उत्तर भारतात वसंतपंचमी साजरी केली जाते. आपण शाळांतून तोच सण सरस्वती पूजन म्हणून साजरा करतो. यंदा २४ जानेवारीस वसंतपंचमी होती. खरे तर हा सुगीचा सण सर्वच भारतात आनंदाने साजरा केला जातो. विवेक पटाईत ह्यांच्या लेखात केवळ वसंतपंचमीचाच उल्लेख आहे. मात्र सुगी साजरी करण्याचे मार्ग अनेक आहेत! चला तर ह्या सुगीच्या बहारीचे आपणही स्वागत करू या!
वसंतपंचमी हा सण माघ शुक्ल पंचमीस येत असतो. ह्या दिवशी सरस्वतीदेवीचा प्रकटदिन असतो. ह्या दिवसास श्री-पंचमी म्हणूनही ओळखले जाते. भारतातील सर्व भागांत ह्या दिवशी शाळांतून “सरस्वती पूजन” केले जाते. खालील श्लोकाने तिचे स्तवनही केले जाते.