गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ५०

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
3 Aug 2015 - 10:59 pm

मागिल भाग..
आणि हे सुशिक्षित महाराज प्रकरण म्हणजे खरच पुन्हा त्या अज्ञाता'ची (सुरवातीच्या हो! ) आठवण करवून देत होतं. मी मनात म्हटलं..'मरे ना का त्याचा ड्रेस कसाही असला तरी..आपल्याला थोडच त्याचं अनुग्रहीत व्हायचय..आणि वैजूही आज ह्याचं ऐकेल सगळं..पण ती ही कुणाची अनुग्रहीत होणार्‍यातली नव्हेच..त्यामुळे भ्या कशाला?'
पुढे चालू...
====================

आणि तो सुरु जाहला.

तो:- हम्म्म.. हात जोडा.

आंम्ही:- __/\__ (नमस्कारावस्थेत गेलो.. म्हटलं बघू तरी काय घडतय!)

तो:- आपल्या इष्टदेवतेचं म्हणजे मनातून प्रेम असलेल्या देवतेचं आणि कुलदेवतेचं काहि क्षण ध्यान करा.

आंम्ही:- ..........................

तो:- आता डोळे उघडा. हम्म्म.. बोला.. तुम्हाला का वाटते भविष्यकाळाची चिंता?

ही:- ................

मी:- अहो चिंता वगैरे काहि नाही. पर्वा जरा आमच्या मुलाला लागलं नि ही लगेच कावरीबावरी झाली.

तो:- ते जे काहि असेल्,ते कृपया त्यांनाच सांगू दे..आपल्याशी मी नंतर बोलेन.(हिच्याकडे पहात..) बोला आपण बोला.

ही:- चिंता..म्हणजे काय आहे ना. की आंम्हाला जुळी मुलं. त्यामुळे एकदम वेगळीच केस आहोत आपण..असं वाटतं . आणि भविष्यकाळात दोन्ही मुलांच्या अडचणी वगैरे एकच येतील की वेगवेगळ्या ..असं सारखं मनात येत रहातं.

तो:- हम्म्म.. जुळी मुलं. भगवंतानी दिलेला एक सुंदर योगायोग.
(मी मनात म्हणालो, "सुंदर वाटतो होय रे तुला. मेल्या..लग्न तरी झालय का तुझं? एकदा ये आमच्या इथे..आणि पोरांचे कपडे आवरण्यापासून ते रात्री त्यांना झोपवे पर्यंत नवरा किंवा बायको पैकी कुणाही एकाच्या खांद्यावर पडली जबाबदारी कि कसं होतं ते बघ अनुभवून.. बोलायला काय जातय तुला इथे बसून!" )

तो:- प्रथम हे लक्षात घ्या की जुळी मुलं असोत अथवा एकेक अशी दोन,अथवा एकच असलं तरिही तुम्हाला चिंता ही वाटणारच. .. ही चिंता वाटते, कारण तुम्ही त्यांचे पालक आहात..म्हणुन! जगातल्या कुठल्याही आइबापांना आपल्या अपत्यांच्या भविष्यकाळाची चिंता वाटतेच. सध्याच्या धावत्या युगात तर जरा जास्तच वाटते. आणि त्यात तुम्हाला जुळी म्हणजे एकावेळीच दोन नुसती मुलं नसून एकाच वेळी दोन वेगवेगळ्या चिंता आहेत. ह्याची चिंता तुम्हाला जास्त आहे. बरोबर ना? (या विवेचनानी मि ही जरा गप झालो. आणि या महाराजाची तो पुढे बोलेल की काय? म्हणून मनात गृहीत धरलेली 'चिंता-चिता' वगैरे श्टैलची हल्लीची फेमस महा-राजीय पोपटपंचिही विसरलो..)

आंम्ही:- हो.

