उपवासाला कोणती दारू चालावी ??

हेमन्त वाघे's picture
हेमन्त वाघे in काथ्याकूट
6 Feb 2015 - 5:06 pm
गाभा: 

( नोंद घ्यावी - मी कोठ्याल्याही प्रकारचा उपवास करीत नाही . तसेच माझा व्यवसाय दारू चा प्रसार करणे आहे. )

अनेक वर्ष्यापूर्वी विलेपार्ले इथे ( मुंबईत ले छोटे पुणे) मी एक वैचारिक चर्चा एका मराठी उपहारगृहात केली होती - कि जर उपवासाला जर बटाटे आणे जव चालते तर काही प्रकारची वोडका जी बात्तात्यापासून केली जाते ती आणि काही बिअर ज्या जावा पासून केल्या जातात त्या का चालू नहेत ? म्हणजे घन ( solid ) असताना बटाटा चालतो आणि तेच द्रव रुपी वोडका झाले के चालत नाही आसे का?

असे केल्यास उपवास अधिकाधिक लोकप्रिय होणार नाहीत काई ? त्यामुळे आपला धर्म हि अधिक समावेशक होऊन वाढायला मदत होईल . ( जसे कि बाबा उद्या जोहन आणि अब्दुल पण उपवासाला यायचे म्हणतात । तसेच ते "प्रसाद" पण स्वताच "घेवून" येत आहेत ..

जाणकारांनी आपली मते द्यावीत.

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

6 Feb 2015 - 5:11 pm | आदूबाळ

वर्‍याच्या तांदुळाची.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Feb 2015 - 5:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

उपवासात "धान्य फ़राळ" म्हणुन एक शास्त्रसंमत प्रकार असतो! कुठले ही धान्य जर भाजुन दळुन त्याचे पीठ करून दशम्या केल्यास त्या चालतात उपवासात ह्यात फ़ळ भाज्या सुद्धा चालतात, ह्या कारणे धान्य (बार्ली गहू ज्वारी) भाजुन त्यात हॉप्स नावाची फ़ळभाजी घातलेली बियर निश्चित चालावी!!!! (कुठली ही बियर घ्या, चकन्यात फ़ळे व् फळभाज्या (काकडी) चालण्यास प्रत्यव्याय नसावा, फ़क्त चकन्यावर नेहमीचं मीठ न भुरभुराता सैंधव मीठ भुरभुरावे)

'पिंक' पॅंथर्न's picture

6 Feb 2015 - 5:38 pm | 'पिंक' पॅंथर्न

मुळातच उपास म्हणजेच कमी खाणे किंवा पिणे.
त्यामुळे काय खावे या पेक्षा किती खावे किंवा प्यावे हे महत्वाचे आहे ..

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2015 - 5:54 pm | अत्रुप्त आत्मा

हे पहा... ह्या अश्या अवस्थेला नेणारी http://www.sherv.net/cm/emoticons/bad/drunk-smiley-emoticon.gif कोणतिही चाल्लि पाहिजे! उपवास म्हणजे चित्त परलोकात देवतांपाशी - वास करत असलं पाहिजे ना? मग झालं तर! :p

अवतार's picture

6 Feb 2015 - 8:17 pm | अवतार

:)))

गणेशा's picture

7 Feb 2015 - 12:31 am | गणेशा

+१

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Feb 2015 - 6:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बाबा रे हेमंता.दारूचा प्रसारच करतोस तर उपवास वगैरेचा का विचार करतोस ? हल्ली ब्रीझर नामक दारू
बाजारात लोकप्रिय आहेत असे हे म्हणत होते. त्याच धर्तीवर काहीतरी बनव. बटाटा,कांदा,काजूची तुला 'बकांका' बन्वता येईल.!

ब्रिझर नाय वो माई बडवायझर हायते .
तरी तुमच्या ह्यांना कालच लै घेत जाऊ नका मनलो होतो.
पण म्हणाले "आमची 'हि ' लै डोक खाते ,त्यामुळे मिळत ते पितो.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2015 - 6:18 pm | अत्रुप्त आत्मा

............http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing015.gif
@त्यामुळे मिळत ते पितो. >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing012.gif

अहो ब्रीझर प्रकाराचीही दारू(!) असते मालक. माईंना माहिती तुम्हाला माहित नाय??

जेपी's picture

6 Feb 2015 - 9:12 pm | जेपी

नव्हत माहित...
'त्यांच्या ' ...'ह्यांच्या' नादात राहील ते

vikramaditya's picture

6 Feb 2015 - 9:41 pm | vikramaditya

ह्यांची "नीट" (काळजी) घेत जा बरं का.

शक्यतो ह्यांना घरीच 'बसु' दे. ह्या वयात ते कशाला नस्त्या फंदात पडतात?

