धुसरिका - व्युत्क्रम

जातवेद's picture
जातवेद in जे न देखे रवी...
17 Dec 2013 - 5:16 pm

कधितरी झाडांवर सावली पडेल
पण मग सुर्य ढग फ़ाडून टाकेल
अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो
विषयांतर करू नकोस

विकासाच्या गतीची ऐशी तैशी
चहा पिताना कपात बसली माशी
नुस्तां वेंधळा आहेस असं म्हणुन गेली
कालची फ़ॅटल एरर कोण काढली?

सरता सरता काळ सरेना
काय मस्त खेळती ही सेरेना
मी दोन चार ठिकाणी अप्लाय् केलय
टाटा माझा स्वीकार करा

मांडणी

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Dec 2013 - 6:42 pm | मुक्त विहारि

काय घंटा समजले नाही.

जावू दे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Dec 2013 - 7:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुवि. चला काढा वही. आज आपण धुसरिका-व्युत्क्रम या कवितेचा अभ्यास करु या.

धुसरिका व्युत्क्रम या कवीतेच्या शीर्षकातून कविता धुसर धुसर व्हायला लागलेली आपण दिसून येते. परंतु शीर्षक जरी संस्कृत छंद आणि त्याच पद्दतीची वाटत असली तरी कवित मात्र तशी वाटत नाही. 'व्युत्क्रम' या शब्दाचा अर्थ आहे. 'उलट क्रम' आता कवी कोणत्या धुसर झालेल्या (धुसरिका शब्दाचा अर्थ काही सापडेना) गोष्टीचा उलट क्रम लावतो त्याचा अभ्यास आपल्याला कवितेतून करायचा आहे.

कवीच्या ओळीतूनच कवीचं पांगलेपण आपल्या डोळ्यासमोर येते. कवितेतून एका ओळीनंतर दुस-या ओळीतून एकमेकांच्या सोबत काहीएक अर्थ प्राप्त व्हावा अशा हेतूने ही कविता लिहिलीच नाही असे वाटते. कविता सहज सोप्या आणि समजणा-या असल्या पाहिजेत असे आपण सतत म्हणत असतो, वरील कविता तशी नाही.

''कधितरी झाडांवर सावली पडेल
पण मग सुर्य ढग फ़ाडून टाकेल
अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो
विषयांतर करू नकोस''

आता पहिल्याच ओळीतून आपल्या पारंपरिक कल्पनेला इथे कवीने तडा दिला आहे. झाड सावली देते हे आपल्याला माहिती आहे, पण इथे झाडाला सावली हवी आहे. आता कशाला सावली हवी आहे तर झाडही सतत कार्यरत आहे, झाड थकून गेलं आहे, उन, पाऊस, थंडीने झाड सावली देत त्यालाही सावलीची गरज भासत आहे तेव्हा इथे झाडाच्या ऐवजी आपण कवी किंवा समाजासाठी काम करणा-या थोर पुरुष डोळ्यासमोर आणायचे आणि त्यांनाही स्वतःचे असे आयुष्य असते आणि त्यांनाही कधी तरी सावलीची म्हणजे आयुष्यात सुखाची अपेक्षा मनात निर्माण होते पण अशी सावली देणारे कोणी तरी येईल का ? येईल कोणी तरी म्हणजे मग इथे कवी म्हणतो '' पण मग सुर्य ढग फाडून टाकेल' मग अशा या झाडाच्या आयुष्यात सावली देण्यासाठी कोण येतंय तर ढग येतात. काही वेळ काही क्षण त्यांच्याही आयुष्यात सावली येते परंतु सुर्य नावाचा त्यापेक्षा मोठा कोणीतरी त्या झाडाची सावली काढून घेतो. आणि कवीच्या वाटेला किंवा त्या समाज सुधारकाच्या वाटेला पुन्हा दु:खच येते. आता आयुष्यात संकंट आली दु:ख आली तर माणूस सैरभैर होतो. कवीही इथे सैरभैर झाल्याचे दिसते आणि तो मार्ग शोधायला लागतो.

''अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो
विषयांतर करू नकोस''

अक्कलकोट या शब्दाचा संबंध हा संत महापुरुषांशी संबंधीत शब्द आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे गाव श्रीदत्त संप्रदायाशी संबंधित आहे. श्री स्वामी समर्थ हे श्री श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. माणसावर संकटं आली की तो कारणांचा शोध घेतो. दु:ख आहे, दु:खाला कारण आहे आणि दु:खाचे निवारण होऊ शकते हे तो विसरुन जातो आणि तो काहीतरी आयुष्यात असा चमत्कार घडून येईल अशा गोष्टींचा शोध घेतो आणि तो श्री स्वामी समर्थचा विचार करायला लागतो नतमस्तक होऊन यावं म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व दु:ख दैन्य दूर होईल असे त्याला वाटते. पण, तोच विचार करतो की असं करणं बरं नव्हे कारण स्वतःवर विश्वास असणारी माणसं स्वतःहुन आयुष्य बदलून टाकतात म्हणून तोच म्हणतो 'विषयांतर करु नकोस' आणि तो अक्कलकोटचा विचार पुढे ढक्लून देतो किंवा काढून टाकतो.

''विकासाच्या गतीची ऐशी तैशी
चहा पिताना कपात बसली माशी
नुस्तां वेंधळा आहेस असं म्हणुन गेली
कालची फ़ॅटल एरर कोण काढली?''

कवीने स्वातंत्र्यानंतर काही स्वप्न पाहिली परंतु त्याच्या वाटेला निराशाच येत गेली सतत वाढणारी जातीयतेची बजबजपुरी, भ्रष्टाचार, अनागोंदी आणि सतत आजूबाजूला व्यवस्थेचा विकास झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, अशा सततच्या निरर्थक टाहोंची त्याला चीड येते आणि तो या व्यवस्थेच्या गतीची ऐशी तैशी म्हणतो. एक सुखाचा क्षण वाटेला येत नाही. थकल्या भागल्या दमल्या मनाने शांतपणे खिडकीतून रस्त्यावरच्या येणा-या जाणा-याकडे पाहात ही माणसं धावत पळत कुठे जात आहेत उगाच असा मनाशी विचार करत चहाचा गरमागरम घोट घ्यावा अशा विचाराने चहाचा एखादा घोट झालेला असेल तोच कपात लक्ष गेल्यावर चहात एखाद्या माशीने एका गोड घोटासाठी आपले प्राण पणाला लावलेले दिसलेले दिसून येते आणि कवीला वाटतं आपण आणि या माशीत फरक आहे. कोणत्या सुखासाठी आपल्या आयुषाची ही धडपड चाललेली आहे. आणि तेव्हाच त्याला आपल्या प्रेयसीची आठवण होते तिला त्याची सोबत हवी असते पण तीही त्याच्यावर रुसलेली असते, तिने आधार द्यावा तर तीच सर्वांसमोर त्याला वेंधळा म्हणत असते. ती कवीला प्रेमाने वेंधळा म्हणते पण त्याचा अर्थही त्याच्यापर्यंत पोहचत नाही. संगणकीय कामात प्रेयसीला फॅटल येरर काढता येत नाही, तेव्हा तो येरर कवी दूर करतो आणि तिला दाखवून देतो की मी वेंधळा नाही.

''सरता सरता काळ सरेना
काय मस्त खेळती ही सेरेना
मी दोन चार ठिकाणी अप्लाय् केलय
टाटा माझा स्वीकार करा''

कवी जरा मिश्किल वृत्तीचा आहे. आपल्या आयुष्यातील या कटकटी कशा संपत नाही. काळ का पुढे जात नाही असा विचार करतांना 'सरेना' आणि ’सेरेना’ अशी शब्दाने लॉन टेनीसमधील 'सेरेना विल्यम' आठवून जाते. किती तीचा शारिरीक धडधाकटपणा पाहून आपण पुरुषासारखे पुरुष असून असा हताशपणा बरा नाही म्हणून तो पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहण्याचा प्रयत्न करतो. पुन्या आयुष्यात कुठे तरी उत्तम संधी मिळावी म्हणून प्रयत्न करु पाहतो आणि श्रीमंतीचे प्रतिक असलेले 'टाटा' नावाच्या व्यवस्थेत काही तरी आयुष्यात आधार मिळेल असा तो प्रयत्न करतो.

आता कवितेत काय नै समजलं ते खरड करुन विचारा.

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

17 Dec 2013 - 7:53 pm | प्रभाकर पेठकर

कवितेचे(?) शवविच्छेदन आवडले.

मृत्युन्जय's picture

18 Dec 2013 - 10:22 am | मृत्युन्जय

+ १ . शवविच्छेदन हा एकच शब्द योग्य आहे याला. वाईट चिरफाड आहे. :)

मुक्त विहारि's picture

17 Dec 2013 - 8:53 pm | मुक्त विहारि

दंडवत स्वीकारा....

बिरुटे सर आमचा बी दंडवत रुजु करुन घ्या हो.

