान्य संकेत वजा जाता कुण्णिही कुणाला हटकत नाही. आणि हटकायचच झालं,तर पूर्ण हटकतो..थोडा अगर अर्धा'च नाही.

एकदा रामाच्या देवळाजवळ सांजेच्याला आमचा आवशिच्या खळ्या मागचा रामू कोंडकर, 'रोजचा टाइम-झालेला' असल्यामुळे, तिकडनं-होऊनच रस्ता मापत येत होता. पण ती चाल बदललेली असली,तरी गाण्याची सुटली नव्हती. म्हणजे- तुज्या गंलां माज्या गंलां,गुंपू मोत्यांच्या माला..ट्याण्याण्याण्या ट्यें.. असं विथ म्युझिक म्हणत तो येत होता. त्यात मधे देऊळ-लागलं,ही जाणिव झाल्यावर तो एकदम गप! आणि मला 'राम राम आत्मूभट' असं म्हणून पुढे सरकला..मग पुन्हा त्याचा तो 'तुज्या गंलां..' चालू झाला. पण ते ही तो, मुक्त कंठांनी गात होता. लोकलज्जेचं हे निरर्थक भय त्यालाहि नव्हतं,आणि ऐकणार्‍यांनाहि! मी देखिल एकदा गावात आमच्या सहकारि पुरोहित मित्र विज्याच्या घरी शिरता शिरता 'गेले द्यायचे राहूनी..तुझे नक्षत्राचे देणे..'- वर होतो. आणि मधेच विज्याला.. मी "विज्याssssss" मग विज्याचं मागनं गोठ्यातनं ते कोकणातलं खास कोकिळेच्या दुरून येणार्‍या आवाजासारखं, "ऊssssss" ..आणि त्यात विज्याची आई.."आत्मू... कुणाला काय द्यायचं राहिलय रे? पर्वा तुझी आइस पापडखाराचं बोल्लिवती.त्यातलं का काही आहे?" असं नम्रपणे विचारत ओटीवरन आंगण्यात आली. मग विज्यानी कपाळावर हात मारत तिला.."अंगं नाय काय..तो आत्मू म्येला वाट्टेल तेंव्हा भावगीतं सोडत-असतो.ते ही त्याच्या(च) विविधभारती वरुन..तू जा आत!" असं करून प्रकरण मार्गावर घेतलं होतं. पण ह्या प्रसंगाला त्याच्याही घरातल्या इतरांनी ,"आकाश कोसळल्यासारखं" पाहिलं नव्हतं.

पण याच ऐवजी.. तुम्ही अशी कल्पना करा, की आपण पुण्यात अलका टॉकिजच्या महासिग्नलला गाडिवर किंवा शनिपारावर बसस्टॉपला उभे आहोत ,आणि तिथे एकदम "ओ मेरी..ओ मेरी..ओ मेरी शर्मिली..." असे मर्यादित आवाजात गुणगुणत-सुरु झालो..,तरी ह्या शहराच्या मूलभूत तत्वांनुसार एकावेळी किमान वीस कटाक्ष तरी अनेकांगानी आपल्याकडे पडतील. याखेरिज कुणी खिश्यातून नाणि काढायला(द्यायला नव्हे!) सुद्धा सुरवात करेल. त्यामुळे पुण्यात मुक्तगायनवाद्यांना बाथरूम हीच खरी गळा सोडायची हक्काची जागा आहे. आणि त्यातंही ते पुणेरी वाड्यातलं दोन खोल्यांच्या भव्य जागेत-काढलेलं बाथरुम असेल,तर आणखिनच मजा! कारण,तिथे जसा आवाज-लागतो..तसा एखाद्या अत्याधुनिक श्टुडिओत पण नाही लागायचा. हे मी अगदी खात्रिनी सांगू शकतो. असंही मला आमच्या त्या महान वाड्याच्या मध्यभागी उभं राहून बोंबलायचं असतं,तर अगदी मालकंही ओरडायला येणार नव्हता. पण ह्या गुरुजिच्या पोश्टमुळे ते तिथेही शक्य नव्हतं. कारण आंम्ही शेवटी काहि झालं,तरी पुरोहित म्हणजे पुणेरी भाषेत गुरुजी ना? मग मनात काहिही असलं,तरी जनात सज्जनासारखं म्हणजे सामान्य माणसापेक्षा वेगळच वागलं पाहिजे हा नियम!

