दिवस माझ्या इंजिनियरिंग च्या शिक्षणाचे होते. ९१ किंवा ९२ सालचे. मी नांदेड ला होतो.
हे दिवस तसे मजेचेच असतात. "आम्ही काय कोणाचे खातो रे? तो राम आम्हाला देतो रे" असे म्हणत घरून आलेल्या ६०० रु च्या पत पुरवठ्यावर, नाक वर करून जगण्याचे दिवस. ह्या वयातले पाप्याचे पितर पण पहिलवनला लालकरात फिरत असते. तर ते दिवस होते.
नांदेड चे गवर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेज हे सरकारने ग्रामीण उत थॅना साठी सुरू केले होते. पण मुळे सगळी वेग वेगळ्या यूनिवर्सिटी मधून यायची. त्यामुळे खुद्द नांदेड ची मुले बोटा वर मोजली तरी काही बोटे तशीच उरायाची. बर वय म्हणाल तर "भलतेच बूभुक्षीत" वय असायचे. जेवणावळ दोन वेळचे जेवण द्यायची. पण ते जेवण म्हणजे एवढे तिखटजाळ असे की, मोठी मोठी पोरे पण दोन दोन चपत्यात "नाक पुसत" उठत असत.
तर त्या दिवसात स्नेहनगर एरिया मध्ये एक नवीन हॉटेल म्हणा किंवा मेस म्हणा उघडली होती. त्या माणसाने नीट अभ्यास करून कमी तिखट जेवण, भरपूर दही असलेला रायता चटणी लोणचे असे छान जेवण देण्यास सुरूवात केली. लगेचच नाव सर्वदूर पसरले. आम्ही पण त्याच्याकडे संध्याकाळचे जौ लागलो. थोडे महाग पण चांगले जेवण. पण शेवटी त्याला पण बिज़्नेस करायचा होता. त्याच्या लक्षात आले की पोरे दिवस भर न जेवता सन्ध्याकाळी अवतरायची, आणि पोटात भुजंग शिरअल्या सारखी चरायची. शेवटी त्याने डोके लावले. जेवण अनलिमिटेड पण चपात्या तीनच असा मामला केला. बरे भात फारसा कोणाला आवडत नसे कारण तो अवडावा असा नसायचाच. त्यामुळे बरेचसे भुजंग येई नासे झाले. आम्हाला पण ते जाणवले पण मग आम्ही दोन तीन पोरांनी विचार केला की आपल्याला काय आवडते. कमी तिखट. मग त्याचा आणि चापाती चा संबंध काय? आणि आम्ही लोका भाजीच खायला लागलो. कधी कधी दोन चापात्या आणि भरपूर भाजी आणि डाळ.
तेव्हा ती लागलेली सवय अजुन जाता जात नाही. मला जेवायला बोलावले तर बायको, बोलावणर्याच्या ग्रुहीणीस खास फोन करून सांगते, की बाई गा चापात्या कमी असतील तर चालतील, पण हा माणूस जेवायला लागल्यावर तुमच्या घरच्या भाजीची खैर नाही.
तिचे पण काही चुक नाही म्हणा. शेवटी काय की माणूस हा घडत असतो. कधी परिस्थीतीने तर कधी अनुभवाने.
प्रतिक्रिया
27 Dec 2013 - 12:26 am | डॉ सुहास म्हात्रे
छोटा पण मस्त खुसखुशित लेख !
>>>> दोन दोन चपत्यात "नाक पुसत" उठत असत.<<< हे विशेष आवडलं :)
27 Dec 2013 - 1:21 am | अभ्या..
एस्जीजीएस वरुन स्नेहनगरात यायचा म्हणजे भारीच की. नशीब तरोडा नाका म्हणला नाहीत. ;)
27 Dec 2013 - 1:54 am | विदेशी वचाळ
अभ्या मी, उदय नगर ला राहायचो. भाग्यनगर च्या जवळ.
साला नांदेड ला पण ना , दर दोन गल्ल्यांवर नगर बदलायाचे.
विवा
27 Dec 2013 - 1:58 am | अभ्या..
मग ओके :)
नशीब कॉलेजची बस होती तुम्हाला.
..............................................
थोडाच काळ गणेशनगरात राहिलेला मी.
27 Dec 2013 - 2:03 am | विदेशी वचाळ
काय राव, तुम्ही पण तिकडेच टप्पे टाकलेत की काय?