ज्ञानव's picture

17 Dec 2013 - 9:28 pm | ज्ञानव

कविता वाचल्याबद्दल (जो आपला प्रान्तच नाही ) मी स्वतःला "व्युत्क्रमी" (शीर्षासनावस्थेत)अवस्थेत बडवून घेत आहे असे काहीसे धूसरच भास होताहेत......

जातवेद's picture

17 Dec 2013 - 11:31 pm | जातवेद

केवळ अप्रतिम. नतमस्तक
मी लिहीताना असा अजिबात विचार केला नव्हता :)

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Dec 2013 - 8:48 am | लॉरी टांगटूंगकर

जमलंय!
वा वा!!!

विटेकर's picture

18 Dec 2013 - 10:11 am | विटेकर

दंडवत स्वीकारा..

क्लास चाले मराठीचा भास मजला होत आहे..
मागच्या बाकावरून मायबोलीचा प्रांत आहे...
भणंग ओल्या कुशीत बालक अंगठा चोखित आहे.
स्वारगेटच्या बसवर माझ्या कंडक्टरचा माज आहे..
लक्तरांचे उभे ओझे अंधारातील भूत आहे....
आदिम आणि इव्ह मधला आद्य नंगानाच आहे.
भाल्याच्या टोकावर मुंगळ्याचे प्रेत आहे ..
बांधावर हलणारे कुल्ले जीवनाचा श्वास आहे...
आगिच्या लोळात झुलते प्रीतीची आस आहे..
आणि मो़कळ्या केसात मारवा खास आहे...
खोपटात भेसूर चिमणीचा प्रकाश आहे..
रंक आहे राव आहे आणि कोणी खास आहे..
या युत्पन्नाचे उत्पन्न करुन दाखवाच !
होऊ दे खर्च ! चर्चा तर होणारच !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2013 - 11:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

होऊ दे खर्च ! रसग्रहण तर होणारच ! ;)

- दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

18 Dec 2013 - 1:41 pm | मुक्त विहारि

मस्त...

उत्तम...

सुहास..'s picture

18 Dec 2013 - 1:40 pm | सुहास..

अग्गागा !!

बिरुटेसर ...पायाचा फोटो पाठवुन देणे ...

अरे काय ती कविता आणि काय ते विवेचन ....अगदी बरखा दत्त अन्ना हजारेच्या एका वाक्यावर न्युज चॅनेलवर दिवसभर टिआरपी गोळा करू शकते अगदी तस .....;)

वाईड बॉल सिक्सर मारताना पाहिला आहे का कोणी ?? नाही मग प्रतिसाद नक्की वाचा ;)

प्यारे१'s picture

18 Dec 2013 - 1:44 pm | प्यारे१

+११११

अगदी अगदी!

तीचा शारिरीक धडधाकटपणा पाहून आपण पुरुषासारखे पुरुष असून असा हताशपणा बरा नाही म्हणून तो पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहण्याचा प्रयत्न करतो

_/\_
साष्टांग

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Dec 2013 - 11:18 am | ज्ञानोबाचे पैजार

बिरुटे सरांचा विजय असो.
काय ती कविता आणि काय तो अर्थ.
सरांच्या प्रतिभेला मनापासुन दंडवत.

अद्द्या's picture

22 Jan 2015 - 3:20 pm | अद्द्या

बाप्रे . . !!!

दंडवत

पैसा's picture

17 Dec 2013 - 6:59 pm | पैसा

धुसरिका म्हणजे काहीतरी गूढ असावं. पण कै कळ्ळं नै.

जातवेद's picture

17 Dec 2013 - 7:50 pm | जातवेद

हा एक नवकाव्याप्रकार आहे, ज्यामधे कशाचा कशालाच पत्ता नसतो. ;)

पैसा's picture

17 Dec 2013 - 8:41 pm | पैसा

सांगून टाकलंत? आता प्रा. डो. बिरुटे सरांनी अर्थ लावलाय तसा नवा नवा अर्थ कोण लावणार?

जातवेद's picture

17 Dec 2013 - 11:47 pm | जातवेद

येथे हवेत मिपाचे :) येरागबाळ्याचे काम नव्हे
तरी सरांनी शुन्यातून एवढा मस्त अर्थ लावलाय कि कसलेले म्यान व्हावेत

मुक्त विहारि's picture

17 Dec 2013 - 9:12 pm | मुक्त विहारि

"हा एक नवकाव्याप्रकार आहे, ज्यामधे कशाचा कशालाच पत्ता नसतो."

असे असेल तर मस्त आहे हे प्रकरण....

आवडल्या गेले आहे.

जमल्यास अजून टाका.