पण काय आहे ना? आधी ही आमच्या बाथरुम सिंगिंगच्या कथेपेक्षा,मी कोकणातून पुण्यात कसा आलो? ही कथा सांगायला पाहिजे. त्याचं झालं असं,की लग्नानंतर पहिलं एक वर्ष जे मजेतच जातं,तसं ते तिकडे अगदी सुखासमाधानानी व्यतीत होत होतं.पण माझीया वाढत्या वयाच्या कथित पक्वतेमुळे असेल,किंवा सदाशिवदादाच्या धंदेवाइक तापटपणामुळे असेल..माझं त्याच्याबरोबर एकंदरीतच जमेनासं व्हायला लागलं. आणि ही गोष्ट काकाच्या लक्षात आलीच. मग त्यानीच एक दिवस घरच्या सगळ्यांची रात्रीच्या जेवणानंतर आंगण्यात मिटींग घेतली..आणि "आपलेकडे वहिवाटीची गावं अगर घरं नसले कारणानी आत्मूला, पुणे किंवा मुंबईप्रांती सदर व्यवसायास्तव पाठविण्याचे करावे" असा ठराव त्यानी घरच्यांची नाराजी ओढवूनंही पास करवून घेतला. त्याचं म्हणणं असं ,की आत्मू इथे स्वबळावरंही चार गावात पैसा नक्की कमवेल. पण त्याची खरी कसोटी लागायची असेल,आणि त्याला यशस्वी झालेलं तुम्हाला पहायचं असेल..तर त्यानी आता शहरच गाठलं पाहिजे.आणि ते ही कोकणप्रांतातलं नको. आणि मलाही स्वतःला हेच हवं होतं.कारण पुण्यातून माझेच अगदी पाचाला चांगले पंधरा मित्र लग्नाआधीपासून तिकडे कूच करायची आमंत्रणं देत होते. मग रहाता राहिला होता,तो प्रश्न-'हीचा आणि घरच्यांचा'. मला आधी वाटलेलं की 'ही' तयार होणार नाही..आणि मला एकट्यालाच मनात बळ घेऊन पळ काढावा लागेल. पण हिनी मात्र "माझ्या आर्ट कॉलेजच्या इतक्या तितक्या मैत्रिणी पुण्यात आहेत,त्यामुळे मला कै प्रॉब्लेमच्च नै" असं काकाच्या कानी गुणगुणलेलं असल्यामुळे,घरचे लोक हा एकमेव पक्ष सह करणे एव्हढीच गोष्ट शिल्लक राहिली होती. ती काकानी त्याच्या अधिकारवाणिनी आणि युक्तिवादानी अवघ्या दहा मिनिटात सर करुन दाखविली. फक्त आइचं "तिकडे जागा कशी मिळेल? आणि कामं कशी कुठून मिळतील? " इत्यादी..इत्यादी..इत्यादी.. संपत नव्हतं. त्यावर आज्जीनी तिला, "अगो..नापितास आणि भटास कुठेही कामाला भांडवल गो काय लागते? दोघांसंही पाणि मिळाले,की ते - सुरु होतात. एव्हढे साधेसे तुला कळंत कसें नाही?" असं म्हणून आइला मुद्द्यातच खोडायला सुरवात केलेली होती. बाबा तर कामानिमित्त अनेकदा पुण्याला आले गेलेले असल्यामुळे त्यांना माझी त्या शहराच्या आणि माझ्या असलेल्या अंदाजावरुन अजिबात काळजी वाटत नव्हती. मग शेवटी आईचं मन काहि शांत होत नाही ,हे पाहून शेवटी सखाराम काकानी तिला, " अगो मी संघटनेचे काम इथे करत असलो,तरी अख्ख्या महाराष्ट्रात माझे बरेच हनुमंत आहेत हो..ते तुझ्या राजकुमारास जागा देतील शोधून . काय समजलीस? माझ्यावर विश्वास आहे ना????" असं जवळ जवळ दमात घेऊनच सांगितलन. मग मात्र मातोश्रींचा कुठे तरी तीळाच्या दाण्याएव्हढा विश्वास बसायला सुरवात झाली. मग आधी सहा महिने तिकडे जागा मिळून जरा जम बसे पर्यंत मी एकट्यानीच जायच असं ठरलं..आणि मी पुण्यातल्या मित्रांना फोनाफोनी करून ऐन श्रावणाच्या भरदार हंगामीच तिकडे कूच करता झालो.