तो:- हम्म्म..चला तुम्हाला नक्की काळजी कशाची वाटतीये हे तर कळलेलं आहे. अता ती सोडवायची कशी एव्हढाच प्रश्न उरलाय..बरोबर ना?

आंम्ही:-(पुन्हा...) हो.

तो:- मग तुम्हाला मी तुमच्याच खेडेगावातलं बैलगाडीला लावलेल्या बैलजोडीचं उदाहरण देतो..हे उदाहरण तुम्हाला थोडं विसंगत किंवा वाइट वाटण्याची शक्यता आहे..याबद्दल मी आधीच तुमची माफी मागतो..परंतू हेच उदाहरण दिल्याशिवाय तुम्हाला समस्या सुटण्याचा मार्ग नीट स्पष्ट व्हायचा नाही..म्हणून द्याव लागतय हे उदाहरण. देऊ ना?

आंम्ही:- द्या..

तो:-धन्यवाद. आता हे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या या जोडगोळीला एका ठराविक वयापर्यंत ते बैलगाडीचं "जू " त्यांना जोखड वाटणार नाही..अश्या पद्धतिनं त्यांच्या मानेवर तुम्हाला ठेवायचं आहे. तशिही परमेश्वरानं तुमच्या समोर ही एकाचवेळी दोन अपत्य वाढवायची जी परिस्थिती उभी केलीये..तीला समस्या न समजता जीवनमार्ग समजायला लागा..म्हणजे बरच काही सोप्पं होइल.

आंम्ही:- ................

तो:- चित्र स्पष्ट होत नाहिये अजुन तुमच्यासमोर. हे लक्षात येतय माझ्या..पण तरिही आपण दोघेजण हे सर्व शांत चित्तानी ऐकून घेत आहात या बद्दल आपले धन्यवाद. लक्षात घ्या की जुळी मुलं ही फक्त दिसायला सारखी असतात..(माझ्याकडे पहात..) त्यांच्या जन्मपत्रिकेसारखी.. परंतू स्वभावानी एकदम भिन्न.. लक्षात ठेवा.विरोधी नव्हे..भिन्न. (अता वैजू हे लिहुन घ्यायच्या बेताला आली होती..मलाही तशीच काहिशी भावना मनात येत होती..परंतू..तेव्हढ्यात.. तो बोलला..) काळजी करू नका.. आपल्याला ह्या सर्व टीप्स इथून निघताना लिखित स्वरुपात मिळणार आहेत. .. तर, ती भिन्न असल्यामुळे त्यांच्यावर हे जे संगोपनाचं जू तुम्हाला एकत्रितरित्या ठेवायचय. तेच ह्या समस्येचं उत्तर आहे.

आंम्ही:- ते कसं काय?

तो:- उदा:- तुम्ही त्यांच्या कळत्या वयात त्यांना जेंव्हा कपडे घ्याल तेंव्हा कधिही त्यांना वेगवेगळं दुकानात नेऊ नका.. आणि तिथे गेल्यावर त्यांना जे अवडतील ते कपडे स्वतंत्र घेऊ द्या..

मी:- अहो..पण असंही ते स्व'तंत्रच घेतील नै का? कारण एक मुलगी..आणि दुसरा मुलगा!

तो:- (माझ्या हातून न कळत पडलेल्या या बाऊन्सरमुळे 'तो' किंचितसा गडबडला..परंतू..) हे पहा मी त्या अर्थानं स्वतंत्र म्हणत नाहीये..ते तर असणारच आहे. शेवटी ते परमेश्वरानं दिलय..बरोबर ना?

(आता एकटा मीच..) मी:- हो.