जातवेद's picture

18 Dec 2013 - 12:10 am | जातवेद

करिन प्रयत्न फावल्या वेळातुन :)
याचे जनक बहुधा पुलं आहेत. नक्कि आठवत नाहिये. कोणी यावर प्रकाश टाकू शकेल काय

रुमानी's picture

18 Dec 2013 - 11:55 am | रुमानी

तुमच्या रसग्रहनाने कविता जरातरी उलगडली...:)

असे हि कै अस्तय होय हो ...

जेपी's picture

17 Dec 2013 - 9:00 pm | जेपी

---^---
दंडवत . लेखकाला आणी बिरुटे सरांना .

आणी मी .....
जातो अभ्यास वाढवतो .
=)

धनंजय's picture

17 Dec 2013 - 9:17 pm | धनंजय

शिघ्रकविता आवडली.

आडौली कविता का काय जे आसंन ते!

प्रसाद गोडबोले's picture

17 Dec 2013 - 9:25 pm | प्रसाद गोडबोले

सरता सरता काळ सरेना
काय मस्त खेळती ही सेरेना

>>> =))

यसवायजी's picture

17 Dec 2013 - 9:33 pm | यसवायजी

मला न्युनगंड आला होता, की आपल्याला कवितेतलं अगदी काय्बी-म्हंजे काय्बी समजत न्हाई म्हणुन..
प्रतीक्रिया वाचुन जीव भांड्यात पडला..
कशाचाच कशाला पत्ता नसतो?? गूड..
मग हे पण वाचा-

बाई- एका हौदात साडेतीन चिक्कू होते, त्यातले ५ पेरु खाल्ले तर किती आंबे उरले?
बंड्या- बाई पांड्याने आज डब्यातुन बटाट्याची भाजी आणलीय.
लगेच पांड्या चिडुन- न्हाई बाई खोटं बोलतोय त्यो.. आमच्या घरात उंदीर जास्त झालेत..
:))

कवितानागेश's picture

17 Dec 2013 - 10:23 pm | कवितानागेश

मी तर व्युत्क्रम हा शब्दच फार वर्षांनी वाचून अत्यानंदानी धावत आले.
कविता वाचली. व्युत्क्रम लिहिल्याने एकदा खालून वर पण वाचली.
दोन्ही वेळेस तितकीच समजली नाही.
बरोबर आहे! :)

वर सरांनी विस्तारीत केलेला अर्थ वाचा म्हणजे मतितार्थ लक्षात येईल :)

निनाद's picture

18 Dec 2013 - 8:44 am | निनाद

व्युत्क्रमी परिकर्म हे विसरलात की क्काय???
सर आमच्या कवितेचे नाही केले ते शव विच्छेदन? का आमची जिवंतय आजून? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2013 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक तर तुम्ही मला विसरून गेला आहात त्यामुले मी तुमच्या लेखन प्रतिसादाकडे दुर्लक्ष करायचे ठरविले आहे. :(

सालं आमच्या गुंडोपंतानं जालावर आम्हाला खरा जीव लावला.
आमचा खरा मित्र तोच, तुम्ही नै धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

निनाद's picture

19 Dec 2013 - 8:54 am | निनाद

आहो सर आता गुंडोपंत 'गेले' त्याला काय करणार? वय झालं होतं त्यांच.
गेलेले का परत येतात? :(

आणि मी कसा विसरणार सर तुम्हाला? :)

असो करा दुर्लक्ष्य!
खा मटारची उसळ खा!
खा शिकरण!!

आम्ही पण करू नवीन कविता... पाहाच!

विटेकर's picture

18 Dec 2013 - 10:01 am | विटेकर

काय वाचू कविता नवती
नुक्तीच न्हालेली पाती
श्वास कोंड्ला घास अडकला
आतल्या उजेडातील पण-ती

( जमलयं काय ? अजून २-४ कडवी टाकू का ? )

पैसा's picture

18 Dec 2013 - 10:25 am | पैसा

साक्षात कवींनीच खुल्लं आमंत्रण दिलंय. मक्काय!! कोणाच्या परवानगीची वाट बघताय? होऊ दे ब्याण्डविड्थ खर्च. मिपा आहे घरचं! ;)

नुसती कविता कळली नाही मात्र तिचे डॉक्टरांनी केलेले विवेचन आवडले. डॉक्टरांचे प्रभुत्व निर्विवाद मान्य !

विटेकर's picture

18 Dec 2013 - 12:57 pm | विटेकर

माज उतरला काका - पुतण्याचा
आणि म्हैस म्हणाली शेणाचा पो.
अस्वलाच्या बेंबीत हात घालीन म्हणतो
कार्ट्या हा कसला खेळ? हा तर खो खो

एक तारखेला पगार होतो, वैकुन्ठाला जाम गर्दी
पळसाच्या पानावर अळी, तिला होईल ना का सर्दी?