काकाच्या मित्रांनी पुण्यात माझी रहायची सोय.. म्हणजे पहिले १५ दिवस एकांच्या घरीच केलेली होती. आणि तेच गृहस्थ मला न्यायलाही स्वारगेटाला आले होते. आणि मग त्या दिवशी संध्याकाळी आमची लालमातीतल्या शिल्लक खुणा चाकांवर आणि अंगावर वागवीत..ती आमची येश्टी स्वारगेटात दाखल झाली. मी माझ्या काहि दोस्त मंडळींना कळविलेलं होतच. त्यातले दोन जणं (संजय आणि गोंद्या..) त्या स्वारगेट मधल्या भव्य झाडाच्या पारा बाजुच्या, बॉनबॉन ग्राइप वॉटरच्या जाहिरातीच्या बोर्डापाशीच उभे होते. मला मात्र ती "बाळाला द्या बॉन बॉन,बाळ होइल गुटगुटीत छान!" ही अक्षरं दिसली. आणि प्रवासाचा सगळा शीणच एकदम नाहिसा झाला. काय आहे ना? पंढरीत जसं वारकर्‍याला लांबुन कळसाचं पहिलं दर्शन झाल्यावर बरं वाटतं..तसंच मलाही भल्यामोठ्ठ्या येश्टी श्ट्यांडवर हे असले बोर्ड दिसले की तसच बरं वाटत. ते का? ते माहित नाही..पण ते तसं वाटतं हे खरं. आणि मी जसा येश्टीतनं उतरलो,तशी माझ्या आधी येऊन स्थायिक झालेल्या माझ्या त्या पाठशालीन मित्राची गोंद्याची हाक आली.."या हो आत्मंभट्ट महाराज या". मी उतरलो आणि दुसर्‍या मित्रानी म्हणजे संजयनी माझी पिशवी घेत,खास त्याच्या मराठवाडी श्टाइल मधे "आता माज्याच घरी यायलास ना? दुसरीकड नाय ना..?नको जाऊ बरं..,तू येनार म्हनुन मोप जेवन करुन ठ्येवलय बायकोनी" असं खरोखर आदरातिथ्य दाखविणारं स्वागत केलं.

मग माझे ते दोन व्यवसाय बांधव आणि मी मिळून आधी त्याच पारावर काहि क्षण विसावलो. पण माझी नजर मात्र लगेच काकाच्या मित्राला शोधू लागली.कारण त्यानी दिलेल्या वर्णना बरहुकुम माणूस मला काहि कुठे दिसेच ना! मग मी जरासा भांबावलेलो आहे..हे ओळखून संजयनी मला, "कुनाला शोधायला रे?" असा प्रश्न विचारला.मग मी त्याला, कोण? काय? .. ते सांगितलं..आणि तेव्हढ्यात मागून "आत्माराम तूच ना रे?" अशी सूचक हाक आली. आंम्ही तिघेही वळून बघतो,तर काकाच्याच वयाचे एक गृहस्थ मागे उभे! मी त्याच भांबावलेल्या स्थितीत 'हो' वगैरे म्हटलं. आणि त्यांनी लगेच "ह्हूं....सखाराम म्हणाला ते खंरं आहे. त्याच्या इतकच तुझंही 'नेटवर्क' तयार आहे हो!" असं म्हणून आम्हा तिघांचंही त्या खास पहिल्या पुणेरी चेंडुनीच स्वागत केलं. आणि पुढे, "पण आता चला हो लवकर घरी..संध्याकाळचा आणखि उशीर नको,नाहितर रिक्षावाल्यांना शोधत शोधत घरी पोहोचावं लागेल" असा दुसरा अजुन एक सूचक चेंडू टाकला. पण आमचा मराठवाडी संज्या ह्या असल्या चेंडूंना चांगला सरावलेला होता. त्यानी त्या काकांना "आओ असू दे ओ काका..रिक्षा नाय आली तं पिएमटी आहे की रातची धा वाजेपरेंत " असा फ्रंटफूट्वर-प्लेड केला. मी एकंदरीत पुढे काय घडू शकेल्,याची कल्पना आल्यानी आमच्या मित्रमंडळींना समजावणी करून त्यांची बोळवण केली..आणि सदर गृहस्थांबरोबर जायला निघालो.

