गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१४

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
27 Aug 2014 - 12:31 am

भाग-१३
मी बराचसा अंतर्मुख..आणि काही काळ गप्प!
=============
हुश्श्स्श्स.......! आणि फोटोंच्या कचाट्यातून कसाबसा एकदाचा तो कान-पिळून होतो.आणि गाडी म्होरल्या ठेसनात येते..ती सप्तपदीच्या! हा मात्र दोन्ही बाजुच्या सर्व आज्जी-बायांचा अत्यंत कौतुकाचा शीन बरं का! इथे येणारे (आनंद)अश्रूही खरे! दोन्ही हात उंचाऊन लांबूनच दिले गेलेले आशिर्वादही खरे. आगदी मंत्रांशिवाय केला हा विधी तरी चालेल...असं माझ्या सारख्याला वाटणारा हा विधी आहे. अहो प्रतीपावला गणिक या दोघांनिही घ्यायचा संदेश जगलेली आणि शिकलेली खरीखुरी वयोवृद्ध माणसं समोर असताना,त्यांनीच प्रति पावला गणिक यांना सावध केलं पाहिजे. तर त्यांना पुढे दोघांना एकत्र कुठे आणि कसं व किती चालावं लागणारे आयुष्यात,याचा खरा गंभीर अर्थ कळेल. तुंम्ही म्हणाल..हा आत्मूगुर्जी हलवायासारखा त्याच्याच मिठाईला कंटाळलाय म्हणून म्हणतोय असलं काहितरी.पण खरच आज आपण करूनच बघू या ही नव सप्तपदी...कशी होते कळेल तरी...

करायची मग सुरवात...
चला...चला... कोण कोण वधूवर तयार आहेत मनातून..या विधी साठी. या बरं उभयता..पहिल्या पदीजवळ...मी तर आहेच आहे...पण आजुबाजुनी तुमचे नातेवाइकंही आहेत हां...

हम्म्म..पहिल्या पावली उभे रहा..चला..
१)इष एकपदी भव सा मामनुव्रता भव।
दोघांन्नी..सर्वांना मोठ्यांदी सांगा-आंम्ही एकमेकांशी एकनिष्ठ राहू
एक वयोवृद्धा:- "रहावं लागतं बरं मुलांन्नो रहावं लागतं! आपण एकमेकांना अगदी आवडत असलो/नसलो तरी...अत्ता राहिलात ना,तर नंतर रहाल.नायतर ही वीट पायाखालनं कधी सरकेल हे तुमच्या आजकालच्या जगात सांगता येत नाही हं.. रागावू नका हं बाळांनो..अरे आज ऐकाल तर लक्षात राहिल ना आयुष्यभर...दोघांची जवाबदारी असते ती...भटजी न्या हो पुढे यांना..."

२) ऊर्जे द्विपदी भव सा मामनुव्रता भव।
हां..आता सांगा:- आपण एकमेकांसाठी असे समर्थ होऊ,की आपलं खर्‍या अर्थानी बलवर्धन होइल.
एक वयोवृद्धः- " अगदी बरोबर बोललात हो..हे बळ लागतच. आणि अत्ताच्या जगात तुम्हाला हे हरऐक बाजुनी लागणार आहे.तेंव्हा सामर्थ्य हे अत्यंत परस्परपूरक रितीने वाढवत रहा हं.त्याशिवाय संसाराचं गाडं नीट चालवता यायचं नाही तुंम्हाला..न्या हो गुर्जी पुढच्या पावली"

३)रायस्पोषाय त्रिपदी भव सा मामनुव्रता भव।
हं अता महत्वाचं आहे बरं का..म्हणा:- या तिसर्‍या पावली आमच्या आयुष्यात धन वाढू दे
एक मावशी:- अगदी खरं..मुलांनो धन वाढवायचं म्हणजे ऋणभार झेलण्यासाठी फक्त जास्त पैश्याच्या मागे लागायचं नाही हां. घरांवर घर घेण्यापेक्षा एकमेकाच्या मनात घर करा आधी..सगळ्यात मोठं धन तेच हो! नाहितर आमचे मायबाप झोपडीतंही सुखानी जगले,आणि आंम्ही ... असो! न्या हो गुर्जी पुढे ..

