दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या आरतीचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी दोन आरत्यांचा ( गणपतीच्या नि देवीच्या ) नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती.
ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांच्या अंशावताराची जयंती. खरंतर देव जन्म घेतात का असा प्रश्न येतो पण भाविकांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू.
दत्त जयंतीची कथा : अत्रि नामक ऋषींच्या पतिव्रता पत्नीची अनसूयेची परिक्षा घेण्यास स्त्रीमत्सरानं सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती उतावीळ होतात, आपापल्या पतिराजांना तयार करतात नि अत्रि नसताना त्यांच्या आश्रमात पाठवतात. भिक्षा मागताना आम्हाला नग्न होऊन भोजन दे अशी अट घालतात. ती आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर तिघांना लहान बाळ करुन आपलं स्तन्य (दूध) वाढते. अनसूयेवर तिघे प्रसन्न, त्यांच्या बायका गप्प. वर माग म्हटल्यावर तुम्हा ति घांनीही माझं दूध प्यायलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिघेही आता माझे पुत्र आहात इथेच वास करुन असा म्हटल्यावर त्रिमुखी दत्त बनून अवतार धारण होतो.
कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि गुलामीनं पिचत पडलेल्या समाजातला कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे सांगू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की पातिव्रत्याचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, भगवंताकडे जाताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.
पूर्ण आरती :
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
(पाठ आहे पण हाताशी पटकन khapre.org वर मिळाली. कॉपी करुन घेतली)
आरती शब्दाचा एक अर्थ 'उपास्याबद्दल रती असेपर्यंत म्हणजे प्रेम असेपर्यंत करावयाची ती' असा आपण पाहिलेला आहेच. पुन्हा सांगावं असा हा विषय आहे. अध्यात्माबद्दल सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज असते. कारण ऐकलेलं पटकन 'आत' पोचत नाही . कारण इतर गोष्टींनी मन 'व्यापलेलं' असतं. असो.
ही संतश्रेष्ठ शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी रचलेली आरती आहे. २१ वेळा अंगावर थुंकणार्या यवनास शांतपणे आपल्या वागण्याद्वारे सुधारणारे, पितर भोजनावेळी ब्राह्मणभोजनाऐवजी दीनदलित जोडप्यांना जेवू घालणारे समाज सुधारक, यात्रा करुन परतताना गाढवाच्या मुखी गंगाजल ओतून भूतदया करणारे असे एकनाथ महाराज! स्वत:च्या उदाहरणातून शांतपणे समाजसेवा करता येते हे त्यांनी तेव्हाच दाखवून दिलेलं आहे.
पंगतीला पत्नीच्या पाठीवर एका उद्धटाने उडी मारली तेव्हा 'अगं सांभाळ, त्यांना पाडशील' म्हणून मिश्किलपणं त्याची जागा दाखवून देणारे, भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन नि अध्यात्माचे अवघड सिद्धांत सहज समजावून सांगणारे एकनाथ महाराज. कार्यालयीन कामकाजात एक पै चा हिशेब सापडेना म्हणून रात्रभर जागून तो शोधणारे व्यवहार दक्ष नि खाजगी कामासाठी सरकारी दिवा विझवून, स्वखर्चाच्या तेलाचा दिवा जाळणारे एकनाथ महाराज. विस्मृतीत गेलेल्या ज्ञानेश्वरीला शुद्ध प्रत करुन पुन्हा प्रचार करणारे एकनाथ महाराज जणू ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्याभोवतीची ही कर्मठपणाने फासणारी मुळीच जणू सोडवतात.
अशा सर्वार्थाने श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी रचलेली ही भगवान दत्तात्रेयांची आरती आहे.
मागे एका प्रतिसादात लिहील्याप्रमाणं भगवदतत्त्व सगळीकडं सारखंच. एकाच व्यक्तीला काका, मामा, बाबा, भाऊ, दादा, सर, साहेब, बंड्या म्हटल्याप्रमाणं कार्यानुसार नि कारणानुसार त्याचं नाम बदलतं. विश्व निर्मितीच्या कार्य शक्ती नि तेव्हाच्या अधिष्ठानाला ब्रह्मदेव, विश्वाचा पसारा सुरु राहण्याच्या कार्यशक्ती च्या अधिष्ठान देवतेला विष्णू नि तोचा संहार करण्याच्या शक्तीच्या अधिष्ठानाला महेश असं नाव आहे. हीच त्रैमूर्ती.
ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण. हालचालीशिवाय कार्य शक्य नाही. कुठलीही गोष्ट सुरु करण्यासाठी आवश्यक हालचाल अथवा जी क्रिया लागते तिला रजोगुण म्हणतात. नि सांभाळण्यासाठी आवश्यक असतं ते स्थैर्य. टिकणं. ह्या टिकण्याच्या मागं असणारा भाव असतो तो सत्त्वगुणाचा म्हणून ओळखला जातो. नि संपवण्यासाठी आवश्यक असतो तो तमोगुण म्हणजे संहार करण्याची क्रिया.
हल्लीच्या कोलॅबोरेशन च्या जमान्याच्या भाषेत बोलायचं तर दत्त भगवान हे एक 'टायअप' आहे तिन्ही गुणांच्या अभिव्यक्तीचं, तिन्ही प्रकारच्या शक्तींचं! पण ह्या तीन क्रिया म्हणजे भगवान दत्त नव्हेत किंवा हे तीन गुण म्हणजे दत्त नव्हेत. तर त्रिगुणात्मक म्हणजे तिन्ही गुणांचा आत्मा म्हणून म्हणजे ज्याला आपण मूळ स्त्रोत म्हणू शकू असे हे दत्त भगवान आहेत. मुळात ते काहीच करत नाहीत. ज्याप्रमाणं वीजेच्या बलावर हीटर नि रेफ्रिजरेटर दोन्ही चालून अनुक्रमे गरम नि थंड करण्याची कामं होतात पण वीज गरम किंवा गार नव्हे त्याप्रमाणं दत्त त्रिगुणात्मक आहेत खरे पण त्रिगुण म्हणजे दत्त नव्हेत तर त्रिगुण ज्याच्या अधिष्ठानावर काम करतात ती गोष्ट (इथं थोडं आणखी विश्लेषण म्हणजे असं एक जागी दाखवता येईल नि दुसरीकडं येणार नाही असं ते नसतंच मुळी. सबाह्य अभ्यंतरी पुढं येईलच)
दत्त म्हणजे दिलेला. कुणी दिला? कसा दिला? आपण वर पुराणातली कथा पाहिली. दत्तांच्या आईचं नाव अनसूया नि वडलांचं नाव अत्रि. कथा फार काही 'सांगणार्या' असतात. बहुतेकदा रुपक कथाच असतात त्या. आओअण नीट पाहिलं तर ह्या कथा पुष्कळ काही देऊ शकतात.
अ त्रि म्हणजे जे तीन च्या पलिकडे आहेत असे ते.
तीन गोष्टींची भली मोठी यादी आहे. तीन गुण -सत्त्व, रज, तम , तीन काल - भूत, वर्तमान, भविष्य, तीन अवस्था - जागृती, स्वप्न, सुषुप्ति, तीन देह- स्थूल, सूक्ष्म, कारण देह अशा सगळ्याच्या पलिकडं गेलेल्या व्यक्तीमध्ये दत्ताची अभिव्यक्ती शक्य आहे. (अथर्वशीर्षामध्ये त्वं गुण, देह, काल, अवस्था त्रयातीतः असं जे गणनायकाचं वर्णन आहे ते हेच्च्च्च! एकाच व्यक्ती चा हाक मारताना पुतण्याकडून काका नि दुसर्या बाजूनं भाच्याकडून मामा म्हणून उल्लेख येतो तसंच)
हेच अनसूया ह्या आईबद्दल. अन-असूय= असूया नसलेला/ली हे मनाचं स्वरुप असलेल्या व्यक्तीमध्ये दत्त भगवान येतात.