*drinks* *DRINK* :drink:

बोका-ए-आझम's picture

6 Feb 2015 - 7:53 pm | बोका-ए-आझम

ह्या अप्रतिम मालिकेत एक सीन होता. त्यात एक कवी उपवास असतो म्हणून व्हिस्कीऐवजी वाईन पितो.त्यावर कोणी णिषेध व्यक्त केला नव्हता. त्यावरून वाईन उपवासाला चालत असावी असा अंदाज आहे.
(जर कोंबडीने आयुष्यभर फक्त शेंगदाणे आणि साबुदाणेच खाल्ले असतील तर ती कोंबडीही उपासाला चालायला हवी, नाही का?)

म्हया बिलंदर's picture

6 Feb 2015 - 9:05 pm | म्हया बिलंदर

हो फुकटची चालते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Feb 2015 - 10:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

साबुदाण्याचा अर्क!!

ज्योति अळवणी's picture

6 Feb 2015 - 11:26 pm | ज्योति अळवणी

गैरसमज... कुणाचे असे तर कुणाचे तसे. विलेपार्लेकरांची स्वतःची ओळख आहे. 'छोटे पुणे' हे नामकरण ते अपमान समजतात; असे एकिवात आहे. तरी मोठे पुणे (करानी) शब्द सांभाळून वापरावेत हा अनाहूत सल्ला!

हेमन्त वाघे's picture

7 Feb 2015 - 12:18 am | हेमन्त वाघे

ज्योतीताई तुम्ही पार्ल्याच्या नगरसेविका ज्योती अळवणी तर नवे ना ?

तसा हि मी मुंबईकर आहे … पक्का . पूर्वी गोरेगाव ला राहणारा

ज्योति अळवणी's picture

7 Feb 2015 - 12:23 am | ज्योति अळवणी

नाही हो

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2015 - 6:01 am | अत्रुप्त आत्मा

हा पहा धाग्याचा परिणाम! दोन उत्तरं एकत्र आली. :-D

टवाळ कार्टा's picture

7 Feb 2015 - 10:58 am | टवाळ कार्टा

=))

बॅटमॅन's picture

9 Feb 2015 - 12:03 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Feb 2015 - 12:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हो ना हो..!! =))

उपवासासाठी शुद्ध सोमरस(दारू हा शब्द उपवासाच्या दिवशी वर्ज्य) घ्यावा सोम ,विकी पाहा
मोहाची देशी नक्कीच चालेल.

सुबोध खरे's picture

7 Feb 2015 - 10:29 am | सुबोध खरे

कंजूस साहेब
सोम रसाबद्दल बरेच समज ( गैरसमज )आहेत. यात काही लोकांचे असे म्हणणे होते कि सोम म्हणजे चरस/ गांजा तर काही लोक विकीवर म्हटले आहे त्याप्रमाणे एफेड्रा झाडाचा रस आहे. यातील एफेड्रीन हे द्रव्य आपल्या शरीरात असते त्या अड्रेनालीन या द्रव्याचे प्रतिरूप सारखे आहे. एफेड्रीन घेतल्याने नशा न येता उलटे तरतरीत वाटते.कॉफीच्या पेक्षा जास्त परिणाम. हे औषध सर्दी (नाक चोंदणे) खोकला आणि दमा अशा आजारावर उपयुक्त आहे आणि अशा बर्याच खोकल्याच्या औषधात हे आढळून येईल. अर्थात जास्त घेतल्यास आपला रक्तदाब वाढू शकतो.

काथ्याकुटाच्या शिर्षकाने अंमळ हसू आले!
चवीने आणि आस्वादाने मद्य घेणार्‍याला उपासतापास सोसत नाहीत असे सूक्ष्म निरीक्षण जाता जाता नोंदवतो!

- (मद्याचार्य) सोकाजी

सतीश कुडतरकर's picture

7 Feb 2015 - 11:48 am | सतीश कुडतरकर

दारू कधीच चालत नाही हो!

ती चालणाऱ्याला धडपडवते, अडखळवते, ठेचकाळवते, गडाबडा लोळायला लावते आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ती खर बोलायला लावते.

हां! उपवासात कोणती दारू प्यायची अस म्हणत असाल तर, बिल भरणार कोणी असल तर उपवासात वास न घेता कुठलीही चालते.

उपवास पुढे ढकलला जातो आपसूकच (पण हा पर्याय फार खर्चिक पडेल तुम्हाला !)

माझीही शॅम्पेन's picture

8 Feb 2015 - 11:19 pm | माझीही शॅम्पेन

उपवासाला साखर चालते , द्राक्ष चालतात ,आंबवलेले पदार्थ दही चालतात

मग कुठलीही चालेल कि , आपल्याला तर बुवा उपासाला शाम्पेन किवा कशाशा चालते (कृ हा घ्या :) )

उपास करण्यारा माणसाने प्यावीच का किंवा खानदानी पिणार्याने उपासाच्या भानगडीत पडूनच नये

इरसाल's picture

9 Feb 2015 - 4:55 pm | इरसाल

शुद्ध रेसीपी आहे.