माणसाचे माकड होते ,मातिमधून येतो सैनिक
गर्द रानातून चेकाळलेली माय, तिचे दैन्य दैनिक

दीनवाणा हसू लागतो कोपर्यावरचा धिप्पाड इराणी
गाईच्या आचळाची धार बोथट प्या आता गढूळ पाणी

"बॉसच्या आईचा घो" बोंबलत उठतो कळ-बडवा
मातीच्या वासातून कोकलतो निवडणुकीचा निळा पारवा

पर्व संपले पांडव हरले, गाई- वासरे उनाड झाली
परकरातली पोर बोबडी , पाढ्यामधूनी बोलू लागली.

उंच इमारत आणि पसरली आकाशाची धूसर रेघ
नभात भरला आणि उसवला मना- मनातील काळा मेघ

सडक डामरी आणिक उखडला पादचारी तो गावाकडचा
"पैताईने" आग्रह केला डाव मांडला या कवितेचा !

अर्थहीन ही असेल कविता आणि कोथळा फाडेल कोणी
"सर"- वर्यासी साद घालतो किती वाढवू आता पाणी ?

सूड नसे हा नसेल चेष्टा , गम्मत आहे मिपावरची
हसाल थोडे नसेल थोडके , गम्मत आहे या कवितेची

बास का ? का अजून हाणु?

पैसा's picture

18 Dec 2013 - 1:24 pm | पैसा

*lol* :D *clapping* *crazy* *mosking* *ROFL* *yahoo* *HELP* *dash1*

मुक्त विहारि's picture

18 Dec 2013 - 1:28 pm | मुक्त विहारि

अजून हाणा.....

हायला विटेकर बुवा लै फ़ॉर्मात.

विटेकर's picture

19 Dec 2013 - 10:55 am | विटेकर

कसचं कसचं !
उगाच आप्ल कायतरी... थकल्या जीवाला विरंगुळा !

अभ्या..'s picture

20 Dec 2013 - 12:56 am | अभ्या..

विटेकर साहेब लैच भारी.
लै म्हणजे काय लैच भारी :)
कविता जबर्‍या अन नीरस ग्रहण खोबर्‍या. :)

जातवेद's picture

18 Dec 2013 - 1:38 pm | जातवेद

लैच पुढपर्यंत गेलं हे सगळं :)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Dec 2013 - 3:29 pm | अत्रुप्त आत्मा

@माज उतरला काका - पुतण्याचा
आणि म्हैस म्हणाली शेणाचा पो.
अस्वलाच्या बेंबीत हात घालीन म्हणतो
कार्ट्या हा कसला खेळ? हा तर खो खो

एक तारखेला पगार होतो, वैकुन्ठाला जाम गर्दी
पळसाच्या पानावर अळी, तिला होईल ना का सर्दी?>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

__/\__/\__/\__ =)) पूर्ण वारल्या गेलो आहे! =))

मनीषा's picture

19 Dec 2013 - 4:20 pm | मनीषा

बरीच सुस्पष्टं आहे.
पण कविता छान आहे.

धन्यवाद. तुम्ही पहिल्याच अशा निघलात, कविता चांगली आहे आणि समजत आहे म्हणनार्‍या

प्यारे१'s picture

20 Dec 2013 - 12:48 am | प्यारे१

नाय नाय ते तुम्हाला नाय. ते विटुकाकांना हाय.
तुमचं 'औघड' च हाय ;)

विटेकर's picture

18 Dec 2013 - 2:54 pm | विटेकर

माज उतरला काका - पुतण्याचा
आणि म्हैस म्हणाली शेणाचा पो.

प्रचलित राजकारणावर कवीने हे बोचरी पिंक टाकली आहे. दिल्लितील म्हैस आता प्रादेशिक घराणेशाहीला भीक घालत नाही असा गर्भित अर्थ !
अस्वलाच्या बेंबीत हात घालीन म्हणतो
कार्ट्या हा कसला खेळ? हा तर खो खो

अस्वल हे हसवून हसवून मारण्यात वाकबगार , कवीने त्याच्याच बेम्बीत हात घातला आहे.. हे म्हणजे मेलं कोंबंड आगीला भ्येत नायं .. पण सुजाण नागरिक सांगतात की असला खो -खो स्वातंत्र्यापासून्च चालू आहे.. कार्ट्या या शब्दात सामान्य लोकांना एकमेकाबद्दल जी कणव आहे ,, त्याचे प्रतिक होय .

