गरवारे कॉलेज मध्ये असताना आमचा एक छान ग्रूप जमला होता .बर्याच वर्षानी आम्हि काही दिवसापुर्वि एक मस्त गेट टुगेदर केल. खाण -पिण आणि गगन भेदी गप्पा . सगळे साधारण २८ ते ३० या वयोगटातले .या गप्पांमध्ये मला आणि माझ्या एका मित्राला एक गोष्ट strike झाली की आमच्या गप्पांमध्ये खूप वेळा 'आपल्या वेळेस अस नव्हत ' हे वाक्य अनेक वेळेला repeat झाल होत ……. आईला ! भर तिशीतच आम्हाला nostalgia आला कि काय ? मला अस वाटत होत की हा निवृत्त झाल्यावर , सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून झाल्यावर पोरटोर मोठी झाल्यावर येणारी हि गोष्ट असते . कुठेतरी काहीतरी चुकत आहे खास.
म्हणजे अस पाहा . तेंडूलकर निवृत्त होत आहे. फेडरर उतरणीला ला लागला आहे . रहमान रहमानच राहिला आहे का असा प्रश्न पडला आहे . बाळासाहेब पण गेले. फेकू आणि पप्पू शी relate होता येत नाही . तिशीतच घर घेतलि. गाड्या आल्या . परवाच असाच माझा एक मित्र मला फोन वर उसासून म्हणाला ," झाल सगळ करून . आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?" मुक्त अर्थव्यवस्थेचा खंदा समर्थक असणारा मी पण जागतिकीकरण च्या या बाय प्रोडक्ट मधून आलेल्या प्रश्नाने भोवंडून गेलो . कमी अधिक फरकाने मी पण या complex चा शिकार होतोच कि .
१९९१ नंतर देशात जे वादळी बदल सुरु झाले त्यात अनेक जुन्या गोष्टी वाहून गेल्या. २००० नंतर या बदलांची गती अजूनच वाढली. ८० च्या दशकात जन्मलेली पिढी हि त्या जुन्या काळाची पण साक्षीदार आणि या भोवंडून टाकणाऱ्या काळाची पण वाटेकरी . एक उदाहरण द्यायचं झाल तर आम्ही पोस्टाने टपाल पण पाठवली आहेत आणि आता तितक्याच सहजपणे इमेल संस्कृतीचे पण वाटसरू बनलो . आई वडिलांची सरकारी नौकरी च सुरक्षित आयुष्य पण जवळून बघितलं आणि आताच्या अति असुरक्षित नौकरया तर आम्हीच करत आहोत . आम्ही शाळा सुटल्यावर मैदानावर जाऊन उन्हातान्हात खूप खेळलो आहोत आणि video games पण जाम खेळलो आहोत. स्वतःच घर -आंगण ते बंदिस्त flat संस्कृती हा प्रवास पण झरझर झाला . त्या अर्थाने आमची पिढी हि 'transition ' मधली पिढी . जागतिकीकरणाचे सगळे फायदे ओरपून घेतल्यावर त्याचे तोटे नको असणारी पिढी . प्रचंड भोवंडून टाकणाऱ्या जगाप्रमाणे बदलताना आमची पिढी तिशीतच थकून गेली आहे . ऐन उमेदीतच आपल आता पुढे काय होणार या भीतीने कोकरासारखी दबून गेली आहे .
कुणी नोंद घेतली आहे कि नाही ते माहित नाही पण social networking वर गेल्यावर कुणी या पिढीतल्या लोकांची status बघितलीत तर जाणवेल की ती प्रचंड nostalgic अस्तात. आपल्या शाळा-होस्टेल-कॉलोनी चे group बनवून तिथे ती लोक (आम्ही ) ते दिवस किती भारी होते आणि आता कस सगळ बोर होत चाललय असल्या चर्चा करत अस्तात. दोन पूर्णपणे वेगळी जग पाहिल्याच्या धक्क्यातून हि पिढी कधी बाहेर येईल असे वाटत नाहि.
आपली पिढी हि नशीबवान आहे आणि तिने खूप बघितले /सोसले आहे हा फेनोमेना जागतिक आणि सार्वकालिक आहेच. पण स्थानिक, जागतिक बदल पचवून त्या बदलांचा भाग बनलेली पिढी हि एकमेवच . जागतिकीकरण मधून एकाकी करणाकडे चालणारा प्रवास या ८० च्या दशकात जन्मलेल्या पिढी बरोबरच संपेल बहुदा .
प्रत्येक पिढीला काही समस्यांचा सामना करावा लागतो. आम्हाला काही वेगळे करावे लागते असा दावा नाही पण lets give davil his credit . खूप पाहिलं रे तुम्ही पोरांनी लहान वयात असे कुणी मायेने तरी भरून पावल.
पण तरी तोच माझ्या मित्राने विचारलेला प्रश्न दशांगुळे व्यापून उरतोच . Whats Next ? कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.
प्रतिक्रिया
3 Nov 2013 - 10:58 am | ध्यानस्थ बगळा
छान निरीक्षण.
पण हे प्रत्येक पीढीत घडतेच की!रेडीओ पीढीला अचानक टीव्हीचे भाग्य मिळाले ,त्यामुळे गप्पाटप्पा ,सोशल इन्टरॅक्शन कमी झाले.पत्र लिहणारे फोन घेऊ लागले, कुस्ती वगैर देशी खेळ मागे पडून क्रिकेट आले, देशी जाऊन विदेशी आली ,सायकल जाऊन जावा यझदी राजदूत आल्या, नंतर स्कूटर व एमेट्या, वगैरे वगैरे... परंतु ते ट्रान्सिशन आणि आताचे यांच्या वेगात मात्र बरीच तफावत आहे.
3 Nov 2013 - 11:01 am | सचिन कुलकर्णी
हेच विचार माझे पण आहेत. आपण अधिक चांगल्या पद्धतीने मांडले आहेत.
--(Transition चा साक्षीदार आणि साथीदार)
3 Nov 2013 - 2:18 pm | शिद
असेच म्हणतो. :)
3 Nov 2013 - 11:01 am | अँग्री बर्ड
छान लिहिलय, आवडले !
3 Nov 2013 - 10:32 am | चित्रगुप्त
लोचा आहे खराच, आणि आम्हा १९५० नंतर जन्मलेल्या पोरांच्या लोच्यापेक्षाही जास्त सॉलिड वाटतो आहे, तुमच्या लेखावरून.
आम्ही तर बुवा अजून जवान आहोत, आणि करण्यासारखे खूप काही आहे, कदाचित त्यासाठी ऊर्वरित आयुष्य कमी पडेल, असे वाटत आहे. बालपणाच्या स्मृती रम्य खर्या, आणि त्यात रमून जाणे हा आवडीचा उद्योग, पण अजून पुढेही नाना गंमती करायच्या आहेत.
एक मात्र खरे, की लहानपणीचे मित्र तुटले न पाहिजेत, आणि जास्त सीरीयसली घेऊ नका राव आयुष्याला. सृजनशील रहा, आरोग्य जपा, काहीना काही नवीन शिकत रहा, मनापासून जे करावेसे वाटते, ते करत रहा, आणि आई-बाबा-आजी- आजोबा वगैरेंची नीट काळजी घ्या.
whats next ? असे वाटणे हा फार महत्वाचा टप्पा. वेगळी दिशा देऊ शकणारा.
3 Nov 2013 - 11:41 am | डॉ सुहास म्हात्रे
लोचा आहेच पण तो काळाचा किंवा बदलाचा नाही... काळ सगळ्याच वेळी सगळ्याच पिढ्यांना तसाच बदलताना दिसतो. कारण बदल हीच एकुलती एक स्थायी गोष्ट या जगात आहे.
स्वतःभोवती गुंफलेल्या कोषापासून जरा दूर पाहिले तर या जगात भरपूर काही सापडेल जे करायला, पहायला, मजा घ्यायला एक आयुष्य नक्कीच कमी पडेल.
3 Nov 2013 - 12:40 pm | कवितानागेश
बदल हीच एकुलती एक स्थायी गोष्ट या जगात आहे.>
अगदी हेच म्हणायचं होतं.
पण तुम्ही पहिला नंबर लावलात. :( (संदर्भ आजूबाजूला पहा.) ;)
3 Nov 2013 - 12:41 pm | प्यारे१
रसरशीत आयुष्य जगलेल्या नि आनंद सगळ्यांना वाटणार्या दोन उत्तुंग व्यक्तिमत्वांचा हा सल्ला अतिशय उपयुक्त असा आहे....
उगाच काही शिल्लक नाही म्हणायला आपली ध्येयं मिडिऑकर करुन ठेवणार्या व्यक्तींच्या मुस्कटात मारतील असे लोक वरचे दोघे आहेतच.
त्यांच्याबरोबरच थोडंसं आजूबाजूला पाहिलं तरी भरपूर सापडतील.
घर, गाडी, पोटभरु नोकरी, कोटभराचा बँक बॅलन्स (आपापल्या आवाक्यानुसार) झालं की झालं असं असेल तर बासच...! अप्पलपोटीपणाचा कळस.
बाकी ह्याच्च कारणाने आत्महत्या करणारांना परत जिवंत करुन गोळ्या घालाव्याशा वाटतात. भिकारचोट साले.
3 Nov 2013 - 1:14 pm | बॅटमॅन
नाही म्हणजे वरील विचार संकुचित वगैरे असेल पण म्हणून अप्पलपोटा कसा ठरतो? बळंच?
3 Nov 2013 - 1:43 pm | प्यारे१
अप्पलपोटा म्हणजे फक्त आपल्यापुरतं बघणारा ना?
(आज कितीची सुपारी ;) )
3 Nov 2013 - 3:32 pm | बॅटमॅन
त्याला निगेटिव्ह कनोटेशन आहे म्हणून तसे म्हणालो.
3 Nov 2013 - 11:40 am | जेपी
*****
3 Nov 2013 - 2:08 pm | अत्रुप्त आत्मा
छान व्यक्त'व्य! :)
3 Nov 2013 - 2:14 pm | प्रसाद गोडबोले
दंडावर देवीची च्या लसीची खुण नाही म्हणजे पोरगी आपल्या पेक्षा मोठ्ठी नाही हा एक सिम्पल थंब रुल ८५ नंतरची पोरं वापरतात हे जाता जाता नोंदवत आहे ;)
3 Nov 2013 - 2:21 pm | टवाळ कार्टा
वा :)
4 Nov 2013 - 12:22 am | आदूबाळ
अशक्य भारी निरीक्षण! +१०००
4 Nov 2013 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा
+१११११११११
5 Nov 2013 - 11:59 am | सुखी
+१११११११
3 Nov 2013 - 3:09 pm | मंदार कात्रे
छान लेख , अगदी भिडला !
मीही याच पिढीतला ....त्यामुळे त्याच वाटेचा वाटसरू !
3 Nov 2013 - 8:49 pm | रेवती
लेखन आवडलं.
3 Nov 2013 - 10:26 pm | आतिवास
कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.
यात १९८० चा फार काही थेट संबंध नाही. What Next? हा प्रश्न काहींना पडतो, काहींना पडत नाही; मग ते १९८० चे असोत,१९५० चे असोत की २००० चे असोत.
असा प्रश्न पडणं ही एक चांगली गोष्ट ठरु शकते :-)
3 Nov 2013 - 10:30 pm | संजय क्षीरसागर
काय असेल प्रश्नाचं कारण? यू कांट इमॅजिन - संपन्नता!
