शंकर अभ्यंकर हे सध्या वाल्मीकि रामायणावर 'शंकर रामायण' या नावाचा एक टीकाग्रंथ लिहित आहेत आणि त्याच्या जवळ जवळ १५,००० ओव्या लिहून झाल्या आहेत. मंगलाचरणच एक हजार ओव्यांचे आहे आणि त्यात हे 'शंकर रामायण' कशासाठी आणि आधीची रामायणे कोणती याचा सविस्तर उहापोह आहे. मिपाकरांच्या सोयीसाठी त्यातील काही ओव्या खाली उधृत करीत आहे. अधिक माहितीसाठी अभ्यंकरांच्या आदित्य प्रतिष्ठान चा २०१४ चा आदित्य दीप हा दिवाळी अंक पहावा (4/15 वेदांतनगरी सोसायटी कर्वेनगर पुणे ४११०५२). माझी खात्री आहे कि गदिमांच्या गीत रामायणाप्रमाणेच हे 'ओवी रामायण' सुद्धा मराठी मनाचा आणि ह्रदयाचा ठाव घेईल.
वाल्मीकींची जी रामकथा । ती पराक्रमाची गाथा । अनुसरली नाही प्रथा । हे शल्य माझे मनी । २।
श्रीरामायण हा इतिहास । युगांचा दिव्य प्रवास । दावावया सर्व लोकांस । 'शंकर रामायण' । ६।
इतिहासासी प्रमाण । रामकथा परम पावन । त्याचेच झाले विस्मरण म्हणोनी 'शंकर रामायण' । ७।
हे 'शंकर रामायण'। इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन । दावाया संस्कृति दर्पण । धर्म नीतीचा । ८।
'शंकर रामायणा'चा हेतू । बांधावा इतिहास सेतू । युवा पिढीचाच क्रतु । सत्पथी चालविण्या । २१०।
प्रतिक्रिया
3 May 2015 - 8:37 pm | चित्रगुप्त
हे रामायण कधी प्रकाशित होणार आहे ? जालावरि उपलब्ध असावे, हेचि बरे.
3 May 2015 - 9:32 pm | योगविवेक
टिळक सर,
ओक सरांकडून आपले नाव ऐकून होतो. आपल्या वरील माहितीने रामायणातील अनेक प्रसंगांचे पं. शंकर अभ्यंकरशास्त्री मराठीत कसे वर्णन करतात व काय भाष्य करतात ते वाचायला आवडेल.
4 May 2015 - 2:38 am | श्रीनिवास टिळक
चित्रगुप्त आणि योगविवेक: शंकर रामायणाबद्दलची माहिती आदित्यदीपच्या २०१४ च्या दिवाळी अंकात आहे. ते केव्हा प्रकाशित होणार आणि अधिक माहितीसाठी मी aditya.pratishthan25@gmail.com या पत्त्यावर दोन महिन्यांपूर्वी लिहिले होते परंतु त्याला अजून उत्तर आले नाही. आदित्य दीपचा २०१३ चा दिवाळी अंक जालावर उपलब्ध आहे (पहा https://www.academia.edu/7562865/Aditya_deep_Diwali_13_73).तसाच २०१४ चा अंकही उपलब्ध करावा अशी विनंती मी केली आहे. पण त्यालाही काही प्रतिसाद आला नाही. कदाचित पुणे स्थित कोणी मिपाकर प्रत्यक्ष तेथे गेले तर काम होऊ शकेल (दूरध्वनी ०२० २५४४५१७१ सकाळी १० ते ६).
5 May 2015 - 1:14 am | रामपुरी
"माझी खात्री आहे कि गदिमांच्या गीत रामायणाप्रमाणेच हे 'ओवी रामायण' सुद्धा मराठी मनाचा आणि ह्रदयाचा ठाव घेईल."
अबब! डायरेक गदिमा?? लै मोट्टी उडी आहे... जरा जपून जावद्या गाडी
5 May 2015 - 9:06 pm | सिद्धार्थ ४
गुरुजींची प्रवचने अत्यंत सुंदर असतात. तू नळी वर बरीच आहेत. श्री कृष्ण चरित्र, दासबोध, भागवत कथा, शिवाजी महाराजांवरील प्रवचने, स्वातंत्रवीर सावरकरान वर विवेचन. अतिशय सुंदर असा आवाज, भाषेवर असलेले प्रभुत्व, विषयांची खोलवर समज, न अडखळता केलेले सुंदर विवरण, दिलेले अलंकार आणि उदाहरणे केवळ अप्रतिम. प्रत्येकांनी एकदा तरी अवश्य ऐकावे. सध्या इप्रसारण वर त्यांचे गीते वर प्रवचन चालू आहे. ते पण नक्की ऐका.
जाता जाता, कुणाकडे त्यांचे अजून video आहेत का ? किंवा एखादी लिंक?
5 May 2015 - 9:26 pm | हाडक्या
स्पष्टच विचारतो, राग नसावा.. मिपा हे तुमच्यासाठी "छोट्या जाहिराती"चे ठिकाण आहे काय ?
माहीती देण्यास हरकत नाही (जसा बहुतेक मोदक यांचा धागा होता की तुमच्या परिसरातील विशेष रोचक अशा कार्यक्रमांच्या संदर्भात माहिती देण्याबाबत) पण काही सदस्य हे एकाच एका हेतूने इथे येतात आणि फुकटच्या जाहिराती टाकत असतात ते पटत नाही.
वरुन कोणतेही मत प्रदर्शन त्यांचा अपमान करणारे (आंजावर तुमचा मान घेऊन येताच कशाला मुळात ?) असेच समजून वागणे होते तेही उगीच वाटते.
असो.
8 May 2015 - 3:01 pm | बॅटमॅन
या सदस्यांच्या एकूण जालवावराकडे पाहिले तर तसे वाटत नाही, सबब हा आक्षेप अनाठायी आहे.
7 May 2015 - 8:21 pm | गौरी लेले
छानच ! वाचायला आवडेल!