गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१०

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
8 Apr 2014 - 7:52 pm

मागिल सर्व भागः-
http://misalpav.com/node/25298
http://misalpav.com/node/25318
http://misalpav.com/node/25527
http://misalpav.com/node/25626
http://misalpav.com/node/26585
http://misalpav.com/node/26703
http://misalpav.com/node/26846
http://misalpav.com/node/26933
http://misalpav.com/node/27236
विवाहातल्या या सर्व सायंकालिन घडामोडींना,क्रिकेटच्याच रूपकात नाव द्यायचं तर पहिल्या (रन---रेट वाढवणार्‍या) पंधरा ओव्हर असच द्यावं लागेल. त्यानंतर मग उरलेली म्याच होते...ती दुसरे दिवशी सकाळी...
देवकं---बसताना!
==============================

तर...

एकदाची ती सकाळ होते.होते,म्हणजे खर्‍या अर्थी रात्र संपते.अता रात्र संपते म्हणजे काय हो..??? तर अनेकदा हल्लीच्या "जेवणं आधी करू...मग धार्मिकविधी" या फेमस होऊ पहाणार्‍या पद्धतीचा तडाखा(तडाखाच तो!!!) बसलेला असला की गुरुजी आणि फोटूवाले या दोघांनाही उत्तररात्रीच घर पहावयास मिळतं.(आमच्या पहाण्यात तर,कार्यालयापासून दूर अंतरावर घर असलेला एक फोटू ग्राफर-रातच्याला घरापर्यंत गेला,आणि उंबरठ्यास शिउन परत पहाटे ५:३० ला कार्यालयात "हळद(होळी)समारंभास" उप-स्थित देखिल झाला!!! :D ..) तर अशी ही तंतरलेली किंवा तन-तरलेली रात्र संपवून आंम्ही पहाटे अथवा सकाळी या दिव्य मंगल कार्यालयात येतो. आणि सवईप्रमाणे जाग न आलेलं स्टेज,आणि(त्यामुळे!)जागे झालेले कार्यालयाचे पोरे लोक,यांना पहात एखाद्या कडेच्या खुर्चीवर जाऊन निद्रिस्थ...आपलं ते हे..आसनस्थ होतो.

थोड्याच वेळात फोटोग्राफर आणि व्हिडिओवाले त्यांचा तो उन्हाळी-दिवा घेऊन मुलिच्या खोलितून 'सुटलो एकदाचे!' असा चेहेरा करत बाहेर येतात आणि आमच्या जवळ येऊन,नविन असतील तर-"आले का गुरुजी..वा..वा..चला चहा घेऊ" असं म्हणतात.जुने जाहलेले-"गुर्जी...आज मुलाला,रुखवताला दोन तास अधी घ्या!!!" (डॉक्टर पेशंटला ऑपरेशनला-घेतो तसे! :D ) असा आंम्हाला,त्या दिवसाचा अंदाज देतात. तर तयार जाहलेले जवळ येऊन-"काहिही बोलत नाहीत"-आणि कडेच्या खुर्च्यांवर विराजमान होतात! ("काहिही बोलत नाहीत"-हे तयार..या इहलौकिक जमातिच प्रमुख लक्षण आहे!..असो!) आणि तेव्हढ्यात विशेष करून मुलाकडच्या 'आलेल्या मंडळींपैकी' एक जण आमचा निवांत चाललेला वेळ पाहून बेचैन होऊन आमच्या दिशेनी यायला लागतो..त्याला पहात काहि दुष्ट फोटूवाले आंम्हाला, "गुर्जी .. येऊ का???" असं खौटपणे म्हणून 'तिथून' दूरवरच्या खुर्चीवर आसरा घेतात. आंम्ही मात्र खुर्ची चुकवली,तरी यांना चुकवणार कसे?..या विचारानी येणार्‍या संकटाचा सामना(जो करावाच लागतो!) करायला 'तयार' होतो! आणि एक छोट्टीशी परंतू वन-डे चा घाम काढणारी टि-ट्वेन्टी झडते!