एक तारखेला पगार होतो, वैकुन्ठाला जाम गर्दी
पैशाला आलेले महत्व ! ज्यांचा पगार एक तारखेला होतो ते सारे मॉलच्य सरणावर तो जालून टा़कतात.
वैकुंठ हे मॉलचे प्रतिक .. एक अट्ळ संपणे .
पळसाच्या पानावर अळी, तिला होईल ना का सर्दी?
पळसाचे पान म्हणजे पत्रावळ , त्यावर अळी म्हणजे महागाई .. तिला सर्दी म्हणजे महागाई चे नाक चोंदणे..
या महागाईच्या आळीने रोजचे जेवण देखील अशक्य केले आहे ..
माणसाचे माकड होते ,मातिमधून येतो सैनिक

माणसाचे माणूसपन संपलय आता .. त्याचा प्राणी झालायं( आहार निद्रा भय मैथुनचं...)
माती सुद्धा पेटून शस्त्र हातात घेईल इतका अण्याय !

गर्द रानातून चेकाळलेली माय, तिचे दैन्य दैनिक
शेतमजूरी करणारी माय आता पोराला काय खायला घालेल ? हे दैन्य तर रोजचेच ! "गर्द रान" या शब्दातून कवीला "जंगल-राज" सांगायचे आहे

दीनवाणा हसू लागतो कोपर्यावरचा धिप्पाड इराणी

व्यापारी माण्साला देखील आता या सार्याची दया येऊ लागली आहे !! धिप्पाड या शब्दात कवी " आहे रे " आणि " नाही रे " यातील दरी स्प्ष्ट करतो .

गाईच्या आचळाची धार बोथट प्या आता गढूळ पाणी
श्वेत-क्रांती झाली पण दुधाचे भाव ? " गढूळ पाणी" ..दरिद्री अश्व्थ्याम्याला दिलेल पीठाचे पाणी दूध म्हणून !

"बॉसच्या आईचा घो" बोंबलत उठतो कळ-बडवा

" आय टी" वाले ही आता ऐटीत नाहीत . गांजलेत बिचारे , त्याचा राग वरिष्टांवर निघतो .
मातीच्या वासातून कोकलतो निवडणुकीचा निळा पारवा
निळा रंग दिन - दलित - दुबळ्यांचा, मातीत असणारे ' नाही रे " दर निवडणुकीला आस लाऊन बसतात पण त्यांची झोळी रिकामीच !

पर्व संपले पांडव हरले, गाई- वासरे उनाड झाली
स्वातंत्र्याची नवलाई संपली , पांडव म्हणजे सत्य हरले , गाई - वासरे म्हणजे सामान्य जन आता निराधार झाले !

परकरातली पोर बोबडी , पाढ्यामधूनी बोलू लागली.

शिक्षणाचाही खेल-खंडोबा ! मुलींच्या शिक्षणाचा तर त्याहून जास्त..पटावर नसलेल्या मुलांचे पाढे म्हनून घेतात! आणि परिक्षाच घेत नाहीत.

उंच इमारत आणि पसरली आकाशाची धूसर रेघ

कॉन्क्रिट्चे जंगल आणि त्यातील लोक ( आयवरी टॉवर ) आणि महानगरातील मानुसकीचे प्रदूषण !
आकश म्हणजे देव ही प्रदूशित झाला आहे
नभात भरला आणि उसवला मना- मनातील काळा मेघ
नभात भरला - आकाशातील देवाची आर्त विनवणी .. पण मनातील काळा मेघ न कोसळता नुस्ता पांगत जातो.. अधिक काळं करीत...

सडक डामरी आणिक उखडला पादचारी तो गावाकडचा
पायाभूत सुविधा केवल महानगरातच .. गावाकडे अजून रस्तेच नाहीत , तो गावकरी का चिडणार नाही ?
झपाट्याने होणारे शहरीकरण !
"पैताईने" आग्रह केला डाव मांडला या कवितेचा !

पैशासाठी या अर्थहीन कवितेचा आयूष्याचा डाव गावाकडच्या( विस्थापित झालेल्या) पादचार्याने ( समाजातील सर्वात निम्न स्तर ) मांडला आहे .
अर्थहीन ही असेल कविता आणि कोथळा फाडेल कोणी
या दीन - दलिताण्चे जगणेच अर्थहीन आहे.. त्याच्या आयुष्याचा पोचट फुगा कोणीही फोडू शकेल !

"सर"- वर्यासी साद घालतो किती वाढवू आता पाणी ?

ही जगण्याची लढाई "सर" व्हावी म्हणून आता डोळ्यातील किती पाणी वाहू दे ?