या आधीची पिढी संपन्न होई तो उतरणीला लागलेली असायची त्यामुळे त्यांना Whats Next ? हा प्रश्न कधी पडलाच नाही. आणि स्थैर्य आल्यावर There was so much missed! त्यामुळे शरीर स्वास्थ्य आणि मनाची उभारी असली की झालं.. One can go on!
ऐंशी नंतरची पिढी तारुण्यातच संपन्न झाली आणि भोगून दमली! (अर्थात हे भाग्य सर्वांच्या वाटेला आलं नाही). आता मिळवण्यासारखं किंवा भोगण्यासारखं काही उरलं नाही. Now the life is just a repetition. And unfortunately with a heightened insecurity. Because the life-style may not be continued this way if something suddenly goes wrong! म्हणजे भोगून झालं, भोगाचं आकर्षण कमी झालं पण उद्या चित्र बदललं तर काय? ही अस्वस्थता कायम.
मला वाटतं ही पिढी अत्यंत भाग्यवान आहे. कारण ती क्रॉसरोडवर उभी आहे. तुम्ही नवनवी आकर्षणं निर्माण करुन जीव रमवू शकता. पण ते किती काळ करणार? यू हॅव अ वेरी लाँग वे टू गो.
किंवा मग मानवी जन्मातच निहित असलेल्या अस्वास्थ्याचं मूळ कारण शोधू शकता - That is Spirituality! मी मागे एकाला व्य. नि. तून म्हटलं होतं One needs Two things to turn Spiritual: Affluence & Maturity, both. काय आहे ही म्यॅच्युरिटी? तर हे समजणं की भोग आणि जीव रमवणं फार काळ चालत नाही. थोडी फुरसत मिळाली की पुन्हा अस्वास्थ्य वर येतंच. तुम्हाला `स्व' शोधायला हवा कारण ती `स्थिती' आहे. It is an unchanging permanent State. त्या स्थितीशी कनेक्ट होणं स्वास्थ्य आहे. मग Whats Next ? हा प्रश्नच रहात नाही. Then there is no future to think of, you enjoy the present. Because present is the only reality!
3 Nov 2013 - 11:31 pm | पैसा
लेख चांगला लिहिला आहे. एका मोठ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा आहे. पण हा Whats Next? प्रश्न तुम्ही सकारात्मक पद्धतीने घेतलात तर करण्यासारखं खूप काही आहे, त्यातलं कोणतं आधी सुरू करू असाच प्रश्न पडेल. रामदासकाकांनी एका लेखात म्हटलं होतं, "एका कवितेचा अर्थ समजायला एक आयुष्य गेलं, मग बाकी सगळं समजून घायला त्या ८४ लक्ष योनी अपुर्या पडतील!" नुसती पुस्तकं वाचत बसलात तरी आयुष्य संपेल, पुस्तकं संपणार नाहीत! इतर गोष्टी लांबच राहिल्या!
3 Nov 2013 - 11:45 pm | अर्धवटराव
मुक्तक आवडलं. नेमक्या शब्दात आशय मांडलाय.
मार्च मधे फायनल परिक्षा आहे. ज्यांनी एक वर्षाआगोदरच उन्हाळी वर्ग लावुन, वर्षभर ट्युशन क्लास मधे सराव करुन डिसेंबर पर्यंत परिक्षेची तयारी संपवली त्यांना 'व्हॉट नेक्स्ट ' हा प्रश्न नक्की सतावतो. परिक्षार्थी मोड मधुन बाहेर पडुन जे विद्यार्थी मोड मधे येऊ शकतात त्यांना नवे सुर गवसतात... पण अर्थात, परिक्षेचं भान सुटता कामा नये.
4 Nov 2013 - 12:07 am | अग्निकोल्हा
what is next अन अधून मधून why is next or kolaaveridi हे प्रश्न आजकाल फार सतावतात. स्थित्यंतर ज़रा जास्तच बघितली असे वाटते. म्हणून सुरुवात ही उमेदददायक वाटत नाही..
अनुभवाने व् कालासोबत प्रौढत्व आले पण इंस्टिंक्ट गमावला आहे. दुःख संकट भीतीदायक वाटत नाही पण जणू सुखाच्या अस्तित्वाला सुरुंग लागलाय.
गाढवाप्रमाने सध्या फ़क्त विनोदी चित्रपट अन साहित्याच वाचतोय कारण इतर ठीकाणी रामायाची कुवत मनाने कधीच गमावली पण सुखाचा हां मार्ग अतिशय उपरा वाटतोय... काहीतरी लोच्या आहे खर्च काहीतरी लोच्या आहे....
4 Nov 2013 - 12:33 am | आदूबाळ
याच पिढीचा प्रतिनिधी असूनही, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर "what's next?" हा प्रश्न कधी पडला नाही बुवा. जेव्हा जेव्हा आयुष्यात "काहीतरी मिळालं, अचीवमेंट झाली" असं वाटणारे प्रसंग आले तेव्हा तेव्हा नवीन क्षितिजं समोरून खुणावत होती. मिपावरच्या आपला जॅक डनियल्स आणि इतर काही जिवलग मित्र आहेत त्यांचे उद्योग पाहिले तर "मला का नाही जमलं हे सगळं?" असं वाटणंच जास्त. त्यामुळे हा धाग्याच्या खालीच असणार्या चित्रगुप्त यांच्या "तुम्हाला उर्वरित आयुष्यात काय करायचेच आहे" या धाग्याशी जास्त रिलेट होऊ शकतो.
रॉबर्ट फ्रॉस्टची प्रसिद्ध कविता आहे. तो म्हणतो "The woods are lovely, dark and deep. But I have promises to keep,. And miles to go before I sleep,." ही प्रॉमिसेस आपणच आपल्याला केलेली असतात. ती पाळायची असं एकदा घट्ट ठरवलं की असा प्रश्न पडत नाही.
4 Nov 2013 - 3:14 am | प्रभाकर पेठकर
घर आणि गाड्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानली तर >>आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?<<<
असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. विचार आणि भावनांमध्ये शुष्कता आली की आयुष्याचा परिघ आकुंचतो. पण शरीराला जशी आर्द्रतेची आवश्यकता असते तशीच विचारांना आणि भावभावनांनाही आर्द्रतेची गरज असते. भरपूर वाचन, श्रवण, आकलन आणि निसर्गाच्या निकट राहणं ह्यात न संपणारं सुख आहे. घर घेतलं, गाड्या घेतल्या पण कवितेचा आनंद घेतला? आशा, लता, हृदयनाथ, भिमसेन जोशी अशा दिग्गजांच्या न संपणार्या यादीतील गायकांच्या गाण्याचा आनंद घेतला? निसर्ग माथेरान, महाबळेश्वर, कासचे पठार आणि अगदी थेट हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत नुसताच पाहिला पण समजून घ्यायचा प्रयत्न केला? ६४ कलांपैकी कुठल्याही कलेला वाहून घेण्यात आनंद शोधला आहे? निदान आस्वाद तरी १०० टक्के घेतला आहे? करायला गेलं तर आयुष्यात भरपूर आहे. बाबा आमटेंसारखे समर्पित आयुष्यही जगता येते. गरजवंतांना, अपंगांना, गरीब विद्यार्थ्यांना, रुग्णांना मदत करता येते. पुढे काय? हा प्रश्नच का पडावा? विचारांची कमी किंवा आयुष्याबद्दलचा अभ्यास कमी.
आमच्या पिढीला (५०च्या दशकातील) शिक्षण, नोकरी, घरच्या जबाबदार्या ह्यातून स्वतःचे घर उभारण्यातच पाऊण आयुष्य गेले. आमच्या पिढीच्या मागची पिढी (आमच्या आई-वडिलांची) बहुतांश आमच्यावर अवलंबून होती/आहे. पण आमची पिढी तशी नाहीए. आपल्या मुलांवर अवलंबून नाही. तुमच्या पिढीला तिशीतच सर्व कांही मिळाले ह्याचा आनंद माना, इश्वराचे आभार माना. आमच्या सारखं दैनंदिन गरजा भागविण्यात आयुष्य नाही गेलं. तरणतलावावर, पाण्यात उडी मारण्यासाठी जी लवचिक फळी (जंपींग बोर्ड) असते ती तुम्हाला लाभली आहे. आहात तिथून अजून उंच उडी मारता येण्यासाठी आवश्यक ते सर्व कांही तुमच्या जवळ आहे. मग खंत कशाकरीता? ही अभद्र हताशा कशाकरीता? मन आणि मेंदू सतत घासूनपुसून लख्ख ठेवा आणि आयुष्याचा आनंद लुटा. इतरांना तो लुटण्यात मदत करा. शुभेच्छा..!
4 Nov 2013 - 3:49 am | प्यारे१
ह्याच धाग्यावरचे म्हणून हे किमान 'तिसरे'! :)
चित्रगुप्त, इस्पिकचा एक्का नि पेठकर काका!
पटापट नावं सापडतात....
पैसाताई, रामदासकाका, पिवळा डांबिस, प्रभू सर, प्रमोद देव काका, डॉ. खरे
एकेक नाव घेतलं तर खरंच सहज मान नम्रपणं खाली झुकते.
ह्यातल्या प्रत्येकानं एका टप्प्यानंतर नवी सुरुवात करुन यशस्वी झालेले आहेत असं माझं निरीक्षण आहे. अर्थात मी तोकडा आहे ह्याची मला जाणीव आहे.
पैसाताई आज मिसळपाव वर बरंच काही एकहाती करतात. वयाच्या ४५-४७ नंतर संगणक शिकून त्यात काही करणं हे चिकाटी नि लढाऊ वृत्तीच दाखवते असं माझ्या मर्यादित अनुभवावरुन मला जाणवलंय.
आम्हाला काय करायचं ह्याचा प्रश्न पडावा???
4 Nov 2013 - 9:47 am | पैसा
पण एक नम्र दुरुस्ती, तू बाकी नावं घेतलीस, त्यांच्या तुलनेत मी काहीच केलं नाहीये! आणि ४५-४७ नंतर या क्याटेगरीत मी अजून नाही! इतर काहीजणांचं खरंच कौतुक आहे. तशी माझी आई सुद्धा वयाच्या ६५-६६ व्या वर्षी संगणक वापरायला शिकली. अशांचे तर नक्कीच पाय धरावेसे वाटतात!
दुसरे म्हणजे मी तरी १९९६ पासून (१० जीबी हार्ड डिस्कवाला आणि डायल अप कनेक्शन वाला का होईना) संगणक वापरते आहे. त्यामुळे मला तसा लवकरच संगणक हातात मिळाला असं म्हणेन!
4 Nov 2013 - 12:42 pm | प्यारे१
चलो तीर थोडातरी निशाने पे लागला म्हणा. मुलगी नाहीतर आईतरी.
मुद्दा जिद्द नि चिकाटी हा आहे.
अजून करण्यासारखं बरंच काही शिल्लक आहे मधला.
बाकी अशा वेळी 'जरा' थंड घ्यावं पैसाताई. नको तिथे प्रामाणिकपणा दाखवू नये. ;)
असं सगळेच नम्र झाले तर झाला का आमचा बल्ल्या! :P
4 Nov 2013 - 3:22 pm | अभ्या..
म्या बी थोडा प्रामाणिक रे प्यारे. :)
च्यामारी या पिढीचे असून आम्हाला नाय ब्वा कधी प्रश्न पडला असा.
हातात पण बरेच आहे करण्यासारखे. अजुन नवीन करण्यासारखे पण लै आहे. प्रयत्न पण चालु असतात.