ते:-काय गुरुजी कधी सुरु करणार?नै..आठ वाजत आले!

आंम्ही:- स्टेज(आणि आंम्हीही) तयार आहेच.मुलिकडचे/मुलाकडचे आले की करू सुरवात!

आपल्याला असं वाटेल की या सरळ उत्तरानी म्याच टॉसमधेच संपली बहुतेक..पण नैsssssss! इतक्यात हे रामायण संपलं तर रावण वधाची(ह्हा..ह्हा..ह्हा..! =)) ..) मज्जा ती काय? अता कार्यालयात,तिथल्या धार्मिक विधिंच्या तयारीसह-स्टेज/गुरुजी/फोटूवाले..हे साईड आर्टिस्ट तयार असतील,तर नाटक सुरु व्हायला मुख्य पात्रांनी प्रवेश करायला हवा...हे साधं गणित अगदी अगणित वेळा ह्या त्यां"न्ना समजावलं,तरी त्यांचं "तुंम्हीच घाई करा!" (यांना करता येत नसते म्हणून!) हे पालुपद काही संपत नाही. :-/

ते:- पण..तुंम्हीच घाई करा!,म्हणजे येतील ते.

आंम्ही:- आंम्ही तिनदा घाई केली हो सकाळी आल्यापास्नं,अता ते येतील तेंव्हाच सुरवात होणार ना!???

ते:- अजुन एकदा(घाई)करा!

आंम्ही:-(वैतागून..) अहो,ते काय बद्धकोष्ठी लहान मुलाला "मोकळं" करायचय का?

ते:- शीssssssssssss कसल्या घाण उपमा देता हो,गुर्जी ना तुंम्ही???

आंम्ही:- तुंम्हाला छाssssssssन आणि नीssssssनीट सांगूनही कळत नाही. त्याला दुसरा इलाज काय मग?

ते:- (ह्यॅ ह्यॅ ह्यॅ...) चिडू नका हो

आंम्ही:- (सुटका झाल्याच्या आनंदात!) हम्मम!

मधे काहि क्षण निरव-जातात..आणि पुन्हा..

ते:- नै..मी क्वाय म्हण्टो..तरी तुंम्ही एकदा जाच!!!

आंम्ही:-(कुठ्ठे???) अहो..वारंवार गेलो,तर चिडतात लोकं(आणि अजून उशिर करतात)

ते:-मी सांगतो तुंम्हाला,जा परत..नै चिडणार यावेळी... जा....ना.....!!!

आंम्ही:-( *DASH* ) हम्म्म्म!!!

ते:- प्लीज जा,मंजे मुहुर्तावर लागेल लग्न!

आंम्ही:- (अता हा असा ऐकायचा नाही,याची पूर्ण खात्री पटल्यानंतर..) चला...येता का तुम्म्ही पण माझ्याबरोबर???

ते:- अं..अं..मी कशाला???

आंम्ही:- अहो,घरच कुणि असलं की ऐकतील नै का आम्चं!?

ते:- नको हो...ते आमच्यावर येइल ना मग!

आंम्ही:-(हां..अता कसं खरं बाहेर आलं!) अता का? अता का? मंजे गुरुजी हा पदार्थ,मार अडवायची ढाल काय?

ते:- ह्हूं..(नेहमीचं पालुपद लाऊन) हल्लीच्या गुरुजिंकडून काहि अपेक्षा ठेवणं उपैगाचं नै!.... --- असं म्हणून ते-टळतात!