मग दुसरा दिवस उजाडला..संध्याकाळी पुण्यातल्या आमच्या भटजिलोकांच्या मिटींगप्लेसवर म्हणजे व्यावसायिक भाषेत ब्रम्हवृंद मंडळात-जाणे झाले. मी संजू आणि गोंद्या बरोबर आत गेलो. मग गोंद्यानी माझी तिथे जमलेल्या सुमारे शंभर ते दिडशे लोकांना प्रथेप्रमाणे मोठ्यांदी नाव गाव सांगुन ओळख करवून दिली.पण हा ब्रम्हवृंद मंडळातला पहिला दिवस म्हणजे माझ्या गुरुजिंनी मला लग्नाच्या आदल्या दिवशी दिलेल्या आशिर्वादाची आठवण करवून देणारा असाच ठरला. पहिली पाच दहा मिनिटं गेल्यावरच तिथल्या एका शिराळशेट श्टाइल मिश्या ठेवलेल्या गुरुजींनी मला हाक टाकली.."अहो वेदमूर्ती आत्माराम...जरा इकडे या" मी जरासा दचकलोच. पण तेव्हढ्यात मला गोंद्यानी "ज्जा ज्जा.." असं खुणावलं. आणि मी पायात व मनात असलेलं बळ एकवटून त्या गुरुजींसमोर गेलो. आणि ते या भटजी-मंडळाचे कार्याध्यक्ष वगैरे असावे असा अंदाज बांधत समोर जाऊन बसलो. मग त्यांनी आजुबाजुच्या त्यांच्या तिन मित्रांच्या टोळिकडे पहात हसत हसत मला "घाबरू नका शास्त्री,आम्ही नविन माणासांना कै खाऊन वगैरे बघत नै,बरं का!" असा बॉम्ब टाकला. मी मनात 'रामरक्षा पठेत् प्राज्ञः..' वगैरे सुरु केलं. माझी ती त्रेधा उडालेली पाहुन बाजुची मंडळी आणखिनच हसली,आणि त्या गुर्जींनी आपल्या डोक्यावरची काळी तिरकी टोपी सरळ करत.."तुमचं अध्ययन कुठे आणि किती झालं? ते सांगा. म्हणजे आम्हाला जरा अंदाज येइल,तुम्हाला कुठकुठल्या लढाईवर न्यायचं त्याचा!" असा प्रश्न टाकला. मी रीतसर सगळं काही सांगितलं. पण मग माझ्या गुरुजींचं नाव ऐकल्यावर ते वजा जाता आजुबाजुची काहि जुनी आणि जाणती मंडळी मात्र सावरुन बसली. पण त्यांनी मात्र अत्तिशय आनंदानी मला "अरे बंडुचा विद्यार्थी ना तू? मग काही चिंता नै...निम्मी वास्तु(शांत) एकटा मारशील. " असं मला सर्टिफिकिट दिलं. मग मी ही आपला पुन्हा त्यांना 'धन्यवाद' वगैरे म्हणून, आमच्या गोटात परत आलो. शेवटी एकदाची ती आमच्या रोजच्या बिझनेसमीटींगची तिथली वेळ संपली आणि मी माझ्या दोन मित्रांसह त्या शनिवार पेठेतल्या शंकराच्या देवळामधुन बाहेर आलो.