सूड नसे हा नसेल चेष्टा , गम्मत आहे मिपावरची
ही तर पूर्वपापाची फळे , कोण कशाला चेष्टा करेल ? चेष्टा : प्रयत्न .. पुरेसे प्रयत्न केले नाहीत असाही अर्थ होतो! आणि हा सूड ही नव्हे ! ( कारण सूडाला अंत असतो !)
"मि - पावर ची" : येथे स्वार्थी राजकारण्याचा संदर्भ आहे .. ही त्यांचीच गम्मत आहे , त्यांच्या "मी"पणाची ही पावर आहे.

हसाल थोडे नसेल थोडके , गम्मत आहे या कवितेची

तरी ही , कवी म्हणतो , हाही आनंदच आहे , थोडेसे हसा. हे आयुष्य ( कविता ) असेच गम्मतशीर आहे ! आपल्याच दु: खावर हसत आहे !!

प्रेरणा आणि साष्टांग आभार - नगरवासी प्राध्यापक डॉक्टर बिरूटे सर

मारकुटे's picture

18 Dec 2013 - 3:04 pm | मारकुटे

प्रेरणा आणि साष्टांग आभार - नगरवासी प्राध्यापक डॉक्टर बिरूटे सर

नगर का? वा ! वा ! मराठवाड्याचं ग्रहण सुटलं !

सुहास..'s picture

18 Dec 2013 - 3:16 pm | सुहास..

सरांनी राजपाट बदलला की काय ?

की गंगापुरमध्ये काय तरास बिरास झाला का ? करु का कल्याण पाटलाला वा सुभाष ला फोन ;)

लई पहुंच असलेला ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2013 - 3:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजुन तरी मराठवाड्यातच आहे :)

बाकी विटेकर साहेबांनी धाग्यावर मजा आण
ली...!!!

-दिलीप बिरुटे
(औरंगाबादवासी)

विटेकर's picture

18 Dec 2013 - 3:54 pm | विटेकर

सर अजून मराठवाड्यातच आहेत ( मराठ्वाड्याला पोरके करायचे आहे का ? )
.. नगरवासी म्हनजे ते आयवरी टोवर मधे राहणारे .. "नीरस- ग्रह्ण" पुन्हा एकदा नीट वाचा !

कवितानागेश's picture

19 Dec 2013 - 12:09 pm | कवितानागेश

विटूकाका पेटलेत! =))

अमोल मेंढे's picture

18 Dec 2013 - 3:36 pm | अमोल मेंढे

कशात काय... आणि उलटे झाले पाय... बिरुटे सर आणि विटेकर काका साष्टांग नमस्कार

विजुभाऊ's picture

19 Dec 2013 - 12:44 am | विजुभाऊ

विटेकर काका.
तुमच्या कवितेतले काका पुतणे कुठल्या गावचे. बारामतीचे की वांद्र्याचे?
रच्याकाने : जातवेद यांना "गरीबांचे शरदिनी" हा पुरस्कार द्यावा अशी सूचना मांडतो

विटेकर's picture

19 Dec 2013 - 11:03 am | विटेकर

आहो काका- पुतणे कुठलेही असले तरी जातकुळी तीच ! गुणवत्तेत तसुमात्र ही फरक नाही, कवितेतील गरिबांना वालीच नाही !
पण या ठिकाणी दिल्लीच्या महिषीचा ( मर्दीनी नव्हे , ती वेगळी , ती तीची सासु) उल्लेख आहे तेव्हा कवीला बहुधा १२मती अपेक्षीत आहे .( बाकी १२ मती म्हणजे खरोखरच १२ दिशांना तोंड करुन हा इसम उभा आहे , खोबरं तिकडे चांगभलं करायला...... असो ते क्लिंट्न महाशयांचा विषय आहे.. आपण त्यात बोलू नये म्हणून थांबतो )

पुरस्काराचे नेमके स्वरूप काय अस्ते म्हणे? नाही म्हणजे रोख रक्कम वगैरे किती अस्ते? कि नुस्ती उपधी?

जेपी's picture

19 Dec 2013 - 9:53 am | जेपी

मजा आली .

विटेकर's picture

19 Dec 2013 - 11:08 am | विटेकर

जातवेद यांना "गरीबांचे शरदिनी" हा पुरस्कार द्यावा अशी सूचना मांडतो
तुमच्या सूचनेला बेशर्त ( किती दिवसांनी हा शब्द सापडला, त्यानिमित्ताने ,पूज्य शब्दकर्त्याचे स्मरण झाले , कळ्फलक कंपित जाहला आणि बोटे पाणावली) संमती !
तुमच्या सूचनेला उपसूचना :
जीवनभाउना ही एखादा पुर्स्कार द्यावा. त्यांच्या सेवेची जालीय समाजाने अजून म्हणावी तशी दखल घेतली नाही म्हणोन सौम्य णिषेध व्यक्त करुन माझे ४ शब्द संपवतो....

