स्वामी त्रिकाळदर्शी उवाच - इमानदार सत्यवादी
स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात ध्यानमग्न अवस्थेत होते. त्यांच्या डोळे उघडण्याची वाट पाहत त्यांच्या पुढ्यात बसलो होतो. अचानक स्वामीजींनी डोळे उघडले. क्षण ही न गमावता मी लगेच प्रश्न विचारला, स्वामीजी एक शंका आहे. आजकाल इंद्रप्रस्थि जे काही चालले आहे, ते बघून सत्यवादी इमानदार या शब्दांबाबत शंका उपस्थित झाली आहे. स्वामीजींच्या चेहऱ्यावर हास्य पसरले, ते म्हणाले, बच्चा, इमानदार व्यक्ती हा सत्यवादी असतो, सत्यवादी हा इमानदार असतो. इमानदार सत्यवादी कधीच खोटे बोलत नाही. संभ्रमात पडलेल्या अज्ञानी मानवांना हे कळणे कठीणच आहे. त्या साठी दिव्य दृष्टीची आवश्यकता असते.