हपिसात बसले की भाषा शिकाव्या वाटतात, एखादे नवीन धाडस करावे वाटते व्यवसायात, हॉटेलात बसले कि नवीन नवीन डिश ट्राय कराव्या वाटतात. (खायला नाही, बनवायला).
अगदि मिपावर आलो तरी मालक म्हणतात ग्राफीक करतोस रे पण पीएचपी पण शिक जरा. वल्ली म्हणतो जरा लेण्या बिण्या फिरुन येऊ. थोडा परत अभ्यास करु कलेच्या इतिहासाचा. किसना म्हणतो जरा किल्ले वगैरे तर पाहायला येत जा. बॅट्या, पैसाताई म्हणतात लिहित जा जरा कथा नायतर अनुभव. चौराकाका म्हणतात बाकी सगळं सोडा लग्न करा.
तस्मात करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. करु सवडीने आवडीने. :)
तूर्तास व्हॉटस नेक्स्ट इस सॅमसंग ;)
4 Nov 2013 - 3:34 pm | प्रभाकर पेठकर
>>सगळं सोडा लग्न करा...... करु सवडीने आवडीने.<<<
हे काही रुचलं नाही राव. लवकर करा. नाहीतर आज आई-बाबा तुमच्यासाठी 'मुलगी' बघताहेत. सवडीने करायला जाल तर तुम्हालाच शेवटी कोणी 'बाई' शोधावी लागेल.
4 Nov 2013 - 3:42 pm | अभ्या..
हो काका. लगेच करतो. :)
4 Nov 2013 - 11:31 pm | बॅटमॅन
अबे सवडीनं कर. काका आपले काळजीनं सांगताहेत पण शेवटी आपलं आपल्याला ठाऊक.
(जसं कै कुणाच्या सल्ल्याने अभ्याच्या निर्णयप्रक्रियेवर कै परिणाम होणारे पण स्टिल..)
5 Nov 2013 - 12:23 pm | आदूबाळ
+१ है शब्बास!
4 Nov 2013 - 3:55 am | रेवती
छान प्रतिसाद.
4 Nov 2013 - 4:04 pm | विजुभाऊ
बरोबर आहे पेठकर काका. माझ्यासारख्या १९६५ नंतरच्या पिढीतील लोकाना काही प्रश्न पडतात.
माझ्या वर्गातली बहुतेक जण डॉक्टर किंवा इंजीनीयर आहेत ( थॅन्क्स टू वसंतदादा पाटील : महाराष्ट्रात खाजगी इंजी. आणि मेडीकल कॉलेजेस ना परवानगी). बहुतेक जण परदेश वारी करून आलेले आहेत्.
मात्र बरेचजणानीसंगणकावर इमेल अकाउंट उघडलेले नाही. त्याना त्यामुळे काही फरक पडलेला नाहिय्ये.
माझ्या पिढीतल्याना वाटते की आपण जुन्या नव्याच्या बरोब्बर मधेच आलो. त्यामुळे जुन्यापिढीचा आदर जपत नव्या पिढीशी स्पर्धा करत दमछाक होते. नोकरी /व्यवसायाच्या बाबतीत हे खरे असेल आमच्यावेळेला कॉलेजात सेकंड इयर ला गेल्यावर संगणक पहायला मिळाला. मात्र पुस्तके वाचण्याच्या बाबतीक अक्षरशः चैन अनुभवली आहे.
आजीबरोबर कथाकीर्तनाचा आनंद उपभोगला आहे. वडिलांचा धाक अनुभवला आहे. ( हल्ली हा प्रकार दुर्मीळ झाला आहे)
नव्या आणि जुन्या दोन्ही टेक्नॉलॉजीचा अनुभव घेतला आहे.१०७२ च्या दुश्काळात टँकर चे पाणी मिळावे म्हणून धावपळ केली आहे तसेच टबबाथ मधे अंघोळीचा आनंद ही घेतला आहे.
नव्या पिढीला कदाचित दिश्काळ वगैरे माहीत पडणार नाहीत. शहरी पिढीला तर नक्कीच नाही.
रेशन दुकानात /सोसायटीच्या दुकानात कपडे साड्या मिळताना देखील पाहिले आहेत.
माझ्या पिढीत शाळेत वर्गात कोणाकडे गाडी वगैरे नसायची. बहुतेकजण रवीवारी दुपारी मैदानात खेळत असायचे.
ज्या कोणाकडे टीव्ही असे त्यांच्या घरात चांगल्या कार्यक्रमाना शेजापाजार्याना आवर्जून बोलावले जायचे. शेजार्यांकडचा फोन नंबर आपला म्हणुन दिला जायचा
पण नव्या भराभर बदलणार्या तंत्रज्ञानाला सामोरे जाताना लोच्या झाला वगैरे कधीच वाटले नाही.
पेठकर काका तुम्ही म्हणता तसे मागची पिढी उतारवयात आमच्यावर अवलंबून आहे. आम्ही मात्र पुढच्या पिढीवर अवलंबून रहाणार नाही. ही गोष्ट देखील तंत्रज्ञानाने साध्य झालीये. मात्र मागच्या पिढीप्रमाणे आमची पिढी स्वतःचे निर्णय मुलांवर लादणे शक्य नाही हे देखील तेवढेच खरे.
मी लहान असताना एखादे चांगले गाणे पुन्हा ऐकायचे तर त्यासाठी खूप आटापिटा करावा लागायचा. रेडीओ आणि ७८ नंतर टेपरेकॉर्डर हीच काय ती मनोरंजनाची साधने होती. आवडले गाणे घे डाऊनलोड करुन हे शक्य नव्हते. एखादे आवडते नाटक/ चित्रपट पुन्हा पुन्हा बघणे शक्य नव्हते. आवडते क्षण केवल मनात किंवा कॅमेर्यातच बम्दीस्त करणे शक्य होते. तम्त्रज्ञानाने हे सध्या अगदी लहानमुलाना सुद्धा शक्य करून दिले आहे.
प्रत्येक पिढी नव्या तंत्रज्ञानाला सामोरी गेली आहे. १९३० /४० च्या तुलनेत १९६० नंतरची पिढी थोड्या वेगाने सामोरी जातेय.
मला समाधान आहे की लक्ष्यकेंद्रीत नसल्यामुळे मी बालपण भरपूर आनंदात घालवलय.
पण माझ्या पिढीतल्याना नव्या तंत्रज्ञामुळे काही लोच्या झालाय असे मात्र काही वाटत नाही.
करण्यासारखे भरपूर आहे. लहानपणी / तरुणपणी जे शक्य झाले नाही ते पन्नाशी नंतर करतायेईल. अनेक टी व्ही / रेडीओ चॅनेल्स मुळे तेंव्हा होत्या त्यापेक्षा भरपूर संधी सध्या उपलब्ध आहेत्.साधने उपलब्ध आहेत. खरेतर ही कितीतरी चांगली गोष्ट उपलब्ध आहे.
जे शिकणे स्थळकाळा अभावी शक्य झाले नाही ते आंजा मुळे सहज शक्य झाले आहे.
व्हॉट नेक्स्ट हे शोधायचे नसते तर ठरवायचे असते. तेंव्हाच ते साध्य होते.
4 Nov 2013 - 8:45 pm | प्रभाकर पेठकर
बापरे! विजूभाऊ तुम्ही इतक्या मागच्या पिढीतले वाटत नाही हो. काय, योगासने वगैरे करता का?
4 Nov 2013 - 11:09 pm | विजुभाऊ
ते साल १९७२ होते की ७५ होता नक्की आठवत नाही. मी पहिलीत्/दुसरीत असेन.पण मिलो आनि हायब्रीड ची भाकरी चाम्गली आठवतेय. पेठेत पाण्याचा टँकर यायचा तेही आठवतय. मी घरातल्यांसोबत छोट्या बादल्या कळशा भरुन आणलेल्या आठवतय
4 Nov 2013 - 8:49 pm | प्रभाकर पेठकर
अगदी बरोबर. तसेच ते विचारपूर्वक निवडायचे असते हेही तितकेच महत्त्वाचे.
5 Nov 2013 - 12:06 pm | लाल टोपी
पेठकर काका अगदी शब्दा शब्दाशी सहमत.
एकंदरीत सर्वच चर्चा आवडली. किती अंगाने आपल्या जगण्याकडे बघू शकतो हे या धाग्यात्तून छान उलगडले. 'पुढे काय?' या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर पुलं म्हणतात तसं 'हे जग मी सुंदर करुन जाईन.'
4 Nov 2013 - 10:48 am | बलि
मस्त निरीक्षण आहे . सगळा काळ असा डोळ्यासमोरून गेला.
4 Nov 2013 - 10:55 am | देशपांडे विनायक
लेख उत्तम आहे आणि श्री पेठकरांचा प्रतिसाद विचारास चालना देणारा !! दोन्ही आवडले
८० च्या पिढीला जन्म देणारी पिढी त्यांचावर अवलंबून नाही हे सुदैव्य ८० ची पिढी आणि त्याला जन्म देणारी पिढी digest करू शकत नसल्याने दोन्ही पिढ्यांना तापदायक ठरत आहे
interdependance हा निसर्गनियम आहे
independant होणे हा ध्यास दोन्ही पिढ्यांना लागला आहे
विचार आणि भावना यात शुष्कता आल्याखेरीज independant होता येत नाही
आधार वाटणे , आधार देणे याकरता विचार आणि भावनेत ओलावा लागतो
आपण आपल्याला काही promises द्यावयाची आणि ती पूर्ण करण्याकरता आयुष्य वेचावे हे खरे असले तरी कोणत्या प्रकारची promises द्यावयाची हे कळले पाहिजे . नाहीतर पुन्हा लोच्या !!!
माझी बायको माझ्या कारने गृहप्रवेशासाठी येईल असे म्हणणारा पुढे कार बदलण्यासाठी नोकरी करतो असे दिसू लागते . त्याच्या समृद्धीचे दर्शन होते पण वाटेकरू कोणी झाल्याचे आढळत नाही
श्री राम मनोहर लोहिया यांनी नवा राजकीय पक्ष काढला तेंव्हा महात्मा गांधीचे आशिर्वाद मागितले
गांधी म्हणाले '' या जन्मी पूर्ण होणार नाही असे ध्येय ठेव ''
भावनेचा ओलावा टिकवणे हे जन्मभराचे काम आहे !!
4 Nov 2013 - 2:20 pm | चिगो
अमोल, जे काही लिहीलंयस, तो लोच्या तर आहेच. ह्याच पिढीतला असल्याने ट्रंककॉल ते "व्हास्सप" हा प्रवासही केला आहे. आयुष्यात एक छोटंसं वर्तुळही पुर्ण केलंय. कधीकधी "व्हॉट्स नेक्स्ट"? हा प्रश्नही येतो. पण मग कळतं, की बरंच काही बाकी आहे. (माझ्याकडे स्वतःचं घर किंवा गाडी तशीही नाहीच आहे म्हणा.. ;-) सध्या सरकारकृपेकरुन..)
बरंच काही आहे यार अजून बघायला.. एकदा आधी अख्खा भारत बघायचाय, मग जमल्यास जग.. बारीक होऊन चांगला डान्स करायला शिकायचंय.. जमल्यास एकदोन वाद्यं शिकायचीयत. वयाच्या तिशीतच जर "रोटी, कपडा और मकान"चे प्रश्न पुरेपूर सुटले असतील आणि खिशात आणि बँकेत बर्यापैकी पैसा असेल तर बरंच काही आहे की करायला.. मागे एकजण भेटला होता. पोरंबाळं शाळा-कॉलेजात होती, आणि हा पठ्ठ्या बँकेतल्या गुबगुबीत नोकरीतून एका वर्षाची "सबॅटीकल" घेऊन बाईकवर भारतभर हिंडायला निघाला होता !