मला गाडीवरून घरी सोडायला येता येता गोंद्या मात्र जाम हसत होता ( :-/ ) मी त्याला "काय रे हसतोस? तिथे मला त्या अस्वलाच्या ताब्यात दिलस,आणि आला देखिल नाहीस जरा बरोबर?" असं विचारताच तो मला म्हणाला, " अरे आत्मू..तुला ज्या माणसाकडे सोडलवतं ना? तो साधा माणूस नाहीये..ते व्यवसायाचं एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे विद्यापीठ" मी विचारलं, "अध्ययन काय रे झालंय त्यांचं? शाखाध्यायी असतील असंच वाटतय रे!!!" यावर पुन्हा खो खो हसून गोंद्या मला, " अरे शा खा ध्य य न??? ... शाखा सोड..त्यानी नवग्रहमंडलाचे मंत्र आणि सत्यनारायण व रुद्रापलिकडे कुठल्या पोथीचं तोंडंही नैय्ये पाहिलेलं!" मी अवाकच झालो हे सारं ऐकून..पण पुढे गोंद्या मला " अरे तो माणूस आपल्या पारंपारिक दृष्ट्यीनी शिकलेला नसला ना..तरी त्याच्या बापाचे जे यजमान तो सांभाळतो आणि स्वतःचे आणखि त्याच्या दुप्पट वाढवून बसलाय..ते पाहिलस तर तुला हे पहिल्यांदा कळून येइल...की व्यवसाय हस्तगत करण्याचा आणि अध्ययनाचा आपल्या धंद्यात दर्भाच्या काडीइतकाही संमंध नसतो!" गोंद्यानी मला मी उतरलो होतो त्या सदाशिवपेठेतल्या वाड्याच्या दाराशी सोडलं..आणि मी दरवाज्यातून आत जात असतानाच..लांबुनच मला, "उद्या सहाला येतो रे..संध्याकाळी.. " असा आवाज दिला. आणि तो गेला.. मी मात्र थक्क होऊन त्या शिराळशेटमिशीकाळीटोपी-गुरुजिंना आणि गोंद्यानी सांगितलेल्या "व्यवसाय हस्तगत करण्याचा आणि अध्ययनाचा आपल्या धंद्यात दर्भाच्या काडीइतकाही संमंध नसतो!" ह्या वाक्याला अठवत अठवत..जिन्याच्या पायर्‍या चढू लागलो..
==================================
क्रमशः...........
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३)

संस्कृतीसमाजजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

8 Apr 2015 - 3:56 am | खटपट्या

खूप आवडला हा भाग.

किसन शिंदे's picture

8 Apr 2015 - 4:50 am | किसन शिंदे

कॉफीशिवाय रफीचं भूत उतरत नाही. =))

अत्रन्गि पाउस's picture

8 Apr 2015 - 5:20 am | अत्रन्गि पाउस

अगदी गुंगवून ठेवता ...
वा बुवा ..

प्रचेतस's picture

8 Apr 2015 - 6:21 am | प्रचेतस

जबरी.
बुवाचे लेखन म्हणजे लय भारी.

मजा आली वाचून.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 7:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुण्यात मुक्तगायनवाद्यांना बाथरूम हीच खरी गळा सोडायची हक्काची जागा आहे.

ही गोष्ट बाकी खरी :) जर का बाथरुम सिंगिंग साठी बक्षिसं मिळत असती तर गेला बाजार ३-४ ग्रॅमी खिशात (बाथरुममधे खिसा कशाला लागतो असले आचरट प्रश्ण फा.मा.ये.) घातली असती.

बाकी नेहेमीप्रमाणे झॅक लेख. आराम संपला ह्याचा आणंद झालेला आहे. =))

निमिष ध.'s picture

8 Apr 2015 - 7:43 am | निमिष ध.

शेवट एकदम मस्त जमला आहे आत्मुगुरूजी. म्हणजे आता तुम्ही पुण्यातले गुर्जी झालात तर. आता पटापट पुढचेही भाग येऊ द्या :)

पॉइंट ब्लँक's picture

8 Apr 2015 - 8:32 am | पॉइंट ब्लँक

जबरी लेखन केलं आहे. मागचे सगळे भाग वाचायलाच पाहिजेत :)

नाखु's picture

8 Apr 2015 - 10:03 am | नाखु

गुरुजी पुढचा भाग घेऊन आले.ता पटापटा टंका पुढचे !!

स्पा's picture

8 Apr 2015 - 11:21 am | स्पा

मी देखिल एकदा गावात आमच्या सहकारि पुरोहित मित्र विज्याच्या घरी शिरता शिरता 'गेले द्यायचे राहूनी..तुझे नक्षत्राचे देणे..'- वर होतो. आणि मधेच विज्याला.. मी "विज्याssssss" मग विज्याचं मागनं गोठ्यातनं ते कोकणातलं खास कोकिळेच्या दुरून येणार्‍या आवाजासारखं, "ऊssssss" ..आणि त्यात विज्याची आई.."आत्मू... कुणाला काय द्यायचं राहिलय रे? पर्वा तुझी आइस पापडखाराचं बोल्लिवती.त्यातलं का काही आहे?" असं नम्रपणे विचारत ओटीवरन आंगण्यात आली. मग विज्यानी कपाळावर हात मारत तिला.."अंगं नाय काय..तो आत्मू म्येला वाट्टेल तेंव्हा भावगीतं सोडत-असतो.ते ही त्याच्या(च) विविधभारती वरुन..तू जा आत!" असं करून प्रकरण मार्गावर घेतलं होतं.