बॅटमॅन's picture

19 Dec 2013 - 12:39 pm | बॅटमॅन

आई शप्पथ!!!!

एरवी शांत असणार्‍या शीनियर मंडळींनी इथे "हू इज द बॉस" हे दाखवून दिले. बिरुटेसरांचे रसग्रहण पाहून पैजारबुवांच्या तंतुनाभमानवकाव्याच्या रसग्रहणाची आठवण झाली, तर विटेकरकाकांची प्रतिभा म्हणजे प्रतिसादागणिक प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णु असल्याचे दिसून आले. ओव्हरमध्ये साही बॉलवर सिक्सर मारणार्‍या युवराजाची आठवण झाली. "साही सिक्सर मारता संपल्या ओव्हरी, ते तू बॉलरलागी फटके जे मारी" अशी नवीन आरती लिहिण्याच्या प्रतीक्षेत. वाढता वाढता वाढे, भेदी विडंबकमंडळा हा साक्षात्कार जाहला आणि अष्टसात्विक भाग जागृत होवोन सर्वांस येक कॉमन लोटाङ्गण घालोन सर्व विडंबनपंडित काका लोकांचा गंडा बांधल्या गेला आहे.

लैच !!

>>तंतुनाभमानवकाव्य *clapping*

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Dec 2013 - 11:11 am | ज्ञानोबाचे पैजार

तंतुनाभमानव :- या शब्दप्रयोगाने सद्गदीत झालो आहोत. आ. १००८ श्री श्री बट्टमण यांना मानाचा मुजरा

तंतुनाभमानव तंतुनाभमानव, माझ्याकडे तुझी नजर वळव
फेकुन आपल्या प्रेमाचे जाळे, तू मला माझ्या घरुन पळव
(हे इस्पायडरमैन या गाण्याच्या चालीत बरोबर बसते. मोठ्यांदा गाउन बघावे.... स्वतःच्या जबाबदारी वर)

असे एक काव्य मला सहज स्फुरले.

आदूबाळ's picture

20 Dec 2013 - 3:59 am | आदूबाळ

:))

वाचनखूण...

आदूबाळ's picture

20 Dec 2013 - 3:59 am | आदूबाळ

आणि वाचक-खून

कविता आणि त्यावरचे प्रतिसाद मजेशीर आहेत.
बिरुटे सर आणि विटेकर काका - दोघांनीही मूळ कवितेत नसलेले रंग भरुन मजा आणली.

चौकटराजा's picture

20 Dec 2013 - 9:04 am | चौकटराजा

साहित्य संमेलनात 'धुसर कवितेचे जनक ' जातवेद यांची मुलाखत प्राडा व कविराज विटेकर घेतील.यासाठी सज्ज रहा !
मग जातवेद यांचा समावेश केशवसूत, मर्ढेकर याच्या लायनीत होणार !

जातवेद's picture

20 Dec 2013 - 12:36 pm | जातवेद

नका... नका हो एवढ चढऊ. असल्याची सवय नाय आपल्याल. कुठ २ वर्षातनं १० ओळी लिहिणारा मी आणि कुठे ते

नका तुम्ही आपल्या कंटाळवाण्या कविता इथे टाकू .
नका तुम्ही वही पेन काढू .
नवीन खेळाडू आला झटकन सिक्सर मारून गेला .
एक हात उंचावून एक पाय लाईनच्या आतच ठेऊन बॉल पकडून दाखवला त्याची सर नाही कुणाला .

टवाळ कार्टा's picture

20 Jan 2015 - 8:12 pm | टवाळ कार्टा

कहर आहे =))

सस्नेह's picture

21 Jan 2015 - 2:34 pm | सस्नेह

आणि उपकाव्ये वाचून मस्तक-व्युत्क्रम होऊन मति धूसर जाहली आहे *lol*

मंदार दिलीप जोशी's picture

21 Jan 2015 - 4:29 pm | मंदार दिलीप जोशी

:D

सतिश गावडे's picture

10 Nov 2015 - 8:14 pm | सतिश गावडे

मुळ कविता, प्रा. डॉंनी केलेली तिची चिरफाड, विटूकाकांची कविता, सारेच भारी.

मांत्रिक's picture

10 Nov 2015 - 8:50 pm | मांत्रिक

सहमत
+१११११

मांत्रिक's picture

10 Nov 2015 - 8:51 pm | मांत्रिक

सहमत
+१११११