ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - ४ (www आणि टीम बार्नर्स ली)

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
23 Oct 2013 - 12:03 pm

इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबरच त्याच्याशी निगडीत बाकी गोष्टींवरदेखील संशोधन होऊ लागल्यामुळे त्यांचाही वेगाने विकास होऊ लागला होता. इंटरनेटच्या सुरूवातीच्या काळात वेबसाईट्स चे पत्ते http:// ने सुरू होत असत. परंतु सामायिक डेटाबेस आणि presentation softwares च्या अभावामुळे माहितीच्या आदानप्रदानात बरेच अडथळे येत होते. त्यावर उपाय काढण्यासाठी बरीच संशोधनं चालली होती.

टीम बार्नर्स ली
या अडथळ्यावर मात करण्यासाठी एका सामायिक वेब पत्त्याची संकल्पना सर्वप्रथम मांडली ती टीम बार्नर्स ली यांनी. संपूर्ण नाव टीमोथी जॉन बार्नर्स ली असणा-या आणि TimBL या टोपणनावाने ओळखल्या जाणा-या ली यांचा जन्म ८ जून, १९५५ रोजी लंडनमध्ये झाला. लहानपणापासूनच संगणक क्षेत्राशी त्यांचा जवळून संबंध आला, कारण त्यांची आई मेरी ली वूड्स आणि वडिल कॉनवे बार्नर्स ली हे दोघेही जगातील पहिल्या commercially built computer, the Ferrari Mark 1 च्या development team चे सदस्य होते. प्राथमिक शिक्षण Sheen Mount Primary School, माध्यमिक शिक्षण लंडनच्या Emanuel School मधून तर पुढे Queen's college, Oxford मधून Physics विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन ते बाहेर पडले.

शिक्षण संपल्यानंतर ली यांनी Poole येथील Plessey या टेलिकम्युनिकेशन कंपनीत इंजिनियर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. १९७८ मध्ये Dorset या कंपनीत रुजू होऊन प्रिंटरसाठी लागणारं सॉफ़्टवेअर बनवण्यात त्यांचा मोठा हात होता. Dosrset मध्ये नोकरी करत असतानाच ली यांनी Europian Organization for Nuclear Research (CERN) मध्ये वैयक्तिकरित्या कामाची कंत्राटं घेण्यास सुरूवात केली. त्यादरम्यान, त्यांनी इंटरनेटवरील माहितीच्या आदानप्रदानासाठी hypertext ची संकल्पना मांडली. त्याचं प्रात्यक्षिक म्हणून त्यांनी ENRIQUE नावाचं प्रोटोटाईप सॉफ़्टवेअर तयार केलं. १९८० च्या अखेरीस, ली यांनी Dorset ला रामराम करून Bournemouth, England मधल्या John Poole's Image Computer Systems Ltd. या कंपनीत टेक्निकल इंजिनियर म्हणून काम सुरू केलं..

१९८०-१९९१ : WWW ची निर्मिती

३ वर्षं Dorset मध्ये राहून ली यांना Computer Networking क्षेत्राचं मोलाचं ज्ञान मिळालं. पुढे १९८४ मध्ये ते पुन्हा CERN मध्ये कामाला लागले. १९८९ मध्ये CERN हे इंटरनेट वापरणारं जगातील सगळ्यात मोठं नोड होतं. तेव्हाच ली यांना hypertext आणि इंटरनेट यांना एकमेकांत जोडण्याची संधी मिळाली, आणि यातूनच world wide web चा जन्म झाला. या घटनेचं वर्णन करताना ली म्हणतात, " मला फ़क्त hypertect ची संकल्पना आणि इंटरनेट यांच्यात मिलाफ़ घडवून आणायचा होता. hypertext ला TCP/IP शी जोडणी केली, आणि world wide web तयार होतं." ("I just had to take the hypertect idea and connect it it to the TCP/IP ideas and ta-daa. The World Wide Web was created.")