आणि आंम्ही वधूपक्षाच्या खोलितून बाहेर येणार्‍या मुलिच्या आईला पाहून सतर्क होतो. या मुलिच्या आईचं..''सर्व काही निर्विघ्न पार पडेल की नाही!?" या चिंतेनी ग्रस्त असणं आंम्हाला कळतं.आणि त्या अनुषंगानी येणारा काहि मारा..पण आंम्ही झेलतो. परंतू काहिकाहि वेळेला अगदी वैताग येतो.अता हा वैताग कोण आणतं??? मुलिची आई????? छ्छे... त्यांचा वैताग आंम्ही अधीच गृहीत धरलेला असतो हो. वैताग आणवणारं पात्र दुसरच असतं.त्याचा परिचय येणे प्रमाणे--- ज्यांचा या खेळात,केवळ उपस्थिती लावणं एव्हढाच रोल असतो त्या नात्यातल्या (म्हणजे- 'ना त्यातल्या..ना ह्यातल्या'! :-/ .. ) काही बायका म्हणजे लग्नात-सर्वांचं टेन्शन वाढवायची सुपारी घेतलेलं खास पब्लिक असतं ना...त्यातल्या या... ताई किंवा अक्का!!! या ताई किंवा अक्कांचा पक्का समज असतो-"इथे कुणालाही का हि ही कळत नाही!" अगदी... मेकापवाली/गुरुजी/फोटोवाले/इतर नातेवाईक हे सगळे आयुष्यातलं हे "पहिलच" कार्य करायला आलेले आहेत,अश्या समजानी,या मांडवात वावरत असतात. देवक बसताना "घरून-घरचे देव-आणलेत की नाहीत?" हे यांनाच आयत्यावेळी,(म्हणजे सगळे पाटावर आले..की..) सु च तं! करवली सुद्धा अगदी तयार झालेली असली,तरी "ही 'खरी' आहे का?" ..हा प्रश्न यांना तिथेच (उघड उघड) पडतो. मधेच, फोटोवाले/व्हिडिओवाले नेमके "कुठे कुठे विसरतील?" हे यांना सुचतं आणि-"या"... त्यांनाही काहि मैलिक(?) सूचना करावयास जातात.आम्ही "मुंडावळ" हे प्रकरण करवलीच्या हतात देववून सुरवात केलेली असली तरी, "गुर्जी..मुंडावळ बांधायला सांगा ह्हंsssss!" असं या चारचौघात आंम्हाला सुचवतात. आणि या सर्व कोला-हलात एकदाचं देवक-सुरु होतं...

मग उशिर झालेला असला तरी, साग्र-संगीत देवक करवायची त्यांना हुक्की येते. आणि त्यांच्या पैकी कुणितरी एक अक्का किंवा ताई "या"--धनुष्य-बाण हाती घेऊन तिथेच कडेला बसतात. वास्तविक यांना काहि धर्मविधिंचं ज्ञान असतं असं नव्हे.पण महत्वाच्या मुव्हमेंट्स माहित असतात.त्या(तेव्हढ्याच!) आधारावर या समग्र कार्य क्रमाला जज करायला लागतात.अता कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाची सुरवात ही यजमान मंडळींना कुंकू-गंध-अक्षता भाळी लाऊनच होते, हे तसं सर्वमान्य आणि सर्वज्ञात असतं.पण तिथेही या सुरु होतात

अता आपण यातल्या काहि विशेष मुव्हमेंट्सची नुस्ती झलक पाहू या!

१) कुंकू लावणे..

आंम्ही:-चला..सगळे पाटावर बसले. हां...(इथे पहिला बाण येतो!)

त्या:- गुर्जी...कुंकू लावायला सवाष्ण लागेल ना कुणितरी...ज्येष्ठ!!!

आंम्ही:-(त्यातल्या शेवटच्या शब्दावर 'नजर' ठेऊन..) हां बरोब्बर..आता कुंकू लावायला कुणितरी ज्येष्ठ सुवासिनी बोलवा बरं....... तुमच्याकडची! (यातला शेवटचा बाण>--> त्यांना!!! ;) ..)

त्या:-कुंकू लावणारीची ओटीपण भरावी लागते ना..(हो गुर्जी)??? सुमन...घेतल्येस का गं जवळ!!!??? (या बाणानी ती सुमन-नामक मुलिची आई "कै तरी चुक्लं!" म्हणून बावरते!)

आंम्ही:-अहो...ताई...ओटी अत्ता नै कै..अत्ता फक्त नारळ किंवा विडा..इथलाच "मांडलेल्यातला!"(मुलिच्या आईचं "हुश्श्श्!")
आणि ओटी-मानपान वगैरे सगळं नंतर.. औक्षणाच्यावेळी

२) औक्षण..

