गुरुजिंचे भावं विश्व! भाग-९

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
6 Mar 2014 - 9:48 pm

मागिल सर्व भागः-
http://misalpav.com/node/25298
http://misalpav.com/node/25318
http://misalpav.com/node/25527
http://misalpav.com/node/25626
http://misalpav.com/node/26585
http://misalpav.com/node/26703
http://misalpav.com/node/26846
http://misalpav.com/node/26933
==============================
मागच्या भागाचे साहित्यिक पौरोहित्य यादी-देऊन संपविले आहे. तेंव्हा म्हटलं आता मूळ खेळाला सुरवात करावी!
मग कुठनं सुरवात करायची बरं..? अरे सोप्पं आहे की! पब्लिक डिमांड! माणसे धार्मिक असोत अथवा नसोत. विवाह हे प्रकरण सगळ्याच लोकांना भरपूर एंजॉय करायला अवडतं... हे नक्की. मग घ्या अक्षता,आपण पहिलं लगन'च लाऊ या... करायची मग सुरवात ... बोला

शुभमंगलंsss सावधान!

यातल्या सुरवाती प्रमाणेच शुभमंगल-हा शब्द यजमानांसाठी आणि सावधान-हा पुरोहितांसाठी,अशी यात शुद्ध इहलौकिक विभागणी आहे. पण..हे कळायला पुरोहितपणामधे किमान १०० लग्न तरी, कार्यालयाचा गुरुजी ,म्हणुन उभे र्‍हाऊन..लावावी लागतात. आहेच तसं ते! यजमान-हा त्या शुभ आणि मंगला अधे अडकलेला असतो,म्हणूनच पुरोहिताचे चित्त अखंड सावधान असावे लागते...कार्य संपेपर्यंत! (कारण,आजच्या सर्व्हिसच्या काळात-त्याच्यावर खेळ रंगवण्याची जबाबदारी आहे हो! :) )

पुण्यामधे तरी अजुनही आदल्यादिवशी संध्याकाळपासून ही(नाइट-डे)मॅच सुरु होते. कार्यालायाचे पोर्‍ये "पार्टी येनार...!" या तयारीत ग्राऊंड सु-सज्ज करून फिल्डवर नेमून दिलेल्या जागी उभे असतात. मॅनेजर दोन्ही संघांचे स्वागत करावयास कार्यालायाच्या दारात रांगोळी-लाऊन.....आपण निवांत हापिसात कार्यरत अथवा छा-मारत बसलेला असतो. आणि अचानक कार्यालयाचे दारात गाड्यांचे हॉर्न,माणसांचा कलकलाट यानी वातावरण "भरायला" लागतं. नेहमी प्रमाणे वधू'इलेवन्स् संघ आधी पोहोचतो.(त्यांच्या चेहेर्‍यावर -सर्व काहि यथस्थित पार पडेल..की पा...र-पडेल!!!? हे टेंन्शन,स्त्रीयांच्या मेकप आणि पुरुषांच्या नविन पोषाखांअडून डोकावत असतं) मॅनेजर त्यांना चला चला..या..या.. असे खास पुणेरी कार्यालयी डायलॉग टाकत टाकत "खोल्यांपर्यंत-नेतो".आणि मग...वधुपिता आणि माता हे उभयता, तिकडची मंडळी आणि कार्यालयाचे गुरुजी कधी येतात? ह्या एका प्रश्नावर लक्ष केंद्रीत करून बसतात. त्यात बर्‍याचदा वर'इलेव्हन्स् संघ आणि गुर्जि-नावाचा अंपायर एकामागोमाग (इथे क्रम कसाही गृहीत आहे. ;) ..) असे एकदाचे येतात! आणि वरपक्ष (त्याच खोल्यांमाधे..) स्थिरावण्यापासून,वधुपिता हा, 'त्या' संघाचा केवळ प्रभारी कॅप्टन..अंपायरकडे.. "नै..केंव्हा सुरवात करायची?" अशी नेहमीची विचारणा करायला येतो. आणि टॉस उडविण्याच्या वाटाघाटींपासून मॅचला एकं-दरीत--तोंड फुटते!