तो:- धन्यवाद..तर त्या अर्थाची ही स्वतंत्रता नाही. तुम्ही त्यांना जुळी आहेत म्हणून एकाच छापाच्या वस्तू, कपडे, खेळणी..हे करण्यापासून टाळा.. कारण यामुळे या जुळ्यांना समजत्या वयापासूनच उगीचच आपल्याला नको ते अंगावर येतय अशी भावना मनात येते..आणि आपण वेगळे असूनंही आपल्यावर हा एकाच छापाचा मारा का होतो? अश्या विचारात ती पडतात..आणि मग त्यांच्या मनाचा एक दिवस उद्रेक होतो..(इतकं नेमकं आणि अचूक बोलायला लागल्यानंतर मजसारखा अडाणी तर प्रभावित झालाच इथे..पण ही सुद्धा आणखि लक्षपूर्वक सगळं ऐकायला लागली. )

तो:- तर आता आज इतकच लक्षात ठेवा..की आजच्या दिवसापासून ते तुमची मुलं वयाच्या आठव्या ते दहाव्या वर्षापर्यंत येइस्तोवर ह्या गोष्टी विशेषत्वानं लक्षात ठेवायच्या आणि प्रत्यक्ष पाळायच्या आहेत..यातही काही समस्या आल्या तर आम्ही साधक तुम्हाला पुनःपुन्हा मार्गदर्शन करु. धन्यवाद.

ह्या धन्यवादा नंतर त्यांच्या त्या स्मितहास्यिकेनी तेथे प्रवेश केला ..आणि आंम्हाला उठायचा निर्देश केला. मी मनात म्हणतोय..आंम्हाला अजुन काही बोलायचं असेल..तर??? ह्यांनी आधीच का उठविले असावे? पण इकडे आंम्ही उठलो..आणि तिकडे तो महाराजंही शेजारच्या कॅबिनमधे अंतर्धान पावला..आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या जागी तसाच साधा वेश असलेला दुसरा एक येऊन बसला.. ह्या "प्रवेशा"मुळे मी पुन्हा त्या (पहिल्या..) अज्ञाताच्या गूढात जाऊन अजुनच बुचकळ्यात पडलो..पण काहि का असेना..समाधानकारक असं बरच काहि ऐकायला मिळाल्याच्या भावनेनी आंम्ही त्या हास्यिकेसह बाजुच्या जिन्यानी खाली उतरून परत त्या बाहेरच्या आसनांवर येऊन विसावलो. मामा गोडश्या आमची वाटच पहात उभा होता..पण मेला आल्या आल्या काही बोलेल असं वाटलेलं तो हा आपला शां..........त! मी आणखिन बुचकळयात पडलो. पण तेव्हढ्यात त्या हास्यिकेनी माझ्या हतात एक लिफाफा ठेवला. आणि ती अंतर्धान पावली. जाते वेळी आमच्या समोर संस्थेला मदत..म्हणून एक बॉक्स आला..त्याच्यावर "स्वेच्छादान " असे शब्द होते. मग मी आपली खिश्याला हात घालून ज्या आल्या त्या दोन नोटा त्यात सरकवल्या..आणि तिथुन उठलो..ही मात्र तिथेच बसलेली होती...शांत एकदम. मी काही बोलणार एव्हढ्यात मामा गोडश्या दिग्विजयी मुद्रेनी तिच्याकडे गेला..आणि मंद हसत तिला निघण्याचा इशारा केलन..त्या सरशी ही पण चटकन उठली..आणि माझ्या पौरुषी अहंकाराची पीन्,नाही म्हटलं तरी जरा सटकलीच ह्या मुळे.

