नगर च्या घटनेत काहीतरी भयंकर घडलयं आणि ते लपवल जातयं.
आजच सकाळी दिव्य मराठी च्या “रसिक” पुरवणीत नितीन आगे या अहमद नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील दलिय युवकाच्या क्रुर हत्ये संदर्भातील नागराज मंजुळेचा “जब्याने मारलेला दगड समाजापर्यंत पोहोचलाच नाही” हा अतिशय संवेदनशील असा लेख वाचण्यात आला. याच पुरवणीत याच घटनेवरील प्रा. सतीश वाघमारे यांचा आणखी एक संवेदनशील लेख “पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो” या नावाने आलेला आहे. दोन्ही लेख अत्यंत विचार प्रवृत्त करणारे व अतिशय अस्वस्थ करणारे असे आहेत. ही बातमी अगोदर वाचनात आली होती पण हे लेख वाचल्यावर त्या घटनेच्या तीव्रतेने अतिशय सुन्न झालोय.