वधुपिता:- नै गुर्जी..कधि करायची सुरवात?

आंम्ही:- करू हो (या एका वाक्यानी बेचार्‍या वधुपित्यास २लिटर घाम फुटतो...पण गुर्जींनी "हो लग्गेच!" असं जरी उत्तर दिलं तरी "वेळ" तेव्हढाच जात असतो!) करू... मुलाकडची मंडळी आल्यावर.

वधुपिता:- नै म्हणजे पहिलं श्रीमंत(?)पूजनच करायचं ना..? ( हे मराठी भाषेतले,खास कार्यालयीन'विवाही-अपभ्रंश आहेत.. श्रीमंत(?)पूजन..लज्जा(???) होम... असो!)

आंम्ही:- यजमान..यजमान..श्रीमंत नै हो..सीमांतपूजन! (हे वाक्य पुरोहिताच्या मनातून उमटलं तर तो 'अट्टल पुणेरी',आणि सवईनी उच्चारत असेल तर तो 'पक्का घाटी' समजावा!)

वधुपिता:- (मनात..ब्वरं बरं कळ्ळं!) उघड- हो..हो.ह्हो.ह्हो..तेच ते! तर कधि करायचं ते? (या प्रश्नावर पुरोहित "कार्यालय" या संस्थेत "घोळलेला" असेल तर त्याला... जेवणाअधी..का नंतर? हा उपप्रश्न नीट ऐकू येतो..आणि "लोळलेला" असेल तर "नंतरच कारा..म्हणजे स्पेशल चार्ज घेता येइल तुमच्याकडून" हे वाक्य त्याच्या स्वमनी तरळतं! ;) ..)

आंम्ही:- यजमान..आधी सीमांत पूजन नै कै..आधी व्याहीभेट..मग सीमांत पूजन/वाङ्निश्चय.

वधुपिता:- बरं..मग काय काय तयारी त्याची.. (इथे वधुइलेवन्सच्या महत्वाच्या प्लेअरची म्हणजे मुलिची आई -या "खर्‍या कॅप्टनची" वेंट्री होते. याचं प्रमुख वैशिष्ठ्य 'नवर्‍याला वेड्यात काढणे' हे अस्तं)

मु.आई:- अहो.... तयारी त्यांच्या कडे असते की! आपण आपली ज्येष्ठ मंडळी जमवू(लढाई पवित्रा!)

वधुपिता:- होय का हो गुर्जी?

आंम्ही:- होय अगद्दी बरोब्बर! तुंम्ही तुमच्याकडची पाच आणि मुलाच्या वडीलांसह त्यांच्याकडची पाच मंडळी जमवा आणि स्टेजकडे या ... आणि हो २ टोप्या आणा हो बरोबरं... आमच्याकडे एक्स्ट्रॉ नसते! (अजुनही व्यावसाइक पुणेरीपणात "नसते" या शब्दाला काहि ठिकाणी हक्काची जागा आहे. :) )

हे वरील सर्व होऊन... आंम्ही स्टेजच्या कडेला ,म्हणजे बाऊंड्रीवर गंधाची वाटी आणि एक नारळ या तयारीसह,दोन्ही संघांची वाट बघत टॉस'च्या तयारीत बसलेलो असतो. आणि मग एकदा का मॅनेजर "चला..चला...नंतर जेवणाला उशीर होइल,जेवणाचं बंद होइल हां मग!" अशी विनंतीवजा धमकी द्यायला लागला की मंडळी खर्‍या अर्थानी गुर्जींकडे वळतात. आणि टॉस उडतो. व्याहीभेट सुरु होते. त्यात दोन्हीकडली पाच/पाच माणसे याचा अर्थ व्यवहारात कित्तीही असाही अनेकदा होतो.आणि कार्यालयाचा गुर्जी जो असतो,त्याला मॅनेजमेंटचा आशिर्वाद जितक्या प्रमाणात लाभलेला असेल तितक्याच प्रामाणात हा टॉस'चा खेळ संपन्न होतो.

