गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१५

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
11 Oct 2014 - 5:05 pm

भाग-१४
हे वरती सर्व आलं. ते माझ्या भावविश्वातला गुरुजी आज बाहेर-आला म्हणून! पण एरवी आमची ही सप्तपदी म्हणजे ..विचारू नका...!!! ... पुढे चालू...
===============

अगदी एक,दोन,तीन असे सावकाश गतीनी आकडे उच्चारले तरी सगळे मिळून एका मिनिटात पूर्ण होतात. तशी वधुला वराकडून झरं..झरं..झरं..झरं..चालवून एका मिनिटात शेवटच्या पावलाला आणावी लागते. अहो पुढचे(अक्षतांनंतरचे) विधीही आधीच करायचे असले.(झाल/सुनमुख्/नामलक्ष्मीपूजन) तरीही आणि नसले तरिही मुहुर्ताच्या आधी (किमान)दोनतास वधुला आणि एक तास वराला द्यावाच लागतो. का म्हणता ??? अहो..हा विधिंचा मेक अप अवरला,की (वधुचा)मेकअप'चा एक मोठ्ठा विधी असतो ना!!! तो मेनटेन केला नाही.तर त्या गुर्जीनी लावलेल्या लग्नाची "साक्षात अत्युत्तम विवाह संस्कार" अशी ब्रम्हदेवानी येऊन पावती दिली,तरी "तुम्ही(च) मुहुर्त चुकवलात!" (मेकपला वेळ-न देऊन! :-/ ) अशी गुर्जीच्या नावानी साक्षात असंख्य बिलं नंतर फाडली जातात.

सातव्या पावलावरुन एकदा का ध्रुवदर्शनाच्या दर्शनी फोटोसाठी वधुवरास फोटोग्राफर हाती सोपवलं,की इकडे आमची तयारी सुरु होते,ती झाल/सुनमूख/लक्ष्मीपूजनाची. नाही म्हणायला हल्ली कार्यालयातले आमचे ब्याकश्टेजवाले म्हणजे मदतीला असलेले कार्यालयाचे नोकर ही जमात या कामांमधे अव्वल तयार जाहलेली आहे. त्यामुळे त्यांनी सेट अप लावला तर तो नीट करवून घेणे किंवा स्वतः लावणे.हे सर्व करता करता मुलिच्या माता/पित्यास बोलावून...''चला...चला..आता मुलाकडच्यांना झालीला बोलवा बरं" अशी सूचना करावी लागते. मग त्या अनुषंगानी मुलाच्या आईला/वडिलांना काय काय (अत्ता) द्यायचे याची माहित असेल तर हिंट् आणि नसेल तर सुचवणी करावी लागते. मुलिची आई खोलीकडे निघाली की तिला आयत्यावेळेस परत हाक मारून येताना एक खण आणा बरं का(जास्तीचा!) अशीही सूचना द्यावी लागते. या सगळ्यातून (धाप लागता लागता..) सावरताना,हळूच मुलाची आई जर कुठे दिसलीच तर तिलाही "चला...येताय ना झालीला..(आजच!!!) " असं शेवटचा शब्द मनात उच्चारून बोलवावे लागते. कारण जशी सप्तपदी होते,तशी मुलाच्या आईला येणार्‍या लोकांच्यात जायची अती..................व ओढ लागते. तिथुन बिचारा तो फरकॅप घातलेला, मुलाचा बाप तिला " अहो चला आता..." अश्या आशयाच्या अनेक हाका मारत असतो. परंतू मुलाच्या आईला मात्र ती वेळ (आपल्या) आलेल्या लोकांमधे रममाण होऊन गप्पा मारत दं.....ग होण्याची हक्काची वेळ आहे,असच वाटत असल्यानी,ती तिकडूनच "आले हो...!" "पाचच मिनिट!" थांबा........जरा!" अश्या परती'च्या शब्दांनी टोलवत असते. शेवटी इकडे स्टेजवर झालीची तयारी पूर्ण होऊन मुलीच्या वडिलांनी आचमन केलं की आमच्या माइकवरच्या आवाजानी जाग येऊन किंवा झोप होऊन , ती एकदाची श्टेजासन्न होते.

