मिपा हे मराठी संकेतस्थळ समजल्यापासून अगदी रोज न चुकता भेट देत आहे. मिपावर रोज येणारे लेख, कविता हा म्हणजे तर जणू खजिनाच आहे. इथे एकदा भेट दिली कि काहीतरी मनोरंजक, ज्ञानवर्धक लिखाण नाकीच वाचायला मिळत. इस्पिकचा एक्का, गवि, स्पा, वामनसुत, विसोबा खेचर, जॅक डनियल्स यांचे लेख म्हणजे तर पर्वणीच असते वाचकांसाठी.
हे सर्व वाचत असतांना लेखनासारख्या नवीन क्षेत्रात माझ्यासारख्या नवीन व्यक्तीला काहीतरी लिहिण्याची स्फूर्ती न येओ तर नवलच. मला ह्या संस्थळावर काही गोष्टींची उणीव भासते, ती मी इथे मुद्देसूद मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे मुद्दे सर्व मिपाकर आणि मिपाच्या व्यवस्थापनाला योग्य वाटल्यास ह्या मुद्द्यांवर विचार करावा हि विनंती, मुद्द्यांवरील उपाययोजना जर मिपावर अगोदरच असतील तर जाणकारांनी त्या उपाय योजना समजावून द्याव्यात हि अजून एक विनंती. मुद्दे योग्य न वाटल्यास बिनदिक्कत हा धागा काढून टाकावा.
१. मिपा वर मराठी कसे लिहावे हे मला तरी ४-५ लेखांनंतरही उमगले नाहीये, मी सध्या तरी गुगल चे ऑनलाइन मराठी टूल वापरून लिखाण करतो आहे. अशी समस्या कोणालाही न येवो ह्या साठी मिपावर मराठीतून लिखाणासंबंधी योग्य असे मार्गदर्शन तसेच कोणकोणत्या ब्राउझर्स मध्ये मराठी लिखाण व्यवस्थित्त करता येईल हे देखील नमूद करावे.
२ . मिपावरील सदस्याच्या नावावर टिचकी दिल्यास उघडणार्या पानावर सदस्यांचे छायाचित्र एकतर दिसत नाही किवा किवा ते अगदीच छोटे दिसते, तेव्हा हे छायाचित्र मोठे म्हणजेच चेपु वरील छायाचित्र एवढे दिसेल अशी सोय करावी जेणेकरून लेखक/लेखिका कोण आहे हे समजून घेणे सोपे जाईल व मिपा कट्ट्यावर भेटणारे सर्वच अनोळखी वाटणार नाहीत.
३ . सदस्यांच्या द्रश्य ह्या पानावर चेपुच्या सदस्यत्वाचा दुवा देण्याची ऐच्छिक सोय असावी.
४. सर्व लेख मालिकांमध्ये पुढील व मागील भागांचे दुवे स्वयंचलित रित्या डकवले जातील अशी सोय असावी जेणेकरून लेखक दुवे देण्यास विसरला असता लेखमालिकेतील सर्व लेख सहज रित्या वाचता येतील. मी स्वतः दुव्यांअभावी काही लेखमालिका पूर्ण वाचूच शकलो नाही.
५. एखादा लेख वाचत असताना त्या लेखकाच्या इतर लखांचे दुवे जर डाव्या किवा उजव्या बाजूस दिले गेले तर त्या लेखकाच्या इतर लेखनाचा आनंद वाचकांना सहजच घेता येईल.
वरील मुद्दे सर्वस्वी माझ्या मनाची उपज आहेत, ह्या सर्वात कुठलाही स्वार्थ किंवा हेतू दडलेला नाही. कृपया मिपाकारांनि मुद्द्यातील उपयुक्तता व फोलपणा प्रतिक्रियांमध्ये व्यक्त करावी.
प्रतिक्रिया
25 Oct 2013 - 2:33 am | खटपट्या
एखादा प्रतिसाद आवडला तर "लाइक/आवडले" बटन असावे.
तसेच "असहमत" असे बटनही असावे.
