नित्या प्रमाणे व्हॅलेंटाईन डे आपला का बाहेरचा वगैरे चर्चा रंगतीलच, विरोध आणि विरोधाच्या काट्या मधूनही गुलाब लाल रंगाची उधळण होत राहील. भारतात तर भारतात पण पाकीस्तान सारख्या इस्लामी देशांमध्ये सर्व कडक कायदे आणि अतीरेकी हाताशी असूनही व्हॅलेंटाईन डे संस्कृतीने बर्या पैकी आव्हान उभ केल आहे. सनातनी लोक हिजाब डे अथवा मॉडेस्टी डे म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा करू पहात आहेत. तर कुणी केवळ गझलांच्या कार्यक्रमांवर भागवतात पण मोटरसायकला बांधून लाल हृदयी फुग्यांच्या विक्रीचे फोटोग्राफ काही पाकीस्तानच्या तरुणाईच वेगळ चित्र उभे करतात.
संबंधीत बातम्यांचे दुवे
* पाकीस्तानातील व्हॅलेंटाईन डे २०१४ -पाकीस्तान टुडे वृत्त
* पाकीस्तानातील व्हॅलेंटाईन डे २०१४ -हफींग्टन पोस्ट वृत्त
* पाकीस्तानातील व्हॅलेंटाईन डे २०१४ - अल्जझीराचे पेशावर वृत्त
* पाकीस्तानातील व्हॅलेंटाईन डे २०१५ बद्दल रफिआ झकारिआ नावाच्या लेखीकेचा डॉन वृत्तपत्रातील ब्लॉग
प्रतिक्रिया
11 Feb 2015 - 10:10 am | पैसा
पाकिस्तानात व्हॅलेंटाईन? आमच्या ऑफिसातला एक कलिग कोणाचा राग आला की "माणूस आहेस की पाकिस्तानी?" म्हणायचा त्याची आठवण झाली! =))
11 Feb 2015 - 10:56 am | मितान
:))
11 Feb 2015 - 11:10 am | माम्लेदारचा पन्खा
त्यांना कसला आलाय व्हॅलेंटाईन ? बुरख्यातली मुलगी ओळखणार क शी?
11 Feb 2015 - 12:00 pm | माहितगार
'मिया बिबी राजी तो क्या करेगा काजी' अशी काही एक म्हण आहे. कोणताही मानवी समाज खूप वेगाने बदलत नाही पण पूर्ण स्थितीशीलही राहू शकत नाही. एक तर पाकीस्तानात सर्वच जण बुरखा वापरतात असेही नसावे. जिथे असेल तेथेही जाहीर वाच्यता न होणारे इतर मार्ग असणारच. एकतर जवळच्या नाते वाईकात विवाह त्या समाजात सर्रास असतात. नातेवाईक मित्र मैत्रिणींचे शादी ब्याह हे अधिक ओळख करुन घेण्याची जागा असते. राहीली बाब बुरख्याची त्याने स्वातंत्र्य जेवढे मर्यादीत होते त्याच्या दहापट मिळतही असेल बुरखा कसा वापरला जातो त्यावर अवलंबून असण्याचा ढोबळ अंदाज आहे :). सोबत बुरख्यात बहीण आहे का इतर कुणी हे समजण कठीणच असेल :) (ह. घ्या.) म्हणूनच त्यांचे कायदेही अधीक खाष्ट असतील कदाचीत.
11 Feb 2015 - 12:04 pm | मदनबाण
दिल तो सभी के पास होता हय... लेकिन इष्क का रस चखने वाले भी कम नय ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
11 Feb 2015 - 1:18 pm | राही
वॅलेंटाइन्स डे.
11 Feb 2015 - 1:31 pm | नंदन
बातम्या वाचून फारसं आश्चर्य वाटलं नाही. boston.com या संकेतस्थळावर साधारण दर आठवड्याला एखादी समयोचित थीम निवडून, जगभरातली छायाचित्रं प्रसिद्ध केली जातात. त्यात दोन वर्षांपूर्वीच्या 'वॅलेंटाईन्स् डे'च्या पानावर पाकिस्तानातल्या चित्रांची संख्या लक्षणीय होती - http://www.boston.com/bigpicture/2012/02/seeing_red_valentines_day_2012....
अवांतर - गूगल सर्च ट्रेन्ड्सवरून घेतलेला मागोवा:
Why Is Gay Porn So Popular in Pakistan?
13 Feb 2015 - 3:21 am | हरकाम्या
" माहितगार" यांना पाकिस्तान प्रेमाचे फार भरते आलेले दिसते. जो देश आपल्याला सतत पाण्यात पाहतो. व त्या
देशाची जनताही तसेच वागते. त्या देशाच्या " Valentine Day" शी आपल्याला काय देणेघेणे असावे ? आपल्या
देशात इतर करण्यासारख्या " उठाठेवी " नाहीत काय?
13 Feb 2015 - 10:48 am | पैसा
आपल्या मित्रांपेक्षा शत्रू काय हालचाली करतोय याची खबरबात अवश्य ठेवलीच पाहिजे!
13 Feb 2015 - 9:53 am | माहितगार
त्याच काय आहे, दक्षीण आषियात १९४७ मध्ये जिवंत असलेल्या पुर्वजांनी काही काम पुढच्या पिढ्यांसाठी बाकी ठेवलय. १५ ऑगस्ट इ.स.२९४७ च्या आत त्यांची घरवापसी होईल यासाठी हा जन्म पुरेसा ठरेल असे वाटत नै हे खरे, पण पुन्हा पुन्हा जन्मेन मी हि जिद्द वास्तव आहे. या व्हॅलेंटाईन डे चा माझा माझ्या मित्रांना संदेश हाच की पराभूत मनोवृत्ती सोडा १५ ऑगस्ट इ.स.२९४७ च्या आत त्यांची घरवापसी होईल हा विश्वास आणि जिद्द ठेवा.
आता त्यांच्या Valentine Day ची उठाठेव कशाला ? मी पुढचा जन्म तिथे घेऊन २० वर्षाचा होई, म्हणजे अजून एक ६० वर्षात तरी मन मोकळेपणाने मला माझ्या Valentine सोबत आताच्या पाकीस्तानी भागात Valentine Day साजरा करता यावयास हवा म्हणून आत्ता पासून तयारी केलेली बरी :)
13 Feb 2015 - 10:53 am | पैसा
अहो नको हो! ती घाण आपल्याला नायतर आपल्या भावी पिढ्यांना तरी कशाला पाहिजे? चांगलं काही तरी सुचवा ना!
13 Feb 2015 - 11:34 am | माहितगार
सिंधू आणि सतलज मध्ये गंगेच पाणी सोडू की थोड, त्यात काय एवढ :)