मुळात हे दत्त वगैरे का आणायचे जीवनात?
माणसाच्या जीवनात अनेक प्रकारच्या संघर्षामध्ये स्पर्धा, मत्सर, हेवेदावे असतात पण ज्या व्यक्तीला असूया नाही त्याला ह्या कशाचा त्रास होत नाही. आपल्याला वाटेल मग प्रगती कशी होणार? स्पर्धेशिवाय प्रगती कशी शक्य आहे ? उदाहरण घेऊ. शाळेत असताना एकाला ७५ % मिळाले तरी इतर ७०% च्या आसपास असल्यानं पहिला नंबर मिळायचा. एकदा असंच एकानं सांगितलं तुला ७५% मिळतात म्हणजे २५ % येत नाही का? डोळे उघडले. परिक्षा कितीची आहे? १०० % ची आहे ना? मग आपण १०० % साठी काम केलं पाहिजे. दुसरा ७० % वर असो अथवा ९५ % वर!
स्पर्धा कुणाची? कुणाशी? ह्या विचारामध्ये आपण इतरांशी तर नाहीच तर स्वतःशीसुद्धा स्पर्धा नाही करत. मला १०० % यावं एवढा भाव निर्माण होतो.
भूतकाळाची नि भविष्याची चिंता मुख्यत्वे भीतीपोटी असते. भीतीचा उगम पुन्हा आपण असू का नसू ह्यामध्ये असतो. एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं. थोडं अवघड वाटतं पण आधीच्या लेखात म्ह्टल्याप्रमाणं जर 'जे माझं आहे ते मी नाही' हे पक्कं झालं की माझा मोबाईल, घड्याळ म्हणजे मी नाही हे जसं मान्य तसं माझा हात, माझा पाय, माझं शरीर, माझं नाव, माझी शैक्षणिक पदवी, माझी संपत्ती, माझे नातेवाईक, माझं मन, बुद्धी चित्त म्हणजे मी नाही हे लक्षात येतं, पटतं. हळू हळू हे आत्मसात व्हायला लागतं. ह्यातून भीती जाते, चिंता जातात, काळजी जाते.
अनसूयेच्या पोटी येणारे दत्त ह्यासाठी आपल्यामध्ये आणावेत. असूया गेली नि भूत भविष्याच्या चिंता गेल्या की बरंचसं मन मोकळं होतं. मन मोकळं झालं की आनंद असतो, आनंद असला की समाधान असतं.
आपण पहिल्या ओळीतला पहिला चरण बघतोय अजून. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा 'जाणा' वर म्हटलेलं सगळं हे जाणण्याचीच तर प्रक्रिया आहे. नेमकं काय आहे हे एकदा समजलं की पुढचं सगळं एकदम स्वच्छ होऊन जातं.
माहिती असणं वेगळं, समजणं वेगळं, समजून घेणं वेगळं नि जाणणं वेगळं. हे जाणल्यावर पुन्हा वेगळं काही जाणण्याची गरज तर राहत नाहीच पण वखवख देखील थांबते.
हे एकदा समजलं म्हणजे जणू 'मास्टर की' सापडली!
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा.: असा हा (तिन्ही गुणांचे स्वामी एकत्र आलेला) अवतार तिन्ही लोकांचा राणा म्हणजे राजाच जणू. (बाकी आनुषंगिक म्हणून तमोगुणाचे स्वामी म्हणून शंकर तमोगुणी नाहीत तर ते त्याचे स्वामी आहेत. बर्याच जणांचा तसा समज पुराणकथांचा पाठिंबा असल्यानं जाणवतो खरा मात्र हे खरं नाही. आमच्या घाटपांडे काकांनी पोलिसात असताना अनेक जणांची पाठ फोडली असेल पण म्हणून ते रागीट ठरत नाहीत तसंच काहीसं! असो. महाशिवरात्रीला शंकराची आरती बघू अशी महादेवाला प्रार्थना!)
नेति नेति शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन समाधी न ये ध्याना|
जोवर नेमका भाव समजत नाही तोवर गूढ आकलन होत नाही त्यामुळंच हे वेद शास्त्र नेति नेति (हे नाही, ते नाही असं) म्हणत राहतात नि कुठल्या अनुमानाप्रत येऊ शकत नाहीत. वर म्हटल्याप्रमाणं जे माझं ते मी नाही चा विचार अगदी ह्याच प्रकारे करता येऊन नेति नेति नि शंकराचार्यांच्या आत्मषटकाला जाऊन पोचतो.
'न जाणता कोटीवरी| साधने केली परोपरी| तरी मोक्षास अधिकारी| होणार नाही||' असं म्हणतानाचा समर्थ रामदासांचा भाव,
'तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसेचि खळ' म्हणणारे तुकाराम महाराज, 'वस्तुर्सिद्धीर्विचारेण न कश्चित कर्मकोटिभि'
ह्या सगळ्याचा नि सुरवरमुनिजन योगी 'समाधी न ये ध्याना' चा एकंदर अर्थ हाच की योग्य मार्गानं सारासार विचार नि विवेक करुनच नेमकं काय हे समजून घेऊनच मोक्षपद प्राप्ती करुन घेतली जाऊ शकते (मुळात ते नित्यप्राप्त च आहे, चुकीच्या धारणांमुळं बंधन वाटतं (आरशावर घाण असली तर प्रतिबिंब दिसत नाही पण ते असतं तसं. आरसा स्वच्छ करावा लागतो))
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता
भव चिंता: भव म्हणजे संसार. दुसरा अर्थ माझ्यापुरतं असलेलं जग. आपल्या आजूबाजूचंच. सगळ्याचा विचार काही ठराविक लोकांसाठी सोडून देऊ. (असतात तसे. असो द्यावेत) श्रीगुरु कॄपेने दिल्या गेलेल्या ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे असं नाथ महाराज म्हणतात तेव्हा ते आपल्यासाठी जास्त असतं. संत स्वतःसाठी बोलताना सुद्धा सगळ्यांचं हीतच पाहतात.
सबाह्य अभ्यंतरी म्हणजे सगळीकडे व्यापून असलेलं तत्त्व ते तूच आहेस. विश्वनिर्मिती ते विश्वाचा लय ज्याच्या सत्तेवर (बेसवर) चालतो ते चैतन्यरुप म्हणजे दत्त. ही गोष्ट अभाग्याला मात्र कळू शकत नाही.
पराहि परतली तेथ कैचा हा हेत, जन्ममरणाचा पुरलासे अंत|
आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलण्याची मूळ सुरुवात होते ती म्हणजे परावाणी. परा, पश्यन्ती, मध्यमा नि वैखरी अशा चार वाणी आहेत. वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ते. मात्र परावाणी मध्ये मूळ सुरुवात होते असं मानतात.
ते तसंच का मानायचं? गणित सोडवायला एक 'क्ष' लागतो म्हणून. बस्स्स. समीकरण सोडवून 'क्ष' चं विसर्जन च अपेक्षित आहे. तर ही जी परावाणी आहे ती सुद्धा परतते असं दत्तात्रेयांचं स्वरुप आहे.
थोडासा विचार करुया. आपण कधी कधी शांत बसतो. अगदी शांत. काहीच विचार नाही. तेव्हा काय होतं? आतलं सगळं शांत असतं. मन हे करु का ते करु असं काम नसतं करत, बुद्धीला घ्यायला कुठला निर्णय नसतो, चित्त काही साठवून ठेवायला नसल्यानं गप्प असतं, तसंच विचाराचा उगम असलेली परावाणी सुद्धा आपल्या मूल स्थानावर असते. चक्र सुरुच नाही ना कसलं! त्यामुळं शांतीचा अनुभव येतो. ह्यालाच परावाणीचं मूलस्थानी परतणं म्हणायचं. जास्त डिटेल्स नकोत पण जेव्हा सगळं अत्यंत शांत असतं तेव्हा दत्ताचं दर्शन झालं असं म्हणायचं.