25 Oct 2013 - 10:07 am | क्लिंटन
याविषयी एका अन्य मराठी संकेतस्थळावरील अनुभव बघता असे करू नये असे मला वाटते.एक तर अशा प्रकारची सोय असेल तर त्याचा दुरूपयोग जास्त प्रमाणावर व्हायची शक्यता आहे.लाईक्/डिसलाईक (किंवा मार्मिक्/भडकाऊ इत्यादी) श्रेणी एकदम ऑब्जेक्टिव्हली दिली तरच त्याचा उपयोग होईल.अन्यथा नाही.संकेतस्थळांचे सदस्य हे हाडामासांची माणसे असतात.त्यांना भाव-भावना,मूड इत्यादी प्रकार येणारच.त्यामुळे एकच प्रतिसाद दोन वेगळ्या आय.डींनी लिहिला तर तो प्रतिसाद लिहिणारा कोण आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात.म्हणजे एखादा सदस्य एखाद्या कंपूचा सदस्य असेल तर त्याच कंपूच्या अन्य सदस्यांनी दिलेल्या प्रतिसादाला तो प्रतिसाद पटला नाही तरी वाईट श्रेणी द्यायची शक्यता कमी आणि vice versa. श्रेणी देणारा गोपनीय राहत असला तरी यात फार फरक पडेल असे नाही.कारण" अरे तो माझा चांगला मित्र आहे त्याला वाईट श्रेणी कशी देऊ" या विचारातून बाहेर पडणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. यातूनच कंपूबाजी अगदी चव्हाट्यावर येईल अशी भिती वाटते.त्याचप्रमाणे एखाद्या सदस्याला समजा एखाद्या विषयावर काही मते असतील तर त्या मतांना अनुकूल असलेल्या प्रतिसादांना (भले मुद्द्यांची मांडणी कितीही गचाळ असो, कितीही out of context असो) चांगली श्रेणी दिली जायची शक्यता जास्त आणि vice versa.
नेमके हेच प्रकार इतर मराठी संकेतस्थळांवर बघायला मिळाल्यामुळे आणि ते न पटल्यामुळे इतर ठिकाणांहून मी कायमची रजा घेतली आहे. त्यामुळे इतरांना काही फरक पडत नसला तरी मला नक्कीच पडतो.
असो.हे माझे वैयक्तिक मत आहे.ते कोणाला पटेल अथवा पटणार नाही.यावर आणखी चर्चा करायची माझी इच्छा नाही.
25 Oct 2013 - 10:20 am | प्रभाकर पेठकर
सहमत.
25 Oct 2013 - 10:48 am | चौकटराजा
लाईक व अनलाईक हे चेपू वरचे प्रकरण एक निखालस भंपकपणा आहे. आज सोमवार आहे अशा विधानाला देखील लाईक देणारे शेकडयाने आहेत तिथे.
25 Oct 2013 - 11:00 am | नानबा
सहमत. लाईक / अनलाईक हा प्रकार इकडे न आल्यास उत्तम. लेख आवडल्यास आवडला अशी एकाक्षरी प्रतिक्रिया देणेच इष्ट...
25 Oct 2013 - 2:31 pm | प्रभाकर पेठकर
माझा आतेभाऊ स्कूटरवरून पडला. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले. बेडवर पडल्या पडल्या त्याने फेसबुक वर स्टेटस अपडेट केले. 'स्कूटर घसरून पडलो. पाय फ्रॅक्चर झाला आहे.' 'त्याला ३ लाईक मिळाले.
येता जाता स्टेटस अपडेट करणारा एक मूर्ख आणि 'पाय फ्रॅक्चर झाला' ला लाईक करणारे शतमूर्ख.
25 Oct 2013 - 4:11 pm | बॅटमॅन
हेच स्टेटस एका मुलीने अपडेटवले तर........लाईक अन कमेंटचा महापूर येईल तिकडे ;) अन फ्रॅक्चर कशाला, "आज मला कसंसंच होतंय", "बोट मुरगळलंय", "गुड मॉर्निंग", इ. लिहिलं तरीही असंच दिसतं.
25 Oct 2013 - 4:51 pm | कपिलमुनी
अहो पोरीनी नुसता :( असा स्मायली टाकला तरी १७६० काँमेंटस येतात..
स्त्री-पुरुष लोकसंख्येमधला फरक ... मागणी पेक्षा पुरवठा कमी ..
25 Oct 2013 - 6:36 pm | बॅटमॅन
नुस्ता लोकसंख्येतला फरक नसावा माझ्या मते.
