ताळेबंद
डोक्यावरचं कर्जाचं ओझं जड झालं की आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य संपवणं , हा अलीकडे सोपा इलाज होऊ लागला आहे. पण आयुष्य मौल्यवान असतं , आपलं आणि आपल्याशी जोडलेल्या कुटुंबाचंही. ते ' अर्थपूर्ण ' करणं अधिक सोपं आहे , संपवण्यापेक्षा.
..........
गेल्या आठवड्यात एका बातमीने सगळं मुंबई शहर हादरून गेलं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या कर्जबाजारी बापानं मुलांचा खून केला आणि नंतर पत्नीसह आत्महत्या केली. दोन दिवसांनी घरातून कुजलेले मृतदेह बाहेर काढावे लागले!