मग झालीची(उमामहेश्वराची) रितसर पूजा वगैरे होऊन,त्या वेळूपात्रातले कणकेचे १६ दिवे लाऊन ती झाल,मुलिच्या आईवडिलांकडून मुलाकडच्या ज्येष्ठांच्या डोक्यावर-धरण्याच्या प्रसंग येतो. हाही विधी फोटो-फेमस असल्यानी तिथे बसलेल्या सगळ्यांच्या डोक्यावर ठेऊन सगळ्यांचे फोटो होईपर्यंत आंम्हा गुर्जींना मंत्रांची कॅसेट अ'खंड वाजवावी लागते. विशेषतः मंडळी जर का देशस्थ असतील तर.......!!!!! (आता पळा..... :D ) कारण कोकणास्थ/कर्‍हाडे/सुवर्णकार/कायस्थ इत्यादीं देशस्थेतरांमधे आजही झालिला जी ज्येष्ठ असतील तीच मंडळी उपस्थित असतात.(म्हणजे फारतर ५ किंवा १०) पण देशस्थात.........छ्छे!!! सांगायला नको...(आत्मू....मेल्या पळून पळून जाशील कुठ्ठे??? :D त्यामुळे आता सांगच! :D ) कमीतकमी १ मिनिबस किंवा वेळ आलीच(त्या गुर्जीची! ;) ) तर १ अखं.........ड एस.टी.बस-भरेल इतकी सुद्धा मंडळी झालीकरता देशस्थात असू शकतात. कारण देशस्थेतरात ही मंडळी किती असावी? हा प्रश्न निखालसपणे स्वाभिमानाचा आणि देशस्थात मात्र तोच प्रश्न अभिमानाचा!!! शिवाय विशेष करून,त्यात कोणी कमी किंवा जास्त-झालच तर,(संगीत) मानापमानाचाही!!!
या मानापमान नावाच्या देशस्थी प्रयोगात पहिला नारळ हा नेहमी गुर्जीच्या डोक्यावर फोडायचा ही अलिखित परंपरा आहे..सुरवात अशी होते बरं का... !
उखडलेली मंडळी:- ओ गुर्जी... झालं का..??? येव्हढेच का?
आंम्ही:- (काहिच अर्थसंगती न लागल्यामुळे..) मग अजुन किती पाहिजेत
उ.मंडळी:-कुठं शिकला तुम्ही लग्न लावायला?
आंम्ही:-(निर्मळपणे) वेदपाठशाळेत
उ.मंडळी:-हो का..मग थांबा जरा आज..नंतर- (इतरांना उद्देशून) - ए ती तुझ्या आत्याकडची कुठायत?
त्यांची बायको:- अजुन आल्या नाही का? (आपण चिंतेत..आणि काहि बोल्लो तर चितेतही! ;) )
उ.मंडळी:- सगळे यायला पाहिजे झालीत(फोटोत) त्याशिवाय पुढे जायचं नाय
आपणः-(समंजसपणे...गप्प!)
शेवट त्यांच्यापैकिच कुणितरी यावर "ती आली कि पुन्हा करु झाल!" अशी आंम्हाला डोळा मारत त्यांची मनधरणी आंम्हाला कंप येइपर्यंत करतो... आणि एकदाची झाल-होते.

त्यामुळे,झालीची ही अविभाज्य सांस्कृतीक विशेषता त्यावेळी जो गुर्जी हसून पचवू शकला तोच खरा या लग्नाच्या श्टेजचा राजा! नायतर त्याचा वाजलाच समजावा बाजा.