तिथनं बाहेर फुटपाथवर आलो..तेंव्हा माझं चालू जगाकडे लक्ष गेलं..आणि "वाजले किती?" हा प्रश्न मनाला पडून नजर घड्याळाकडे गेली. बघतो...तर दुपारचे चांगले तीन वाजत आलेले हो. मग मात्र माझं मन माझ्या त्या गोंडस बेंबल्याकडे स्वानंदीकडे लागलं..आणि हिलाही .., "आता लवकर घरी चला...!" चे वेध लागलेले तिच्या चेहेर्‍यावर मला स्पष्ट दिसू लागले. रिक्षा पकडली..आणि मग मी मामाला बोलता केलाच चांगला घरी जाइपर्यंत! ही मात्र गप्प गप्पच होती.
मी:- काय हो मामा? तुम्ही कोणत्या अडचणीसाठी आलात ह्या महाराजांकडे?
मामा:- (नेहमीच्या तयार हास्यासह..) हँ हँ हँ हँ हँ.. ते तुम्हाला कसं सांगू मी? आपले तिथे शेअर केलेले प्रॉब्लेम दुसर्‍याबरोबर बोलायचे नसतात आत्माराम गुरुजी ..लक्षात ठेवा आता तुम्हिही.
मी:-(त्याच्या वाक्यातल्या "आता तुम्हिही" कडे मी संपूर्ण दुर्लक्ष केलं ..आणि..) होय का? बरं बरं. पण काय हो? तुमच्या ह्या पंथात महाराजाची कमिटीच आहे की काय अगदी? मगाशी मला वाटलं तसं कारण आमच्याशी बोलून झाल्यावर तिथे कोणीतरी दुसरा मार्गदर्शक येऊन बसला.. मग नेमका त्यातला मनेश्वर महाराज कुठला?
मामा:- (पुन्हा एका.. हँ हँ हँ हँ हँ... सह) आहो हीच तर गंमत आहे.. आमच्यात मुख्य महाराज असं कोणी नाहीच खरं तर.मी सांगणारच होतो तुम्हाला.. पण आता सांगतो. काय आहे ना की आमचे मूळ महाराज जे होते..त्यांनी मार्गदर्शन सुरु केल्यापासून दहाव्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. नंतर त्यांच्या जागी त्यांचा मुलगा काम पाहू लागला..तो ही अनुग्रहीत होताच..पण मनानी काही फारसा धार्मिक वगैरे नव्हे..म्हणून त्यानीच मग ही प्रथम अनुग्रहीत असलेल्यांपैकी काही अनुयायांना हताशी घेऊन ही मार्गदर्शन संस्था काढली. आणि तिला नाव मात्र वडिलांच दिलं.. तत्वही त्यातूनच जन्माला आल्येत या संस्थेची..येइलच प्रचिती तुम्हाला.
मी:- असं ..असं.. बरच भारी वाटलं हां पण तुमच्या संप्रदायात येऊन.
मामा:- मग???? एकमेका सहाय्य करू...ही गोष्ट आम्ही सगळे पाळतो मनोमन.. आहो,मन..हाच आधार आहे आपल्या संस्थेचा..
हे बोलून मामा थंडावला आणि मि ही. पण माझिया मनाचे विचारचक्र काहि केल्या थांबे ना. म्हटलं..कोणतेही अंगारे धुपारे नाहीत.दैवी उपाय आणि योजनाही नाहीत.. एक माणूस दुसर्‍याशी जसा बोलतो..त्या धर्तीवरचं साधं परंतू बरचसं चतुराईनं भरलेलं त्यांचं बोलणं. पुन्हा गुरु शिष्य ही भानगडंही नाही. कुठलिही बळजबरी नाही..पुन्हा परत याच..असा आग्रह ही नाही..आणि इतकं दिसायला आणि असायला साधं असून जाताना त्यांनी आपल्याकडून जे पैसे मिळवले..त्याची आपल्या मनाला कुठेही रुखरुख अथवा कुठली बोचंही लागलेली नाही. म्हणजे आध्यात्माचं मार्केटंही काळानुसार ह्या शहरात अगदी अपडेट झालेलं आहे तर! लोकांच्या समस्या,गरजा आणि त्यांच्या मनाची भूक नीट ओळखून तपासून..अगदी जशी हवी तशी सेवा देणारं हे आध्यात्माचं आधुनिक दालनच का समजू नये? शिवाय सुचवलेले उपायंही शुद्ध वैचारीक स्वरुपाचे.फक्त त्याचे डोस आपल्या पोटात जाण्यासाठी त्याला आध्यात्माचा चमचा आणि आपल्याच मनात शिल्लक असलेल्या देवाधर्माची मात्रा यांनी अगदी अचूक आणि नेमकी वापरलेली आहे.

