नास्तीक नावाच्या हिंदी चित्रपटात कवी प्रदीप यांच एक गाण आहे...
देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान
कितना बदल गया इनसान कितना बदल गया इनसान
या गाण्याच्या ओळींचा शेवट
फूट\-फूट कर क्यों रोते
प्यारे बापू के प्राण, कितना ...
(संदर्भ आणि उर्वरीत काव्य दुवा)
अशा काही आहेत, कुणाला बापू आवडोत अथवा न आवडोत पण त्यांनी 'स्वराज' च्या लढ्यासाठी असहकार चळवळीचा जेव्हा आवाज दिला, अनेक कर्त्या धर्त्या मंडळींनी त्यांच्या उमेदीचा शिक्षणाचा कार्यकाळ राष्ट्रासाठी वाहून दिला यात बापूजीं नेहरू ते आणि इतर असंख्य वकील मंडळींचाही समावेश होता ज्यांनी आपल्या चालत्या वकीली व्यवसायावर पाणी सोडून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.
कदाचित अशा निस्पृह विधीज्ञ मंडळींचाही सहभाग असेल की भारत देशाला एका चांगल्या घटना आणि संसदीय लोकशाहीची प्राप्ती झाली.
पण आज मी 'स्वराज' शब्द लेख शीर्षकातून वापरतो तेव्हा वाचक मंडळी वेगळ्याच कुतूहलाने हा धागा लेखात डोकावून पहात असतील. काळ बदलला की शब्दांचे अर्थही कसे भर्रकन बदलू शकतात. माझ्या या धागा लेखाचा उद्देश (सुषमा) 'स्वराज' दाम्पत्यावर सवंग टिका करण्याचा नाही. सध्या परराष्ट्रमत्र्यांच्या बर्याच जबाबदार्या भारताचे पंतप्रधानच परस्पर पाहून घेत असल्यामुळे असेल किंवा काय, ते असो पण टिका म्हणून नाही तर वस्तुस्थिती म्हणूनही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातून माणूसकीच खूप चांगल दर्शन मागच्या वर्षाभरात झालेल दिसत. परदेशात कोणत्याही संकटात असलेला भारतीय असो परराष्ट्र मंत्रालयातून दखल बर्यापैकी तातडीने घेतली जाते आहे असे दिसते मग इराक मध्ये अडक्लेल्या नर्सेसना सोडवणे असो वा कुणातरी परदेशस्थ भारतीय मुलीच्या पालकांचा विमानतळावर हरवलेला पासपोर्टची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना ट्विटर वर मिळते आणि कमीत कमी कालावधीत भारतीय दुतावास त्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी दस्तएवज उपलब्ध करून देत हि बातमी वाचून कुणाही भारतीयाचा उर का म्हणून भरून येऊ नये ? सुषमा स्वराजांचे पती स्वराज कौशल यांनी मिझो करार होण्यासाठी काही सकारात्मक सहभाग घेतला होता अस मागच्या दोनचार दिवसातल्या वाचनावरून दिसतं.
परदेशस्थ भारतीयांच्या हिताची आणि अडीअडचणींची काळजी भारतीय परराष्ट्र मंत्रालय संवेदनशीलपणे घेत असेल आणि या अशा संवेदनशीलतेचा फायदा विवादात अडकलेल्या भारतीयालाही मिळत असेल तर मिळूदेतकी आक्षेप विवाद आणि माणूसकी या वेगवेगळ्या मापाने मोजायच्या गोष्टी असतील तर वेगवेगळी मापे लावण्यास हरकत नसावी. पण मुख्य म्हणजे उद्देश आक्षेप आणि विवादांवर हितसंबंधाने पांघरूण घालण्याचा नसावा. पण आज संशयाने एवढे वातावरण गढूळ होण्याचे मुळात कारण काय ?, अशी बरीच कारणे असतील. माझ्या धागा लेखाचा उद्देश जरासा वेगळा या सगळ्या गदारोळातून सुटून जात असलेल्या वेगळ्या मुद्दाकडे लक्ष वेधण्याचा आहे.
आजच्या काळातील सर्वोच्च न्यायालयातील वकील मंडळींचा भारतीय राजकारणातील सहभाग हा खरेतर सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल एवढा मर्यादीत नाही. भारतीय सर्वोच्च न्यायालयातील अनेक (ज्येष्ठ) वकील मंडळी वर्षानुवर्षे भारतीय राजकारण आणि भारतीय संसदेत ठाण मांडून आहेत. यात कम्युनीस्ट पक्षातील आदरणीय सोमनाथ बाबूंपासून ते कपिल सिब्बलांपर्यंतची पी चिदंबरम, स्वराज हे अलिकडे माहित पडलेले नाव अशी अनेक नावे आहेत.