हे कधीकधी एका जन्मात शक्य होत नाही म्हणून 'जन्ममरणाचा अंत पुरतो'. जन्मो जन्म सुद्धा घालवावे लागतात.
दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला : अशा सातत्याच्या विचारातून कधीतरी जाणून घेतलेल्या अनुभवातून दत्त हा अनुभव येतो त्याला शाश्वततेकडे नेणार्या सतभावानं प्रणिपात म्हणजे अहं सोडून नमस्कार केला.(भाव म्हणजे जो स्थिर असतो तो तर भाव-ना म्हणजे अस्थिर भाव, अभाव म्हणजे नाहीच्च! )
अशा रितीने तत्त्व समजल्यानं आशीर्वाद लाभला नि जन्ममरणाचा फेरा म्हणजे हे जे 'मी नि माझं' चं खरं स्वरुप समजलं त्यामुळं त्या बंधनातून माझी मुक्तता झाली.
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन,
मीतूपणाची जाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान||
तत्त्व समजलेलं आहे, त्यामाग ची प्रेरणा जाणलेली आहे, जनार्दनस्वामी जे श्रीगुरु आहेत त्यांची कॄपा झालेली आहे अशा दुग्धशर्करायोगानं प्रारब्ध योगानं नि स्वप्रयत्नानं नाथ महाराजांना त्रिगुणातीत, अनसूय बुद्धीनं मिळालेल्या दत्ताचं ध्यान लागलंय, हे ध्यान लागल्यानं मनाचं, बुद्धीचं, चित्ताचं, अहंचं काम थांबून मनाची उत-मन म्हणजे जणू मन शिल्लकच नाही अशी अव स्था झालेली आहे. एकच तत्त्व सगळीकडं असल्याचा अनुभव, अनुभूती आल्यानं वेगळेपणा शिल्ल क नाही, मी आणि तू असं काही नाहीच सगळीकडं एकच एक असल्याचा भाव जागृत झालेला आहे.
असाच आनंदाचा ठेवा सगळ्यांना प्राप्त व्हावा हीच विनवणी श्री दत्तात्रेय, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी नि श्रीगुरुंच्या चरणी अर्पण करतो.
सगळ्यांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
16 Dec 2013 - 9:42 am | ज्ञानोबाचे पैजार
दत्ताच्या आरती वरचे हे विवेचन वाचताना माझी अशीच अवस्था झाली होती.
अत्यंत रसाळ आणि ओघवते वर्णन आहे, आरती कडे पहाण्याचा नवा, वेगळा दृष्टीकोनही आवडला.
वाचता वाचता
मुळीं देह त्रिगुणाचा | सत्वरजतमाचा |
त्यामध्यें सत्वाचा | उत्तम गुण ||१||
सत्वगुणें भगवद्भक्ती | रजोगुणें पुनरावृत्ती |
तमोगुणें अधोगती | पावति प्राणी ||२||
त्यांतहि शुद्ध आणी सबळ | तेहि बोलिजेति सकळ |
शुद्ध तेंचि जें निर्मळ | सबळ बाधक जाणावें ||३||
शुद्धसबळाचें लक्षण | सावध परिसा विचक्षण |
शुद्ध तो परमार्थी जाण | सबळ तो संसारिक ||४||
तया संसारिकांची स्थिती | देहीं त्रिगुण वर्तती |
येक येतां दोनी जाती | निघोनियां ||५|| द.२ स.५
हे आठवले
16 Dec 2013 - 10:32 am | प्रसाद गोडबोले
हरि हरि !!
प्यारे लेख अत्यंत आवडला .
(फक्त एक शंका/ पाठभेद : सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना >>> इथे "न" नाहीये बहुतेक ! मुनिजनांना समाधी ने नक्कीच दत्ततत्त्व समजुन घेता येईल तसे नसेल तर समाधी साधनाचा अवमानच होईल नाही का ? )
(अवांतर :असाच अजुन एक पाठभेद जिथे पुर्ण विरुध्द अर्थ येतो : मनाच्या श्लोकात > सुखाची स्वये सांडी जीवी करावी इथे काही जण दुखाची म्हणतात ... असो. )
16 Dec 2013 - 12:50 pm | प्यारे१
आपण म्हणता तसं असू शकतं. पाठभेद असू शकतात. समाधीनं तत्त्व साध्य होतं पण समाधी नि ध्यान म्हणजे तत्त्व नव्हे. 'समाधी लागली' म्हणायला कुणी शिल्लक राहत नाही. 'जे व्हायचं ते होतं' असा अनुभव असतो कारण तो सांगता येत नाही.
'नेति नेति शब्द न ये अनुमाना | सुरवरमुनीजनयोगी समाधी न ये ध्याना' मध्ये अलिकडचा चरण पाहिला तर नेति नेति करत अनुमान सापडत नाही तसं निव्वळ स्वबळावर एवढे सारे लोक प्रयत्न करुन सुद्धा त्या तत्त्वाचं पूर्ण आकलन होत नाही असं म्हणायचं असावं असा अर्थ. ह्यात 'समाधी' हे सुद्धा साधनच आहे. थोडा 'अर्थवाद- स्तुति' असतो.
बाकी मुळात आहेत ते शब्द. लिहीलंय कुणा अधिकारी व्यक्तीनं. त्यांना असंच म्हणायचं होतं का हे ठाऊक नाही. आपण फक्त त्यातून आपण आपल्याला हितकर अर्थ काढून (किमान विरोधी तरी नसावा असं) त्याचा वापर कसा करायचा हे ठरवायचं. 'नो द सिस्टम, युज इट, गेट रिझल्ट्स आणि फरगेट द सिस्टीम' ह्यातील रिझल्ट्स मिळाले नाहीत तर सिस्टीमचा इंच इंच ठाऊक असला तरी उपयोग होत नाही. तसंच 'साध्य होता साधनाचा ठाव' राहू नये.
16 Dec 2013 - 10:07 pm | प्रसाद गोडबोले
प्यारे , स्पष्टीकरण आवडले ...
'नो द सिस्टम, युज इट, गेट रिझल्ट्स आणि फरगेट द सिस्टीम' हे ही पटले ...
( सध्या क्नोईग च्या स्टेपला आहे , म्हणुन जरा कनफ्युजन क्लीयर करुन घेत आहे :) )
कधीतरी प्रत्यक्ष भेटुन बोलुयात !!
16 Dec 2013 - 11:19 pm | मृगनयनी
अत्यंत सुस्पष्ट.. अर्थपूर्ण... भावलं मनाला!!!!... प्यारे... कीप इट अप!!!..... || अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त || :)
16 Dec 2013 - 11:28 am | संजय क्षीरसागर
आणि काय अर्थ काढतात!
इतक्या बाळबोध आणि मूर्ख गोष्टीचं समर्थन याला "विचारांची क्लॅरिटी" म्हणणं हा तर त्याहून मोठा विनोद!
16 Dec 2013 - 12:54 pm | प्यारे१
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
ज्ञानाच्या अधिकार्यांसाठी कर्मकांड अथवा उपासना नाहीत त्यामुळं पुराणातल्या भाकडकथा देखील नाहीत. ह्या कथा आहेत आमच्यासारख्या सामान्यांसाठी.
आपण प्रतिसाद दिलात ह्याचाच आनंद वाटला.
16 Dec 2013 - 12:57 pm | अनिरुद्ध प
+१११ पूर्णपणे सहमत.
16 Dec 2013 - 10:08 pm | रामपुरी
काय मारली आहे (शालजोडीतून)...
16 Dec 2013 - 10:38 pm | अवतार
२१ वेळा अंगावर थुंकणार्या यवनास शांतपणे आपल्या वागण्याद्वारे सुधारणारे.
गाढवाच्या मुखी गंगाजल ओतून भूतदया करणारे.
असे प्यारे महाराज!
