मिपावरील तरुण तुर्कांनो आणि ज्येष्ठ अर्कांनो प्रेमात पडलेल्या ,पडु इच्छीणारे आजी-माजी प्रेमवीरांनो यंदा च्या दिवाळी ला एक महान मिपा प्रेम-कोष तयार करुन समाजसेवा करण्याचा मानस आहे. की जेणेकरुन भावी आणि सध्याच्या प्रेमी जीवांना एक रेडी रेकनर प्रेम फ़ुलविण्यास, प्रेयसी ला आपले प्रेम पटवुन देण्यास उपयोगात येइल आणि ज्या योगे एक ऐतिहासिक महत्वाचा विश्वकोषा च्या धर्तीवर प्रेमकोष बनु शकेल. याने प्रेम या संकल्पने वर एका जागी सुंदर असे साहीत्य ही जमा होइल. यात आपण उदार हस्ते आपल्या जवळील प्रेम खजिना शेअर करुन प्रेमकोष निर्मीतीस योगदान करावे ही प्रेमळ विनंती !. या योगदानाच्या निमीत्ताने नवयुवकांना स्फ़ुरण येइल व वृध्द्दांच्या वठलेल्या मनाला पालवी फ़ुटेल. ज्येष्ठांकडुन विशेष अपेक्षा आहे. ( सरळ नावाने योगदानास संकोच वाटत असेल नाव न छापण्याच्या अटी वर ही देउ शकतात)
आपण प्रेमकोषा ला कशा प्रकारे योगदान देउ शकतात
१- प्रेम कविता , प्रेम गीते नवी जुनी मराठी-संस्कृत-हीन्दी-इंग्रजी गाण्यांच्या लिंक्स व्हीडीओज. कवितांचे रेसीटेशन असेल तर तसे काही.
२- प्रेमा चे आपापल्या लव्ह स्टोरीज चे प्रसंग अनुभव घटना इ. पहला प्यार वगैरे. जमलेल्या फ़सलेल्या लव्ह स्टोरीज, महत्वाचे म्हणजे टीप्स ,आयडीयाज सल्ले इ.युवकांच्या उपयोगासाठी,
३- प्रेम-प्रणय संकल्पना असलेली दर्जेदार पेंटींग्ज ,फ़ोटोग्राफ़्स, स्केचेस इ. व्हिज्युअल मटेरीयल.
४- प्रेमावर – प्रणयावर भाष्य असलेले अर्थपुर्ण उतारे , ललित लेख ,सुविचार कोट्स इ.लघु असेल तर कथा इ.
५- प्रेम-प्रणय हा मुख्य विषय असलेले काय वाटेल ते क्रायटेरीया एकच इट मस्ट बी ऑन लव्ह.
संपादक मंडळास नम्र विनंती हा प्रेम या विषयावर स्पेशलायझेशन असलेला कोष बनु शकतो म्हणुन हा इतर अनेक विषय समाविष्ट असलेल्या इतर धाग्यात मर्ज केल्यास त्याची मजा जाईल.
आता सुरुवात मी माझ्या कडील चिल्लर चाल्लर मटेरीयल ने करतो
म्हातारी मला सांगत होती.
“ मुली बघण हा पुरुषांचा स्थायीभाव च आहे. बायकांकडे पहावं ही भावना जोवर जागती आहे, तोवर पुरुष हा पुरुष आहे. आता विणा चे वडील, तस वय झालेलं, पण असे खिडकीजवळ उभे राह्यले की गुंग व्हायचे, मोठ्या प्रसन्नतेने रस्त्यावरच्या बायका पाहत रहायचे. ते तर पुरुषच, पण तुला गम्मत सांगते, एक दोनदा मी पण त्यांच्या जवळ जाउन उभी राह्यले. रस्त्यांवरुन जाणार्याु पोरींकडे त्यांच्या म्हणजे तुम्हा पुरुषांच्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला.तेव्हा बायांकडे पागल होउन पाहणारे पुरुष मला पागल वाटेनासे झाले बघ !
