ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - ३ (ARPANET चा अस्त आणि TCP/IP चा उदय)

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
14 Oct 2013 - 10:35 am

भाग - १
भाग - २

१९६९ मध्ये प्रो. क्लाईनरॉक यांनी ARPANET साठी पहिला संदेश पाठवला आणि इंटरनेट संकल्पनेला मूर्त स्वरूप येण्यास सुरूवात झाली. ARPA नंतर जगभरातील संगणक अभियंत्यांनी आणखी आधुनिक, जलद आणि जास्त क्षमतेच्या संदेशवहन नेटवर्क्सवर संशोधन सुरू केलंच होतं.

१९७२ मध्ये संगणक अभियंता रॉबर्ट काह्न हे DARPA च्या Inoformation Processing Technology Office मध्ये रुजू झाले. तिथे सॅटेलाईट पॅकेट नेटवर्क आणि जमिनीवर स्थित रेडिओ पॅकेट नेटवर्क या दोन्ही प्रकारच्या नेट्वर्क्सवर त्यांनी बरंच संशोधन केलं होतं. या दरम्यानच त्यांना या दोन्ही नेटवर्क्समधील जोडणीचं महत्व लक्षात आलं. पुढे १९७३ मध्ये तत्कालीन ARPANET च्या Network Control Program (NCP) protocol चे जनक व्हिन्सेंट सर्फ़ आणि रॉबर्ट काह्न यांनी एकत्रितपणे संशोधन करण्यास प्रारंभ केला. ही सुरूवात होती जगात आमूलाग्र बदल घडवणा-या इंटरनेटचा पाया असणा-या TCP/IP प्रोटोकॉलच्या जन्माची.

१९७३ च्या अखेरपर्यंत या जोडगोळीने नेटवर्क्सच्या आपापसांतल्या जोडणीसाठी मुलभूत संशोधन केलं होतं. याचा मुख्य गाभा होता दोन नेटवर्क्समधील एका समान internetwork protocol चा अंतर्भाव, आणि ARPANET प्रमाणे इंटरनेटच्या विश्वासार्हतेसाठी नेटवर्कवर अवलंबून न राहता होस्टचा समावेश. त्याचबरोबर Router संगणकाचा नेटवर्कमधला समावेश हासुद्धा या संशोधनाचा परिणाम होता. या संशोधनामुळे जगातील कुठलंही नेटवर्क कुठल्याही नेटवर्कशी जोडणं सहज शक्य झालं. यातील ट्रान्समिशन कंट्रोल आणि इंटरनेट जोडणीच्या वैशिष्ट्यांमुळे याचं नाव पडलं, Transmission Control Protocol & Internet Protocol (TCP/IP).

१९७४ पर्यंत व्हिन्सेंट सर्फ़ यांनी स्टॅनफ़र्ड येथे TCP ची काही ठोस specification तयार केली. त्याचसोबत DARPA ने BBN Technologies, Standford University आणि University College London यांच्याशी वेगवेगळ्या Hardware platforms वर चालणारे प्रोटोकॉल्स बनवण्यासाठी करार केले. त्यातून TCP/IP चे ४ versions बनले, TCP v1, TCP v2, TCP v3 आणि सध्या अख्खं इंटरनेट ज्या प्रोटोकॉलवर चालतंय तो IPv4. १९७५ मध्ये Stanford University आणि University College London च्या दरम्यान 2-network communication test यशस्वीरित्या पार पडली. १९७७ मध्ये US, UK आणि Norway च्या दरम्यान 3-network communication करण्यात आलं. १९७८ ते १९८३ च्या दरम्यान जगभरात TCP/IP चे अनेक प्रोटोकॉल्स घडवण्यात अभियंत्यांना यश आलं, आणि १ जानेवारी १९८३ रोजी ARPANET वरून इंटरनेट संपूर्णपणे TCP/IP च्या खांद्यावर आलं. ARPANET ला अलविदा करण्यात आला.