17 Dec 2013 - 9:30 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत. अधिकारी लोक परिक्षा घेऊन ज्ञान किती मुरलंय ते बघत असावेत ते असे. ;)
18 Dec 2013 - 11:39 am | निराकार गाढव
19 Dec 2013 - 10:19 pm | अवतार
गाढवाला आपण स्वत: गाढव आहोत म्हणून सगळेच गाढव नसतात हे तरी माहित असतं.
20 Dec 2013 - 11:18 am | अत्रुप्त आत्मा
@गाढवाला आपण स्वत: गाढव आहोत म्हणून सगळेच गाढव नसतात हे तरी माहित असतं.>>> अगागागागा... अवतारबाबा की जय!
21 Dec 2013 - 12:03 am | निराकार गाढव
श्शी, माणूस कुठला! एक क्षणभरसुद्धा उभं नाही राहवत या माणसांमध्ये. हा मी चाललो संपादक मंडळाकडे तक्रार करायला....
16 Dec 2013 - 11:37 am | रुमानी
प्यारे असेच दत्ताच्या गुरुन वर हि येउ देत कि एक लेख.
16 Dec 2013 - 11:53 am | अभ्या..
छान लिहिलीयस प्यारे. :)
समजले काहीही नाही :( कदाचित समजून घेण्याइतकी बुध्दी माझी नाही. :(
एखाद्या ओळीचा, श्लोकाचा भावार्थ, निरुपण सांगणार्यांबद्दल फार आदर वाटतो. कारण माहीत नाही. तो कदाचित संस्काराचा भाग असेल. त्यामुळेच तुला दंडवत.
16 Dec 2013 - 12:01 pm | प्रचेतस
उत्तम विवेचन.
अवांतरः
बाकी दत्ताचा उगम हा शंकराच्या 'सदाशिव' रूपातून उत्क्रांत झाला असे माझे मत आहे. हा त्रिमुखी शिव घारापुरी, वेरूळ येथे पाहावयास मिळतो.
सदाशिव जरी पंचमुखी असला (सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि इषण) शंकराची ही त्रिमुखी रूपे सदाशिवाचीच आहेत असे संशोधकांचे मत आहे.
अतिअवांतरः नाथसंप्रदायाचा उगम हा बौद्ध धर्मातूनच झाला असे मत कालच आमचे मित्र धन्याजीराव वाकडे यांनी बेडसे लेणी येथे व्यक्त केले. :)
16 Dec 2013 - 12:17 pm | बॅटमॅन
महाराष्ट्र सोडून अन्यत्र दत्तोपासना कुठे आहे? उत्तर कर्नाटक सोडले तर कै दिसत नाही. उत्तरेत तर लोकांना असा कै देव असतो हेच माहिती नाही. गुजरातेत आहे का? केरळ-तमिऴनाडूमध्येही असल्याचे माहिती नै. आंध्रावाल्यांना विचारले पाहिजे.
साधारण दत्तोपासनेची सुरुवात कधीपासून झाली असे म्हणता येईल? नृसिंह सरस्वतींच्या अगोदर दत्तोपासना पापिलवार नसल्याची शंका आहे.
16 Dec 2013 - 12:49 pm | अनिरुद्ध प
हि आन्ध्रप्रदेश्,पिठापुर्,श्रीपाद श्रीवल्लभ्,गुजरात-गिरनार पर्वत; कर्नाटक-कुरवपुर्,गाणगापुर,महाराष्ट्र-औदुम्बर्,नरसोबाची वाडी,ई मला माहीत असलेली स्थाने आहेत बाकी जाणकार माहीती देतिलच.
16 Dec 2013 - 12:51 pm | बॅटमॅन
धन्यवाद. कुरवपुर अन पिठापूर ठाऊक नव्हते, बाकीचे माहिती होते.
(नरसोबाच्या वाडीचा फ्यान (मुख्यतः पेढा अन बासुंदी)) बॅटमॅन.
16 Dec 2013 - 5:55 pm | अनिरुद्ध प
माझ्या वाचना नुसार्,दत्त उपासना ही महाराष्ट्रात ही माहुर गड येथे सुरु झाली,नन्तर श्रीपाद्श्रीवल्लभ्,हा पहिला अवतार्,पिठापुर आन्ध्र प्रदेशात्,नंतर न्रुसिंह सरस्वती परत महाराष्ट्रात कारन्जा ईथे झाले श्रीपाद्श्रीवल्लभांचा काळ साधारणता,ई स १३०० च्या आसपासच्या काळातील आहे,बाकी जाणकार ईतिहास अभ्यासक भर घालतीलच.
16 Dec 2013 - 6:03 pm | बॅटमॅन
माहितीकरिता धन्यवाद!
17 Dec 2013 - 6:42 am | चित्रगुप्त
दत्तोपसेनेची सुरुवात संतोषीमातेची उपासना पापिलवार होण्यापूर्वीची, एवढे नक्की.
16 Dec 2013 - 12:11 pm | अनिरुद्ध प
प्यारे१,
विनन्तीला मान देवुन धागा काढल्या बद्दल धन्यवाद्,अत्यन्त उत्क्रुष्ठ विवेचन.
सगळ्यांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
16 Dec 2013 - 12:30 pm | मुक्त विहारि
आवडला
16 Dec 2013 - 4:38 pm | मूकवाचक
+१
16 Dec 2013 - 12:58 pm | आदूबाळ
क्या बात है प्यारेस्वामी! लेख आवडला. मुख्य म्हणजे समजला. :)
16 Dec 2013 - 1:12 pm | मनीषा
उत्कृष्ठं विवेचन.
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
इतका समर्पित भक्तीभाव माझ्याकडे नाही.. पण तरीही लेख आवडला.
(अवांतर : त्या काळातही कुणालाही,,कुणाचीही, काहीही कारण नसताना परीक्षा घ्यायची परवानगी होती असं दिसतय)
16 Dec 2013 - 1:13 pm | मंदार कात्रे
अतिशय सुन्दर लेख .
धन्यवाद प्यारे जी !
दत्तजन्माच्या कथेबाबत काही विक्रुत लोक उपहासात्मक व हेटाळणी करताना आढळतात .मूळात नारदाने चिथावनी देवुन अनुसया सर्वात मोठी पतिव्रता असल्याचे सानितले ,त्यामुळे शिव ,विश्णू आणि ब्रह्मा या देवतान्च्या बायका अनुसयेचा द्वेश /मत्सर करतिल आणि देवाना अनुसयेची सत्त्वपरीक्षा घ्यायला पाठवतील ,या कथेतच गोची आहे .कारण स्वर्गीय देवताना प्रुथ्वीवरिल माणसान्चा मत्सर वाटण्याचे काहिच कारण नाही . देव-देवतावर मानवी भावना आरोपित करुन पुराणात अशा अनेक प्रक्षिप्त कथा घुसडण्यात आलेल्या आहेत .त्यान्चे सन्शोधन करुन तत्त्वबोधात्मक /रूपकात्मक कथासार सान्गणे महत्त्वाचे आहे.अन्यथा अशा कथा म्हणजे धर्मबुडव्यान्साठी माकडाच्या हाती आयते कोलित देण्यासारखेच ठरते.
आपल्या लेखातुन अप्रेक्षित असे धर्मप्रबोधन साध्य होइल अशी अपेक्षा !
16 Dec 2013 - 1:25 pm | पैसा
अगदी कीर्तनकारांसारखं रसाळ विवेचन! लेख मस्त जमला आहे. या मालिकेत आणखी जरूर लिहा!
16 Dec 2013 - 2:01 pm | प्यारे१
आभारी आहे हो!
16 Dec 2013 - 1:37 pm | अर्धवटराव
छान मांडलय. आपल्याला ते रूपक बिपक समजत नाहि. आय टेक इट अॅज इट इज :)
अवांतरः अर्वाचीन काळात दत्त संप्रदायाला पुनर्प्रस्थापीत करण्याचं कार्य टेंबे स्वामींनी केलं. पीठापूर वगैरे स्थानं त्यांनीच प्रकाशात आणली... व तसं करताना त्यांनी ऐतिहासीक दस्तावेजांचा आश्रय घेतला नाहि... तपःश्चर्या हाच अघ्यास व प्रचिती हाच निकाल. दत्तोपासनेचा काळाच्या उदरात ट्रेस घेण्यात कोणास इंटरेस्ट असेल त्याने खुशाल ऐतिहासीक साधनांचा धांडोळा घ्यावा. ज्याला दत्ताशी मतलब आहे त्याने साक्षात दत्ताला किंवा अधिकारी गुरुला साकडं घालावं हे उत्तम.