ह्या विचारात असताना... रिक्षा वाड्याच्या दारात केंव्हा आली ते काही केल्या कळलं देखिल नाही. मग उतरून आधी त्या रिक्षावाल्याच्या मिटरचे झालेले जेव्हढे पैसे होते ते जास्ती वाटत असले तरी न बोलता त्याच्या हतावर टीकवले. हो....,आहो इथे शुद्ध श्रमाचं मोल त्याच्या मिटरला लागलेलं आहे..तिथं "एव्हढे झाले???" हा 'आपल्या' हिशोबाचा थर्मामिटर लागू कैसा पडावा? तो तिकडे बरोब्बर लागू पडला..आणि कोणत्याही प्रकारचं 'बील' महाराज किंवा त्यांच्या या नवशिष्यांनी दिलेलं नसताना मी 'स्वेच्छेनी' चांगले दोनशे रुपये त्या 'स्वेच्छादानात' टाकुन आलो. रिक्षा वळली आणि मामा गोडश्या पुढे गेलेला पाहून मागून आंम्हीही घराकडे आलो. येता येता सहज तो लिफाफा उघडला..तर आत एका पानाच्या वरती श्री..औम..वगैरे काहिही नसून "तुमचा परमेश्वर ..तुमचा कल्याणकर्ता" अशी एक लाइन ठळक अक्षरात टाइप केलेली होती. खाली एक,दोन..असे आकडे टाकून तिथे त्या सगळ्या टिप्स टिपून-ठेवलेल्या होत्या.आणि शेवटी पुन्हा ठळक अक्षरात परंतू हलका ठसा वापरून "तुमच्या मनाचा इश्वर तुम्हाला आंम्ही दर्शविलेल्या ह्या मार्गदर्शनानुसार पुढे घेऊन जाणार आहे..फक्त त्याच्याशी प्रतारणा करु नका. नाहितर दिशा भरकटेल..किंबहुना ती पुन्हा सापडणारंही नाही." असा इशारेवजा आदेशंही देऊन ठेवलेला होता. ते पत्र त्या लिफाफ्यात परत ढकलत मनात विचार केला ..."माझं सोडा..परंतू हिच्या मनावरच्या चिंतेला एकदा ह्या महाराज..सॉरी.. बिगरगुरुशिष्यपरस्परसहकारी संप्रदायाच्या संपूर्ण प्रकरणाच्या कथनासह, सखारामकाकाच्या पुढ्यात नेऊन बसवल...की परत हा पंथ आपल्या डोक्यावर "जू" बनून यायचा नाही." तसाही ह्या महाराजबाजी किंवा पंथबाजीला मी विरोध करणाय्रातला आता उरलो नव्हतोच. कारण ह्या पौरोहित्याच्या कामानी ह्या शहरात आल्यापासून अश्या लहान मोठ्या अनेक पंथांची आणि महाराजांची ओळख मला करवून दिलेली होती. त्यातून मला एक कळलेलं होतं,की जेव्हढा विरोध तेव्हढी यांची यांच्या चाहत्यात मागणी जास्त वाढते..आणि बाकिच्यांचं जाऊ द्या ..पण मला ती माझ्या घरात नक्कीच वाढू द्यायची नव्हती. त्यामुळे ह्याच्यावरचा उतारा काकाकडून खात्रीनी मिळेल ह्या विचारानी शांत होऊन
मी वाड्यातून आत गेलो..