TCP/IP ची प्रगती

१९८२ मध्ये अमेरिकन सैन्याने त्यांच्या संगणक नेटवर्किंगसाठी TCP/IP चे प्रोटोकॉल standard म्हणून वापरणार असल्याचं जाहीर केलं. १९८५ मध्ये Internet Advisory Board (ज्याचं नंतर नामकरण Internet Architechure Board करण्यात आलं) ने संगणक क्षेत्रामध्ये TCP/IP बद्दल माहिती देण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी ३ दिवसीय चर्चासत्राचं आयोजन केलं. पुढे IBM, AT&T आणि DEC या कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीत TCP/IP चा संपूर्णपणे अवलंब केला. त्यानंतर TCP/IP च्या वापरकर्त्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत गेली. १९९५ मध्ये Microsoft ने आपलं स्वत:चं TCP/IP stack windows 95 मधून बाजारात आणला, आणि Microsoft नेही TCP/IP चा वापर करण्यास सुरूवात केली. Microsoft ने TCP/IP चा अवलंब करण्यासाठी घेतलेला अवधी थोडा जास्त असला, तरी यामुळे इंटरनेट क्षेत्रात TCP/IP चं स्थान मजबूत झालं, आणि हळूहळू IBM System Network Architechure (SNA), Open System Interconnection (OSI), Microsoft Native NetBIOS आणि Xerox Network Systems (XNS) अशा बाकी प्रोटोकॉल्सचा अस्त होत TCP/IP ने आपली पकड घट्ट केली.

आजच्या घडीला अख्ख्या जगातल्या इंटरनेटची धुरा TCP/IPv4 ने समर्थपणे आपल्या खांद्यांवर सांभाळली आहे.

sd
व्हिन्सेंट सर्फ यांची जगातील पहिलीवहिली Packet Radio Van

f
जगातील पहिली Internetwork Connection Diagram

df
TCP/IP चे जनक - व्हिन्सेंट सर्फ़

g
TCP/IP चे जनक - रॉबर्ट काह्न

fgh
आधुनिक इंटरनेट जनक जोडगोळी - रॉबर्ट काह्न आणि व्हिन्सेंट सर्फ
(चित्रे आंतरजालावरून साभार.)

-क्रमशः

मांडणीइतिहासप्रकटनसमीक्षा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Oct 2013 - 10:43 am | मुक्त विहारि

वाचत आहे...

पु.भा.प्र.

प्रचेतस's picture

14 Oct 2013 - 12:27 pm | प्रचेतस

उत्तम लिहित आहेस रे.

पैसा's picture

14 Oct 2013 - 4:36 pm | पैसा

एकदम नवीन माहिती देतो आहेस. मग मोबाईलच्या सेटिंग्जमधे IPv4 बरोबरच IPv6 हा काय प्रकार असतो?

नानबा's picture

14 Oct 2013 - 4:56 pm | नानबा

IPv6 हे IPv4 चं पुढचं version आहे. साधारणपणे १९८८ पासून इंटरनेटचा सगळा डोलारा IPv4 वर उभा असल्याकारणाने त्याची क्षमता आता जवळपास संपल्यात जमा आहे. त्यामुळे इंटरनेट संशोधकांनी IPv6 बनवलंय. हळूहळू करत IPv4 वरून IPv6 वर इंटरनेट शिफ़्ट करण्याचं काम सध्या सुरू आहे.

पैसा's picture

14 Oct 2013 - 5:03 pm | पैसा

ओक्के!

कोमल's picture

17 Oct 2013 - 11:53 pm | कोमल

अगदी.. खरं तर IP म्हणजे Internet Protocol. V4 म्हणजे version 4. प्रथम ने म्हटल्या प्रमाणे ८८ पासून IPv4 वापरात आहे. यामध्ये IP address हा ४ भागात विभागलेला असतो. जसा आपल्या मिपाचा IP address आहे 198.148.112.73

आणि ipv6 address खालील प्रमाणे असतात
p

थोडक्यात काय तर..
p1

कोमल's picture

17 Oct 2013 - 11:55 pm | कोमल

अगदी.. खरं तर IP म्हणजे Internet Protocol. V4 म्हणजे version 4. प्रथम ने म्हटल्या प्रमाणे ८८ पासून IPv4 वापरात आहे. यामध्ये IP address हा ४ भागात विभागलेला असतो. जसा आपल्या मिपाचा IP address आहे 198.148.112.73

आणि ipv6 address खालील प्रमाणे असतात
p

थोडक्यात काय तर..
p1

(चि.आं.सा)

नानबा's picture

18 Oct 2013 - 10:09 am | नानबा

gj

मदनबाण's picture

14 Oct 2013 - 4:42 pm | मदनबाण

वाचतोय...

इतर भागांसारखीच मोलाची माहिती.
तिनही फोटोंत सारख्याच व्यक्तींचे आहेत. दुसरे फोटो असते तर अधिक चांगले झाले असते.

नानबा's picture

15 Oct 2013 - 9:46 am | नानबा

TCP/IP च्या जडणघडणीत या दोघांचाच सगळ्यात मोठा वाटा असल्यामुळे यांचेच फोटो ठेवले आहेत...

अद्द्या's picture

16 Oct 2013 - 11:12 am | अद्द्या

छान माहिती .

येउन्द्या पुढचे भाग