अति अवांतरः मनाने मनाला मनाबाहेरुन मनाजोगं कंट्रोल करणार्या अत्याधिकारी गुरुंच्या मागे जाताना मात्र सर्वांनी सावधगिरी बाळगावी.
16 Dec 2013 - 10:28 pm | अर्धवटराव
मनाने मनाला मनाबाहेरुन मनासारखं कंटोल करणार्यांना तर अजुन ते भाकड आहेत हेच कळलं नाहिए. सबब, कायद्याच्या कचाट्यापासुन ते सध्यातरी फार लांब आहेत. मराठीत त्यांना काय म्हणतात माहित नाहित... इंग्रजीत त्यांना एक विशिष्ट शब्द आहे आणि त्यावर काहि दिवसांपूर्वी धन्याने एक उत्तम धागा काढला होता.
17 Dec 2013 - 9:47 am | संजय क्षीरसागर
हे मात्र सोयिस्करपणे विसरलेलं दिसतंय.
17 Dec 2013 - 10:44 am | अर्धवटराव
पण मनाने मनाला मनाबाहेरुन मनाजोगं कंट्रोल करणार्या महाभागांना आपला भंपकपणा दिसुनच येत नाहि... तर कबुल काय करणार. त्यांचा सगळा भार असंबद्ध बोलण्यावर आणि स्वप्रतिमा पूजनावर... आणि पुन्हा एकदा काँग्रॅच्युलेशन्स... हे स्वप्रतिमापूजन देखील अंधश्रद्धेच्या कायद्याखाली येत नाहि.
17 Dec 2013 - 11:26 am | संजय क्षीरसागर
अश्या भोळसट कथांवर विसंबणार्या तश्याच तद्दन भक्ताला कुणी काल्पनिक दत्त वाचवेल या व्यर्थ श्रद्धेतून जी निर्माण होते त्याला स्वप्रतिमा म्हणतात! मला खरंच आश्चर्य वाटतं किती बाळबोध विचारसरणी असू शकते याचं आणि झुंडीपुढे दाभोलकरांसारख्या व्यक्तिचे प्रयत्न कसे निरुपाय होऊ शकतात याचं.
या भंपक कल्पनांपायीच धार्मिक आणि जातीय भेदापासून भारताला कधीही स्वातंत्र्य मिळणार नाही आणि देशाच्या विकासात ही धार्मिक अनेकात्मकता (जी अश्या भरमसाठ देवांच्या निव्वळ कल्पनेवर आणि भोळसट लोकांच्या बाळबोध विश्वासावर टिकून आहे) सदैव बाधक ठरणार आहे.
17 Dec 2013 - 12:00 pm | अर्धवटराव
पण आश्चर्य नाहि वाटलं, कुठलिही परिभाषा तयार करण्याचा अधिकार आहे ना न्यायमूर्तींना. तसंही मन जर मनाला मनाबाहेरुन मनासारखं कंट्रोल करु शकतं तर त्याच्यापुढे कुणि दाभोळकर किस झाड कि पत्ती. आणि मग कंट्रोल करणारं मन पुढे जाऊन राष्ट्रोद्धाराच्या गप्पा मारेल तर ते त्याच्या भ्रमीत अवस्थेला शोभेसंच आहे.
असो. आता सरकारने एक कायदा पास केला पाहिजे... लोकांनी साकाळी उठल्या बरोबर "मन मनाला मनाबाहेरुन मनासारखं कंट्रोल करतय" असा मंत्र म्हणावा... म्हणजे पट्कन राष्ट्रीय ऐक्य साधल्या जाईल... या मंत्रप्रभावाने अखील मानवजात वैज्ञानीक दृष्टीकोनाची बनेल, दाभोळकर तर या मंत्रामागचा वैज्ञानीक दृष्टीकोन बघुन स्वर्गातुन आनंदाश्रू गाळतील... आणि असं नाहि झालं तरी भारत देश भोंगळ, मुर्खांचा बाजार आहे अशी न्यायधिशाची मखलाशी करता येईलच कि... सर्वज्ञ आहे ना न्यायधीश...
17 Dec 2013 - 4:49 pm | कवितानागेश
=))
17 Dec 2013 - 7:18 pm | पैसा
डॉ. दाभोलकरांचे काही विचार इथे द्यायचा मोह आवरत नाही.
17 Dec 2013 - 8:44 pm | प्यारे१
मला वाटतंय दाभोलकरांच्या चळवळीचं नाव : 'अंधश्रद्धा' निर्मूलन समिती असं होतं. ह्यातल्या ह्या 'अंधश्रद्धा' ह्या शब्दावर ह्याच मिसळपाव वर अनेक वेळा अनेकांनी आपापली मतं मांडलेली आहेत. अंध श्रद्धा ह्या विषयाची नेमकी व्याप्ती काय, तिचा उपयोग कुठं नि आणखी बर्याच गोष्टी इथं येतात. त्यांना स्वतःलाही श्रद्धा मुळासकट उखडून फेकायच्या असत्या तर 'श्रद्धा निर्मूलन समिती' असं नाव उपलब्ध असणारच की! अंधश्रद्धा का म्हटलं असावं?
बाकी दाभोलकरांना विज्ञानातलं सुद्धा सगळंच्या सगळं कळत असेल असा खुद्द त्यांचाही दावा नसावा.
अध्यात्मातल्या बर्याच विषयांची, संकल्पनांची माहिती दाभोलकरांना स्वत:ला असेल का ह्याबाबत मला शंका आहे. भीक नको पण कुत्रा आवर च्या चालीवर अध्यात्म नकोच पण कर्मकांडं आवर असा विषय असू शकतो.
कथेबद्दल उहापोह होऊ शकतो असं सुरुवातीलाच म्हणताना दत्त जन्माची अशी अशी कथा सांगितली जाते इतकंच म्हटलेलं आहे. त्यापुढं जाऊन आपल्या हितासाठी श्रेयस्कर असेल त्या अनुषंगानं कथेकडं पाहणं उचित ठरतं.
अनेकदा रुपककथांना कर्मठ परंपरांचं स्वरुप आलेलं दिसतं असं लेखातच म्हटलेलं असताना त्या कथेबाबत आणखी स्पष्ट काय लिहावं असा प्रश्न मज पामरास पडलेला आहे.
दत्त येऊन मला वाचवेल किंवा मी धावा करुन दत्तानं मला वाचवावं असं एक तरी वाक्य लेखामध्ये दाखवून द्यावं.
आधारासाठी देवाचा उपयोग करताना त्याचं संकटमोचक हे रुप सर्वसामान्याना भावतं, आवडतं त्याचा काही अंशी उपयोग देखील होतो मात्र देव म्हणजे 'संकटातून जामीन मिळवून देणारा वकील नव्हे' हे कृपया लक्षात घ्यावं.
17 Dec 2013 - 10:26 pm | संजय क्षीरसागर
आणि पुढचं वाक्य लगेच :
तत्पूर्वी म्हटलंय :
एकदा कथेचा फोलपणा लक्षात आला की दत्त कुठे उरतो?
प्रश्न व्यक्तिगत असता तर गोष्ट वेगळी आहे पण निधर्मी देश निर्मितीत असल्या भाकड कथा पिढी-दर-पिढी पुढे संक्रमित होतात आणि धर्माधिष्ठित राजकारणाची तीच तर मेख आहे.