ख्याक =))

फक्त आइचं "तिकडे जागा कशी मिळेल? आणि कामं कशी कुठून मिळतील? " इत्यादी..इत्यादी..इत्यादी.. संपत नव्हतं. त्यावर आज्जीनी तिला, "अगो..नापितास आणि भटास कुठेही कामाला भांडवल गो काय लागते? दोघांसंही पाणि मिळाले,की ते - सुरु होतात. एव्हढे साधेसे तुला कळंत कसें नाही?" असं म्हणून आइला मुद्द्यातच खोडायला सुरवात केलेली होती.

=))

अत्रुप्त आत्मा's picture

8 Apr 2015 - 12:27 pm | अत्रुप्त आत्मा

वेचक प्रतिसादी तैयार पांडु! :-D

सूड's picture

8 Apr 2015 - 3:05 pm | सूड

>>पर्वा तुझी आइस

हे 'आइस' बर्‍याच दिवसांनी वाचलं.

नव्या जीवनाच्या वाटेवर निघालो होतो.
पुढे चालू...

डायरेक दीडदोन सालांन्नी विश्रांत घेतलो की तुम्मि! खंय हां?

सूड's picture

8 Apr 2015 - 3:28 pm | सूड

खंयची भाषा मरे ही? :))

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2015 - 1:52 pm | अत्रुप्त आत्मा

कॅप्टन जॅक स्पॅरो
@ही गोष्ट बाकी खरी :) जर का बाथरुम सिंगिंग साठी बक्षिसं मिळत असती तर गेला बाजार ३-४ ग्रॅमी खिशात (बाथरुममधे खिसा कशाला लागतो असले आचरट प्रश्ण फा.मा.ये.) घातली असती.>> ह्या ह्या ह्या!!

बाकी नेहेमीप्रमाणे झॅक लेख. >>> धन्यवाद.
--------------------------------------------------------
निमिष ध.

शेवट एकदम मस्त जमला आहे आत्मुगुरूजी. म्हणजे आता तुम्ही पुण्यातले गुर्जी झालात तर. आता पटापट पुढचेही भाग येऊ द्या :) >>> येस्स स्सर! आहे मोकळा वेळ ,तोवर उरकून घेतो खेळ! :)
---------------------------------------------------------
पॉइंट ब्लँक
@जबरी लेखन केलं आहे. >>> ठांकू! :)

--------------------------------------------------------
स्वॅप्स
@डायरेक दीडदोन सालांन्नी विश्रांत घेतलो की तुम्मि! खंय हां?>> खि खि खि! आवो तसं न्हाय वो त्ये!
त्यो सगळा रीटर्न-फ्लॅशबॅक-रीटर्न मोड'चा ख्योळ हाय. :)
--------------------------------------------------------
सर्व वाचक/प्रतिसादकांचे धन्यवाद.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 6:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हालाही मोड त्रास द्यायला लागले का काय जेपीबुवांबरोबर?

=))

अत्रुप्त आत्मा's picture

8 Apr 2015 - 6:57 pm | अत्रुप्त आत्मा

तिथे कशाचा त्रास?? तो तर लेखनानंदाचा सहवास! :)

उत्साह वाढे जिथे जिथे, यमकाला यमक जुळे तिथे.. =))))

बॅटमॅन's picture

8 Apr 2015 - 8:12 pm | बॅटमॅन

सूडलक्ष्मी =))

महाद्वार रोड, कोल्हापूर वैगरे राह्यलं !! ;)

बॅटमॅन's picture

8 Apr 2015 - 8:16 pm | बॅटमॅन

खी खी खी ;)

टवाळ कार्टा's picture

8 Apr 2015 - 9:50 pm | टवाळ कार्टा

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 9:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ळोळ!!! डोक्याला डोकं जुळतं जिथं ही उवांची अ‍ॅड आठवली.

सुडलक्ष्मी हॅ हॅ हॅ हॅ!!!

सुडलक्ष्मी हॅ हॅ हॅ हॅ!!!

मेल्या महालक्ष्मी दिनदर्शिकाची झायरात आठव!!

अत्रुप्त आत्मा's picture

8 Apr 2015 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा

@उत्साह वाढे जिथे जिथे, >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt004.gif व्वाह! फारच छाण आहे आपली स्म-रणशक्ति! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt004.gif

जेपी's picture

9 Apr 2015 - 5:54 pm | जेपी

वाचतोय