मला जेवायला बोलावले तर बायको, बोलावणर्याच्या ग्रुहीणीस खास फोन करून सांगते
दिवस माझ्या इंजिनियरिंग च्या शिक्षणाचे होते. ९१ किंवा ९२ सालचे. मी नांदेड ला होतो.
हे दिवस तसे मजेचेच असतात. "आम्ही काय कोणाचे खातो रे? तो राम आम्हाला देतो रे" असे म्हणत घरून आलेल्या ६०० रु च्या पत पुरवठ्यावर, नाक वर करून जगण्याचे दिवस. ह्या वयातले पाप्याचे पितर पण पहिलवनला लालकरात फिरत असते. तर ते दिवस होते.