25 Oct 2013 - 6:54 pm | गवि
मुलीचे स्टेटसः
Feeling sad..! :(
कॉमेंट्सः
1. What happened baby?
2. Tryin' to call you dear.. what's wrong.. tell me..
3. Oho..itne cute face pe itna dukh ?? I am coming to you darling.
4. Don't worry. everything will be alright..now give me your schweeeeet smile jaanu..
5. Tears in those blue blue eyes?? Who's the bad bad guy who did it?
..
..
..
..
100. Hope you are fine again like a beautiful rose by now..
पुरुषाचे स्टेटसः
Feeling sad..! :(
कॉमेंट्सः
1. ab kyaa hua bhadve..
2. rote hi rahiyo humeshaa.. doob mar dukhbhari aatma..
खतम..
25 Oct 2013 - 9:54 pm | रेवती
खी खी खी. खरय.
26 Oct 2013 - 5:40 pm | बॅटमॅन
हा लिङ्गभेद दिसत असूनही त्यावर वाचा उठवणारे कोणी नसल्याने एक मिपाकर, पुरुष आणि फेसबुककर म्हणून शरम वाटली.
26 Oct 2013 - 5:48 pm | पिलीयन रायडर
आणि ते ढिगभर लाईक्स देणार्या "पुरुषांचे" तुम्ही काहीच प्रबोधन करत नाही हे पाहुन एक स्त्री, मिपाकर आणि फेसबुककर म्हणुन शरम वाटली!!!
26 Oct 2013 - 6:43 pm | बॅटमॅन
पण ते "पुरुषांचे" ला अवतरणचिन्हे द्यायचे प्रयोजन काही समजले नाही. लाईक्स देणारे पुरुष नसतात असा काही संदेह तर द्यावयाचा नाही ना =))
27 Oct 2013 - 2:33 pm | पिलीयन रायडर
लाइक्स देणारे पुरुष.. त्या बद्दल तक्रार करणारे पण पुरुष.. त्या बद्दल शरम वाटुन घेणारे ही पुरुष..
म्हणुन "पुरुष" .... !!!
28 Oct 2013 - 12:40 am | बॅटमॅन
खरंय. पुरुषांचे असे संवेदनावैविध्य असते.
बायकांचे..............? =))
(पळाल्या गेले आहे)
26 Oct 2013 - 6:46 pm | बॅटमॅन
जास्त म्हणायला १७६० हा आकडा मराठीत का फेमस आहे? पानपताच्या लढाईअगोदरची दोनेक वर्षे मराठी साम्राज्यासाठी सर्वांत जबराट ठरली म्हणून जास्त म्हणजे १७६० सालासारखे जास्त असा काहीसा अर्थ असावा की काय अशी शंका येऊन अंमळ हळवा झालो.
26 Oct 2013 - 8:20 pm | नितिन थत्ते
एका मैलात १७६० यार्ड असतात म्हणून असेल का?
26 Oct 2013 - 11:43 pm | बॅटमॅन
शक्यता रोचक आहे. जरा इकडेतिकडे पाहतो अन विचारतो माजरा काय आहे तो.
27 Oct 2013 - 2:09 am | रमेश आठवले
जा जा - तुझ्या सारखे छप्पन पाहिले आहेत-
असे लोक म्हणतात. यातील छप्पन हा आकडा निवडण्यामागे काय कारण असावे ?
28 Oct 2013 - 12:27 am | खटासि खट
ते दोन्ही आकडे डाव्या कुशीवर निजल्यासारखे वाटतात.
25 Oct 2013 - 4:31 pm | सुमीत भातखंडे
.
26 Oct 2013 - 12:39 am | खटपट्या
ठीक आहे,
कंपूबाजी आहे तर आपल्याकडे
25 Oct 2013 - 3:32 am | निशदे
१. मिपावर इतर वेबसाईट्स(माबो, मीम इ.इ.) प्रमाणेच लेखनाची सोय आहे. त्यामुळे तशी अडचण येऊ नये. पण तरीही येत असली तर थोड्या सरावाने जमू लागेल. आम्हीही आधी गूगलवरून लिहितालिहिता इकडे आलो. आता मात्र तिकडे जाववत नाही.
२,३.वर संपादकच निर्णय घेऊ शकतील.
४. मुद्दा उत्तम, पण हे काम लेखकांना सहज करण्यासारखे आहे.