तर अशी ही झाल होते. आणि मग वधुपिता/माता हे उभयता वरमातेकडे आपल्या लाडक्या लेकिची जवाबदारी ती वेळुपात्ररुपी झाल* त्यांच्या हातात देऊन करतात. हे ऐरणीदान* करवून वधुपित्याकडनं करवून घ्यायची प्रार्थना जी असते. ती मात्र खरच सगळं वातावरण भावनिक करणारी असते. कित्येकवेळा ती प्रार्थना त्यांच्याकडून म्हणवली सुद्धा जात नाही. कसं शक्य आहे हो? भावार्थात असलेली ही वाक्यः- "आजपर्यंत आंम्ही शिकवून संस्कार करून वाढवलेली ही कन्या आपल्या कुळामधे सुपूर्त करतो आहोत,त्यामुळे हे वरमाते तू तिचा तुझी मुलगी समजून सांभाळ कर" अशी दिसायला साधी वाटत असली,तरी त्यावेळी, आपल्या मुलिला आता, आपण अंतरणार हीच भावना प्राधान्यानी मनात असते. ती पेलवून नेणं, हे सोपं काम खचितच नव्हे! हे होऊन काहि वेळ शांततेत जातो. मुलिचे आईवडील (त्यादरम्यानच) मुलाच्या आईला तिथे द्यायच्या गोष्टी(साडी/सैभाग्यवायन इत्यादी) देतात. आणि श्टेजवरून खर्‍या अर्थानी एक्झिट होतात...
===========================
क्रमशः

संस्कृतीसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Oct 2014 - 5:52 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच जबरदस्त आणि संवादही अगदी खुसखुशीत.

धन्या's picture

11 Oct 2014 - 10:48 pm | धन्या

हेच म्हणतो.

जेपी's picture

11 Oct 2014 - 5:58 pm | जेपी

भाग आवडला.
देशस्थाबद्दल निरीक्षण अचुक आहे.

अगदी अगदी. झालीचे दिवे पार मालवेपर्यंत लोकांची रांग संपतच नाही. यातले किती नंतर खरोखरच वधूचं योगक्षेम पहातात हां संशोधनाचा विषय आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Oct 2014 - 11:06 pm | अत्रुप्त आत्मा

@यातले किती नंतर खरोखरच वधूचं योगक्षेम पहातात हां संशोधनाचा विषय आहे.>>> क्या बोल्या रे.....! वाह!!! दिल की बात छीन ली!

समांतरः- पण हे सगळं तुम्ही ऑनस्टेज बोल्लात की मेलात! ;)

कारण देशस्थेतरात ही मंडळी किती असावी? हा प्रश्न निखालसपणे स्वाभिमानाचा आणि देशस्थात मात्र तोच प्रश्न अभिमानाचा!!!
हा हा हा. अगदी!
लेखन आवडले.

मुक्त विहारि's picture

11 Oct 2014 - 11:15 pm | मुक्त विहारि

आवडला...

गुरुजी आता ह्यावर एखादा एकपात्री प्रयोग बसवा... सुसाट चालेल...

यसवायजी's picture

11 Oct 2014 - 11:42 pm | यसवायजी

+1

नावातकायआहे's picture

12 Oct 2014 - 4:38 pm | नावातकायआहे

+११११११११

खरच मुविंची सुचना भारी आहे.
विचार करा.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2014 - 9:14 am | अत्रुप्त आत्मा

@खरच मुविंची सुचना भारी आहे.
विचार करा.>>> हम्म्म्म्म! सीरियसली थिंकिंग नाऊ! :)

मिपावर एक स्पर्धा ठेऊयात का?

बुवांचा फॅन (आडगाव बु||)

दशानन's picture

11 Oct 2014 - 11:47 pm | दशानन

जबरदस्त!!!!

आवडला हाही भाग बुवा!! हल्ली झाल धरतात तसलं लग्न पाहाण्यातच नाही आलं.वैदिक पध्दतीत नसतो वाटतं हा भाग. आमच्या देशस्थांचे निरिक्षण भारीच!!

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2014 - 2:04 pm | अत्रुप्त आत्मा

@वैदिक पध्दतीत नसतो वाटतं हा भाग.>>> हम्म्म.. बरोबर. वैदिक पद्धतीत झाल/सुनमुख नसतं. नामलक्ष्मीपुजन असतं पण ते ही आधी न होता बर्‍याचदा नंतरच होतं.

