तरुण तुर्कांनो व ज्येष्ठ अर्कांनो प्रेमकोषा च्या निर्मीतीस योगदान द्यावे ही प्रेमळ विनंती !
मिपावरील तरुण तुर्कांनो आणि ज्येष्ठ अर्कांनो प्रेमात पडलेल्या ,पडु इच्छीणारे आजी-माजी प्रेमवीरांनो यंदा च्या दिवाळी ला एक महान मिपा प्रेम-कोष तयार करुन समाजसेवा करण्याचा मानस आहे. की जेणेकरुन भावी आणि सध्याच्या प्रेमी जीवांना एक रेडी रेकनर प्रेम फ़ुलविण्यास, प्रेयसी ला आपले प्रेम पटवुन देण्यास उपयोगात येइल आणि ज्या योगे एक ऐतिहासिक महत्वाचा विश्वकोषा च्या धर्तीवर प्रेमकोष बनु शकेल. याने प्रेम या संकल्पने वर एका जागी सुंदर असे साहीत्य ही जमा होइल. यात आपण उदार हस्ते आपल्या जवळील प्रेम खजिना शेअर करुन प्रेमकोष निर्मीतीस योगदान करावे ही प्रेमळ विनंती !.