वर बर्याच ज्येष्ठ मिपाकरांनी लिहील्याप्रमाणे बरंच काही आहे करायला.. आपल्या मुला-बाळांसोबत मूल होऊन शिका- शिकवा. लहानपणी ज्या गोष्टी कराव्याशा वाटत होत्या, पण पैशांअभावी करु शकला नाहीत, त्या करा.. (मी पुस्तकं वाचतोय- अगदी "फास्टर फेणे" सकट :-)) हां, आता "पैसे कमावून कंटाळा आलाय, यार.. काय सडवायचा काय त्याला?" म्हणत, जरा कुठे मोकळेपणे भटकायचा चान्स मिळाल्यावर "स्साला, हे काम सोडून जाऊ शकत नाही, यार.. इन्क्रिमेन्टचा प्रश्न आहे !" असा लोच्या असेल तर मग जाने दो..;-)
(ढिसक्लेमर : प्रतिसाद वैयक्तिक नाही.)
4 Nov 2013 - 3:08 pm | माम्लेदारचा पन्खा
१९८० ते १९९० ची पिढी हा नवीन आणि जुन्याचा योग्य संगम आहे.....
4 Nov 2013 - 3:50 pm | llपुण्याचे पेशवेll
वरच्या लेखाशी आणि त्यातल्या निरीक्षणांशी संपूर्ण सहमत असलो तरी 'व्हॉट नेक्स्ट' हा प्रश्न खरेच पडला नाही. उलट काही गोष्टी ज्या आता करतो आहे त्या थोड्या पूर्वी मिळाल्या असत्या तर जास्त मजा केली असते असे वाटते.
उदा. चांगली दुचाकी पुण्याबाहेर सफर करायला, चांगली ४ चाकी जेव्हा आमच्या मित्रांचा ग्रुप खूप घट्ट आणि एकत्र होता (आता एकत्र आहे, प्रत्येकाची गाडी आहे पण प्रपंचामुळे तितका घट्ट नाही, नाहीतर मस्तं ४ चाकी गाडीतून हिंडून दंगा केला असता तेव्हा), गाणं शिकण्यासाठी फीचे पैसे लहानपणी न परवडल्यामुळे गाणे शिकायला गेलो नाही ते आता शिकता येणार नाही असे वाटत असूनही प्रयत्न करतो आहे.
बाकी मला मात्र नेहेमी व्हॉट नेक्स्ट च्या नेमके विरुद्ध वाटते, कायम वाटते आता परत सायकले कोकणात जाणे जमणार नाही पूर्वीसारखे कारण वेळ आणि स्टॅमिना २न्ही नाही पूर्वी सारखा. आपल्याला चांगले ४ लोकात गाता येणार नाही असेही कायम वाटते. अर्थात या सगळ्या गोष्टी टूडू मधे आहेतच. तालमीतल्या आखाड्यातला दोर २ वेळा चढून उतारायचे उद्दीष्ट अजून सिद्ध व्हायचे आहे. १००० जोर मारायचे चॅलेंज अजून शिल्लक आहे.
पुढच्या जन्मासाठी पण बहुधा बरीच मोठी टू डू असणार आहे.
4 Nov 2013 - 5:13 pm | नगरीनिरंजन
बर्याच दिवसांपासून मनात घोळणारा विषय चर्चेला आल्याचे पाहून आनंद झाला. वरील काही प्रतिसाद वाचले आणि चर्चा खोलवर न जाता वरवरची चाललेली आहे असे वाटते. करण्यासारखे बरेच असते हे सगळ्यांनाच माहिती आहे हो, पण आयुष्याचे ध्येय काय?
मागच्या पिढीच्या 'सिंपलमाईंडेडनेस' बद्दल मला वाईट वाटते आणि त्यातून निर्माण झालेल्या दुटप्पीपणाची कधीकधी चीड येते. त्यांना आजच्यासारखी माहिती वा ज्ञान सहजासहजी उपलब्ध नव्हते त्यामुळे व्यापक दृष्टीकोन नसणे समजू शकते. पण त्यामुळे आमच्या पिढीचा लोचा झाला हे मात्र खरे.
माझ्या आई-वडिलांच्या पिढीने तसे गरिबीत दिवस काढले. साधं स्वतःचं घर घ्यायला चाळिशी उजाडायची आणि ते सुद्धा कर्ज घेऊन घ्यावं लागायचं. त्यामुळे भरपूर पगार देणारी नोकरी, गाडी, बंगला हीच आयुष्याची ध्येयं बनवून त्यांनी आम्हाला शिकवलं. याला फार थोडे अपवाद असतीलच पण बहुसंख्यांनी असं केलं नाही असे म्हणणे खोटारडेपणा होईल. घर आणि गाडी व्हायला फार मोठ्या कर्तृत्वाची गरज नसून उद्द्योग-धंदे करणार्यांना मुक्त अवकाश देणे फक्त आवश्यक आहे हे कदाचित तेव्हा बहुतेकांना समजले नसावे.
तेव्हा साध्या स्कूटरसाठी पाच-पाचवर्षे वाट पाहणार्या समाजात आता खुली अर्थव्यवस्था आल्याने मनात येईल तेव्हा हवे ते जाऊन घेता येते. वरती कोणीतरी म्हटले आहे की तुम्हाला तिशीतच मिळाले याचा आनंद माना; पण ते मिळण्यात आनंद आहे हे सांगणेच मुळात चुकीचे आहे हे कोणाच्या लक्षात का येत नाही? घर आणि गाडी फुकटात येत नाही, त्यासाठी किंमत मोजावी लागते. अर्थव्यवस्था खुली झाली, पाश्चात्त्य कंपन्यांना फायदा होत राहावा म्हणून अधिकाधिक स्वस्त मनुष्यबळाची गरज भासू लागली म्हणून आपल्याकडे सुबत्ता आली. पण नुसतीच सुबत्ता आली आणि बाकी काही बदललं नाही असं नाही. मागच्या पिढीने शिकवलेल्या घर,गाडी, लग्न, मुले या स्वप्नांना मिळवण्यासाठी बहुतेकांनी सौदा केला आहे. आपल्या वेळेचा. माझ्या बरोबरच्या अनेक मित्रांनी दोन-दोन घरे, दोन-दोन गाड्या घेतल्या आहेत. नवरा-बायको दोघेही नोकर्या करतात आणि मुले मात्र पाळणाघरात. आठवड्यातून एक दिवस फक्त मुलांना देता येतो. चकाचक घरात आठवड्यातले पाच दिवस नोकर माणसे फक्त राहतात. म्हातार्या आई-बापांशी तर धड बोलायलाही फुरसत मिळत नाही. वर्षातून पंधरादिवस सुट्टी मिळते तीसुद्धा शेजार्यापेक्षा आपण कमी नाही हे दाखवण्याच्या नादात महागड्या ठिकाणी सहलीला जाण्यात जाते.
बारावीला आमच्या वर्गात असलेल्या काही हुशार-मुलामुलींचे तर तेव्हाच अमेरिकेला जाणे जवळजवळ निश्चित होते. बरं अमेरिकेला जायचे ते काहीतरी भव्य-दिव्य करून दाखवायला का? तर नाही. केवळ तिथे गाडी-बंगला सहज घेता येतो म्हणून. ज्या आई-बापांनी परदेशी जाण्याची स्वप्ने दाखवली तेच आता एकाकी केविलवाणी तोंडे घेऊन बसतात स्काईपसमोर.
'व्हॉट नेक्स्ट' हा "आता वेळ घालवायला काय करायचे" इतका सोपा प्रश्न नाहीय. ज्या समाजाने भौतिक सुखाची ध्येये ठरवून दिली आणि माणसाकडच्या खेळण्यांवरून त्याची किंमत करायला शिकवली, ती खेळणी तर आम्हाला मिळालीत; पण त्या भानगडीत आम्ही एका माईंडलेस कन्झुमरिझमच्या चक्रात अडकलोय आणि त्यात काही राम नाहीय हे कुठेतरी जाणवायला लागले आहे. त्यातूनच सतत घाईचे, सतत बदलणारे आयुष्य आणि त्यातूनच हा नॉस्टॅल्जिया (आणि प्रसंगी रिग्रेशन) निर्माण झाला आहे.
लहानपणी कुठेही हुंदडताना आई-बापांनी धरून आणून ज्या उज्ज्वल भविष्यासाठी बकोट धरून शाळेत बसवलं त्या भविष्यापर्यंत आम्ही फार लवकर पोचलो आणि आता 'व्हॉट नेक्स्ट' या प्रश्नाला "जा हुंदडा" हे उत्तर अत्यंत दुटप्पी आणि क्रूर वाटते.
4 Nov 2013 - 5:18 pm | पिंपातला उंदीर
'व्हॉट नेक्स्ट' हा "आता वेळ घालवायला काय करायचे" इतका सोपा प्रश्न नाहीय. ज्या समाजाने भौतिक सुखाची ध्येये ठरवून दिली आणि माणसाकडच्या खेळण्यांवरून त्याची किंमत करायला शिकवली, ती खेळणी तर आम्हाला मिळालीत; पण त्या भानगडीत आम्ही एका माईंडलेस कन्झुमरिझमच्या चक्रात अडकलोय आणि त्यात काही राम नाहीय हे कुठेतरी जाणवायला लागले आहे. त्यातूनच सतत घाईचे, सतत बदलणारे आयुष्य आणि त्यातूनच हा नॉस्टॅल्जिया (आणि प्रसंगी रिग्रेशन) निर्माण झाला आहे.
+१००००००
4 Nov 2013 - 6:20 pm | पैसा
मला वाटते जास्त मोठा प्रश्न मनोधारणेचा आहे. आताच्या पिढीला बहुतेक उंदरांच्या शर्यतीत धावणे आणि इतर उंदीर जे मिळवतात ते म्हणजे गाडी/घर मिळवणे हे आयुष्याचे ध्येय वाटते. ते एकदा हातात पडल्यावर आता काय करावं हे कळत नाही त्यामुळे ही वैफल्याची भावना दिसते. माझे वडील आणि आई दोघेही नोकर्या करत होते पण ते आयुष्यभर मध्यमवर्गीयच राहिले. उच्चमध्यमवर्गीय सुद्धा नाही. माझ्या वडिलांच्या मालकीचा एक टीव्ही किंवा फोन सुद्धा नव्हता, की स्कूटर. घर तर दूरच राहिले. घर घ्यायचा त्यांनी आयुष्यात कधी विचारही केला नाही. पण ते आताच्या तुलनेत पाहता फार समाधानी आयुष्य जगले. आयुष्य चांगलं जगणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे त्यांनी आम्हाला शिकवले. त्यामुळे मी गाडी आणि घर या दोन्ही गोष्टी घेऊ शकले आणि आता पुरे झालं असं वाटताच नोकरी सोडूनही दिली. अजूनही मला काय करावं असा प्रश्न पडलेला नाही. चित्रं काढायची आहेत, भटकायचे आहे, गाणी ऐकायची आहेत, गावाला शेती करायची आहे, आणि वर म्हटलं तशी पुस्तकं तर वाचायची आहेतच! मुलांनाही हेच शिकवायचा प्रयत्न करते आहे की घर गाडी यामुळे आयुष्य अधिक चांगलं होतं, पण त्या काही बेसिक गरजा नव्हेत. पैसे मिळवणे, त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेणे यात काही चूक नाही. पण घडामोडींचा वेग नियंत्रित करणे आपल्या हातात असते. तुमची शक्ती त्यात "बर्न आउट" होता कामा नये. आपला निदान काही वेळ तरी स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी खर्च केला पाहिजे. घर आणि गाडी या गोष्टी तर होतच असतात. पण ती "बाय-प्रॉडक्ट" आहेत; फायनल आऊटपुट नव्हेत हे लक्षात ठेवलं की पुरे. शर्यतीत किती वेळ आणि कोणत्या वेगाने धावायचे हे तुमच्या हातात आहे.