पुढे होऊन घराचं कुलूप काढलं आणि आत जाऊन चपला काढून 'ही' कुठाय ? म्हणून बघतो..तर चपला दाराच्या बाहेर..आणि 'ही' गायब. मनात म्हटलं पोरांना घेऊन परस्पर तिकडे गेली की काय परत? पण नाही हो..नाही..असं मला वाटायचा अवकाश..आणि वरतून म्हणजे आमच्या घरमालकिणिच्या घरातून मला त्यांनीच हाक दिली.."आहो गुर्जी ..इकडे या हो वरती..सगळी इथेच आहेत" मग तिथे गेलो.. बघतो.. तर एका कोपर्‍यात सतरंजी टाकलेली आणि तिथे आज्जीबाई आमच्या ह्या जुळ्यांना खेळवत बसलेल्या. आणि हिचं आत त्यांच्या स्वयंपाक घरात काहितरी पोहे वगैरे करणं सुरुही झालेलं होतं. पुन्हा मनात विचार आला.."ह्या आज्जीबाई जसं एकाच वेळी सदूला गुंतवून स्वानंदीलाही खेळवत ठेवतात..ते कसं ते..ह्यांच्याच कडनं शिकून घेतलं तर हवा कशाला तो पंथ तरी?" पण नाही..'हे प्रकरण येव्हढे सोपे तुजला जायचेची नाही...' अशी ओळ माझ्या मनात उमटून लगेच खात्रीच झाली त्याची.कारण जसा मी दिसलो तशी माझ्या त्या बेंबल्याबोंबल्या स्वांनदीची फेवरेट "बॅबा........." अशी रुदंत स्वरातली सनई सुरु झाली. आणि मग माझा आपला तिला जवळ घेऊन "आता मी आलो कि नै...आता कचाला ते लली लली कलायच?" वगैरे ठराविक डायलॉग सुरु झाला. आज्जीबाई कडेनी माझ्याकडे पाहून कौतुकानी हसत होत्या ..आणि सदू मेला डामरट.., बापानी आपल्याला सोडून बहिणाबाईंना आधी घेतले याची नुकतीच 'तयार केलेली' तक्रार घेऊन तिकडे आत जाऊन वैजूपाशी भो'कांड सुरु करण्याची तयारी करायला लागला. मग मी सरळ जाऊन त्यालाही उचलला..आणि दोघांना एकेका हतानी एकदम कडेवर घेऊन उभ्या उभ्या "डाविकडे बसला सदू ,उजवीकडे स्वानंदी.." असं कायच्या काही गुणगुणत पुढची ओळ शोधायला लागलो..तर आतून वैजू हसत हसत हतातल्या पोहे परतायच्या झार्‍यासह बाहेर आली आणि दुष्ट्पणानी " आई आत पोहे करते,बाबाचा झाला उभा नंदी!" असा दगड मला हाणून पुन्हा आत पळाली.. आज्जीबाई हसून हसून बेजार व्हायला आल्या होत्या..आणि पोरांना बिचार्‍यांना ह्यातलं काहिच कळत नसल्यामुळे(किती सुखी! नाही का? ) सगळ्यांच्या हास्याचं आणखि हसू येत होतं...

=======================================
क्रमशः
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७.. ३८.. ३९.. ४०.. ४१ .. (खेडेगावातील नाटक..) ४२.. ४३.. ४४.. ४५.. ४६.. ४७.. ४८.. ४९..

संस्कृतीसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

पन्नासाव्या भागाचे अभिनंदन.फारच गुंतवून ठेवले सर्वांनी .उत्सुकता वाढतच राहिली कथानकात.

अर्धशतकाबद्दल अभिनंदन!

सुरेख मालिका. बर्‍याच दिवसांनी पुढचा भाग आला.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2015 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा

दिलगीर आहे. पण गेले काही दिवस लेखनाचा अज्जिब्बात मूड लागत नव्हता . आजही काही वाटले नव्हते लिहिनसे! पण संध्याकाळि काय झालं म्हैत नै.. कुणीतरी फेसबुकावर आठवण काढली मागच्या भागातल्या उमटत आलेल्या या महाराजाची. आणि एकदम सुरवात झालि या महाराज संवादांना मनात.. मग थांबलोच नाही.