आंम्ही:-(पुण्याहवाचन विधिच्या मध्यावर..) चला अता औक्षणाला या बरं! (असा स्टेजजवळील मुलिकडच्या लोकांकडे पाहून अवाज देतो.आणि उशिर झालेला असेल,तर.. वेळे'च्या गणिताला सांभाळण्यास्तव त्यातल्या ५जणिंनी किंवा ७जणिंनी या हा भाग वगळतो. आणि नेमकं याच वेळी............................

त्या:-(मुलिच्या आईला परस्पर) थांब गं..मी बोलावते..(असं म्हणून स्वतःसह ५/७/९ अश्या जेव्हढ्या मिळतील तेव्हढ्या सवाष्णिंन्ना घेऊन मैदानात येतात)

आंम्ही:-(ही वेळ येणारच आहे..हे ओळखून,"त्या" सवाष्ण शोधकार्यात गेल्यानंतर...मुलिच्या आईला,फोटूग्राफर-भटजी-युतिच्या व्यापक ऐक्याला धरून! :D एक 'चेंडू' टाकतो! ) अहो काकू...त्यांना सगळ्यांना एकत्रच औक्षण करायला लाऊ या! नै का? नंतर लक्ष्मीपूजनाला सगळ्या वेगवेगळं करतीलच की..स्वतंत्र! नै का?

फोटूवालं:- काकू..सकाळची वेळ आहे..नॅचरल लाइटमधे एकत्र फोटो छान येइल अगदी...!

आंम्ही:- आणि प्रत्येकिला (औ-क्षणा :D चा) स्वतंत्र मानही द्यावा लागणार नाही...नै का????? (हा अर्थ-शास्त्रीय बाण अचूक-बसल्यामुळे...) मुलिची आई पुढे सरकणार्‍या घड्याळाचे मान पहाता, हळूच हसत "आंम्हाला" संम्मती देते!

३) देवक आणि देवकाचा आहेर...
या औक्षणानंतर पुण्याहवाचन विधि संपतो.आणि ते सुपात मांडलेलं देवक अस्तं त्याची पूजा सुरु होते.यात त्यां"चं बाकि कुठेही लक्ष गेलं नाही तरी "देवकातल्या देवतांना हळद लावणे" या गोष्टीकडे (बरेचदा) लक्ष जातच

आंम्ही:- चला...मुलिच्या आई...तुंम्ही...ही अंब्याच्या पानांवर लावलेली तेल-हळद सुपातल्या देवतांना चढवा बरं..(फोटुग्राफरच्या पोज'ची सोय करतं!) हां...अता या बरं सुपा-समोर! (पण तेव्हढ्यात.....)

त्या:-(हस्त-क्षेप करून..) अहो..गुर्जी कुठची हळद लावायला सांगता तुंम्ही? ती सकाळी यांना लावलेली कार्याची हळद सांगा की!!!!!!!

आंम्ही:-(मनातल्या मनात..कपाळावर हात मारत) ब....रं...आणा!!!!!!!

त्या:-(विजयी मुद्रेने) मग..सांगायला नको का? असं कसं टाळता तुंम्ही?

आंम्ही:-(अत्यंत नाइलाजानी..) अहो(बाई!) ही हळद आधी देवाला लावतात..मग (मुलिकडच्या) माणसांना आणि त्याच्यानंतर ति'च हळद-तिकडे-मुलाकडे पाठवतात हे विसरलात काय?(आज???) आपण देवक 'घरी' बसवलं कीच हे (सगळं) क्रमात जमतं? नै का?

त्या:- हम्म्म्म! (असं म्हणून काहिश्या हिरमुसतात..आणि एकदाची "ही" किंवा "ती" हळद लागते!)

नंतर काहि वेळातच देवकाची त्या पुढील पूजा पूर्ण होते आणि येऊन ठेपतो..तो देवकाचा आहेर.