4 Nov 2013 - 6:57 pm | नगरीनिरंजन
प्रश्न मनोधारणेचाच आहे आणि ती मनोधारणा कशी घडवली जाते त्याने फरक पडतो. आजच्या पिढीला ते ध्येय वाटते कारण ते मिळवणार्या व्यक्तीलाच कर्तृत्ववान समजले जाताना सतत पाहिलेले असते. आजही समजा माझ्याकडे गाडी नाही तर मला मिळणार्या वागणुकीत फरक पडतो. साध्या अंगावर घातलेल्या कपड्यांवरून माणसाची किंमत केली जाते.
'घर आणि गाडी' बाय-प्रॉडक्टच काय अत्यंत अनावश्यक गोष्टी आहेत अशी माझी मनोधारणा आहे पण तिला विचारतो कोण? आज एखाद्याने नोकरी सोडून साधं दोन खोल्यांच्या घरात राहावे आणि सायकलने फिरावे असे ठरवणे म्हणजे ज्या कम्युनिटीत आजवरचे आयुष्य घालवले त्यापासून विभक्त होणे आहे.
केवळ आपण राहतो त्या आपल्या मित्र-परिवारात आपल्याला सामावले जावे, मान मिळावा म्हणून प्रत्येकाकडून हे सगळे केले (खरं म्हणजे करवले) जाते. ज्यांना नोकरी सोडूनही तसे राहणे परवडते ते तसे राहतात. ज्यांना नाही जमणार ते आयुष्यभर चक्रात फिरत राहतात.
4 Nov 2013 - 7:28 pm | पैसा
इथेच ग्यानबाची मेख आहे.
बहुतेक वेळा आईबाप "मला मिळालं नाही, आता पोराला मिळू दे" अशा भावनेने त्याला असल्या एकेक गोष्टी देत रहातात. त्यातूनच हे सगळं मला पाहिजे, आताच पाहिजे ही भावना वाढीला लागते. मग रात्री झोपण्यापुरता एक आडोसा एवढाच वेळ जरी घरात जात असला तरी ५०-६० लाखाचा २-३-४ बेडरूम्सवाला फ्लॅट पाहिजे. त्यासाठी ३०-४० लाखाचं कर्ज काढायचं. मग ते फेडण्यासाठी नवरा बायकोने दोघानी नोकरी करणे अपरिहार्य.
नात्यातला एकजण प्रचंड पैसे कमावतो, पण ड्रायव्हिंग आवडत नाही म्हणून गाडी घेत नाही. कुठे जाता येत नाही म्हणून त्याचा मुलगा तक्रार करत होता. त्या मुलाला म्हटलं "अरे, बाबांना सांग की निदान नॅनो तरी घ्या, म्हणजे जवळपास तरी सगळ्यांना एकत्र जाता येईल." तर त्या १३ वर्षाच्या मुलाने मला काय उत्तर द्यावे? "ह्या: नॅनो? ती घेतली तर माझी मित्रांच्यात काय इज्जत राहिली?" म्हणजे या पोरांना गाडी पाहिजे, आणि ती नॅनो पण नको! ती टोयोटाच पाहिजे! मला सायकल चालवणारे माझे वडील आठवले एकदम!
4 Nov 2013 - 9:06 pm | प्रभाकर पेठकर
समाजात चांगले वाईट दोन्ही असते. त्यातुन काय घ्यायचे हे आपणच ठरवायचं असतं. स्पर्धा प्रगतीसाठी पोषक असावी, जीवघेणी नाही. किती धावायचं हे आपणच ठरवायचं असतं. दुसर्यांच्या (समाजाच्या) चुकीच्या विचारसरणीवर आपले आयुष्य बेतणे म्हणजे स्वतःकडे विचार करण्याची कुवत नसण्याचे प्रतिक ठरावे. विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पण सध्या एवढेच.
5 Nov 2013 - 3:13 pm | नगरीनिरंजन
तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे आणि विचार चालू झाले आहेत म्हणून (आणि भविष्याचं भयावह चित्र डोळ्यासमोर स्पष्ट होत चाललंय म्हणून) हे सगळं बाहेर पडतंय.
पण तुम्हाला सांगतो काका, स्वखुशीने कोणी या उंदीर शर्यतीत पडत नाही. यामागे वर्षानुवर्षांचे ब्रेनवॉशिंग असते.
आज ज्या क्लासवॉरबद्दल एवढं बोललं जातंय ते फार पूर्वीपासून चालू आहे. ब्रेनवॉशिंग करून नाहीतर माणसाच्या डिग्निटीला आव्हान देऊन या शर्यतीत ओढले जाते.
एक-दोन किस्से सांगतो. मी तसा निम्न-मध्यमवर्गातला. शाळेत उनाडक्या करणारा बॅकबेंचर. दहावीत मला शिक्षकांकडून केला जाणारा भेदभाव कळायला लागला. शिकवत असताना पुढच्या बेंचवरच्या तथाकथित हुशार मुलांनी काही कमेंट टाकली की आमच्या मराठीच्या बाई म्हणायच्या,"काय रे! सारखा काहीतरी मिश्कील बोलत असतो." आम्ही काही बोललो की राहा बेंचवर उभा नाहीतर जा वर्गाबाहेर.
बारावीनंतरही जेव्हा आम्ही कॉलेजला बसने जायचो तेव्हा माझ्या एका श्रीमंत मित्राला त्याच्या वडिलांनी एमएटी घेऊन दिली. त्याच्या घरी पेढे घ्यायला गेलो तेव्हा सहज विचारले की एमएटी का घेतली, मोटारसायकल का नाही? तेव्हा त्याचे वडिल म्हणाले की अजून काही वर्षांनी तो मारुती घेईल तेव्हा आमच्या ऑफिसमधल्या कोणालातरी देऊन टाकू.
जेव्हा सतरा-अठरा वर्षाच्या मुलाला हे ऐकवले जाते तेव्हा त्यातून काय अर्थ घ्यायचा हे त्याच्या तरूण रक्ताला कळत नाही असे नाही. पुढे नोकरी लागल्यावर स्वतःच्या कमाईने बाईक घेतली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू तरारले होते.
असे अनेक प्रसंग आहेत.
पण आता हळूहळू जाग यायला लागलीय. या वस्तू मिळवणे म्हणजे पुरुषार्थ नाही हे कळतंय आणि तोच पुरुषार्थ आहे असे ठसवले जाण्यात कोणाचा फायदा आहे हेही कळतेय.
आमच्या नॉस्टेल्जियाला एका विषादाचीही किनार आहे. मागे वळून पाहताना कळते की आमच्या आधीच्या पिढीत बहुतेक लोक सरकारी नोकर होते. स्वातंत्र्यात जन्माला आलेली ती पहिली पिढी. देश-समाज उभारणीचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होते. पण बहुतेकांनी वरकमाईतच धन्यता मानली. १० ते ५ ऑफिसमध्ये पाट्या टाकणारे आणि ऑफिसमध्ये आलेल्याला हाड-हाड करणारे कित्येक लोक माझ्या आजूबाजूला होते. उदात्त-भव्यतेच्या तोंडी गप्पा आणि प्रत्यक्ष आचरणातला फरक आम्हाला फार लहानपणी कळायला लागला.
शिवाय या नॉस्टेल्जियाला खतपाणी घालणारा दुसरा मह्त्त्वाचा घटक म्हणजे भविष्याची जाणीव. ज्याचे आज थोडेफार वाचन आहे त्या माणसाला हे कळणे अवघड नाही की संपूर्ण जग एका क्रांतिकारक वळणावर येऊन ठेपले आहे. अगदी प्रगत देशांमध्येही बेरोजगार तरुणांची संख्या ४०% च्या आसपास जाऊन पोचली आहे. मोठमोठ्या अर्थव्यवस्था संकटात आहेत. माणसाच्या भोगवादाची भरधाव गाडी नैसर्गिक मर्यादांच्या भिंतीवर आपटण्याची पुरेपूर शक्यता आहे. सध्या गरीब असलेल्यांनाच काय आमच्या पुढच्या पिढीलाही आमच्याइतके संपन्न आयुष्य मिळणे अशक्य होणार आहे.
अशा परिस्थितीतही बरोबरचे लोक जेव्हा दोन-दोन घरे, दोन-दोन गाड्या घेतात आणि वंचित लोक नक्षलवादाकडे वळतात तेव्हा काहीतरी चुकतंय असंच वाटतं.
त्याबाबतीत काहीतरी केले पाहिजे असे विचार तर सुरू झालेत. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचे बळ येऊन कृती कधी होईल कोण जाणे?
तोपर्यंत बालपणीच्या सुखी आठवणींचाच आधार आहे.
5 Nov 2013 - 10:31 pm | चतुरंग
या लेखाशी अगदी थेट सुसंगत असेलच असे नाही परंतु वरती लिहिल्याप्रमाणे भविष्याचं भयावह चित्र डोळ्यांसमोर स्पष्ट होत चालल्याची आणखीन एक खूण चेपुवर काल बघितली -
एक आकृती पाहिली त्यात आपण खरेदी करतो त्यातली बहुतांश उत्पादने जगातल्या फक्त दहा मोठ्या कंपन्या या ना त्या प्रकारे नियंत्रित करतात असे दिसते!! :(
http://www.policymic.com/articles/71255/10-corporations-control-almost-e...
हे फार भयानक आहे. 'मुक्त' अर्थव्यवस्थेत जगातल्या दहा कंपन्यांची इतकी प्रचंड मक्तेदारी असणे हे खरेतर 'आर्थिक हुकूमशाही' प्रकारात मोडणारे आहे. परंतु या गोष्टी आपल्या जाणिवांपर्यंत पोचण्याएवढी उसंत आपल्याला मिळत नाही. आणि जरी या गोष्टी समजल्या तरीही आपण काय करु शकतो?
सगळं प्रचंड अस्वस्थ करुन टाकतं!
6 Nov 2013 - 8:04 am | शिल्पा ब
हे तुम्हाला आत्ता कळलं? खरोखरीच आश्चर्य वाटलं म्हणून विचारतेय. प्रत्येक मोठ्या कंपनीचे किती ब्रांड असतात म्हण्जे काहीही खरेदी करा फायदा त्याच कंपनीचा. ठळक उदा. युनिलीवर.
6 Nov 2013 - 11:39 am | चतुरंग
खाद्यपदार्थांचे प्रोसेसिंग करणार्या काही बलाढ्य कंपन्यांबद्दल वाचले होते. ३० वर्षांपूर्वी ६० च्या आसपास असलेल्या या कंपन्या आता इतरांनी गिळंकृत्/नामशेष होत होत केवळ सहा उरल्या आहेत म्हणून, परंतु इतर उत्पादनांबाबतही तेवढीच भयावह स्थिती आहे हे माहीत नव्हते! :(
6 Nov 2013 - 12:34 pm | आदूबाळ
शिल्पाताई, युनीलीवर सोडा - काही वर्षांनी आपण जे जे म्हणून खाऊ ते कधी ना कधी मॉन्सॅन्टोच्या मालकीचं असणार आहे!
