~झालंया सगळ येगळ~

वैभवकुमारन's picture
वैभवकुमारन in जे न देखे रवी...
16 Dec 2013 - 11:00 am

झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ
आप -आपल्यात मीसळतानाभी वाचतया रक्तगटाची ओळ

सगळं झालया तुटक-तुटक .. नात्याला कृत्रीमतेची ओल
बोलणं फकस्त जवळ आलंया .. शब्द राहिल्याती अबोल

भाऊ नाही मनात कुणी ... रडतीया चंद्राची ती कोर
भाकरीनभी ओळ्ख बदललीया .. नग म्हणतीया चूल

पिसेच वहित ठेवत नाही कुणी .. झालाय दु:खी तिकडे मोर
पाया पडून मूर्ती चोरतुया ...इतका नास्तिक झालाय चोर

आंब्याच भी बालपण गेलया ...आणलाया लहानपणीच मोहोर
शब्दाच भी वय वाढलया .. लावत्याती कुणाच्याभी जीवाला घोर

दुष्टाची ती चक्र रंगवुनी , पिवळ पिकलया ते ऊर
पंख फुटलेकी कि पक्षी उडतुया , नग म्हनतुया घर

झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ
आप -आपल्यात मीसळतानाभी वाचताया रक्तगटाची ओळ

~वैभव कुलकर्णी ~

मांडणी