स्ट्रेट फ़्रॉम द हार्ट !
कुठलीही चळवळ एका विशिष्ट हेतु च्या प्रचारासाठी अन्य्याया चा विरोध करण्यासाठी सुरु होत असते. समलैंगिक चळवळ ही समलैंगिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात काम करते. समलैंगिक हे ही इतरांसारखेच सामान्य आहेत त्यांना त्यांची लैंगिकता जोपासण्याचा हक्क आहे. आदि महत्वपुर्ण अशा हक्कासाठी ही चळवळ काम करते. माझा या चळवळीला विरोध नाही. त्यांच्या हक्कांची व स्वातंत्र्याची मी कदर करतो. मात्र मला या चळवळीने जे सध्या एक नकारात्मक वळण घेतलेले आहे त्याविषयी आणि दुसरी बाब म्हणजे त्यांच्यातही काही दोष आहेत त्या विषयी आता इथे माझे म्हणणे मांडायचे आहे. या चळवळीतल्या लोकांची एक नकारात्मक बाजु देखील आहे.