आंम्ही:- हं..चला(मुलिच्या नातेवाईकांच्या दिशेनी..) अता घरचा आहेर करायचाय हांsss! या बरं,ज्यांना ज्यांना करायचाय..त्यांनी!!! (अशी 'नेमकी' सुचना देतो.पण...)

त्या:-(अख्खा मांडव जमवायच्या बेताला येऊन..) ए.......वसुंध्रा...शमा..बेबी...या गं या...सगळ्या ..आहेर करायचाय ..चलाssss! (आंम्हाला..मगाचचा पराभव अठवत! ) ओ गुर्जी... हितच थांबा आहेर संपेपर्यंत!

तेव्हढ्यात मुलिची आई:- अगं अक्के...यांच्या आणि त्यांच्या-ह्यांच्या(????) भावानी करु दे की आहेर...एव्हढी सग्ळी कशाला जमवतेस?

त्या:- पायजेत..आज सगळ्या..नायतर आपली लोकं फोटोत कधी-येणार? तू बस खाली..गुर्जी कुंकू द्या हो इकडं(असं म्हणून सगळ्यांचा..पुढे सुमारे अर्धा तास(कित्तिही सेकंद असलेला!) त्या" खातात. आणि तेव्हढ्यात कार्यालयवाल्यांची 'नाष्टा संपल्याची' वर्दी लागल्यानंतर तिकडे सटकतात...हे सगळं-झाल्यानंतर,दमलेले आंम्ही आणि फोटोवाले- चहा/तंबाखू,या कार्या-लयातल्या (खास आमच्या) इष्ट विभागाकडे (हळूच) पलायन करतो!
==============================================
क्रमशः

संस्कृतीसमाजमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

8 Apr 2014 - 8:27 pm | पैसा

मस्त रंगतेय म्याच! आधी शेवटचं क्रमशः बघितलं आणि जीव भांड्यात पडला! त्या उगा लगबग करणार्‍या अक्कांचं चित्र मस्त काढलंय!

आता पर्यंत अटेंड केलेली तीन्-चार जवळची लग्नं डोळ्यासमोरुन गेली. त्यातल्या त्या उद्धट आणि खवचट माम्या/मावशा/काकवांना दिलेली तितकीच खवचट उत्तरं आठवली. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Apr 2014 - 8:59 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यातल्या त्या उद्धट आणि खवचट माम्या/मावशा/काकवांना दिलेली तितकीच खवचट उत्तरं आठवली. >>> =)) सूडुक..मेल्या...तू माज्या बरोबर १/२ म्याच'ला चलच! चांगलं,जाsssड-काठाचं मद्राशी धोत्तार नेसवून(सॉरी! नेसायला देऊन! :D ...) भस्म लाउन..त्यांचं भस्म-करायला नेतो तुला. =))

.
.
.
मला खात्री आहे. एकदा ही "तोफ" लावली,की बुरुजांच्या आत लढायला म्या मोकळा! :D

लग्नाच्या क्रिकेटच्या मॅचच्या 'हंपायरां'च्या तोंडचं धावतं समालोचन.

खटपट्या's picture

8 Apr 2014 - 9:15 pm | खटपट्या

आवडलं !!

पिवळा डांबिस's picture

8 Apr 2014 - 9:38 pm | पिवळा डांबिस

सॉल्लिड बॅटिंग करतोय आत्मूराम! :)
येऊ दे!!!

अजया's picture

8 Apr 2014 - 10:19 pm | अजया

मस्त !

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2014 - 10:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै खत्री !

मापं काढण्यात बुवांचा हात नावाजलेला शिंपीही धरू शकणार नाही. ;) :)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Apr 2014 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा

@नावाजलेला शिंपीही धरू शकणार नाही.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif काय माप काढता राव!? http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif कार्या-लयात "गेलेल्या"(राम नाम सत्य हो! :D ) प्रत्येक गुरुजिच्या जिभेचा बोरू होतोच!(पुण्यात तरी!) तशी "गरजच" आहे इथली! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

रेवती's picture

9 Apr 2014 - 12:19 am | रेवती

छान चाललय लग्न.