आता तर रस्त्यावर च्या मुली पाहण्याचा मलाच छंद जडलाय. बेभान करण्याच तंत्र बरोब्बर शिकल्यात बघ पोट्ट्या, चित्रासारख्या राहतात बघ , मी तर गेल्या अनेक दिवसांत कुरुप मुलगीच पाह्यली नाही !
मी हसुन विचारलं “ आजी , तुमचे हे विचार माझ्या बायकोला ऐकवालं का ?”
’मुळीच ऎकवणार नाही ’ का ?
“तरुणपणात बेटा अहंकार असतो. आपली तुलना इतरांबरोबर होता कामा नये, अस वाटतं. त्यात काही गैर पण नाही.मी तरुण असतांना माझ्या नवर्यााला कमी छळलय का ? हे विचार आत्ताचे , म्हातारपणाचे, स्वत:च्या रुपाचा अहंकार जळाला तेव्हा इतर सौंदर्य दिसायला लागल.”
लेखक- व.पु.काळे
( हम केले है तो क्या हुऑ दिलवाले है हम तेरे तेरे तेरे चाहने वाले है ! )
(The man who took this iconic photograph is Alfred Eisenstaedt. Named ‘V–J day in Times Square’, it shows a jubilant sailor kissing a nurse after the Americans defeated the Japanese forces during the World War II. The woman in the picture was later identified as Edith Shain, a nurse who recently passed away, but the identity of the sailor in this photo remains a mystery even today.)
प्रतिक्रिया
7 Nov 2013 - 8:27 pm | अत्रुप्त आत्मा
@वृध्द्दांच्या वठलेल्या मनाला पालवी फ़ुटेल. >>>> =))
@ज्येष्ठांकडुन विशेष अपेक्षा आहे. >>> calling चौ रा का का...! :-D
7 Nov 2013 - 9:02 pm | मालोजीराव
ओ बुवा त्या तिसर्या फोटोतला त्याचा हात काढा ओ बाजूला…पोरीचा चेहरा दिसना
7 Nov 2013 - 9:21 pm | अमेय६३७७
त्यांचो 'कार्यभाग' आटापलो की सावकाशीन हात बाजूक काडतील ते, वाईच दम धरा तवसर ;)
7 Nov 2013 - 9:27 pm | अत्रुप्त आत्मा
=))
7 Nov 2013 - 8:33 pm | अग्निकोल्हा
असे णाव हवे होते!
9 Nov 2013 - 9:14 am | चौकटराजा
प्रेम ही मनाची एक भावनिक व बौद्धीक यांचे मिश्रण असलेली अवस्था आहे. अर्थात प्रेम हे आंधळे असते व डोळसही.
प्रेम व कामवासना यांचा काहीही संबंध नाही.
प्रेम हे स्त्रीपुरूष या संकुचित विषयापेक्षा फार मोठे विशाल आहे.
प्रेम म्हणजे एखाद्या गोष्टीतील गुणांच्या योगाने उत्पन्न झालेले आकर्षण. अर्थात गुण म्हणजे काय याची व्याख्या व्यक्तिसापेक्ष असल्याने कारण वेगळे परिंणाम एकच असे होउ शकते. उदा. स्ट्रेट ड्राईव्ह मस्त मारतो म्हणून सचिन विषयी प्रेम तसेच प्रचंड नम्र संयमी म्हणून सचिन विषयी प्रेम असे होउ शकते.
कोणत्याच गुणाची पारख नाही आवड नाही अशी व्यक्ती प्रेमात पडणे दुरापास्त असते.
प्रेमात पडण्याचे प्रमाण एकूणच पुरूषांमधे स्त्रीयांपेक्षा अधिक असते. मला वाटते कौतुकाची लेव्हल हे कारण असावे.
वरील फोटोतील चुंबनाच्या फोटोविषयी.
हा फोटो १९७७ चे सुमारास " लाईफ" च्या अंकात मी पाहिलेला आठवतो. या फोटोतील जी नर्स आहे तिने संपर्क साधावा
असे आवाहन करण्यात आले होते. व त्यावर सुमारे वीस बावीस ललना हा " क्लेम" घेऊन पुढे आल्या होत्या.