17 Dec 2013 - 11:04 pm | अर्धवटराव
दाभोलकर ज्या दृष्टीकोनातुन या प्रॉब्लेमकडे बघतात तो योग्यच आहे. आणि तो दृष्टीकोन केवळ धार्मीक बाबतीत नाहि तर मानवी जीवनाच्या प्रत्येक बाबतीत लागु पडतो. मग ते आहार असो वा शिक्षण, भाषा असो वा मेडीकल थेरपी, परराष्ट्र संबंध असो वा लग्नसंबंध. आपल्या पदरी जे काहि पडलय त्याची वस्तुनिष्ठ शहानिशा करण्याचा विवेक जर दाखवला नाहि तर संस्कार हे भारवाही ओझे बनुन राहातात.
अडचणीच्यावेळी संस्कारात जीवनाचा आधार शोधणे हा अॅटिट्युड फार कॉमन आहे व त्याला कारण माणसाचा आळस आहे. किंबहुना, कमितकमी कष्टात, कमीतकमी रिस्क घेऊन आपलं काम झालं पाहिजे, हा अप्पोलपोट्टेपणा या सर्वांच्या मुळाशी आहे आणि ति माणासाची हौस आहे... हे सत्य स्विकारण्याऐवजी आपण अंधश्रद्धेच्या नावाने कितीही बोटं मोडली तरी समस्या सुटणार नाहि. सो कॉल्ड धार्मीक अंधश्रद्धा अस्तंगत पावुन इतर अंधश्रद्धा उभ्या राहतील, इतकच. (अंधश्रद्धा या शब्दातच मूलभूत चुका आहेत, असो).
प्रस्तुत चर्चा दत्तप्रभूंच्या जन्मकथेच्या भाकडपणाविषयी सुरु झाली बहुतेक. कुणाला त्यात भाकडपणा दिसेल तर कुणाला रूपकं दिसतील. कुणाला त्यात दत्तप्रभूंची लीला दिसेल तर कुणाला तो विश्वात्मक शक्तीच्या अविष्काराचं विलोभनीय रूप वाटेल. आता आपलाच दृष्टीकोन तो योग्य आणि इतरांचे विचार म्हणजे कचरा असा अॅटिट्युड असणारे त्याला नावे ठेवतीलच. आणि त्याला कारण त्यांच्या मनात स्वतःविषयीचा गोंधळ आहे. हा गोंधळ त्यांना सर्वसमावेशक विचार करुच देत नाहि. आपल्या मनात असा कुठलाच गोंधळ नाहि हि देखील एक अंधश्रद्धाच... आणि हे सत्य स्विकारण्याचं धाडस ते दाखवणार नाहित.
17 Dec 2013 - 11:24 pm | संजय क्षीरसागर
आणि वस्तुनिष्ठता काय? तर म्हणे :
शेवटी तर कमाल आहे :
म्हणजे चर्चा कुठे चालू झाली आणि आपण काय प्रतिसाद देतो याचं भान नाही. त्यामुळे लेख तरी नीट वाचला की नाही शंका आहे.
लेखात हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे (आणि माझ्या सर्व प्रतिसादंचा रोख त्यावर आहे):
आता याचा वस्तुनिष्ठ उहापोह असंभव आहे. मग काय मानसिक गोंधळाला पारावर नाही :
मस्त! बसा बघत!!
17 Dec 2013 - 11:42 pm | अर्धवटराव
आपला गोंधळ चव्हाट्यावर मांडायची संधी साधल्याबद्दल पुन्हा एकदा काँग्रेच्युलेशन्स. मनाबाहेर पडुन मनाला नाकारणारं मन न्यायधिशाची भुमीका वठवायची खुमखुमी किती केवीलवाण्या पद्धतीने सादर करते आहे. हि त्या मनाची हौस आहे... इलाज नाहि.
18 Dec 2013 - 12:14 am | संजय क्षीरसागर
तुम्ही फक्त मुद्याला धरुन लिहायला शिकलात तरी झालं!
18 Dec 2013 - 1:02 am | अर्धवटराव
आणि तुम्हाला मुद्द्यांवर विचार करायला शिकण्याबद्दल शुभेच्छा. (शक्यता कमि आहे).
18 Dec 2013 - 1:03 am | प्यारे१
>>>>(अंधश्रद्धा या शब्दातच मूलभूत चुका आहेत, असो).
अगदी अगदी!
मुळात 'पहिल्या पावलावर' कुठलीही श्रद्धा अंधच असते. कारण तो एखाद्या वस्तूवर अथवा व्यक्तीवर अथवा तिच्या सांगण्यावर, कृतीवर ठेवलेला आंधळा विश्वास असतो. ते करताना हळूहळू पावलं टाकत टाकत आपल्याला त्याचे परिणाम दिसू लागतात नि तो विश्वास बळकट होऊ लागतो. काही काळानं त्या परिणामांचा परिणाम म्हणून विश्वासाचं रुपांतरण श्रद्धेमध्ये होतं.
श्रद्धेची उपयोजिता 'दुसर्याला नि स्वतःलाही काही नुकसान न करता, पीडा न होता' ध्येयासमीप नेणं ही आहे.
ह्याउलट जिला दाभोलकर अंधश्रद्धा म्हणतात ती मुळात 'विकृत श्रद्धा' आहे. तिची उपयोजिता काहीतरी हेतू ठेवून 'दुसर्याला अथवा स्वतःला त्रास देऊन, नुकसान करुन, पीडा देऊन' इप्सित साध्य करणं अथवा तसे प्रयत्न करणे' ही आहे. (मुख्य फरक स्व/परपीडा, नुकसान होणं आणि न होणं आहे असं माझं मत आहे)
एखाद्यानं सांगणं की रोज २५ सूर्यनमस्कार घातलेस तर तुझं आरोग्य सुधारेल. त्याच्या शब्दावर सुरुवातीला आंधळा विश्वास ठेवून तसं केल्यानं नक्कीच आरोग्य सुधारेल. (बहुसंख्यांच्या बाबत हा विचार आहे. वैद्यकीय सल्ला आवश्यक. ;) ) ज्यानं सांगितलं त्यानं सूर्यनमस्कार घातले नसतील तरी परिणाम होईलच. ही त्या माणसाप्रती श्रद्धा आहे. मात्र तुझं आरोग्य सुधारण्यासाठी उपाय सांगण्याऐवजी दुसर्या व्यक्तीनं काही केलंय म्हणून तुझं आरोग्य सुधारत नाहीये तर तू अमुक तमुक कर म्हणून प्रवृत्त करणं नि ती कृती समोरच्यानं करणं ही विकृत श्रद्धा आहे.
अर्थात हे अत्यंत सामान्य पातळीवरचं उदाहरण होय.
18 Dec 2013 - 11:12 am | संजय क्षीरसागर
आणि ध्येय काय? तर
अश्या काल्पनिक स्टोर्यातून जन्मलेल्या देवाच्या आरत्या करुन सांसारिक चिंता दूर होतील हा प्रार्थमिक भ्रम. अश्या व्यक्तिगत भ्रमाला पाठींबा मिळावा म्हणून असली भाकड पोस्ट आणि त्यातून `तुम्ही ही आरतीला लागा' ही शिकवण.
या उप्पर भलावण काय तर `दुसर्याला नि स्वतःलाही काही नुकसान न करता, पीडा न होता' ध्येयासमीप नेणं'!
18 Dec 2013 - 11:35 am | स्पा
कशाला संक्षी या भाकड लोकांवर तुमचा मौल्यवान वेळ खर्च करताय
ह्यांना राहुन्द्या ह्यांच्या विश्वात
तुम्ही लिहा फाहू फक्कड काहीतरी
वाट बघतोय
20 Dec 2013 - 4:46 pm | निराकार गाढव
अगदी माज्या मनातलं बोललास रे स्पावड्या. तूच एक केवळ समजू शकतोस...
18 Dec 2013 - 11:49 am | गवि
संक्षी, देव किंवा दत्त किंवा त्यासम गोष्टी ही एक गुंगी आहे हे मला वैयक्तिकरित्या मान्य आहे. पण दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है.. असं मानणं हे बहुतांश लोकांना गरजेचं आहे हेही खरंच आहे.
