आज होणार, उद्या होणार, होणार की नाही अशा अनेक विषयांमुळे बराच चर्चिलेला डोंबिवली दिवाळी कट्टा अखेर झालाच. वृत्तांत वाचून कट्ट्याचा आनंद घेऊ इच्छीणा-या आणि काही कारणास्तव येण्याचे मनात असूनसुद्धा येऊ न शकलेल्या तमाम मिपाकरांसाठी हा वृत्तांत..
अखेरच्या क्षणापर्यंत कट्टेकरी मंडळींची पक्की संख्या तळ्यात मळ्यात होती. माननीय चोळेगावकर श्री. स्पा यांनी आधीच नकार कळवला होता, तर रविवार रात्रीची वेळ असल्यामुळे डोंबिवली बाहेरील अनेकांनी येणं टाळलं. साधारण ५ जणांचा होकार आल्यामुळे दुपारीच नंदी पॅलेसमध्ये फ़ोन करून टेबल रिझर्व्ह करून ठेवलं होतं. तेवढ्यात ४.३०-५ च्या सुमारास भटक्या खेडवालांनी फ़ोन करून त्यांना पाठदुखीमुळे येणं जमणार नसल्याचं कळवलं, आणि कट्ट्याचा एक हरहुन्नरी मेंबर गळाल्यामुळे थोडासा हिरमोड झाला. परंतु त्यापाठोपाठ आलेल्या मुविंच्या फ़ोनने पुन्हा उत्साह आला, कारण डॉ. सुबोध खरे येत आहेत अशी बातमी सांगण्यासाठी आलेला तो फ़ोन होता. त्यामुळे आधीच्या दोन डोंबिवली कट्ट्य़ांप्रमाणेच हा कट्टासुद्धा स्मरणीय होणार याची खात्री झाली.
ठरल्याप्रमाणे ८ ला नंदी पॅलेसमध्ये जाऊन बसलो, टेबल ठेवलेलं होतंच. ८.१५ ला कंजूषरावांचं, तर ८.२० च्या आसपास विनोदरावांचं आगमन झालं. पाठोपाठ मुवि, डॉ. खरे आणि शैलेन्द्र आले, आणि ८.३० ला ६ जणांसह कट्टा जमला. कट्ट्याची सुरूवात अर्थातच प्रथम एकमेकांची खरी नावं आणि मिपा आयडीसह ओळख परेडने झाला. मग आयडी मागचा खरा चेहरा कळल्यानंतर त्यांच्या लिखाणाबद्द्ल प्रतिक्रीया वगैरे देऊन झाल्या. मग विपश्यना आणि मनावरील संयम या विषयावर एक गहन चर्चासत्र पार पडलं. मुविंनी मनावरील ताब्यासाठी विपश्यनेला असलेला विरोध, त्यासाठी आर्ट ऑफ़ लिव्हिंग की तत्सम काहीतरी करूनही त्यांच्याच घरात मनावर ताबा नसणा-या व्यक्ती कशा नाहीत पासून डॉ. खरेंच्या विक्रांतवरच्या अनुभवांसह विपश्यनेसारख्या उपायांतून मनाकडे येणारी सर्व दारं बंद केली की स्वत:ला ओळखण्यात कसा फ़ायदा होतो यावर बराच वेळ चर्चा झाली. सोबतीला वेटरने चुकून आमच्या टेबलवर आणून ठेवलेले रोस्टेड पापड होतेच.
नंतर विषय वळला तो चारचाकींकडे. मग टाटांच्या गाड्या कशा उत्तम, सफ़ारीचा दणकटपणा, मारूतीची इंजिनं, शैलेन्द्रांचे महिंद्रा रेनॉल्टचे अनुभव यावर पुढला अर्धा पाऊण तास चर्चा रंगली. डॉ. खरेंच्या कुठल्याशा विधानावरून श्रीमंती आणि त्याच्या व्याख्या याकडे चर्चेचा रोख वळला. त्या दरम्यान डॉ. खरेंची, "A rich is not the person who earns more, or spends more. But rich is the person who does not need anything anymore." ही व्याख्या मनात घर करून बसली. मग ४०० रू. चे घड्याळ आणि ४.५ लाखाचे घड्याळ यात वेळ पाहण्यापलिकडे काही फ़रक आहे का, वगैरे तात्विक विषयांवर संवाद घडला.
एवढ्या चर्चेनंतर सगळ्यांनाच पोट नावाच्या अवयवाने छळायला सुरूवात केल्यामुळे काय खावे यावर लहानशी चर्चा झाली, आणि २ व्हेज सिझलर्सची फ़र्माईश झाली. सिझलर्स येईपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पांच्या ओघात आमच्यातल्या सर्वसामान्य नागरिकत्वाची प्रत्येकाला जाणीव झाली, आणि चर्चेची गाडी राजकारण या जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळली. सध्या तर या विषयात किती बोलू अन किती नको इतक्या उलाढाली होत असल्यामुळे सिझलर्स संपून बिल देऊन बाहेर पडेपर्यंत कुठलंही विषयांतर न होता मनसोक्त चर्चा आणि थोडेफ़ार वादविवाद झाले. (जास्त तपशील न देणेच इष्ट.)