4 Nov 2013 - 6:35 pm | रेवती
वरील सगळ्याच प्रतिसादांशी थोडी थोडी सहमत. खरंतर सगळंच पटलय आणि सगळच ज्याच्या त्याच्या दृष्टीनं बरोबर आहे. तरी ननिंशी जास्त सहमत कारण मी तशीच वाढले आणि आता भारतात असते तर जसे माझ्या पिढीच्या अनेकांचे चालले आहे तसेच चालले असते. बखोट धरून अभ्यासाला बसवलेल्यांच्या पुढच्या पिढीला "जा हुंदडा" म्हणताना कष्ट पडतात, पण पैसाताई म्हणते तसे बेसिक गरजा भागवल्यानंतर आयुष्य चांगलं , थोडं सोपं करण्यासाठीचे विचारही पटले.
4 Nov 2013 - 6:40 pm | चित्रगुप्त
पतंजलींच्या योगसूत्रातील पहिलेच सूत्र आहे: अथ योगानुशासनम.
ओशोंच्या पतंजलींवरील प्रवचनात याचा विस्तृतपणे उहापोह केलेला आहे. त्यात 'अथ' याचा अर्थ काहीसा इथे जी गाडी,घर इ. झाल्यावर 'व्हॉट नेक्स्ट' अशी स्थिती येते, ती, असे ओशो सांगतात.
थोडक्यात म्हणजे अशी स्थिती आली, की स्वतःच स्वतःला अनुशासनबद्ध करण्यापासून सुरुवात करत हळूहळू अष्टांगयोगाची साधना करावी, त्यातून संपूर्ण जीवनाला नवी दिशा मिळून ते अधिकाधिक सार्थक होइल, वगैरे. अर्थात हा विषय फारच मोठा आहे. 'कला' ही सुद्धा एक उत्तम दिशा.
4 Nov 2013 - 6:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
या धाग्यावरची चर्चा बरीच रोचक होऊ लागलीय. अपेक्षेप्रमाणे काहीजण लेखकाच्या मानसिक गोंधळाशी सहमत आहेत तर बर्याच जणांनी त्यांची उत्तरे अगोदर शोधून ठेवलेली आहेत किंवा त्यांची अंमलबजावणीही सुरू केली आहे.
बर्याच जणांनी "घर-गाडी-बँक बॅलन्स" याची तरतूद झाल्यावर काय काय करता येईल याबाबत बरेच छान मुद्दे पुढे आणले आहेत. अर्थात काही अपवादात्मक व्यक्ती सोडल्या तर "घर-गाडी-बँक बॅलन्स" हे तीन मुद्दे बहुतेक सगळ्यांच्या मनात पहिलेच असतात. असं मीच नाही तर मास्लोव्ह पण म्हणतो ;)
मात्र आपले हे उद्दिष्ट्य साध्य झाले की मग काय ? असा विचार मनात तेव्हाच मनात येतो जेव्हा आपण मागच्या पिढीची स्वप्ने आपल्या जीवनात उधार घेतो... मूळ लोचा हाच आहे... तो असा:
या लेखातल्या उदाहरणात पूर्ण झालेल्या सगळ्या गोष्टी ही "मागच्या पिढीची स्वप्ने" होती... कारण त्या काळातली कठीण परिस्थिती आणि उपलब्ध असलेली संधी पाहता मध्यमवर्गियाला "घर-गाडी-बँक बॅलन्स" ही स्वप्ने वाटण्याएवढीच कठीण गोष्ट होती. आजच्या काळात त्या गोष्टी जरी सहजशक्य नसल्या तरी खूप अशक्य नक्कीच नाहीत आणि त्या पुर्या केलेल्या ३० वर्षिय व्यक्तींची संख्या फार कमी तर नक्कीच नाही... हे तर लेखातच म्हटलंय !
याचा अर्थ लोचा परिस्थितीचा नाही... चुकीच्या स्वप्नांचा आहे. "अपयश नाही तर छोटे ध्येय हा गुन्हा आहे" (Low aim, not failure, is crime !) असे म्हणतात ते यासाठीच !
उपायः
१. स्वप्ने पाहताना कंजूसी करू नका. बदलत्या काळात कालची स्वप्ने आजची सामान्य वस्तुस्थिती बनत असतात. आपल्या आईवडिलांची जुन्या काळची त्यांच्याबद्दलची (तुमच्या बद्दलची नाही !) स्वप्ने आपण आज लवकर वास्तवात आणली तर त्यात आनंद आहे पण ते अभिमानास्पद असेलच असे नाही. शिवाय त्यांनीच त्यांच्या खांद्यावर तुम्हाला उभे करून दूरवरचे क्षितिज बघायची संधी दिलीय.
ते त्यांना न दिसणारे क्षितीज गाठा आणि त्यांना व स्वतःला चकीत करा !
आता जरा वेगळे विचार / उपायः
२. मला काय करायचे / मिळवायचे आहे हे तर ठीक आहेच. आपण आपले प्रयत्न पणाला लावून अनेक गोष्टी मिळवतो. पण त्यामागेही आईवडिलांचा मोठा हातभार तर असतोच पण समाज-देश-जग यांचाही काहीना काही हातभार लागलेला असतोच... तर "घेता घेता देणार्याचे हात घ्यावे" असा प्रयत्नही करायला हरकत नाही... जेवढा जमेल तेवढा, आपापल्या शक्ती आणि इच्छेप्रमाणे. हे सुख काही वेगळंच असतं
३. असं म्हणतात की हुशार माणसं आयुष्यात तीनदा तरी पेशा/व्यवसाय बदलतात ! एकच एक पेशा/व्यवसाय केल्यावर काही काळाने, विषेशतः आर्थिक स्थैर्य आल्यावर, माणसाला त्याचा कंटाळा वाटू लागतो. याचा अर्थ असा की त्या पेशा/व्यवसायाने सर्वात पहिली गरज पुरी केली आहे पण ती व्यावहारीक तडजोड होती. आणि त्यात वावगे असे फार काही नाही. जर शक्य असेल तर, अश्या बदलाच्या शोधाला लाग की ते काम करताना कंटाळा येणार नाही. खूप धमक असली तर तुमच्या एखाद्या छंदाला व्यवसायाचे रूप द्या... आयुष्यभर कंटाळा येणार नाही.
महत्वाची सूचना: हा शेवटचा विकल्प अर्थातच जोखमीचा आहे आणि त्याबाबतचा निर्णय ज्याने त्याने केवळ पूर्ण विचार करूनच नाही तर व्यावसायिक कोष्टक (business plan) बनवून पूर्ण अभ्यासांती आणि आपल्या मगदुराप्रमाणे घ्यायचा असतो. हे केवळ डिस्क्लेमर नाही तर वस्तुस्थितीही आहे.
4 Nov 2013 - 7:34 pm | आबा
गोंधळाशी सहमत आहे. परंतू "व्हॉट इज द पॉईंट?" असा प्रश्न पडलेली ही आपलीच पिढी नाही. अगदी वेदांपासून ते अलिकडे नित्शे पर्यंत बर्याच लोकांनी लिहिलय यावर.
"पॉईंट" प्रत्येकजण आपला आपला शोधून काढत असतो.
वरती क्षीरसागरांनी म्हणलय तसं काही लोक आध्यात्मात उत्तर शोधतात (हा टॉलस्टॉयचा अॅप्रोच होता). तर काही लोक कलेमध्ये. एकच-एक उत्तर देता येणार नाही हे खरेच आहे.
(अल्बेर कामूचे "द मिथ ऑफ सिसिफस" वाचले नसल्यास वाचा असे सुचवेन.)
4 Nov 2013 - 7:39 pm | विजुभाऊ
आमची पिढी "मोठी स्वप्ने बघा" " नॉट फेल्युअर बट अ लो एम इज अ क्राईम" आणि
"अंथरुण पाहून पाहून पाय पसरावे" ....." बेडकीने बैल होण्याची स्वप्ने बघु नयेत"
"रोड लेस ट्रॅव्हल्ड" "महाजनो येन गता स पंथः" या असल्या द्वीधा मनस्थीत बर्याचदा आडकली आहे.
4 Nov 2013 - 8:26 pm | पिंपातला उंदीर
मुळात आपल्याकडे जी संन्यासाश्रम व्यवस्था होती ती सर्व संसारिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यावर यायची . म्हणजे त्यात आयुष्याचा बहुतांश वेळ जाणार असे कुठेतरी गृहीत धरले होते. पण हल्ली मुलांचे संगोपन सोडले तर बहुतेक (सर्व नाही पण बहुतेक ) गोष्टी या तिशीतच पूर्ण होतात . वरती अनेकांनी वाचन ,समाजसेवा , ई . पर्याय सुचवले आहेत पण वरती नगरी निरंजन म्हणतात तसे हे फारच वरवरचे आहे. किंवा समस्येचे simplification आहे. कारण माझ्यासकट अनेक जण या गोष्टी करत आहेतच . पण यासाठी फावल्या वेळातले छंद , १० ते ५, आणि फारस seriously न घेता आयुष्य मस्त एन्जॉय करायचे यापलीकडचा अजून काही option आहे का हे जाणून घ्यायला आवडेल . काहीजनाच्या प्रतिसादातून पण खूप चांगले मुद्दे मिळाले हे नाकारता येत नाही : )
4 Nov 2013 - 11:11 pm | अर्धवटराव
जगणं आनंददायी, अर्थपूर्ण, सफल, आणि नो टेन्शनवालं करायला एकच ऑप्शन आहे... आणि ते फार सिंपल आहे. किंबहुना त्या ऑप्शनला फाट्यावर मारल्यामुळेच सर्व अडचणी सुरू होतात. त्या गुरुकिल्लीचं नाव आहे "प्रेम". जेंव्हा केंव्हा उपलब्ध क्षण व्हॉट नेक्स्ट म्हणुन आ वाचुन उभा असेल तेंव्हा लक्षात घ्या कि प्रेम फॅक्टर मिसींग आहे. त्या क्षणाला थ्री मॅजीक वर्ड्स वापरुन गच्च मिठी मारा, मग बघा तोच क्षण आनंदाचे किती दालनं उघडतो ते. असं करत करत या जन्मावर शतदा प्रेम करावे अशी अवस्था येते. चिल्ल मामु.
4 Nov 2013 - 9:08 pm | शिल्पा ब
जगात करायला इतकं आहे कि आयुष्य पुरं पडणार नाही. असो. लेख चांगला आहे. आमच्या पिढीचं काय होतंय हे काळच सांगेल.:)
4 Nov 2013 - 10:45 pm | निक
घर अणि गाडी बरोबरच पन्नाशीत होणारे आजारही तिशीत सुरु झाले आहेत! या बाबत तुमच्या पिढीत awreness वाढवण्यासाठी काही करता येईल!
4 Nov 2013 - 10:47 pm | निक
typo -- awareness-- sorry!
5 Nov 2013 - 7:12 am | कंजूस
वेळीच हा विचार केलात ते फारच आवडले .बऱ्याच दिवसांनी छान चर्चा वाचायला मिळाली .सर्वांशी सहमत .