या गुंगीतून मनुष्य जागा होणं अत्यंत अवघड.. आणि बहुतेक वेळा अनावश्यक. कारण जागं झालं तरी शेवटी अंतहीन अज्ञाताचं भिंताड आहेच.. त्यामुळेच या गुंगीला विरोध करु नये असं माझं म्हणणं आहे. जाऊ दे.
याचं कारण असं की :
असं नसतं हे कोणाला जरी पटवलं समजा, किंवा त्यांच्या कृपेने काही पीडाबिडा दूर होत नाही असा खाडकन थंड पाण्याचा सपकारा तोंडावर मारुन घेतला तरी जागं होऊन काय करायचं ? या पीडांना पर्याय काय ?
तर काहीतरी (तुलनेत) "रॅशनल थिंकिंग"मधून या पीडा सोडवणे, त्यांना तोंड देणे, किंवा या पीडा महणजे वास्तविक पीडाच नव्हेत असं काहीतरी मानणे..
म्हणजे आरुनफिरुन त्या पीडांपासून आभासी सुटका असंच ना.. वास्तविक सश्रद्ध असो, अश्रद्ध असो वा अंधश्रद्ध.. तो पीडांना तोंड देतच असतो आणि त्या भोगतच असतो.. कारण त्याला इलाज नसतो.. बायपास नसतो.
मग दत्त किंवा तत्सम मार्गाने जर काहीजणांना ऑपॉप मनःशांती मिळत असेल तर मिळेना.. त्यांना त्या मार्गापासून स्ट्रिप ऑफ करुन दुसरा पर्याय काय देऊ शकतो. आणि तो देणारे आपण कोण?
आपण सगळेच भ्रमात जगतोय. कोणाचा भ्रम दत्त तर कोणाचा भ्रम तर्क तर कोणाचा भ्रम निसर्ग अन कोणाचा भ्रम विज्ञान किंवा आणखी काही.
शेवटी उपयुक्तता महत्वाची. विज्ञानाने तरी आपण उपयुक्ततेशिवाय काय मिळवतो? तसंच उपयुक्तता म्हणून पहा याकडेही. काही जणांना दत्त किंवा तत्सम गोष्टींमुळे आनंद, सुख, समाधान मिळत असेल तर त्यांच्याविषयी तुच्छता, राग किंवा तिटकारा वाटण्याऐवजी मला त्यांचा हेवाच वाटतो..
श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यांत फरक करणं किंवा त्या समजावून दूर करणं अशक्य आहे.. आणि त्याहूनही जास्त अनावश्यक आहे.. कोणाचा बळी दिला किंवा मारहाण केली तर खून आणि इजा यांच्या सांप्रत कलमांखाली शिक्षा करावी बस्स..
तोसवर ज्याला जे करायचे ते करु दे.
काही निर्मूलन वगैरे करायला जाऊ नये असं व्यक्तिगत मत आहे.
ता.क. प्यारे.. तू आजपासून मिपाचा बुवा नं. १ (मॅक्डोवेल नं. १ च्या चालीत वाचावे.)
18 Dec 2013 - 12:00 pm | स्पा
अबाबाबाबा
आता गवि परिणामांना तयार राहा
तुमच्या टंच हे आपलं टंकनिकेला भरपूर काम आहे :D
18 Dec 2013 - 12:15 pm | अर्धवटराव
दो इट हार्ड्ली मॅटर्स...
"आपण सगळेच भ्रमात जगतोय. कोणाचा भ्रम दत्त तर कोणाचा भ्रम तर्क तर कोणाचा भ्रम निसर्ग अन कोणाचा भ्रम विज्ञान किंवा आणखी काही."
-- ऑस्सम
18 Dec 2013 - 12:57 pm | अनिरुद्ध प
आपली मुद्दा पटवण्याच्या कलेबद्दल HATS OFF,
मानगये उस्ताद.
18 Dec 2013 - 1:35 pm | प्यारे१
___/\___
गवि प्रतिसाद आवडला. सगळं पटलं नाही तरी तुम्हाला आमच्याकडून आमचंच खरं माना म्हणून सक्ती अथवा बंदी नाहीच्च. भ्रम नक्की काय ह्या भ्रमात आपण सगळेच आहोत. ;)
सगुणाचेनि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारासारविचारे, संतसंगे||
समर्थ रामदास म्हणतात, प्यारे नाही. आता ते कोण विचारलंत तर मग बोलूयाच नको. उपयोग नाही.
सगुणाच्या> दत्ताच्या, अवताराच्या आलंबनानं निर्गुण निराकाराचाच अनुभव घ्यायचाय.
सार म्हणजे शाश्वत काय नि अशाश्वत काय ह्याचा शोध संतांच्या 'संगानं' घ्यायचाय.
ज्याला कशाचंच काही माहिती नाही त्याला हे आलंबन आवश्यक असतं. ड्रायव्हिंग शिकताना ए बी सी शिकतो का? तसंच. पण ड्रायव्हींग शिकल्यावर नाही गरज त्याची. तशीच वाढ होणं अपेक्षित असलं तरी आधी ए बी सी नको का?
तसंच माणसाच्या बुद्धीला असलेल्या मर्यादांमुळं तर्क तोकडे पडतात हे मान्य असायला प्रत्यवाय नसावा.
बाकी आपण आम्हास बुवा म्हणताय खरं पण आत्मुस बुवांची एन ओ सी आणलीये का? ;)
18 Dec 2013 - 12:09 am | संजय क्षीरसागर
तुमच्या प्रतिसादातला हा अत्यंत महत्त्वाचा भाग पुनरुधृत करतो :
आणि हा पुढचा भाग देखिल अत्यंत योग्य आहे
पण इतक्या भोंगळपणाला अजूनही माना डोलावणारे (किमान इथले तरी) असंख्य सदस्य विचार कधी करणार? म्हणजे "मार्ग खूप लांबचा आहे" याचा अर्थ 'आम्ही आरत्या करत राहाणार आणि दाभोलकरांना अपेक्षित बदल इतरांच्यात होईल अशी अपेक्षा करत राहाणार' असा होतो का? आणि तसा बदल कदापी तरी शक्य आहे का? स्वतःत वस्तुनिष्ठ विचार निर्माण झाला नाही तर दाभोलकारांच्या इतक्या अनमोल विचारांचं आपण काय सार्थक केलं?
18 Dec 2013 - 9:36 am | पैसा
या सर्वावर टिप्पणी करण्याएवढा माझा अभ्यास नाही. तुमचं लिखाण काय, प्यारेचं काय आणि दाभोलकरांचं काय सगळ्यांच्या लिखाणातून जे मला घेण्यासारखं वाटतं तेवढं मी घेते. या जगात संपूर्ण टाकाऊ अशी कोणतीच गोष्ट नसते. बाकी सर्वांनाच _/\_
18 Dec 2013 - 11:27 am | संजय क्षीरसागर
टिप्पणी तर तुम्ही सुरुवातीलाच केलीये :
आणि त्या अनुषंगानं दाभोलकरांच्या विचारातला तुम्हाला मुळात अधोरेखित करायचा भाग हा होता :
पण इतक्या उघड गोष्टीला :
इथली एक जवाबदार व्यक्ती म्हणून स्वतःचं मत व्यक्त करायची वेळ आली तेंव्हा तुम्ही हमालाची भूमिका घेतलीये. कसा होणार बदल?
18 Dec 2013 - 12:03 pm | पैसा
:)
21 Dec 2013 - 12:07 am | निराकार गाढव
तुमचा हा शब्द मपल्याला लै आवडला: पुनरुधृत.
16 Dec 2013 - 1:51 pm | प्यारे१
@ पैजारबुवा, मस्तच.
@ श्रुति: प्रयत्न करेन.
@ वल्ली, बॅटमॅनः आभारी आहे.
@ अनिरुद्ध प : आपल्या पाठपुराव्यामुळे लिहीलं. आभारी आहे.