१९९२ - १९९५ : WWW चा विकास

www ची यशस्वी निर्मिती झाल्यानंतर त्याची सर्वप्रथम जोडणी झाली ती CERN च्या डिपार्टमेंट्स आणि Fermilab व SLAC या प्रयोगशाळांदरम्यान. जानेवारी १९९३ पर्यंत जगभर www ने जोडल्या गेलेल्या सर्व्हर्सची संख्या होती ५०, तर ऑक्टोबर १९९३ मध्ये ती वाढून ५०० पर्यंत पोहोचली होती. अर्थात तोपर्यंत इंटरनेट साठी एकाही ब्राऊझरची निर्मिती झाली नव्हती. मे १९९२ मध्ये Pei-Yuan Wei या तैवानच्या संगणक अभियंत्याने ViolaWWW हा ब्राऊझर बनवला. ग्राफ़िक्स आणि ऍनिमेशनयुक्त असा हा जगातला पहिलाच ब्राऊझर होता. परंतु तो केवळ युनिक्सच्या X window systems वर चालत असल्यामुळे त्याची फ़ारशी प्रगती होऊ शकली नाही.
www च्या घडणीतला महत्त्वाचा टप्पा ठरलं वर्ष १९९३. कारण ठरलं University of Illinois at Urbana-Champaign (UIUC) मधील Mark Andreessen या National Centre for Supercomputing Applications (NCSA) च्या अभियंत्याने बनवलेला Mosaic हा ब्राऊझर. ग्राफ़िक्सने भरलेला हा ब्राऊझर लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. पुढे लोकांना वापरताना आलेल्या अडचणी दूर करून, back बटण आणि search चे पर्याय mosaic प्रचंड लोकप्रिय ठरला.
त्याच सुमारास जून १९९३ मध्ये मायक्रोसॉफ़्टचा cello हा ब्राऊझर बाजारात आला. cello बनवण्यात मोलाचा हातभार लावला Cornell Law School च्या थॉमस ब्रूस याने. mosaic ब्राऊझर लोकप्रिय असला तरी या सुमारास विंडोज वापरणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. त्यातही बहुतांश वकिल आणि न्यायव्यवस्थेतील इतर लोक विंडोजचा वापर करत असल्यामुळे माहितीच्या आदानप्रदानात सहजता येण्यासाठी cello ची निर्मिती झाली.
१९९३ च्या अखेरीस Andereessen आणि Silicon Graphics चा माजी CEO James H. Clark यांनी एकत्र येऊन mosaic च्या commercial development साठी Mosaic Communication Corporation ची स्थापना केली. एप्रिल १९९४ मध्ये या कंपनीचं नाव बदलून Netscape ठेवण्यात आलं. ब्राऊझरचं नावसुद्धा बदलून Netscape Navigator झालं, आणि अशा प्रकारे Netscape Navigator जा जन्म झाला.
१९९४ च्या अखेरपर्यंत वेबसाईट्सची संख्या सध्याच्या तुलनेत बरीच कमी, तरीही त्या काळासाठी बरीच जास्त झालेली होती.

१९९६-१९९८ : www चे Commercialisation

१९९६ पर्यंत इंटरनेटचा व्यवसायवृद्धीसाठी वापर ही संकल्पना ब-याच प्रमाणात रूजल्यामुळे अनेक वेबसाईट्सचा जन्म झाला. त्यातूनच ई-कॉमर्स ही नवी संज्ञा उदयास आली. दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढू लागला. www आणि dotcoms च्या संख्येत मोठी भर पडली.

sdf
टीम बार्नर्स ली

d
violaWWW - जगातील पहिला ग्राफ़िक्सयुक्त ब्राऊझर

df
mosaic ब्राऊझर

d
मायक्रोसॉफ़्टचा cello ब्राऊझर

fg
Netscape चे जनक - James H. Clark

sdg
१९९४ मधला पहिला Netscape Navigator

(चित्रे आंतरजालावरून साभार.)

-क्रमशः

मांडणीइतिहासप्रकटनसमीक्षा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

23 Oct 2013 - 12:05 pm | मुक्त विहारि

सुरेख...

अनिरुद्ध प's picture

23 Oct 2013 - 12:14 pm | अनिरुद्ध प

पु भा प्र

कुसुमावती's picture

23 Oct 2013 - 1:00 pm | कुसुमावती

छान झालाय हा भाग.

पैसा's picture

25 Oct 2013 - 7:25 pm | पैसा

त्या जुन्या ब्राउझर्सचे स्क्रीनन शॉट्स बघून मजा वाटली! शून्यातून हे नवे विश्व उभे करणार्‍यांची खरोखर कमाल आहे. आज मिपावर प्रतिक्रिया टाईप करताना त्यामागे एवढ्या लोकांचे कष्ट असतील याची जाणीवही आपल्याला होत नाही! पण खरंच हे सगळं फार ग्रेट आहे!!

जेपी's picture

25 Oct 2013 - 9:01 pm | जेपी

वाचनीय