आंम्ही:- (सौजन्य मोड ऑन..)
या या... दोन्ही व्याही पुढे या. (मग पहिला काहि वेळ त्यांना कॅमेरामनच्या दिशेने 'सेट' करण्यात जातो!) "हां...अता आपापल्या डोक्यावर टोपि घाला आणि एकमेकाला गंध लावा बरंsss"...इथे टोपि पटकन सापडली आणि गंध लावताना ते शर्टावर सांडलं नाही तर देशस्थीविवाहात तो फाऊल धरतात. आणि कोकणस्थी विवाहात यापैकी काहिही एक घडलं,तर ते कुळ त्या-दिवसानंतर अहंकार-बहिष्कृत समजले जाते! "अता एकमेकाच्या हतात नारळ द्या..कॅमेर्‍याकडे पाहून गळाभेट घ्या...हां...छान! अता येऊ द्या पुढची जोडी." असं करत करत १० मिनिटं किंवा एक तासात,ही व्याही-भेट सं प ते!

तोपर्यंत इकडे वराच्या करवल्या शोधवून त्यांना वराला स्टेजवर मुंडावळ्याबद्ध करवण्यात जातो. (पूर्वी करवली एकच असायची.अता किमान दोन ते कमाल कित्तिही..अश्या-त्या-असतात..असो!) होता होता वधुपिता आणि माता वराला "द्यायच्या-वस्तू" नावाचं अभेद्य प्रकरण घेऊन स्टेजकडे येतात.त्यातच ज्येष्ठ जावयांचा मान(मोडेपर्यंत)करणेचा होतो...आणि मग मुलाचे पाय धुवायचे की नाही? औक्षण एकीनी करायचं की पाचजणींनी..? ते ही एकत्र की स्वतंत्र.?-की स्व-तंत्र...??? अशी स्त्रीवर्गात बारिक बारीक..(परंतू अत्यंत महत्वाची) वाग् युद्धं झडून सीमांतपूजन सुरु होतं. नंतर तो वांङ निश्चय घडून मुलिची पूजा होऊन खेळ संपतो..एव्हढ्यात खरी प्रकरणाची सांगता लावता येइल... पण या सगळ्यात घडणार्‍या कॉमन गोष्टी मांडाव्याच लागतील..नाहितर ते सीमांतपूजन-वांङ निश्चय..कैचे??? दोन्हीकडली सुरवात कुंकूलावणे..आचमन प्राणायाम..संकल्प..गणपति/वरुण पूजन.. वगैरे शेवटापर्यंत जात असली...तरी,
फोटोग्राफर-व्हिडिओशुटींगवाले आणि भटजी,कार्यालयाचा स्टेज-नोकर आणि यजमानपार्टी,दोन्हीकडच्या-अर्थातच विहिणी(मुला/मुलिची आई) ही शीतयुद्धही त्यात असतातच.
पैकी..
क्रमांक १) फोटोग्राफर-व्हिडिओशुटींगवाले आणि भटजी---

फोटोवाले:- गुर्जी..जरा या साइडला..या साइडला..
आंम्ही:- अता ठीक आहे का?
फोटोवाले:- हां..ओक्के!
आंम्ही:-(हुश्श्श!)

फोटोवाले आणि कंपनी आणि गुर्जी हे समजुतदार(झालेले..) असले तरच हे एव्हढ्यात संपतं. नाहितर...