@ संजयजी : प्रतिसादाबद्दल आभार
@ आदूबाळ, मनीषा : आभार
@ मंदार कात्रे : कथेमध्ये 'नग्न म्हणजे न अग्न'- न शिजवलेलं असं अन्न हवं' अशी मागणी केली असा देखील एक प्रवाद आहे. त्यामुळं अनसूयेनं दूध दिलं वगैरे. कथा मान्य कराव्यात श्रद्धापूर्वक. त्यातून आपल्याला श्रेयस्कर मांडावं.
@अर्धवटराव.
>>>तपःश्चर्या हाच अघ्यास व प्रचिती हाच निकाल.
+१११
मंथुनि नवनीता तैसे घे अनंता| वाया व्यर्थ कथा सांडिमार्गु||
आंब्याच्या बागेत झाडं किती, कलम कुठलं, पान पिवळं का, खत कुठलं वापरता, झाड उंच का हे पहावं का हाताला लागलेल्या आंब्याची गोडी चाखावी हे ज्यानं त्यानं ठरवावं.
प्रतिसाद देणार्या सगळ्यांचे नि वाचकांचे आभार!
20 Dec 2013 - 4:55 pm | निराकार गाढव
22 Dec 2013 - 2:55 am | बाळकराम
लेख चांगला आहे. मी स्वतः व्यक्तिशः अश्रद्ध व नास्तिक असलो तरी श्रद्धेची मानसिक गरज बहुसंख्यांना आहे हे मला मान्य आहेच. त्यामुळे, एक निरागस आणि निरुपद्रवी श्रद्धा या स्वरुपात हे ठीक आहे.
पण नग्न = न + अग्न = म्हणजे न शिजवलेले- या व्युत्पत्तीबद्दल शंका आहे. कोणी संस्कृत तज्ज्ञ खुलासा करतील काय?
16 Dec 2013 - 2:19 pm | अक्षया
आवडले !
16 Dec 2013 - 2:35 pm | श्रीवेद
खुप छान आणी अप्रतिम लेख.
16 Dec 2013 - 2:41 pm | सूड
येवढ्या मोठ्या गोष्टी समजून घ्यायची आमची कुवत नाही !!
16 Dec 2013 - 4:34 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
20 Dec 2013 - 4:53 pm | निराकार गाढव
बाकी इथल्या समद्यांना शिकविणीची गरज आहे.
16 Dec 2013 - 3:07 pm | कवितानागेश
वा प्यारेबुवा, छान लिहिताय. :)
16 Dec 2013 - 4:17 pm | दिव्यश्री
लेख आवडला ...
हल्लीच्या कोलॅबोरेशन च्या जमान्याच्या भाषेत बोलायचं तर दत्त भगवान हे एक 'टायअप' आहे तिन्ही गुणांच्या अभिव्यक्तीचं, तिन्ही प्रकारच्या शक्तींचं! हे भारीच ...
16 Dec 2013 - 4:45 pm | मारकुटे
मस्त !
16 Dec 2013 - 5:02 pm | मृत्युन्जय
छान लिहिले आहे.
16 Dec 2013 - 5:10 pm | अनिल तापकीर
सुंदर
16 Dec 2013 - 5:12 pm | पिलीयन रायडर
स्वभावातला माजोरडेपणा कुणा समोर नतमस्तक होऊ देत नाही.. कुणीही तारणहार नाही हा विचार "दत्त दत्त ऐसे लागले ध्यान" पर्यंत जाउ देत नाही.. अध्यात्म समजुन घेण्याइतका संयम आणि प्रगल्भता नाही.. त्यामुळे तुझ्या सारख्या लोकांचे कौतुक वाटते जे देवा वर इतकी श्रद्धा ठेवुन शांत राहु शकतात.. हेवा वाटतो.. आमच्या विचारसरणी मधुन ही शांतता लाभायला मला तरी बराच वेळ आहे.. अजुनही वैचारिक संघर्षच चालु आहे.. पण ही शांतता मनाला लाभावी अशी तु माझ्यासाठी प्रार्थना कर..!
तुझे लेखन ओघवते आहे.. मला त्यातल काही कळत नसलं तरी वाचायला छान वाटलं..
16 Dec 2013 - 5:42 pm | सूड
>>त्यामुळे तुझ्या सारख्या लोकांचे कौतुक वाटते जे देवा वर इतकी श्रद्धा ठेवुन शांत राहु शकतात.
देवावर श्रद्धा असेल प्यारेकाकांची, पण ते शांत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे बरं !! ;)
16 Dec 2013 - 5:50 pm | पिलीयन रायडर
मी तुझं कौतुक केलं होतं रे प्यार्या... हाच तुझ्या इमजचं भजं करतोय.. ह्यावेळी मी काहीही केलेलं नाहीये..
16 Dec 2013 - 5:51 pm | प्यारे१
___/\___ प्रयत्न करतोय रे!
16 Dec 2013 - 6:18 pm | बिपिन कार्यकर्ते
:)
16 Dec 2013 - 6:29 pm | प्यारे१
:( ( बिकाकाका कमी बोलून किंवा काहीच्च न बोलता बरंच बोलतात ब्वा!)
'दया तिचे नाव, भूतांचे पाळण' पर्यंत पटतं ना! त्यापुढं 'आणिक निर्दालण कंटकांचे' पण आहे हो!
मी तरी काय करणार नि तुम्ही तरी. नाही का? ;)
16 Dec 2013 - 8:18 pm | बिपिन कार्यकर्ते
:)
16 Dec 2013 - 8:19 pm | सूड
>>'दया तिचे नाव, भूतांचे पाळण' पर्यंत पटतं ना! त्यापुढं 'आणिक निर्दालण कंटकांचे' पण आहे हो!
प्यारेकाका, तुमची संतवाणी सोडून आमच्यासारख्या सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगाल काय?
17 Dec 2013 - 5:14 pm | स्पा
का छळतोस रे प्यारे काकांना
16 Dec 2013 - 6:41 pm | सुहास..
सुपर्ब !!
प्यारेपक्व ...आपल हे परिपक्व लिखाण ...!!
16 Dec 2013 - 6:47 pm | जोशी 'ले'
आवडले...अजुन दोन एक वेळा शांतपणे वाचावा लागेल _/\_
16 Dec 2013 - 8:01 pm | आनंद घारे
लेखामधले विवेचन सुरेख आहे. जन्ममरणाचा फेरा वगैरेवर ज्यांचा विश्वास असेल त्यांच्यासाठी चांगले मार्गदर्शक आहे. नसला तरी वाचायला छान आहे.
दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
या कडव्यामधील भाषाशैली वेगळी वाटते, तसेच त्यातला अर्थ आधीच्या आणि नंतरच्या कडव्यांशी सुसंगत प्रवाहात (फ्लोमध्ये) वाटत नाही. कदाचित हे कडवे संत एकनाथांनी लिहिले नसून अन्य कोणी जोडले असावे असे वाटते.
16 Dec 2013 - 8:15 pm | आनंद घारे
सर्व जगाचे गुरू असलेल्या दत्तगुरूंनी २४ गुरूंकडून २४ गुण घेतले होते अशी आख्यायिका आहे. या विषयावर एक लहानसा लेख माझ्या ब्लॉगवर दिला आहे.
16 Dec 2013 - 10:08 pm | प्यारे१
अभ्या, अक्षया, श्रीवेद, दिव्यश्री, लीमाऊ, पिरा, घारेकाका, सूड, बिका, अनिल तापकीर, मृत्युंजय, मारकुटे, सुहास.. , नि सगळ्या वाचक व प्रतिसादकांचे हार्दिक आभार!
17 Dec 2013 - 9:58 am | बिपिन कार्यकर्ते
:)
16 Dec 2013 - 10:24 pm | आनन्दिता
ह. भ. प. (ओरिजिनल लाँगफॉर्म सहित) प्यारेबुवा ... अफाट विवेचन केलंय... आवडलं!!