शतशब्द कथा (वृद्धाश्रम)
अतिवास आणि खेडूत यांच्या लिखाणामुळे प्रेरीत होऊन एक शतशब्द कथा लिहायचा प्रयत्न करतोय...कोठेतरी वाचलेल्या एका संवादाचे हे एक छोटे रुपांतर आहे... चु.भू.द्या.घ्या.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"बाबा लवकर उशीर होतोय मला..." सातव्यांदा गुणेश खेकसला..”च्यायला रिक्षा/टॅक्सीचा आजच संप असावा आणि आजच बॉसने लवकर ऑफिसला बोलवावे.?”
अरे बाबा, तुला उशीर होतोय तर मी एकटाच जातो. आता जवळच आहे..
नको नको, जड बॅग घेऊन या उन्हात तुम्हाला चालवेल?