चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला
गर गर फिरणारा भोवरा.. बनुन बघायचय मला
भरारणारा तो पतंग- त्याची ती उंची;
वा-याशी दोस्ती काटाकाटीची मस्ती...
वेगळच जगण अनुभवायचय मला!
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
Born clerk... died clerk सगळेच असतात;
वेगळा option click फ़क्त थोडेच करतात;
त्या थोड्यांमद्धे रहायचय मला...
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
White color job आपला फंडा नाय...
कोप-यावरच्या पक्याचा रुबाबसुद्धा जमत नाय..
एक वेगळ आयुष्य जगायचय मला...
काय अन् कस कोणी सुचवतय का ज़रा?