फोटोवाले:- "ओ..गुर्जी थोडे कडेला या ना" ...यात गुर्जी कोणत्याही कडेला असला तरी यांना त्याची 'बाजू' कायम चुकिचीच वाटत असते!
आंम्ही:- "मी कडेलाच आहे हो..तुंम्ही तुमची साइड जरा...मारा" ...इथे दोन्ही पक्षी, ठराविक बाणांचा मारा होऊन मगच प्रकरण मार्गी लागतं! वास्तविक गुर्जी हा कार्यालयीन धर्म-सेवा-वाहक...म्हणजे अंपायर अश्याही स्वरुपाचा असल्यामुळे,तो बरोब्बर वधु/वरपक्षाच्या मधे आसनस्थ जाहलेला असतो.पण फोटुग्राफरांच्या समस्त जमातीस त्याचं ते आसनस्थ..कायम "असं नस्तं!"..असच का दिसत अस्तं? ते तेच जाणोत.

क्रमांक २)
कार्यालयाचा स्टेज-नोकर आणि यजमानपार्टी---

य.पार्टी:- "तांदुळ कुठे ठेवतात ही लोकं... ओssss तांदुळ द्या होssss!"
नोकरः- "तिथे स्टेजखाली वाका...नीट नजर टाका..आणि घ्या (एक्स्ट्राचं..) ताट काढून" ..असा नोकर मंडळी य.पार्टीच्या बाऊन्सरला उपरकट मारतात.
मग चिडून य.पार्टीवाले आपल्यातल्याच कोणालातरी "अगं सुमे..काढ गं ताट ते..बघू तांदुळ म्हणून काय दिलनीत नेमकं!" असा बहुआयामी टोला लगावतात. नोकर कंपनी या सार्‍यात तय्यार असल्यामुळे हे सगळं मालकाच्या अंगावर गेलं तर जाऊ देत 'खोकलिचं'..म्हणून श्टेजमागं गपग्गार होते. यातही तय्यार नोकर मंडळी.."तांदुळ पायजे का?..देतो ना--सर(!)" अशी (सौजन्य-इन-कॅश) वाक्य टाकुन यजमानाच्या रागाचा मो-बदला अनेक ठिकाणी-घेण्याची तयारी सुरु करतात. बाकि बरीचशी तयारी ही 'पॅकेज'मधे लागू असल्यामुळे आजकाल या विषयावर फार वाग् युद्ध झडत नाहीत.

क्रमांक ३)
दोन्हीकडच्या-अर्थातच विहिणी(मुला/मुलिची आई)
वास्तविक हे शीतयुद्ध आध्यात्माप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय असल्यामुळे इथे देणे तसे गैरलागू आहे. आणि त्याची खरी मज्जा ही त्या ग्राऊंडवरच घ्यायचा विषय आहे,हे ही तेव्हढेच खरे. तरी आपण या युद्धात दुसर्‍या दिवशीची छुपी-तयारी कशी असते? त्यातले महत्वाचे काहि पाहुच! :D
(हे संवाद प्रस्तुत धार्मिक विधि चालू असताना,आधे मधे घडत असतात,,हे सांगितलेले बरें हो..नै तर उगीच आमच्यावर आफत यायची! :D )

मुलाची आई:- अहो..ते देण्याघेण्याचं आपण आजच उरकू या..नै का..मंजे बरं पडेल!

मुलिची आई:- "होय तर!!! आजच अवरायला हवं..उद्या राहून काय उप योग त्याचा(???)"

मुलाची आई:-"पण रुखवताचं उद्याच 'करावं' लागेल!"

मुलिची आई:-"ते उद्याच 'करणार' आहोत... हं हं हं-(हा हसण्याचा अभिनय आहे!) .. चालेल ना !?"
त्यातच-"आजकाल मुलिची आई..(काळाचा न्याय मिळून) बरीच पालटलेली आहे! असे (कुणी..कुणी) म्हणतात ते बाकि खरें हों!" ... अश्या प्रकारचाही संवाद स्टेजच्या कडेनी कानावर-पडत असतो.