28 Dec 2013 - 3:18 am | अभ्या..
नाय ओ. आम्ही लैच शाहू (नांदेडातले, कोल्हापूरवाले नव्हं) टप्पा पडायच्या आतच ऊडलो तिथून. ;)
उगी एका मामाचे गाव म्हणून म्हैत हो. बाकी सगळे पच्चिमम्हाराश्ट्रच. :)
30 Dec 2013 - 2:05 pm | बॅटमॅन
"पच्चिम्म्हाराश्ट्रच" असा शुद्ध पाठ आहे. एक अक्षर अशुद्ध लिहिल्याबद्दल णिशेढ ;)
30 Dec 2013 - 3:51 pm | विनटूविन
जर शुद्ध लिहिला असता तर वाचायला जास्त मजा आली असती, राहून राहून लक्ष व्याकरणाच्या आणि इतर वाक्यरचनेच्या चुकांकडे गेले की मुद्दे विसरले जातात.
30 Dec 2013 - 3:53 pm | विनटूविन
लेख जर शुद्ध लिहिला असता तर वाचायला जास्त मजा आली असती, राहून राहून लक्ष व्याकरणाच्या आणि इतर वाक्यरचनेच्या चुकांकडे गेले की मुद्दे विसरले जातात.
27 Dec 2013 - 1:30 am | अर्धवटराव
कालेजातल्या सवयी पार लग्नानंतर काहि वर्षे कंटिन्यु करणं येरागबाळ्याचं काम नाहि राजा ;)
बाकि हे मेसवाले मुद्दाम असं अन्न बनवतात कि भुजंग गपगुमान बिळात शिरावेत... त्यांना आपल्या प्लॅनींग कमिशनमधे घेतलं तर भारत पोटभर्या भुकबळींचा देश म्हणुन नाव कमवेल.
27 Dec 2013 - 11:27 am | जेपी
लय भारि
27 Dec 2013 - 11:34 am | पिशी अबोली
भारी..
27 Dec 2013 - 11:56 am | युगन्धरा@मिसलपाव
खुप आवडला लेख.... कॉलेज चे दिवस आठवले....
27 Dec 2013 - 10:56 pm | मी-सौरभ
आवडॅश
27 Dec 2013 - 10:58 pm | मुक्त विहारि
आवडला....
27 Dec 2013 - 11:11 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त! आवडलं!
28 Dec 2013 - 3:58 pm | ब़जरबट्टू
आवडले.. पण शिर्षक का काय म्हन्तो मी ते... :)
28 Dec 2013 - 5:32 pm | वेताळ
मेस मध्ये विद्यार्थी ज्यादा जेवतात म्हणुन मेस चालक विवीध आयडिया लडवुन अन्न वाचवायचा प्रयत्न करतात.त्याची आठवण झाली. मस्त लिहले आहे
28 Dec 2013 - 5:49 pm | arunjoshi123
आम्ही भुजंग लोकांपैकी एक होतो. आम्हाला नमवण्यासाठी सपेर्यांनी काय काय युक्त्या शोधल्या ते लिहिण्यासाठी एक वेगळा लेख लागेल.
30 Dec 2013 - 1:50 pm | ब़जरबट्टू
हैद्राबादला असतांना तर पोळी खायला मिळावी म्हणून आम्ही वाट्टेल ती किंमत मोजायला तय्यार असायचो. कामत ला आम्ही चार पैकी २ मित्र भात मागवायचो, व उरलेले २ भाताच्या एवजी अजुन पोळ्या मागायचे. दोघांचा भात चौघांना सहज पुरायचा. त्यात कुणीतरी एका राजस्थानी खाणावळला शोधुन काढले, जो मनसोक्त पोळी भाजी द्यायचा.. मग काय विचारता.. भाताच्या शितालाही न शिवता २० - २० पोळ्या खाणारे भुजंग म्हणून रागाने बघायचा आमच्याकडे... :))
(ढेरपोट्या) बज-या... :)
12 Mar 2015 - 5:35 pm | नितिन५८८
असेच माझ्या ओळखीतले ३-४ मित्र तिरुपती बालजी ला गेले होते, तिथे तीरुमल्ला च्या पायथ्याला १ खानावळ होती अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी. खाणारे सर्व भुजंग होते थाळी ३० रुपये प्रती होती. मग काय पहिल्यांदा तिथे जेवले प्रत्येकी ३०-४० पोळ्या झाल्या असतील खानावळ मालकाने शेवटी बाहेरून तंदूर रोटी मागवली. परत दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सर्व तिथे हजर झाले तर तिथला बोर्ड अनलिमिटेड वरून लिमिटेड थाळी असे लिहिले होते ते पण असे ३ पोळ्या, २ भाज्या, दाल, भात, दही आणी पापड