बाहेर पडल्यावर पुढला कट्टा आणि कुठे कधी भरवावा यावर बोलणं चालू असतानाच मुविंनी जानेवारीत देशावर हुरडा खायला जाऊया अशी पुडी सोडली. सोबतच तथास्तु यांनी लातूरला बोलावणं धाडलं आहे, आणि हुरडा पार्टीची सगळी सोय होईल हेही सांगून टाकलं. तेव्हा पुढची भेट लातूरलाच करू या ठरावासह रात्री ११.३० च्या सुमाराला मंडळी पांगली, आणि डोंबिवली कट्टा संपन्न झाला.
कट्टेकरी (डावीकडून) - कंजूष, डॉ. खरे, शैलेन्द्र
कट्टेकरी (डावीकडून) - विनोद१८, मुक्त विहारी
प्रतिक्रिया
19 Nov 2013 - 10:02 am | जेपी
तयारी चालु आहे लातुर कट्टाची .
19 Nov 2013 - 10:18 am | देवांग
टुबोर्ग झाली वाटते ;)
19 Nov 2013 - 11:52 am | संजय क्षीरसागर
छोटासापण अर्थपूर्ण कट्टा. प्रफ कुठेत?
19 Nov 2013 - 12:59 pm | नानबा
फोटू काढत होते..
19 Nov 2013 - 12:33 pm | स्पा
लय भारी
19 Nov 2013 - 12:39 pm | स्पंदना
मुवि असे उचकुन काय पहाताहेत?
बाकी मनसोक्त गप्पा झालेल्या दिसताहेत.
तपशील अन फोटो मस्तच.
19 Nov 2013 - 9:51 pm | मुक्त विहारि
कुणास ठावूक....
अद्याप कट्ट्याच्याच आठवणीत रमलो आहे.
20 Nov 2013 - 3:10 am | प्यारे१
मुविंना कुणीतरी 'तो बघा ग्रेटथिन्कर आला !' असं म्हणालं असणार. ;)
20 Nov 2013 - 5:19 am | खटपट्या
ह ह पु वा....
बादवे ग्रेथिना बोलवा कधीतरी कट्ट्यावर आणि ……
21 Nov 2013 - 6:13 pm | मुक्त विहारि
त्यामुळेच कट्टा छान पार पडला.
19 Nov 2013 - 1:00 pm | सुबोध खरे
DISCLAIMER मी विपश्यना केलेली नाही किंवा त्यातील तज्ञ सुद्धा नाही.(फक्त तटरक्षक दलाच्या जहाजावर दोन आठवडे काहीही न करता राहिलो आहे.यात दिवसेन दिवस काहीही न बोलता राहावे लागले) जर आपण आपल्या मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत असू तर दहा दिवसात ते होणारे नाही. आपण साधक आहोत. सिद्ध किंवा योगी होणे हे इतके सोपे नाही. मी फक्त प्रथमला एकच सांगितले कि संपूर्ण एकांतवास हा आपल्याला स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. तेंव्हा तू विपश्यना चा अभ्यासक्रम करशील तेंव्हा पूर्ण मोकळ्या मानाने त्याला सामोरे जा. पण जर दहा दिवसात स्वताची थोडीशी ओळख पटली तरी चांगलेच आहे.
19 Nov 2013 - 1:34 pm | संजय क्षीरसागर
होईल ना. मन म्हणजे नक्की काय ते उलगडण्याचा अवकाश आहे.
19 Nov 2013 - 2:04 pm | अग्निकोल्हा
होणार की? थोडक्यात मेल्यावर?
19 Nov 2013 - 1:59 pm | कंजूस
माझा पहिलाच कट्टा मला आवडला .मिसळपाव डोंबिवली दिवाळी कट्टा २०१३ .गप्पांचा फड जमला पण खाण्याची ऑर्डर काय द्यावी या विचारात मुक्तविहारी आणि विनोद१८ .फोटो http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/Katta13/Photo5236_zpsad7... ॥ विपश्यना ,मनावर ताबा याविषयी एक मुद्दा समजावतांना डॉ. सुबोध खरे (खास मुलुंडहून आले),सोबत शैलेन्द्र .http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/Katta13/Photo5237_zps57a... ॥प्रथम फडणीस (मध्ये) याने पावणेआठला येऊन जागा बुक केली .पुढच्या त्याच्या शिक्षणाबद्दल सांगतांना
॥शैलेंद्र स्थानिक आणि राज्यातील राजकारण यावर बोलतांना ,डावीकडे डॉ सुबोध खरे आणि कँजूस यांचा अर्धाफोटो ।
19 Nov 2013 - 3:00 pm | संजय क्षीरसागर
प्रफच्या ग्लासमधेच दिसतोय!
