भिकबाळी

क्रेझी's picture
क्रेझी in काथ्याकूट
7 May 2015 - 12:13 pm
गाभा: 

मला ह्या दागिन्याबद्दल माहिती हवी आहे. ह्याबद्दल असलेल्या काही शंका/ प्रश्न.

१) 'भिकबाळी' हा योग्य शब्द आहे की ह्या दागिन्याचं मूळ नाव काही वेगळं आहे?
२) ह्याचा नेमका इतिहास काय आहे? ह्याला 'भिक'बाळी असंच का म्हणतात?
३) हा दागिना एखाद्या मुलाला/ पुरूषाला विशिष्ट वयानंतरच घालता येतो किंवा एखाद्या खास प्रसंगानंतरच घालता येतो असा काहि नियम आहे का? ( प्रसंग - उपनयन संस्कार किंवा लग्न )
४) ह्या दागिन्यामधे मोती, पोवळा आणि सोने ह्याव्यतिरिक्त कोणता धातू वापरतात किंवा फक्त ह्याच गोष्टी वापरून भिकबाळी बनविली जाते का?

पेशव्यांच्या मालिकेमधे सर्वप्रथम ह्या दागिन्याचं दर्शन झालं आणि त्यानंतर पुण्यामधे ब-याच मुलांनी घातलेलं बघितलं.
तेंव्हापासून हे प्रश्न मनात घोळत आहेत जाणकार मिपाकरांनी कृपया प्रकाश टाकावा.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

7 May 2015 - 12:43 pm | कपिलमुनी
क्रेझी's picture

7 May 2015 - 12:54 pm | क्रेझी

धन्यवाद कपिलमुनी पण त्या धाग्यावर विशेष माहिती मिळाली नाही.

हेमन्त वाघे's picture

7 May 2015 - 1:09 pm | हेमन्त वाघे

संकल्पनाकोश - लेखक - सुरेश वाघे ..
खंड २ - मानवी शरीर व जीवनावस्था
पण ५ - १२५

भिकबाळी - नाव - मुलांना दृष्ट लागू नये म्हणून नातेवाईकांनी व ओळखी पालखीच्या लोकांनी " भिक" मागून दिलेल्या पैश्यातून बनविलेली बाळी ..

हा माझ्या वडिलांचा ५ खंडी ग्रंथ आहे. त्यांना अधिक माहिती आहे का विचारतो.

पैसा's picture

7 May 2015 - 1:11 pm | पैसा

जरूर विचारा. तुमच्या वडिलांनी बरंच मोठं काम केलेलं दिसतंय.

येवढ्या माहितीचा उपयोग काय करणार आहात ते कळलं तर लिहायचे कष्ट घेऊ!

ज्ञानकंडु शमवणे हे एक सबळ कारण होत नाही का?

हा कंडू नेमका कुठे होतो ते कळलं तर काहीतरी करता येईल!! =))))

प्रसाद गोडबोले's picture

7 May 2015 - 7:07 pm | प्रसाद गोडबोले

हेच म्हणतो ! !

"इतर" पिअर्सिंग विषयी माहिती विचारली असती तर लय कौतुकाने इन्टर्नेट्वर फोटो शोधुन शोधुन माहीती काढुन दिली असती , आणि प्रतिसाद डीलीट व्हायच्या आत ब्यॅकपही घेतला असता ;)

बॅटमॅन's picture

7 May 2015 - 7:24 pm | बॅटमॅन

डोक्यात होतो. =))

प्रसाद गोडबोले's picture

7 May 2015 - 6:48 pm | प्रसाद गोडबोले

भिकबाळी करुन झाली !!

आता रुद्राक्षाचे कानातले
1

केयुर (फोटो मिळाला नाही ) आणि तोडर (फोटो मिळाला नाही ) लिस्ट वर आहेत आमच्या :)

जवाहिरे's picture

12 May 2015 - 11:25 pm | जवाहिरे

बाळी हा कानासाठी असलेला अलंकार. त्यातील एक प्रकार म्हणजे भिकबाळी.प्राचीन काळी हा दागिना पौराहित्य करणाऱ्या म्हणजेच भिक्षूकी करणाऱ्या पेशात आवर्जुन घातला जायचा. त्यामुळेच भिकबाळी हे नाव पडलं असावं. मराठेशाहीत हा मानाचा अलंकार म्हणून लोकप्रिय होता. हा दागिना घालण्यासाठी काही नियम नाहीत. सोने, मोती, पोवळा किंवा माणिक त्यासाठी वापरले जाते.