५. अतिशय उत्तम मुद्दा. सध्या "track" टॅब मध्ये गेल्यास सदर लेखकाचे लेखन+प्रतिक्रिया अशी वाटचाल बघायला मिळते. फक्त लेखन पाहण्यासाठी सोय झाल्यास फार उत्तम होईल. (किंवा सदर सोय आहे पण मलाच अजून सापडली नाही).
25 Oct 2013 - 5:17 am | रेवती
२,३.वर संपादकच निर्णय घेऊ शकतील.
नाय हो. नाय घेता येत हे निर्णय. सुधारणांची आमचीच मोठी लिष्ट आहे. सध्या सगळेच बिज्जी.
25 Oct 2013 - 7:18 pm | भुमन्यु
http://www.misalpav.com/user/NNNN/authored
NNNN = युझर आय. डी. (ट्रॅकवर क्लिक केलं की मिळतो)
उदा. रामदास यांचे सगळे लिखाण वाचण्यासाठी http://www.misalpav.com/user/838/authored ही लिंक वापरा
25 Oct 2013 - 10:20 pm | निशदे
धन्यवाद..... :)
25 Oct 2013 - 3:38 am | बहुगुणी
१. या दुव्याचा वापर करू शकाल. मराठी इथेच टंकलिखित करणं अतिशय सोपं आहे, थोड्याश्या प्रयत्नाने सहज जमेल.
५. एखाद्या लेखकाचे/ लेखिकेचे आधीचे लेख वाचायचे असतील तर http://www.misalpav.com/user/**/authored
इथे शोध घेतलात तर ही माहिती मिळेल. [**=लेखक किंवा लेखिकेचा सभासद क्रमांक]
25 Oct 2013 - 8:24 am | सांजसंध्या
ऑर्कुटवर अॅक्टीव्ह असताना नव्यानेच सुरू झालेल्या या संस्थळाच्या नावापासून उत्सुकता होती. संस्थळाला हॉटेल म्हणणं, हॉटेलमधे आलेले गि-हाईक असे उल्लेख याने सुरुवातीपासूनच वेगळेपण जाणवलं. वृत्तांची माहिती देणारं सदर इथं कुणीतरी चालवायचं. बरेच उपक्रम वेगळे होते.
लेख आणि प्रतिक्रियांच्या झणझणीतपणाने मिसळीची चव टिकून आहे. ती अनुभवायला मराठी आंजाविश्वात मिपाला पर्याय नाही.
25 Oct 2013 - 12:26 pm | कपिलमुनी
खर आहे !!
इथे बरीच नवीन गि-हाईक सापडतात :)
26 Oct 2013 - 11:51 pm | खटासि खट
कुणाला ?
25 Oct 2013 - 10:16 am | भाते
जुन्या मिपा कट्टयाचे वृत्तांत वाचुन बुजुर्ग मिपाकरांची ओळख करून घेणे ही माझ्यासारख्या नवख्या मिपाकराला पर्वणीच असते. सध्या मिपा कट्टयाचे वृत्तांत जनातलं मनातल, भटकंती, काथ्याकुट सारख्या अनेक विभागांत विखुरलेले असतात. त्यामुळे कट्टा वृत्तांत किंवा तत्सम नविन विभाग सुरु करून सर्व कट्टयाचे वृत्तांत एकत्रित करता येणे शक्य होईल का? संमं किंवा बुजुर्ग मिपाकर यावर काही ऊपाय सुचवू शकतील का?
25 Oct 2013 - 10:20 am | अद्द्या
इथे पूर्वी "सर्च" साठी tab एक असायचा .
गेल्या झालेल्या अपडेट च्या वेळेसलाय . तो परत आणता आला तर पहा .
25 Oct 2013 - 10:27 am | अद्द्या
"गेल्या काही दिवसात झालेल्या अपडेट च्या वेळेस गायबलाय . तो परत आणता आला तर पहा . "
असा पाहिजे होतं ते .
यावरून आठवलं .
आपल्या पोस्ट आपण "एडीट" करायची सुविधा पण देता येईल का?
25 Oct 2013 - 10:47 am | मदनबाण
मिपा चे फेसबुक करु नका म्हणजे झाले ! ;)
25 Oct 2013 - 2:04 pm | विजुभाऊ
सध्या खरडवहीतील खरडी डीलीट करायची सोय बंद झालेली आहे.
ती पुन्हा चालू करता येईल का?