19 Nov 2013 - 2:02 pm | प्रचेतस
छोटेखानी पण मस्त कट्टा वृत्तांत.
तुमच्या कट्ट्याच्या वेळेसही मी, धन्या, सूड आणि सूडचा भाऊ असे चौघेजण एफसी रोडवर 'याना' मध्ये छोटासा कट्टा करत होतो. तिथले सिझलर्स खाऊन मग कॅफे चॉकोलेडमध्ये वॉलनट क्याडबी. मजा आली जाम.
19 Nov 2013 - 4:47 pm | मीता
मला पण यायचं होतं..
19 Nov 2013 - 5:04 pm | सूड
हो ना !! पुढल्या वेळेस नक्की सांगू हो, या म्हणजे झालं. ती देवरुखकरांची मीनाक्षी अजून येतेच आहे, तसं करु नका.
19 Nov 2013 - 2:30 pm | सूड
हम्म !! छान वाटला आटोपशीर वृत्तांत. वर वल्ली म्हणतो त्याप्रमाणे याच दिवशी आमचाही पुण्यात छोटासा का होईना कट्टा झाला. वॉलनट कॅड बी म्हणजे अगदी 'अप्रतिम*' होता.
*मी बरा न म्हणता अप्रतिम म्हटलंय याची जाणकारांनी नोंद घ्यावी. ;)
19 Nov 2013 - 3:05 pm | शैलेन्द्र
"
वल्लीने एकदा सांगितलंय, परत परत सांगितल्यास तुमच्या खर्चाने पुरावा मागण्यात येइल
19 Nov 2013 - 3:10 pm | नानबा
अगदी अगदी. डोंबिवलीतसुद्धा कॅड बी मिळतं हो..
19 Nov 2013 - 4:20 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा........! छान! :)
माननीय चोळेगावकर श्री. स्पा >>>
19 Nov 2013 - 5:01 pm | दिपक.कुवेत
पण हे काय दोनच फोटो? कट्टेकरी कमी असले म्हणून काय झालं फोटो हे ढिगाने हवेतच......निदान खाण्या/पिण्याचे फोटो टाकुन ईनोचा खप करायचा रे! बाय द वे हि "चोळेगावकर" काय भानगड आहे?
19 Nov 2013 - 5:20 pm | शैलेन्द्र
ती भानगड चोळ्याशी (खरतरं "चोला") संलग्न आहे
19 Nov 2013 - 5:33 pm | सूड
भानगड?? जरा जपून बोला हो, सबंध आगर आळी यायची 'पोकल' बांबूचे फटके द्यायला.
19 Nov 2013 - 7:17 pm | त्रिवेणी
बस उलूसा वृत्तान्त आणि फोटो.
ये बहोत नाईन्साफी हे.
19 Nov 2013 - 9:53 pm | मुक्त विहारि
चला परत एक मस्त कट्टा करु या.....
21 Nov 2013 - 5:58 pm | त्रिवेणी
आता मुंबई-पुणे कट्टा करुयात ,पुण्यात. किवा मग नववर्ष्याच स्वागत समस्त मिपाकर मिळून करू सर्वांना सोयिस्कर अशा ठिकाणी.
20 Nov 2013 - 3:03 am | खटपट्या
डॉ. खरे आणि मुवि न्चे दर्शन झाले. बरे वाटले.
20 Nov 2013 - 5:33 am | अगोचर
+१ असेच म्हणतो !
20 Nov 2013 - 11:50 am | भ ट क्या खे ड वा ला
पाठ दुखी कडमडली नेमकी नको त्या वेळी
एक चांगली मैफल हुकली
20 Nov 2013 - 12:00 pm | नानबा
महान व्यक्तिमत्त्च श्री. चुलबूल पांडे सांगून गेलेत,
*देअर इज आलवेज अ नेक्श्ट टाई*
;)
20 Nov 2013 - 2:38 pm | अनिरुद्ध प
व्रुत्तान्त वाचुन आनंद झाला,काही अपरिहार्ययेवु शकलो नाही हि खंत आहेच.
20 Nov 2013 - 2:43 pm | उद्दाम
आम्हाला नको म्हणून सांगितले... मोदीना व्हिसा नाकारल्याचा राग आमच्यावर काढला. :)
20 Nov 2013 - 6:53 pm | llपुण्याचे पेशवेll
मुवि बरेचसे थत्तेचाचांसारखे दिसतात. म्हणजे ओरिजिनल डुप्लिकेट असल्यासारखे.