मुलाची आई:- (मुलिला) साडी लवकर बदलून ये गं .. गुर्जी तुंम्हीही सांगा

मुलिची आई:- त्यांनी कशाला सांगायला हवं? तिला वेळ काढायची सवय नाही..... कार्यालयात वगैरे-आल्यावर ( ही दुसर्‍या दिवशिची-सर्वात मोठ्ठी ठिणगी! )

मुलाची आई:- अस्सं होय. गुर्जी कन्यादान किती वाजता हो उद्या? (या संवादात आम्म्ही एकंदर 'वजा' म्हणूनच गृहीत असतो! आणि हे ज्या गुर्जिस समजत नाही..तो कध्धिह्ही कार्यालयाचा 'गुर्जी' नसतो! )

मुलिची आई:- मुलगा आला कि सुरु करतात..नै का हो भटजी?

मुलाची आई:- अहो भटजी..किती वाजता उद्या ते सांगा कि ..(एकदाचं)
========================
यात पराभूतपक्ष हा नेहेमी..तिकडे सरळ काढायला न जमलेला राग,गुरुजी नामक वाफेच्या यंत्रात घालुन त्याचं पाणि करुन का घेतो हे आंम्हाला एक न उलगडलेलं कोडं आहे... असो!
विवाहातल्या या सर्व सायंकालिन घडामोडींना,क्रिकेटच्याच रूपकात नाव द्यायचं तर पहिल्या (रन---रेट वाढवणार्‍या) पंधरा ओव्हर असच द्यावं लागेल. त्यानंतर मग उरलेली म्याच होते...ती दुसरे दिवशी सकाळी...

देवकं---बसताना!

==================
क्रमशः....

संस्कृतीसमाजमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Mar 2014 - 9:51 pm | मुक्त विहारि

आता लेख वाचतो...

पाषाणभेद's picture

6 Mar 2014 - 10:10 pm | पाषाणभेद

गुरूजी एक पुस्तकच करा आता.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2014 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gif

दिव्यश्री's picture

6 Mar 2014 - 10:37 pm | दिव्यश्री

आंम्ही:- यजमान..यजमान..श्रीमंत नै हो..सीमांतपूजन! >>> :D

हे खूप वेळा ऐकलंय ... लोक सर्रास संकष्टी पावावे आणि श्रीमंत पूजन असेच म्हणतात आणि हो काही लोक हे बोलतात . :P *lol*
बाकी पूर्ण लेख वाचला नाही अजून ...अगदी राहवले नाही म्हणून हा पर्पंच . :D

खास बुवा शैलीत लिहिलेला लेख आवडला.
चौकार षटकार चांगलेच हाणलेनीत.

आंम्ही:- (सौजन्य मोड ऑन..)

तुम्ही आणि सौजन्य मोड ऑन पाहून डोळे पाणावले.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2014 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्ही आणि सौजन्य मोड ऑन पाहून डोळे पाणावले.>>> :-/ हेच्च होतं तुमचं! आत्मू गुर्जी कुठे बोल्तो? आणि अत्रुप्त आत्मा कुठे? हे ओळखुच येत नाही तुंम्हाला! त्यामुळे अ......सो....च्च! :p

प्रचेतस's picture

6 Mar 2014 - 11:45 pm | प्रचेतस

खी खी खी. =))

खटपट्या's picture

7 Mar 2014 - 2:01 am | खटपट्या

सौजन्य मोड ऑफ कधी होतो ? (सौजन्य मोड ऑफ झाल्यावरची तुमची फटकेबाजी ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे)

लॉरी टांगटूंगकर's picture

7 Mar 2014 - 12:04 am | लॉरी टांगटूंगकर

"फाऊल धरतात." वाचून ढेरीवरचा लॅपटॉप गदागदा हलेपर्यंत हसलो. पुढचा भाग लवकर लिहिणे.
:ड

आदूबाळ's picture

7 Mar 2014 - 12:07 am | आदूबाळ

एकच नंबर!! पुढचा भाग लवकर लिहा!