5 Nov 2013 - 11:32 am | विनायक प्रभू
फोटोत काय असते?
जन्म तारीख, मरण तारीख
माझ्या फोटोत असेल जन्म तारीख आणि फॉरेवर.
असे माझे साहेब म्हणायचे.
वयाच्या ७५ वर्षी महत्वाकांक्षी प्रकल्प.
किडनी स्टोन, ब्लड प्रेशर वर इतर मंडळी ची ऐसी की तैसी.
दिवसाला कमीत कमी १५ कमीटेड.
आयला हे व्हॉट नेक्स्ट म्हणजे काय असते?
5 Nov 2013 - 11:45 am | चतुरंग
प्रश्न पडणे हे एकाच वेळी चांगले आणि वाईट दोन्ही आहे असे वाटते.
चांगले अशासाठी की असा प्रश्न पडतो आहे म्हणजे संवेदनशीलता जागी आहे!
वाईट अशासाठी की लहान वयात असा प्रश्न पडूनही उत्तरे वेळेवर मिळाली नाहीत तर आयुष्य नीरस, शुष्क, कंटाळवाणे वाटू लागते. कोणत्याही भौतिक सुखाने समाधान होत नाही.
१९८० च्या आसपास जन्मलेल्या बहुतांश मध्यमवर्गीय पिढीचे आत्ताचे आर्थिक स्थान हे त्यांच्या आईवडिलांच्यापेक्षा सुस्थितीचे आहे असे समजायला हरकत नाही. त्यांच्या आईवडिलांपैकी एकाने किंवा बर्याचदा दोघांनी नोकरी करुन मुला-मुलींची शिक्षणे केली, त्यांना शिक्षणाबरोबरंच आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बरेचदा त्यांचे स्वतःचे आर्थिक स्थानही बर्यापैकी राखण्यात ती पिढी यशस्वी झाली, त्यामुळे निवृत्तीनंतरही आर्थिक स्वावलंबन टिकून राहिले. आर्थिक अवलंबित्व हा कुटुंबसंस्था एकत्र ठेवणारा एक मुख्य घटक असतो असे मला वाटते. आपल्याला कोणाची तरी गरज आहे, आवश्यकता आहे या जाणिवेतून एकत्र राहून मग तडजोडी केल्या जाऊ शकतात. एकमेकांना मदत केली जाते. वर उल्लेखलेल्या पिढीची(किंवा त्याच्या १०/१५ वर्षे आधी जन्मलेल्यांची बर्याचजणांची सुद्धा)एक अडचण अशी असते की आई-वडील स्वतंत्र असल्याने ते जवळ असून त्यात अवलंबित्व नसल्याने एकप्रकारचा तुटलेपणा, तडजोड न करण्याची वृत्ती बर्याचदा दिसते. "मी का म्हणून अॅडजस्ट करु? मला काय गरज आहे?" असे होऊ शकते.
त्या पिढीने त्यांच्या आईवडिलांची, बर्याचदा कुटुंबातीला इतरांची लहान बहिणी, भाऊ यांचीही जबाबदारी घेतलेली असते. त्यासाठी कष्ट केलेले असतात. त्या सगळ्यात त्यांचे स्वतःच्या कुटुंबाचे (नवरा/बायको, मुले) यांची जबाबदारी घेऊन स्वतःचे घर, पैसा, निवृत्तीनंतरची सोय या सगळ्यात त्यांचे वय जवळपास पन्नाशी पार करुन जात असे. सतत काही ना काही ध्येय डोळ्यासमोर असेच (मग ते स्वखुशीने स्विकारलेले असो की जबाबदारी म्हणून तुमच्याकडे आलेले असो).
शिवाय आयुष्य त्यामानाने एवढे धावपळीचे नव्हते. नोकर्यांना बर्यापैकी स्थैर्य होते, कामाचे तास ठराविक होते, सामाजिक सरमिसळ मोठ्या प्रमाणात घडलेली नव्हती त्यामुळे एका चाकोरीतून जात राहणे बर्यापैकी फायद्याचे होते.
१९८० च्या आसपासच्या पिढीला शिक्षण मिळून नोकरीची वेळ आली तोपर्यंत आयटीसारखी नवीन क्षेत्रे खुणावत होती. ज्यात पगार भरपूर होते, कामाचे तास आणि ताणही जास्त होते, शिका, पाहिजे तिकडे जा असा आई-वडिलांचा पाठींबाही होता. 'एक या दो बस' मुळे घरच्या जबाबदार्याही अतिशय मोजक्या किंवा जवळपास नसल्यातच होत्या. सामाजिक सरमिसळ प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. संस्कारांची, मूल्यांची पडझड/बदल झपाट्याने होत होते. एकदा का शिक्षण होऊन नोकरी लागली की पैसा येत गेला. स्वतःचे घर असावे या जाणिवेतून मग स्वतंत्र घराची मागणी सुद्धा जोर धरु लागली. मुलींचे शिक्षण आणि नोकर्या या मुलांच्या बरोबरीने असल्याकारणाने त्यांनाही स्वतंत्र घर असणे, घरच्या जबाबदार्या कमी असणे याची सवय झाली होती. अशा अनेक कारणांनी स्वत:ची नोकरी, घर, पैसा यापलीकडे जाऊन काही जग असते याची जाणीव हळूहळू पुसट होत गेली. यात त्या पिढीचा काही दोष आहे असे नाही तर सामाजिक अभिसरणाचा हा एक साईडईफेक्ट आहे असे मला वाटते.
व्यवस्थित पैसा आणि स्वतःचे घर असल्याखेरीज लग्नाच्या बाजारातही मागणी कमी असणे हे कशाचे द्योतक आहे?
त्यामुळे तुम्हाला काय वाटते किंवा मिळवायचे आहे यापेक्षा इतरांनी काय मिळवले आहे आणि त्यांना काय वाटते आहे हाच एकप्रकारे मापदंड बनत गेला/जातो. व्यवहारी जगात हे पूर्णपणे चुकवता येणे अतिशय कठिण असते परंतु तुमची नेमकी गरज काय आहे? कुठे थांबलात तर चालू शकेल? याचा अंदाज येणे फार महत्त्वाचे.
तिशीतच गाडी, घर, पैसा हे सगळे होणे आणि तशी अपेक्षा असणे हे चूक आहे असे मला वाटते. प्रत्येक ट्प्प्यावर योग्य परिपक्वता येत गेली की ती ती गोष्ट मिळवण्याचा आनंद असतो. हल्ली मी बर्याचदा (विशेषतः आयटीमध्ये) ३० वर्षांचे मॅनेजर्स झालेले लोक बघतो. त्यावेळी मनात येते की मॅनेजर होऊन ५-१० माणसांची टीम सांभाळण्या एवढी परिपक्वता तिशीत येत असेल का? नुसते काम माहीत असून उपयोग आहे का? त्यामागचा माणूस वाचू शकण्याची पात्रता काही अनुभवानंतरच येते असे माझे मत आहे. तसे नसेल तर मग खाजगी आयुष्य आणि कामाचे आयुष्य यातल्या ताणांचे व्यवस्थापन नीट होत नाही आणि सगळीकडचाच ताण वाढत जातो.
आयुष्य हे एकाचवेळेला अनेक अंगांनी फुलत जात असते. पहिली दहा वर्षे भरपूर पैसे कमवू, मग व्यायाम करु, त्यानंतर छंद जोपासू, मग सहलीला जाऊन घेऊ असे तुकड्या तुकड्यांनी आयुष्य जगता येत नाही. प्रत्येक टप्प्यावर अग्रक्रम बदलते असले तरी सगळेच मुद्दे थोड्याफार फरकाने विचारात घेत पुढे जाता आले तर ते संपन्न आयुष्य होते.
यात कुठेतरी स्वत्:चे पोट पुरेसे भरले की इतरेजनांचाही विचार करायची फुरसत आपण ठेवायला हवी. त्याने निरपेक्ष देण्याचे समाधान मिळते. तो आनंद तुम्हाला प्रचंड ऊर्जा मिळवून देतो.
आणखीन एक जाणवणारा मुद्दा म्हणजे शालेय आणि कॉलेजच्या शिक्षणासोबतच किंबहुना जास्त महत्त्वाचा असा व्यवहार शिक्षणाचा किंवा दुनियादारीचा अनुभव पुढल्या पिढीला देणे ह्यात मागल्या पिढीचे पालक बर्याचदा कमी पडले असे वाटते. आम्हाला कष्ट पडलेत ना मग तुम्हाला नको, हे चूक आहे. गाडीचे चाक हे रस्त्यावर असलेल्या पुरेशा घर्षणामुळेच स्थिरपणे चालू शकते अन्यथा अगदी गुळगुळीत रस्त्यावर जरा ब्रेक लागला की गाडी घसरलीच! या नव्या पिढीची मानसिक ताण सहन करण्याची क्षमता, अडचणींना तोंड देण्याची क्षमता, मनाविरुद्ध गोष्टी झाल्या की त्यातून मार्ग काढण्याची क्षमता या कमी तर झालेल्या नाहीत ना अशी शंका येते. अडचणी या येणारच आणि त्या सोडवण्यातच आयुष्याचे यश आहे हा गाभा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत भकास आणि मोकळे वाटत राहणार. कोणतेही सुख चटकन न मिळता थोड्याफार अपयशातून, अडचणींमधून मिळते तेव्हा त्याची लज्जत, किंमत आणि आनंद फार वेगळ्या दर्जाचा असतो.
वरती पेठकर काकांनी, इस्पिकचा एक्का यांनी आणि इतरांनीही अतिशय चांगले मुद्दे मांडले आहेत. त्या मुद्यांचा विचार व्हावा आणि त्यातून मार्ग सापडावा ही सदिच्छा! खूप दिवसांनी एक चांगली चर्चा वाचायला मिळाल्याचे समाधान वाटले.
5 Nov 2013 - 12:26 pm | आदूबाळ
वाचनखूण
5 Nov 2013 - 12:33 pm | प्रभाकर पेठकर
वरील चर्चेत फक्त आयटीत अचाट आणि अफाट कमाई करणार्या पिढीचाच विचार झालेला दिसतो आहे. किंवा निदान तिच जमात डोळ्यासमोर दिसते आहे. पण प्रत्यक्षात आय टी व्यतिरिक्त फार मोठा तरूणवर्ग महागाईशी, राजकिय, सामाजिक परिस्थितीशी झगडताना दिसतो. लग्नाचे वय झाले पण वेगळी सदनिका नसल्याने किंवा आई-वडिलांसमवेत राहण्याच्या इच्छेमुळे कित्येक तरूण मुलांची वये लग्नावाचून वाढताना दिसत आहेत. शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, चर्चा, आंतरजाल आदी माध्यमातून मुलींचा दृष्टीकोन बदललेला जाणवतो आहे. खुपशा प्रसंगात मुलीच, आलेल्या स्थळांची छाननी करून मुलांना नाकारत आहेत. म्हणजे हा अधिकार फक्त मुलांनाच आहे असा माझा मुद्दा नाहिए. पण तिशीतच घर, गाडी घेणारे, घेऊ शकणार्या तरूणांचे प्रमाण किती आहे?