यशोधरा's picture

9 Apr 2014 - 12:23 am | यशोधरा

मस्तच! :)

स्पंदना's picture

9 Apr 2014 - 5:00 am | स्पंदना

आत्मुस!! ___/\___
काय नाही! कोपरा पासून!

नाखु's picture

9 Apr 2014 - 11:52 am | नाखु

"फुकट" अधिकारी भाग आवडला आहे.
यांच्या चर्येवरील भाव पाहून "असूरी आनंद" कस्सा असतो हे सोदाहरण समजेल. यात मावश्यांबरूबर काही "काकोबा" ही आघाडीवर असतातच.
पु.भा.प्र.

पैसा's picture

9 Apr 2014 - 11:59 am | पैसा

एका अशाच एका काकाची आठवण आली. एका ओळखीच्या घरात एकाचा अकाली मृत्यू झाला. घरचे अगदी सावरण्याच्या पलिकडे गेलेले आणि हे साहेब १२वे १३वे कुठे करावे, मालाडला की दादरला आणि भटजी कसे चुकत आहेत याचीच चर्चा करायला बसलेले. गेलेल्याचा एक नातेवाईक त्याना मारायला उठलेला.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2014 - 4:46 pm | अत्रुप्त आत्मा

@ गेलेल्याचा एक नातेवाईक त्याना मारायला उठलेला.>>> असल्या बे'भानांवर अशी वेळ येते खरी! त्यांना,आपल्याला याच्यातलं कित्ती ज्ञान आहे..हे दाखवायची सुरसुरी (कुठेही) येते! एकदा एका ठिकाणी याच तेराव्याच्या कार्यक्रमात,असाच एकजण...तेराव्याचं श्राद्ध दु.१२ वाजता असतं..असं माहित असल्याचं दाखवत असलेला महाभाग,आमचे सकाळचे शांतोदकाचे विधि सुरु असल्यापासून पिंड कधि करायचे..ते सांगा! म्हणून माझ्या मागे लागलेला होता. शेवट..त्यानी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारल्या नंतर,मी त्याला-"कुणाचे???" असा टोला लागावून,त्याचा पिंड मात्र तिथेच-पाडला. तोपर्यंत तो "पिंड" रागानी चरफडत दूर गेलावता!

पैसा's picture

9 Apr 2014 - 4:50 pm | पैसा

अवघड आहे!

प्रचेतस's picture

9 Apr 2014 - 12:37 pm | प्रचेतस

मस्त एकदम.
एकापेक्षा एक इरसाल नमुने मस्त रेखाटलेत. त्यांना तितकेच खवचटपणे हाणणारे गुर्जीही भारीच.

बॅटमॅन's picture

9 Apr 2014 - 12:59 pm | बॅटमॅन

गुर्जींचा हा धागा वाचून 'सारख्याला वारकी' या म्हणीची आठवण झाली. जब्री हाणलंय!

त्रिवेणी's picture

9 Apr 2014 - 5:06 pm | त्रिवेणी

आज वाचला हा भाग. आता सगळे वाचुन काढेन.

फार आवडला हा भाग. साक्षात लग्नमंडपातून सैर करवलीत. अन सनईचे सूर अन लगबग, अत्तरांचा-गजर्‍याचा सुवास, लफ्फेदार शालू-साड्यांची सळसळ सग्गळं अनुभवलं. :)

होय अत्तर, वाळा, गुलाबपाणी अन वाकून नमस्कार करणे, थोरामोठ्यांनी आज्जी-काकवांनी नीट निरखून सूनेला पारखणे ... देवक, रुखवत एकंदर सगळच मनाने अनुभवलं.

मुक्त विहारि's picture

9 Apr 2014 - 10:15 pm | मुक्त विहारि

आवडला.

(रिटायमेंट नंतर पार्ट टाईम करायला , आणि टाइमपास करायला, हा धंदा बरा आहे, असे वाटत होते.पण तुमचे अनुभव वाचून, असा धंदा न करता, एखादी पानाची टपरी टाकावी म्हणतो.)