खूप इंटरेस्टिंग मालीका वाटतेय.
सुरुवातीपासून वाचायला सुरूवात केलीय. जरा वेळ लागेल कॅच अप करायला पण हरकत नाही. छान लिखाण आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Aug 2015 - 7:19 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हाप शेंच्युरीबद्दल हाबिणंदन. अत्मुस गुर्जींचा सत्कार एक पासपोर्ट, पुस्प्गुच्च देउन करणेत येत आहे.

बाकी कथानायक आणि वयजुवैनींनी जुळ्यांना म्हारांजांकडे न्यायला हवं होतं. म्हाराजांना तिथे बसुन काय माहित मुलं सांभाळणं कित्ती अवघड काम आहे ते. =))

लेख नेहेमीप्रमाणेच आवडला.

प्रचेतस's picture

4 Aug 2015 - 8:49 am | प्रचेतस

a

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2015 - 8:58 am | अत्रुप्त आत्मा

अभ्या"स करून केलेला ब्यानर आहे हां.. ! :P
काय ती कल्पना शक्ति! :P

आता थांबा देतो तुम्हासही एक आत्म"भेट! ╰_╯

नाखु's picture

4 Aug 2015 - 9:00 am | नाखु

धाग्याला अभिनंदन आणि धागाकर्त्याच्या चिकाटीचे कौतुक !!!
सत्कारमूर्तींनी सत्कार वस्तूंची माहीती आणि प्रची न टाकल्याबद्दल जाहीर निशेध !!!!
वस्तू जेपी आणि ट्क्याने व्य्वस्थीत ठेवल्या आहेत.

सत्कार समीती सभासद पिंची शाखा !!
आमची कुठेही शाखा नाही असे नाही

वर बर्याच जणांनी सत्कार केल्यामुळे मी फक्त हाफशेंच्युरी निमीत्त शुभेच्छा देतो.

-शुभेच्छुक-जेपी आणी तमाम देवलसीकर्मकांडी कार्यकर्ते.

परफेक्ट बोललात.

सुंदर लिहीलंय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Aug 2015 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

अर्धशतकासाठी अभिनंदन आणि शतकासाठी शुभेच्छा !

टवाळ कार्टा's picture

4 Aug 2015 - 12:22 pm | टवाळ कार्टा

व्वा :)

सनईचौघडा's picture

4 Aug 2015 - 1:14 pm | सनईचौघडा

वा! वा! आमच्या गुरुजींचे धाग्याच्या अर्ध-शतकासाठी अभिनंदन आणि पुस्पगुच्च. असेच शतकही गाठावे हीच सदिच्छा !
1

1

दिक्षांताच्याप्रतिक्षेतअसलेलाएकशिष्य०

बॅटमॅन's picture

4 Aug 2015 - 1:35 pm | बॅटमॅन

हाण्ण तेजायला. आता शतकी वाटचालीसाठी सुबेच्चा!

अत्रुप्त आत्मा's picture

5 Aug 2015 - 1:09 pm | अत्रुप्त आत्मा

कंजूस,स्वॅप्,पद्मावति,कॅप्टन जॅक स्पॅरो,प्रचेतस,नाद खुळा,
जेपी,अभिजितमोहोळकर,डॉ सुहास म्हात्रे,टवाळ कार्टा,सनईचौघडा,बॅटमॅन

http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy018.gif धन्यवाद.http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy018.gif

झाले पन्नास! तुमच्या चिकाटीला सलाम! छान झालाय हा ही भाग!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2015 - 12:31 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद हो .... धन्यवाद! :)

gogglya's picture

7 Aug 2015 - 4:32 pm | gogglya

५० झाले वाचता वाचता !

मुक्त विहारि's picture

10 May 2016 - 1:46 pm | मुक्त विहारि

पुढचा भाग कधी?