मला वाटतं, संगणकाद्वारे एकतर्फी ज्ञानाचा आणि मनोरंजनाचा बदाबदा कोसळणारा धबधबा, ज्यात 'विचार' करायला फार कमी असणारा किंवा अजिबात नसणारा वेळ ह्याने एकतर स्वतः विचार करण्याची सवय हरवली आहे. तसेच आंतरजालावर॑ व्यक्ती समोर नसल्याने तसेच नांवेही खरी नसल्याने कसेही बोला/लिहा आणि आपल्या वैफल्याला वाट करून द्या. शाब्दीक आसूड ओढून असूरी आनंद मिळवा ह्या सवयीत क्षणैक आनंदासाठी जगायची सवय लागत गेली आहे. शाश्वत आनंदाचे मुल्यच कमी झाले आहे. त्याने आयुष्यात पोकळी निर्माण होऊन 'पुढे काय?' ह्या विचारांनी हातपाय गाळणार्यांची संख्या वाढते आहे.
चांगली संगत, प्रत्यक्ष समोरासमोर मुद्देसुद चर्चा, चांगल्या विचारांचे आदानप्रदान, संवेदनशिलता आणि चराचरावरील प्रेम ह्या मुल्यांच्या आधारे आयुष्य सुकर होईल, असे वाटते.
5 Nov 2013 - 10:13 pm | चतुरंग
विषयाचा आवाका फार आहे. आयटी व्यतिरिक्त समाजाचा मोठा वर्ग हा फारच भीषण वास्तवातून जातोय हे खरेच आहे. उद्याच्या जेवणाची चिंता असलेल्या समाजाचं "व्हॉट नेक्स्ट?" हे खूप वेगळं आहे! :(
परंतू इथल्या लेखाच्या अनुषंगाने जो प्रातिनिधिक मध्यमवर्गीय समाज मी डोळ्यांसमोर घेतला त्यानुसार वरची प्रतिक्रिया होती.
5 Nov 2013 - 12:38 pm | चित्रगुप्त
सहमत. ही चर्चा पुढे चालत राहून या मुद्द्याच्या वा लोचाच्या सगळ्या अंगांवर प्रकाश पडावा, जे काहीसे गोंधळात आहेत त्यांना भक्कम आधार, मर्गदर्शन आणि दिशा मिळावी.
5 Nov 2013 - 1:07 pm | अग्निकोल्हा
सततच्या स्पर्धात्मक्तेने आता चेलेंज हे चेलेंजही वाटतच नाही.... मग वोट नेक्स्ट वाटणार नाही काय ? यश अपयश या गोष्टी आता कमालीच्या यांत्रिक झाल्यात तेंव्हा उगा हे राहीलय ते राहिले म्हणताना खरच या राहिलेल्या गोष्टी किती मिस होतात याचा विचार केला तर उत्तर विशेष नाही हेच असते. काहीही मिस हॉट नाही तेव्हांच नोस्टेल्जियाचा आधार घेउन आमच्या वेळी यांव अन त्यांव करावेसे वाटते... :(
5 Nov 2013 - 1:47 pm | पैसा
भाऊ, हेच एग्झॅक्ट दुखणं आहे. आयुष्य हे जगण्यासाठी आहे. आपल्या नशीबाने विचार करणारा माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहोत हे लक्षात घ्याल त्यादिवशी जगण्याची, आयुष्याची खरी किंमत कळेल. नाहीतर घरात मांजर कुत्रे फार काय मुंग्या आणि पालीसुद्धा त्याच त्याच गोष्टी करत वर्षानुवर्षे जगत असतात. त्यांना कंटाळा आल्याचे कुणी पाहिले आहे? कंटाळा आणि वैफल्य हा फक्त माणसाला भेडसावणारा प्रश्न दिसतो आहे.
तसेही इथे येणारे बहुसंख्य लोक हे आयटीत किंवा तत्सम क्षेत्रात काम करणारे आहेत. हा लेख त्या पिढीचे बर्यापैकी प्रतिनिधित्व करतो; पण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची संख्या कितीशी आहे? खेडेगावातील अल्पशिक्षित, कामगार वर्गातले, शेतकरी यांना यापेक्षा मोठे प्रश्न पडतात. उद्याचे जेवण कुठून येईल? पाऊस पडेल का? शेतीमालाला बरा भाव येईल का? त्यांना असले सगळे विचार म्हणजे चैनीची बाब आहे.
कलेच्या क्षेत्रात काम करणार्या अभ्याचा प्रतिसाद पुरेसा बोलका आहे.
5 Nov 2013 - 2:51 pm | अग्निकोल्हा
अर्थातच. कारण यांत्रिकतेचा तिटकारा मानवच करू शकतो. म्हणुनच विचार(आणि त्या बरहुकुम कृती) करायची क्षमता खरच कितपत वरदान आहे हां प्रश्न तेंव्हाच आ वासून उभा राहतो जेंव्हा विचार केल्याने प्रश्न संपूर्ण सुट्त नसतात हे समजते.
अभ्याचा प्रतिसाद वाचला आहे! तरतरीत प्रतिसाद आहे. माझी टुडू लिस्ट त्याहुन भयंकर अन मोठी आहे पण प्रश्न हां आहे की यातल्या किती गोष्टी फार मिस करेंन ?
PHP यांवे म्हणून अभ्या असा किती जीव ओतणार आहे ? तसे असेल तर मीच त्याला 1 वर्षात दृपलसाराखे फ्रेमवर्क फ्रॉम स्क्रेच लिहायला तरबेज करेन म्हणतो. पण प्रश्न त्याची टुडुलिस्ट तो खर्च किती मिस करतोय ? थोडक्यात एक्विलिब्रिअम अवस्था थोड्याफार फरकाने त्याचीही झालेली आहेच.... किंबहुना बहुतांश प्रतिसदकांची तीच अवस्था आहे... कोणी ते मान्य करतेय, कोणी तीला समजुन घेतय, कोणी अस्वीकार करतय, या प्रकारे आपले मन प्रकट करते आहे... परन्तु कृतिमधुंन या अवस्थेपासून कोणीही दूर भासत नाही
5 Nov 2013 - 4:14 pm | पैसा
त्यातल्या किती गोष्टी मिस होतील याचे उत्तर देणे कठीण आहे. प्रत्येकाचे उत्तर वेगवेग़ळे असू शकेल. पण करायला किती ऑप्शन्स आहेत याचा काहीतेरी पॉझिटिव्ह विचार तरी डोक्यात राहतो ना! तसे तर जीवनावश्यक गोष्टी मिळवणे हेच आयुष्यात आवश्यक असते. पण आपण केवढा पसारा गोळा करतो.
हमको मालूम है जन्नत की हक़ीकत लेकिन
दिल को खुश रखने को ग़ालिब ये ख़याल अच्छा है!
5 Nov 2013 - 7:24 pm | अग्निकोल्हा
पण एखादी गोष्ट नेमकी शब्दबध्द करणे वा शांतपणे मुद्देसुद मांडने हां माजा प्रांत नाही(मला दंगा करणे, विषय अनावश्यक भरकटवणे, उध्दार करूँ समोरच्याला शांत करणे च साध्य आहे) म्हणून agree to disagree इतकच बोलुन रजा घेतो, रच्याकने मी नाउमेद वगैरे अजिबात नाही हे नक्की.
6 Nov 2013 - 1:57 pm | फिरंगी
८० च्या दशकातला आजकाल नोस्ताल्जिक होताना दिसतय …जाणवतय …. हे बाकी खरं
7 Nov 2013 - 5:05 pm | सौंदाळा
छान लेख.
दिग्गजांचे प्रतिसादही वाचनीय.
प्यारेच्या पैसाताईंचे वय शोधण्याच्या प्रयत्नाला विशेष दाद ;)
10 Nov 2013 - 12:25 am | प्यारे१
आयला,
असा पण अर्थ निघतोय काय?
स्त्रिया १६ च्या पुढे सरकत नाहीत असा प्रवाद आहे, न मानल्यास वाद होतो.
8 Nov 2013 - 9:42 am | भिकापाटील
१. आली लहर केला कहर...
२. होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..
३. चर्चा तर होणारच होवु दे खरच...
४. एकच फाइट वातावरण ताईट ...
५. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत...
6. बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन...
७. मुलींचा दावा आहे ...... भाऊ छावा आहे...
८. एक घाव शंभर टुकड़े अर्धे इकडे अर्धे तिकडे
९. .... भाऊ तुमच्यासाठी काय पण...
१०. भाऊची डेरिंग कालपन ,आजपन,उद्यापन......
११. आला कंटाळा केला घोटाळा...
१२. अमाप केला खर्च.. घेतल नाही टेंशन घरच.
१३. पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊचा विषय खोल आहे.
१४. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात..भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.
१५. असेल औकात.. तर भेट चौकात...
13 Nov 2013 - 6:48 pm | चिगो
दादा म्हणत्यात' होऊ दे खर्च, लै आहे बायकोच्या माहेरचं'..
8 Nov 2013 - 9:49 am | भिकापाटील
ऐन तिशीतच पुढे काय? असा प्रश्न पडनार्या नविन पिढीला काय म्ह्णावे? मोठे ध्येय नसल्याने असे होत असावे...
रामरक्षेची जागा आता Android ने घेतली,
त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली....
.
माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण,
मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन.
.
पुस्तकाची PDF झाली,रोज वेगळा BF अन रोज नवी GF आली...
प्रगती होतेय सांगत घडणारी / बिघडणारी नवीन Online पीढ़ी आली...
.
अंगठे दुखतायत आता Type करून
मानसं भेटतायतं आता Skype वरुन...
.
पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं
आता, काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता...
.
मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय,
Android Market मध्ये Temple Run जो आलाय...
.
व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले 'Connected',
पण शेजारधर्म 'Was Totally Disconnected'...
.
आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता,
'देव देव' काय करता,पूजा करायचं पण App आलाय आता....
.
या 'Technology' मागे पळता पळता,
लोकांनी पळणंच बंद केलय आता....
.
विसरले सारे चव आईच्या भाजीची,शुर गाथा शिवाजीची,
साथ पसरलीय सावध रहा Latest आलेल्या 'Technology' ची...
वाट लावून टाकील
भिका पाटील
9 Nov 2013 - 10:19 am | आशु जोग
>> कंपू असेल पाठिशी,तर १००प्रतिसाद गाठिशी!
ते दिवस गेले.... रे
जिकडे तिकडे मालक वा कंपन्या बदलतात पण चपराशी मात्र परमनंट होतात. ममो असो व नमो चपराशी तेच
9 Nov 2013 - 10:27 am | आशु जोग
अमोल उद्गिरकर
यांनी छान विचार करायला लावणारे निरीक्षण मांडले आहे.
तिशीतच घर घेतलि. गाड्या आल्या . परवाच असाच माझा एक मित्र मला फोन वर उसासून म्हणाला ," झाल सगळ करून . आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?"
सहज एक विचार मनाशी करून पहावा... माझ्या आजोबांचा प्रचंड मोठा वाडा जमीनजुमला होता. त्यामानाने वडिलांचे घर छोटे होते. माझे घर त्याहूनही लहान आहे. तर मागच्या पिढीच्यापेक्षा मी अधिक संपन्न कसा !
31 Dec 2013 - 12:04 pm | नगरीनिरंजन
आझाद इस्सा (जन्म १९८२) या कवीची ही कविता पाहा:
13 Jan 2014 - 9:36 am | पिंपातला उंदीर
झक्कास.
31 Dec 2013 - 9:47 pm | भ ट क्या खे ड वा ला
छान लेख
पण इतक्या लौकर हा प्रश्न कसा काय पडतो बुवा ?
आम्हाला अजून बर्याच गोष्टींवर लव करायचं आहे
या जन्मा वर या जगण्यावर शतदा प्रेम करावे