४) मायो भव्याय चतु:ष्पदी भव सा मामनुव्रता भव।
हं अता म्हणा:- आमच्या मधे असं सख्य निर्माण होऊ दे,की सुख आणि समृद्धी आंम्हाला निराळी शोधावीच लागू नये!
एक काका:- " येस येस..मुलांनो आय कंप्लीटली अ‍ॅग्री विथ गुर्जी! हतात घेतलेला हात मनात जोडला जायला वेळ लागतो लग्नानंतर..पण तो जोडला जायलाच हवा.एकदा तो जोडला गेला की मग निर्माण होतं ते सख्य.तोपर्यंत फक्त ओळखच असते एकमेकांची एकमेकाशी! हे सख्य एकदा घडलं,की सूखंही-समृद्ध होऊन हात जोडून आपल्या पुढे उभं रहात..ही चवथ्या पावलावरची उपासना म्हणजे कठीण परिक्षा आहे रे मुलांनो...धीरानी सामोरे जा..शुभाशिष हो तुम्हाला..गुरुजी ..जांऊं द्या पुढे गाडी!"

५)प्रजाभ्यः पंचपदी भव सा मामनुव्रता भव।
हं..हे ही महत्वाचच.. म्हणा:- आंम्हाला उत्तम संतती होवो.यास्तव आंम्ही एकमेकाला बांधिल राहू
एक अजोबा:- "हांssssssss, हेच्च हो हेच्च गुर्जी..मुलांनो असं स्पष्ट सांगायला हवं हो अत्ताच्या आणि तुमच्या पुढच्या हरेक जमान्यात..यातल्या यशापशाची जावाबदारी तुम्हा दोघांची असे म्हणा..मंजे, आधी आपापल्या मनात..आणि मग गुरुजी सांगतात..तसे उघड-आंम्हा सज्जनात.. का....य!!!? हॅ हॅ हॅ हॅ...भारी महत्वाचं हो हे गुर्जी..भारी महत्वाचं हल्ली! चला मी रजा घेतो,चालु दे पुढे.."

६)ऋतुभ्यः षट्पदी भव सा मामनुव्रता भव।
हे आता त्याच्या पुढचं..म्हणा:- निसर्गऋतुं बरोबर सहजीवनात येणार्‍या सुखासाठी आंम्ही परस्पर अनुकूलतेने वागू
एक समृद्ध जीवन जगलेला ... :- हंम्मम..मुलांनो अनुकूलता म्हणजे केवळ इच्छा नव्हे बरं का! परस्परांविषयी स्नेहभाव असेल,तर त्या इच्छांना महत्व आहे.आणि मग त्याला अनुकूलता म्हणायच तर म्हणा. नायतर एरवी तो एका बाजूनी वसूलीचा व्यवहार आणि दुसर्‍या बाजूनी उपचाराचा आचार...असला प्रकार होऊन बसतो.तसं झालं की तो परस्परांसह निसर्गाचाही अपमान होतो हं! हलकं वाटणारं जड पाऊल आहे हो हे... गुर्जी हळूच न्या हो अता शेवटच्या पावली."

७) सखा सप्तपदी भव सा मामनुव्रता भव।
आता दोघांनिही म्हणा बरं:- आंमच्यात या सातव्या पावली परस्पर मित्रत्व दृढ होऊ दे
एक आज्जी/अजोबा:- आज्जी:- अहों गुंरुंजी???...अर्धेच कसे सांगितलेत!? मुलांनो, परस्परात घडणारं भांडण हेच या मित्रत्वाचं निदर्शक असतं हो.....! अहो..तुंम्ही बोला की कायतरी.. आजोबा:- (आज्जीना उद्देशून..):- हे बघां..!!! हें असं पाहिजे! ... संसारात मधून मधून एकमेकांशी भांडलात तर तुंम्ही एकमेकांचे मित्र,नायतर मग होऊन बसाल नुस्त भिंतीवरचं फ्रेंडशिप'चं चित्र! ... कसें.......??? भटजी...जाऊ द्या गाडी आता धृवदर्शनाला.आंम्ही बाजुस होतो आता..यांच्यातून! चला हो..."