@आमच्या देशस्थांचे निरिक्षण भारीच!!>>> धन्यवाद. :)

पिवळा डांबिस's picture

13 Oct 2014 - 10:01 am | पिवळा डांबिस

आमचे स्वतःचे लग्न रजिस्ट्रर असल्याने (आहे, टिकून आहे, अजूनतरी!!) हे सगळं वाचतांना विलक्षण करमणूक होतेय!!! :)

सहिच लिवतोय बुव्या..
आंदो ओर

मधुरा देशपांडे's picture

13 Oct 2014 - 1:32 pm | मधुरा देशपांडे

मस्तच. देशस्थांचे निरीक्षण पण भारी.

सूड's picture

13 Oct 2014 - 2:12 pm | सूड

मस्तच!! पुभाप्र

प्यारे१'s picture

13 Oct 2014 - 2:21 pm | प्यारे१

मस्तच!

मस्त वर्णन.देशस्थांचे वर्णन नेमके.आमच्या नातातल्या बाईंनी लेकाच्या लग्नात झालीला फक्त सासरचेच का? माझ्या माहेरचेहि हवेत अस म्हणून भरपुर वर्‍हाड बोलावले मग सासरची मंडळी;ती ही सख्खी,चुलत सगळी जमा.स्टेज वर कशीबशी मावली सगळी.पूढे अर्धा तास झालीचा कार्यक्रम संपेना.
तो प्रसंग डोळ्यापुढे आला आणि हसु आवरेना वाचताना.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2014 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा

@तो प्रसंग डोळ्यापुढे आला आणि हसु आवरेना वाचताना.>>> =))

(काल्पनिक..हां :D ) नातातल्या बाईं :- ए आक्के...येऊ दे की तुज्याकडची सगळी..या रे या वरती..नाय त थांबा..ओ नोकर(स्टेजचे..) लावा की अजुन धा खुर्च्या..बसले आपले बगत! .. ओ गुर्जी तुमी का थांबले? .. सुरु-रहा.. शांतीपा .. सपला का म्हणून.. रामरक्षा म्हना..चलतय..! .. ओ नोकर त्ये झालीच्या दिव्यांना त्येल आना.. गंगे...,तू का प्येंगुळली??? .. हां,बस अशी ता .. झाल आली डोक्याला,की हसायच फोटुत-आलं पायजे-सगळं..!
=))
आंम्ही मंत्र फेकुन फेकुन ख....लास! आणि वधुचे माता/पितु: झाल---धरुन..धरुन! =))

कोणत्या गावचे देशस्थ आहेत त्यावर अवलंबून आहे हो गुर्जी! आमच्या लग्नात तर माझ्याकडचे पुणेरी देशस्थ आणि नवर्‍याकडचे कोकणस्थ यांच्यात पाहुण्यांच्या संख्येपासून मदतीच्या ओघापर्यंत, आहेरापासून देण्याघेण्यापर्यंत काहीही एकसारखे नव्हते. नंतर कितीतरी दिवस आम्ही हसत होतो. अजूनही आठवले तर हसू येते.

रेवती's picture

14 Oct 2014 - 2:35 am | रेवती

नंतर एकदा कोल्लापूरला ;) लग्नाला गेलो होतो आणि त्यांची भाषा ऐकून आम्ही खुसुखुसू हसत होतो. त्या लग्नाच्या आदल्या दिवशी दुपारी पोहे मात्र मस्त केले होते. आज अकुंचे पोहेगान वाचून मला तीच आठवण आलीवती.

+१०नेहमीप्रमाणे खुसखुशित. पुढच्या कटट्याला एकपात्री प्रयोग कराच. मुवि +१

पैसा's picture

15 Oct 2014 - 12:18 am | पैसा

खुसखुशीत आणि नेहमीप्रमाणेच एकदम झक्कास!