'हरवलेलं गाव'
'हरवलेलं गाव'
माझ्या घरातल्या अंगणाला
नाही शेणसडा
गेली तुळस झीजुन
तया नाही पाणी घडा
नाही शाळा ती पडकी
कुठे दिसत नाही फळा
आता नाही वनभोजन
म्हणून रुसलाय मळा
गेला पार तो खचून
घेतोय निर्जानांच्या झळा
कमी झाली वटपूजा
नाही दोऱ्याचा तो लळा
गेली पाखर उडून
पडलाय ओसाड हा वाडा
फोडे बुरुज हंबरडा
डोळी चार चार धारा
गेल 'जात' अडगळीत
गेला खुंट्याला तो तडा
आता दाण्यालाही लागलाय
बघा गीरनीचा ओढा