25 Oct 2013 - 2:48 pm | पिलीयन रायडर
खरडवही मध्ये उत्तर द्या असा तॅब होता, त्याने डायरेक्ट समोरच्याच्या खरडवही मध्ये जाता येत होते. तॉ सोय परत हवी.
आणि संपादनाची सोय हवीच हवी.
25 Oct 2013 - 2:49 pm | मेघनाद
काही प्रतिसादांमध्ये फारच चांगली माहिती तसेच चांगली चर्चा झाली आहे, मला देखील काही नवीन बाबी समजल्या आहेत.
तसेच मिपा करांना जे बदल आणि ज्या सुधारणा हव्या आहेत त्या इथे मांडल्या जात आहेत.
प्रतिसादांमधून समजलेल्या बाबी तर आम्हास माहीतही नव्हत्या
25 Oct 2013 - 2:49 pm | पैसा
१) सर्व प्रकारची मदत वरच्या बारमधील "मदत पान" या दुव्यात उपलब्ध आहे. तसेही मराठी टंकनासाठी खास काही कष्ट घ्यावे लागत नाहीत. उजव्या कॉलममधील भाषा बदल दुव्यातून मराठी भाषा निवडून सरळ आपण बोलतो तसे टाईप करायला सुरुवात करा. गमभन वापरायला अतिशय सोपे आहे.
२) छायाचित्र देणे न देणे ही प्रत्येकाची आवड-निवड असते. पूर्वी खरडवहीत स्वागताचा मजकूर लिहिताना असा एखादा फोटो/ व्हिडिओ देता येत होता. पण द्रुपल अपग्रेड झाल्यानंतर ते परत सुरू करता आले नाहीये. नीलकांतला वेळ मिळाला की तो नक्कीच याकडे लक्ष देईल.
३) चांगली सूचना आहे. मात्र ज्यांना निवडक लोकांशी संपर्क ठेवायचा असतो ते फेसबुकवरून संपर्क करतातच.
४) लेखमालिकांचे दुवे, सध्या आम्ही लेखक विसरला तर देतोच. पण आधीची एखादी मालिका तुम्हाला मिळत नसेल तर जरूर कळवा. दुवे तयार करून देऊ.
५) लेखकाचे इतर लेखन हा दुवा पूर्वी प्रत्येक लेखावर वापरात होता. मात्र ग्रुपल अपग्रेडनंतर तेही अजून परत सुरू करता आले नाहीये. "शोध" चालत नाहीये, हेही मान्य. पण त्यासाठी बरेच काम आहे. मिपा ३/४ दिवस बंद करावे लागेल. त्यामुळे सध्या ते काम मागे ठेवले आहे.
तुमच्या कळकळीच्या सूचनांसाठी धन्यवाद. मात्र काही गोष्टींबदल मला असे वाटते, की मिपा हे मुख्यतः चांगले लिखाण आणि वाचन सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केले आहे. सोशल इंटरअॅक्शन ही दुय्यम आहे. त्यामुळे अगदी फेसबुकसारखे उपक्रम इथे मिळतीलच असे सांगता येत नाही. द्रुपलच्याही काही मर्यादा आहेत. तरीही जे जे शक्य होईल ते नीलकांत अवश्य करील.
25 Oct 2013 - 7:26 pm | सोत्रि
मात्र काही गोष्टींबदल मला असे वाटते, की मिपा हे मुख्यतः चांगले लिखाण आणि वाचन सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केले आहे. सोशल इंटरअॅक्शन ही दुय्यम आहे.
ह्या पेक्षा जास्त समर्पक उत्तर नसावे!
- (मिपाकर) सोकाजी
25 Oct 2013 - 2:52 pm | मेघनाद
पैसा ताईंना धन्यवाद, नीलकांतजींना शुभेच्छा.
मिपाचा चाहता….
25 Oct 2013 - 3:24 pm | विजुभाऊ
ज्योती ताई.
खरडवहीतील खरडी डीलीट करण्याची सोय द्यायचे बघा ना
25 Oct 2013 - 4:06 pm | सुनील
तुम्हाला कोणाच्या कोणत्या खरडी डिलीट करायच्या आहेत? त्याची यादी इथे द्या. म्हणजे तुमची खव वाचताना आम्ही "त्या" खरडींकडे पाहून न पाहिल्यासारखे करू! ;)
25 Oct 2013 - 7:26 pm | विजुभाऊ
हा हा हा....... पूर्वी म्हणजे फारफार पूर्वी. जेंव्हा शाईने लिहीलेले खोडता येत नसे तेंव्हा त्यावर हरताल नावाची पिवळी पावडर फासत असत. म्हणजे शब्द दिसत असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे.