बापूजींच्या काळात वकीलांनी समाजकारणात आणि राजकारणात सहभाग घेतला तेव्हा भारतीय संस्कृतीत पाण्याची खरेदी विक्री योग्य समजली जात नसे, काळ बदलला आज अगदी भारताच्या कोणत्याही खेड्यात सुद्धा पाण्याची खरेदी-विक्री होत असते. आज भारतातील सर्वसामान्य उच्चमध्यमवर्गीयाला सुद्धा सर्वोच्च न्यायालयातील वकीलांचे सवलतीचे दरही कितपत झेपू शकतील अशी स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयातील एकेका वकीलाचे उत्पन्नाचे आकडे पाहून सर्वसामान्यांचे डोळे फिरावेत असे आकडे असतात. यांचे गलेल्लट्ठ उत्पन्नाचे मार्ग सोडून, आजच्या संस्कृतीत अमुलाग्र परिवर्तन आलेल्या काळात भारतीय राजकारणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील वकील मंडळींचा सहभाग खरेच खूप स्मितीत करणारा वाटतो. भारतातील वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे समर्थन करणारी हि वकील मंडळी अथवा त्यांचे नातलग व्यक्तीगत जीवनात भारतातील थोर थोर उद्योगपतींचे न्यायालयात प्रतिनिधीत्व करत असतात. हातात प्रत्यक्ष पुरावे येत नाहीत तो पर्यंत हितसंघर्षाचे मुद्दे उपस्थीत करणे कठीण जाते.
सरकारात बसून सर्वसामान्याना माणूसकीची वागणूक दिली जाताना काही असामान्याना माणूसकीची वागणूक मिळत असेल तर त्यात फारसे गैर मानण्याचे कारण नाही. पण काही विशेष लोकांसाठी विशेष वागणूक अथवा कायदे रचना प्रभावीत होणार असेल आणि त्यासाठी सर्वसामान्यांचे नाव पुढे केले जात असेल तर नैतीक दृष्ट्या फरक पडू शकतो. स्वराज दांपत्य असे काही करत असतील असे तुर्तास म्हणवत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयीन वकील मंडळींचा राजकारणातील एकुणच उत्साह कुठेतरी या निमीत्ताने तपासला जावयास हवा. त्यांच्या सहभागा मागे पारदर्शकतेसाठी काही संकेतांची रचना केली
जावयास हवी की ज्यामुळे भारतीय कायदे मंडळांना त्यांच्या ज्ञानाचा फायदा होईल पण कुणाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यक्तीगत हितसंबंध गुंतले असतील तर त्याने भारतीय संसदेतील कायदे बनवण्याची आणि शासकीय अंमलबजावणीच्या प्रक्रीया प्रभावीत व्हावयास नकोत. फूट\-फूट कर क्यों रोते प्यारे बापू या गुरुजी के प्राण, कितना ... असे म्हणण्याची वेळ भारतीयांवर पुन्हा न यावी 'स्वराज' या शब्दाचा अर्थ बदलू नये, एवढीच प्रभू चरणीची प्रार्थना मिपांकरांचे साक्षीने.
प्रतिक्रिया
17 Jun 2015 - 10:31 pm | पैसा
असं कुठे होतंय काय!
18 Jun 2015 - 8:28 am | माहितगार
मलाही असे काही होऊ नये वाटते. छ्याच असावे.
मी सर्वोच्च न्यायालयाच्या राजकारणात वकीलांची दिलेली नावे वानगी दाखल आहेत. अनेक जण आपल्याला बातम्यातून राजकारणी म्हणून माहित होतात पण ते सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत हे माहितीही नसते. अशा लोकांची एकुण संख्या आणि इन्व्हॉल्वमेंट सर्वसामान्य अपेक्षेपेक्षा अधीक असण्याची दावा नसलातरीही प्रथमदर्शनी शक्यता वाटते.
संशयवाद हा चिमुटभर मिठा पेक्षा अधिक असू नये पण चिमूटभर मिठा एवढा असला म्हणजे विश्वास ठेवताना डोळेही झाकले जात नाहीत.
18 Jun 2015 - 2:47 pm | पैसा
पारदर्शकता वगैरे कुठे असते काय म्हणते मी!
18 Jun 2015 - 2:52 pm | माहितगार
ओह ! असं म्हणताय होय :) खरे आहे ते.
17 Jun 2015 - 11:19 pm | खटासि खट
कौशल यांचं आडनाव स्वराज का नाही ?
20 Jun 2015 - 7:08 am | बबिता बा
परराष्ट्रमंत्री एका संशयित गुन्हेगाराला दुसर्या देशात जायची परवानगी देऊ शकते पण स्वतःच्या देशात चौकशीला परत ये असा आदेश देऊ शकत नाही . यातच सर्व काही आले.
भारतात घोटाळे करुन जगभर मजा मारत फिरा. असा संदेश बिनदिक्कतपणे दिला जात आहे . याचा निषेधच व्हायला हवा.