व्याहीभेट थोडक्यात आवरली याबद्दल णिशेढ.

मला व्याहीभेटीचे दणकट अनुभव आहेत. टोपी न सापडणे आणि गंध सांडणे हे बेसिक आहेच.

पहिल्यांदा आपल्याला ज्याला गळे-भेटायचंय तो कुठेतरी सांडलेला असतो. "मुलीचा भाऊ...मुलाचा भाऊ" असा पुकारा झाल्यावर आपण इमानदारीत जाऊन उभं रहावं तर विरुद्ध पक्षाचा मनुक्ष गायब. मग "अरे शिरीष कुठंय? शिरीषला बोलवा. आत्ताच तिकडे बाहेर होता..." वगैरे होऊन शिरीष-शोध चालू होतो. तोपर्यंत आपण व्हीडियो शूटिंगच्या प्रखर प्रकाशामुळे घामेघूम.

विशेषत: देशस्थांकडे नात्यांचा जरा गोंधळ असतो. उदा. माझा एक पुतण्या माझ्यापेक्षा चांगला पाच वर्षं मोठा आहे. (वयाच्या विशीतच मी आजोबा झालो!) त्यामुळे त्या शिरीषचं वय पाच वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंत काहीही असू शकतं. लहानगा शिरीष कपाळीच्या ओल्या गंधाचा डाग आपल्या पोटावर पाडतो. मध्यमवयीन शिरीषच्या ढेरपोटासकट त्याला कवेत घ्यायला जरा अवघड जातं. वयस्कर शिरीषच्या वरच्या खिशातली चुन्याची डबी कचकन टोचते!

कधी आपलं नातं एकच असतं (म्हणजे मुलीला एकच भाऊ), पण मुलाला चांगले पाच भाऊ असतात आणि सगळ्यांना हाऊस असते. मग तोच नेहेमीचा यशस्वी प्रयोग पाच वेळा करायचा. शेवटी अंबाबाईसारखा कपाळी मळवट भरल्यासारखं चित्र दिसू लागतं!

लाजाहोम आणि कानपिळीबद्दल परत कधीतरी...

ह्या वेळी पु ल देशपांडे आठवले...

भन्नाट लेखन :)

सीमांतपूजनाबद्दल सर्रास श्रीमंतपूजन, श्रीमंतीपूजन, सीमांती असे भयानक पाठभेद ऐकलेत. बरं एरवी ज्यांना पोळीला चपाती आणि काकूला काकी म्हटलेलं खटकतं अशा व्यक्तींकडून हे उच्चार ऐकल्यानंतर हसावं की रडावं ते कळत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Mar 2014 - 9:23 am | अत्रुप्त आत्मा

@सीमांतपूजनाबद्दल सर्रास श्रीमंतपूजन, श्रीमंतीपूजन, सीमांती असे भयानक पाठभेद ऐकलेत.>>> हे पाठभेद नाहित सुड,भेदकपणे पाठ(झालेले) अप भ्रंशच आहेत. :D
शेवटी पाठभेदाला सुधा काही अर्थ असतोच. खरा शब्द सीमांतपूजन असाच आहे.
मुलाची पूूजा होताना , कल्पित प्रदेशे सीमांते... आगताय अस्मै स्नातकाय वराय असाच नामोल्लेख होत असतो. :)

पाठभेद सार्क्यास्टिकली म्ह्टलं होतं गुर्जी !!

आवडल . आतापर्यंतची घरची सगळी लग्न डोळ्यासमोरुन गेली .
:-)

चौकटराजा's picture

7 Mar 2014 - 11:36 am | चौकटराजा

हसून हसून खल्लास. पण काय हो गुर्जी, तुम्ही स्वत: ला समजता कोण ? आमच्या फोटोग्राफरची, मुलाच्या, मुलीच्या आईची अन तुमची काय खुन्नस आहे हो ?. एक तर कचकून दक्षिणा हाणता वर यजमाणाची टि़गल ?

