sadism एक आदिम मानवी प्रवृत्ती.
या शब्दाचा उगम मार्क्वीस द साद या १८ व्या शतकातील फ़्रेंच सरदार व लेखक याच्या नावावरुन झाला. याचा जन्म तेव्हाच्या एका प्रभावशाली उमराव कुटुंबात झाला. हा सुरुवातीपासुन इतरांना यातना देउन लैंगिक आनंद मिळविण्यात समाधान मानत असे. याला अनेकवेळा वेश्यांशी अत्यंत क्रुरतेने वागल्याच्या कारणासाठी तुरुंगात टाकण्यात आले. बॅस्टील च्या कुप्रसिद्ध तुरुंगात ही याला टाकण्यात आले होते. तेथे त्याने त्याची अनेक कुप्रसिद्ध पुस्तके लिहीली. त्यात जस्टाइन आणि १२० डेज ओफ़ सॅडोम या बहुचर्चित पुस्तकांचा समावेश आहे.