अस्वस्थामा's picture

10 Apr 2014 - 6:13 am | अस्वस्थामा

भारी हो गुर्जी..!! :)

सुबोध खरे's picture

10 Apr 2014 - 9:55 am | सुबोध खरे

वा गुरुजी,
अतिशय उत्तम लेखमाला. अगोदरचे सर्व लेख वाचले असले तरी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही क्रमाने वाचले तरी तितकीच मजा येते. मला फार पूर्वीपासून गुरुजींच्या बद्दल वाईट वाटत आले आहे. ( माझ्या दोन मित्रांचे वडील पौरोहित्य करत असत) कारण आपण लिहिले आहे तसे आपण शंभर पापे केली तरी चालतील गुरुजींनी सोवळे राहिलेच पाहिजे आणि आमची पापे धुण्यास मदत केली पाहिजे हा दांभिकपणा समाजाकडून पाहत आलो आहे. यादी स्वच्छ शब्दात लिहिली असेल तरी लोक महत्त्वाच्या गोष्टी विसरतात आणि गुरुजीना "जमवून घ्या" सांगतात हा प्रकार पण डोक्यात जाणारा आहे.(हे म्हणजे आमच्या धंद्यात पथ्य पाळा सांगूनही आम्ही पाणीपुरी खाणार आणि पोट बिघडले कि डॉक्टरवर परत खापर फोडायला तयार. १००% मधुमेही असे करतातच.)
असो आपल्या ताजमहालाला आमची वीट नको.
आपले लेखन उत्कृष्टच आहे. प्रत्येक भागानंतर आता प्रतिक्रिया देतो असे ठरवत होतो पण येणारा प्रत्येक भाग सुरेखच आहे त्यामुळे सर्व भागांना वेगळी प्रतिक्रिया न देता एकत्रच देत आहे.
लिहिते राहा.
आपला कृपाभिलाषी
सुबोध खरे .

अत्रुप्त आत्मा's picture

12 Apr 2014 - 12:02 am | अत्रुप्त आत्मा

सर्व प्रथम सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

@ कारण आपण लिहिले आहे तसे आपण शंभर पापे केली तरी चालतील गुरुजींनी सोवळे राहिलेच पाहिजे आणि आमची पापे धुण्यास मदत केली पाहिजे हा दांभिकपणा समाजाकडून पाहत आलो आहे.>>> येस्स्स्स्स! आणि नेमका याच दांभिकपणामुळे आमचा 'पुरोहितपणा' बाजारी झालेला आहे. म्हणून तर मी स्वतःला (स्वतःच्या मनात) धार्मिक एंटरटेनर म्हणवतो. ;)

@यादी स्वच्छ शब्दात लिहिली असेल तरी लोक महत्त्वाच्या गोष्टी विसरतात आणि गुरुजीना "जमवून घ्या" सांगतात>>> हे ही बरेच ठिकाणी घडतं. पण तरिही मी, असं सांगणारा माणूस समंजस वृत्तीचा असेल तर खरच 'जमवून घ्यायला' तयार असतो/आहे. आणि त्यात काहि चुकिचंही नाही. कारण ज्याच्या जश्या श्रद्धा..तसा त्याचा धर्म!-हे सत्य. :) पण जे तत्ववादी असतात त्यांना मात्र अश्या प्रसंगी अडवावसंच वाटतं. कारण आंम्ही असं काही(ही) विसरलो की मग मात्र हे लोक आंम्हाला कध्धिही माफ करत नाहीत!

@लिहिते राहा. >>> येस्स स्सर!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif

अजुन एक म्हणजे-तुमच्या या प्रतिसादामुळे ... या लेखमालेच्या दरम्यान/शेवटी कधितरी.. माझ्या हातून "माझ्या भावविश्वातला गुरुजी" असा लेख बाहेर येणार हे नक्की! :)

झकासराव's picture

10 Apr 2014 - 4:39 pm | झकासराव

मस्तच सुरु आहे लेखमाला. :)