अवांतरः "हरताळ फासणे" हा शब्द त्यावरूनच आला
26 Oct 2013 - 5:37 pm | असा मी असामी
Mark as Unread सोय पाहिजे कि राव....
26 Oct 2013 - 6:55 pm | रमेश आठवले
प्रतिसादांना त्यांच्या दाखल केल्याच्या वेळेनुसार नंबर देण्यात यावा. सध्याच्या पद्धतीत दोन प्रतिसादांच्या मध्ये नंतर टाकलेले प्रतिसाद घुसवणे शक्य आहे. त्यामुळे नंतर वाचणार्या व्यक्तीला ते सर्व सुसन्गीत रीत्या वाचता येत नाहीत.
26 Oct 2013 - 11:40 pm | भाते
एखाद्या प्रतिसादाखाली दिलेले प्रत्युत्तर लगेच खाली वाचण्यात तर खरी मजा असते. आपण म्हणता त्याप्रमाणे दाखल केल्याच्या वेळेनुसार प्रतिसाद आल्यामुळे कदाचित पाचव्या प्रतिसादाचे प्रत्युत्तर पन्नासाव्या क्रमांकावर असेल तर नक्की हे कुठल्या प्रतिसादाचे ऊत्तर आहे याचा गोंधळ होतो. इतर मराठी संस्थळावर हे अनेकदा होते. यावर सोपा ऊपाय म्हणजे (वेळ असले तर) सगळे प्रतिसाद पुन्हा एकदा वाचणे. वेळ सत्कारणी लागतो, सर्व प्रतिसादांनी छान मनोरंजन होते.
आता ह्याच प्रतिसादाचे उत्तर मी आणखी दहा प्रतिसादांनंतर दिले असते तर तुम्हाला/इतर मिपाकरांना मुळ प्रतिसाद शोधणे कठीण वाटले असते. मिपावर आपण माझ्यापेक्षा जेष्ठ असल्याने लहान तोंडी मोठा घास घेतो आहे.
27 Oct 2013 - 1:58 am | रमेश आठवले
नंबर वेळेप्रमाणे द्या पण प्रतिसादाची जागा तो टंकित करणार्या लेखकालाच ठरवू द्या असे मला म्हणावयाचे आहे.
26 Oct 2013 - 9:44 pm | रमेश आठवले
मेघनाद यांनी दिलेली क्रमांक १ नंबर ची अडचण ---
मी वर दिलेल्या साईट (saait ) चा वापर (vaapr ) करून मराठीत लिहितो. मी मिसळ (misl ) पाव (paav ) चा सदस्य (sdsy ) होई पर्यंत मला मराठी टायपिंग ( taayping )) येत न्हवते आणि त्याचा सुरवातीस खूप त्रास झाला.यावर वर दिलेल्या साईट ने खूप मदत केली.याची काही उदाहरणे वर दिली आहेत.
इंग्लिश स्पेलिंग मराठी उच्चारा प्रमाणे करावे लागते. आपल्याला अभिप्रेत मराठी शब्द आला नाही तर एक स्पेस मागे गेल्या ५-६ पर्यायी शब्द मिळतात .
एखादा लांबलचक शब्द मला जमला नाही तर मी त्याचे विभाजन करून ते शब्द टंकित करतो व नंतर त्याना जोडून घेतो.
27 Oct 2013 - 6:52 am | वेल्लाभट
नमस्कार,
माझं असं सुचवणं आहे की मिपा वर एक जाहिरातींचा विभाग असावा जिथे लोकांना घर विकणे आहे, घेणे आहे, किंवा अशा छोट्या जाहिराती टाकता येतील.
27 Oct 2013 - 9:35 pm | निम
ज्या प्रमाणे विविध blogging sites वर # वापरून tagging करता येतं तशीच सुविधा मिपा वर उपलब्ध झाली तर उत्तमच . याचा फायदा असा कि विविध शोधयंत्रे वापरून मिपावरील धागे शोधणे सोप्पे होईल .