चला आता दोघांनी त्याच सातव्या पदाच्या बाहेर या आणि डोक्यास डोके भिडवा.म्हणजे मी तुंम्हाला सहाशिर्वाद देतो:- देवस्यत्वा सवितु:...... अनेक देवतांच्या कृपेने..तुंम्हास सहजीवनात...सामर्थ्य,लक्ष्मी,यश समृद्धी प्राप्त होवो.. ...अमृताभिषेकोSस्तु..शंति:पुष्टि स्तुष्टि श्चास्तु शांति..पुष्टि..तुष्टि ..असे सर्व तुम्हा लाभो... (आता दुसरे कोणी येत नाही..)
मीच-उरलेल्या नात्यानी उपदेशितो:- आज तुंम्ही एक नविन नातं मिळवलत,पण सप्तपदितल्या या खर्‍या समुपदेशकांना स्मरणात ठेवाल..तर ते मिळालेलं-टिकेल...ते टिकावं अशी आपल्या मनोदेवतेजवळ प्रार्थना करून..चला बरं आता..धृवदर्शनाला..खरं तर आकाशात धृव पाहायची गरज नाही. इथूनच नमस्कारा त्याला आणि आपल्या या आजच्या विवाह संस्कारात-अढळता मागा त्याच्याकडून! एकदा ती मिळाली..की मग हे सगळे संस्कार अंगी लागतात..................मनापासून खाल्लेल्या अन्नासारखे! :)
=====================
हे वरती सर्व आलं. ते माझ्या भावविश्वातला गुरुजी आज बाहेर-आला म्हणून! पण एरवी आमची ही सप्तपदी म्हणजे ..विचारू नका...!!! :D
===============
क्रमशः....

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

रेवती's picture

27 Aug 2014 - 1:53 am | रेवती

छान लिहिलयत गुर्जी! आजी, आजोबा, मावशी यांचा आधार घेण्याची आयडिया ब्येष्ट आहे.

खटपट्या's picture

27 Aug 2014 - 2:49 am | खटपट्या

मस्त !! खरे म्हणजे अशीच सप्तपदी झाली पाहीजे.

धन्यवाद गुरुजी, छान सांगितले.
किती भव्य व दिव्य अर्थ आहे यात!

स्पा's picture

27 Aug 2014 - 10:27 am | स्पा

कं लिवलय क लिवलय

अशेच गुरजी सरवांना लगनात लाभो....(तुमच्या पण ;-) )

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2014 - 12:20 pm | अत्रुप्त आत्मा

@तुमच्या पण >>> अस्सं...! आणि तुझ्या!? ;)

सूड's picture

27 Aug 2014 - 2:13 pm | सूड

आणि तुमच्या पण !! ;)

नेमका कुठला तारा दाखवतात हो?

लग्नानंतर काही वर्षांनी बायको नवर्‍याला म्हणते, "हम्म्, काय तरी. तो ध्रुव का शुक्र तारा दाखवत होतात लग्नात तेव्हा वाटलं होतं की सुखाचे तारे तोडून आणाल जमिनीवर माझ्यासाठी. आता कळतंय, माझ्या पदरात उल्काश्म पडलाय म्हणून." यावर नवर्‍याचेही उत्तर अनुभवाने तयार असतेच, "तुला हा दगडाची किंमत उमजली नाही. तारे काय मागतेस?"

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2014 - 2:07 pm | अत्रुप्त आत्मा

=))

ध्रूवतारा दाखवतात असं ऐकलय.

सूड's picture

27 Aug 2014 - 2:13 pm | सूड

पुभाप्र !!

प्रचेतस's picture

27 Aug 2014 - 7:36 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन.
प्रसंग डोळ्यांसमोर उभे करण्यात आपला हातखंडा आहे.

सस्नेह's picture

27 Aug 2014 - 7:44 pm | सस्नेह

सप्तपदीचा अर्थ किती सुरेख समजावलात
माम्या अन काक्या याच उपयोगाच्या बरं !

सस्नेह's picture

27 Aug 2014 - 7:44 pm | सस्नेह

सप्तपदीचा अर्थ किती सुरेख समजावलात
माम्या अन काक्या याच उपयोगाच्या बरं !

मुक्त विहारि's picture

27 Aug 2014 - 9:58 pm | मुक्त विहारि

आवडला...

आदूबाळ's picture

27 Aug 2014 - 10:19 pm | आदूबाळ

ज्जे बात!

अत्रुप्त आत्मा's picture

28 Aug 2014 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा

सर्वांचे धन्यवाद. :)

रेवती's picture

28 Aug 2014 - 5:13 pm | रेवती

गुर्जी, तुम्हीसुद्धा?

हो ना. उत्क्रांतीशील मराठीचा गर्व आहे मला.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Aug 2014 - 8:51 pm | अत्रुप्त आत्मा

योक डाव मापी देनेत यावी! :-/