अत्रुप्त आत्मा's picture

7 Mar 2014 - 12:05 pm | अत्रुप्त आत्मा

@यजमाणाची टि़गल ? >>> यजमान लोक... गुरुजिंची काय कमी उडवतात होय! :p
अलिकडे एक होउ घातलेले यजमान... वास्तुशांति वरून तर माझी भयंकर म्यानेज करुन खेचत असतात.. =))
ते पर्वा आपण भेटलो... तेंव्हाचे अठवतात का होsssss? :p

प्रचेतस's picture

7 Mar 2014 - 12:25 pm | प्रचेतस

ते खवचट गुर्जींना यजमान पण तसेच खवचट मिळणार ना. =))

अत्रुप्त आत्मा's picture

7 Mar 2014 - 2:11 pm | अत्रुप्त आत्मा

@तसेच खवचट मिळणार ना. >>> :-/ पुन्हा तेच! :-/

हत्ती धाग्यावर खेळतो होळी
मारा त्याला एक बंदुकिची गोळी!

http://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-two-guns.gif दु..दु..हत्ती http://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-m16-smiley-emoticon.gif

प्रचेतस's picture

7 Mar 2014 - 3:06 pm | प्रचेतस

हाच तो खवचटपणा. =))

तो साय साय करायचा हे दु दु ...दु दु करतायेत. कलोनियल कझिन्स शोभतात बाकी !! ;)

मंदार दिलीप जोशी's picture

7 Mar 2014 - 3:49 pm | मंदार दिलीप जोशी

छान!!!

रेवती's picture

7 Mar 2014 - 9:05 pm | रेवती

हम्म्....वाचतीये.

पैसा's picture

7 Mar 2014 - 9:38 pm | पैसा

पुढचा भाग लवकर येऊ द्या! गेल्या २ वर्षात काही लग्नात हल्लीचे फटुग्राफर मंडळी शिणेम्याचे डायरेक्टर असल्यासारखे सगळ्यांना वागवत असतात आणि माळा घालणे सुद्धा २/२ वेळा करवून घेतात हे बघून डोकं पार आउट झालं होतं, त्याची आठवण झाली. शिवाय ते चपला पळवणे, नवरा नवरीला उचलणे वगैरे प्रकार तर अगदीच भयानक. लग्न आहे का विडंबन तेच कळत नाही. तसले प्रकार बघून तुमचं डोकं जाग्यावर रहातं का बुवा?

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2014 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा

@काही लग्नात हल्लीचे फटुग्राफर मंडळी शिणेम्याचे डायरेक्टर असल्यासारखे सगळ्यांना वागवत असतात आणि माळा घालणे सुद्धा २/२ वेळा करवून घेतात हे बघून डोकं पार आउट झालं होतं,>>> =)) अता लग्नही तेच लावत असतात.आंम्ही फक्त मूव्हमेंट करवून घेत असतो बर्‍याचदा! अता विंधिंचे फोटो नसतात,फोटोंचाच प्रत्येक विधी असतो! :D

@लग्न आहे का विडंबन तेच कळत नाही.तसले प्रकार बघून तुमचं डोकं जाग्यावर रहातं का बुवा? >>> पहिली दहा वर्ष डोकं भरपुर हलत डुलत होतं. आता ते थंड करून घेतलेलं आहे. :)

त्यामुळे आता लग्न/मुंज काहिही असो..हे सर्व संस्कार नव्हे सोहळा म्हणून पूर्ण रुपांतरीत झालेले आहेत. हे आंम्ही अ‍ॅक्सेप्ट केलं तर गुरुजी...नाहीतर कुणीच नाही! :)

अर्र चांगलं दाबुन हाणलय =))

दादा पेंगट's picture

8 Mar 2014 - 1:58 pm | दादा पेंगट

आत्माराव, मस्त मझा आला! :D