माध्यमे आणि मोदीविरोध

इष्टुर फाकडा's picture
इष्टुर फाकडा in काथ्याकूट
12 Sep 2013 - 1:55 pm
गाभा: 

मी दररोज मटा, लोकसत्ता आणि सकाळ (लोकसत्ता प्रामुख्याने) हि वृत्तपत्रे वाचतो/चाळतो. त्यातले मटा हे लेटेस्ट बातम्यांसाठी ('बातम्या' या शब्दाबद्दल मतभेद मान्य), सकाळ हे पत्रकारितेतल्या पक्षपातीपणाच्या प्रत्ययांसाठी आणि लोकसत्ता तुलनात्मक दर्जासाठी वाचत असतो. बातम्यांमधील मजकुरातून राजकीय पक्षांच्या धोरणात्मक हालचालीतून प्रेरित केली जात असणारी विधाने, कुरघोड्या, मारलेल्या कोलांट्या उड्या आणि उधळलेली मुक्ताफळे यातले भेद आणि समयोचित संधिसाधुपणा या गोष्टी मला track करायला आवडतात.

पण गेल्या काही दिवसात माध्यमांमधील पक्षपातीपणा अचानक नागडेपणाने समोर येवू लागला आहे. असं मला वाटतं. सकाळ ने घेतलेली राष्ट्रवादीची सुपारी आपण सगळेच ओळखून आहोत, म्हणजे असावोत (काल सलग तीन मोदींच्या बातम्या होत्या सर्व बातम्यांवर कोंग्रेसी चाप असूनही 'लाइक्स' चे प्रमाण अचंबा वाटावा इतके मोदींच्या बाजूने. बहुतेक म्हणूनच तासाभरात सर्व प्रतिक्रिया आणि लाइक्स वगैरे वगळून 'रिफ्रेश' मारल्यासारखा ई-पेपर दिसू लागला !). पण हल्ली जो सरळसोट खुला 'प्रोपागांडा' (हि हि...असो,) वाटावा असा प्रकार लोकसत्ताचाही चालू आहे त्याने खचितच वाईट वाटले. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कि मी जरी भाजपचा (मोदींचा) समर्थक असलो तरी गिरीष कुबेरांचे अग्रलेख मला आवडतात. त्यांच्या लिखाणात मोदींबद्दल थोडासा कडवट भाव असूनसुद्धा वास्तवाला स्वीकारण्याची भूमिका असते. नियोजन आयोगाच्या आकड्यांवर आधारभूत भूमिका घेऊन 'महाराष्ट्रच गुंतवणुकीत नंबर वन' या सिएम च्या विधानावर त्यांनी अग्रलेखात कडक फटके टाकले होते हे आपल्यापैकी काही लोकांना आठवत असेल. पण कालच्या 'दंगल आवडे सर्वांना' या अग्रलेखात सरळ सरळ भाजपवर आरोप झालेले आहेत ! या दंगलीचा आणि अमित शहांना प्रभारी नेमण्याचा त्यांनी सरळ दंगलीशी समंध लावला आहे*. आज राहुल'जीं' च्या मोदिंवरील बुळबुळीत टीकेला 'कडाडणे' वगैरे विशेषणे बहाल केली आहेत**. आणि यासारख्या अनेक उदाहरणातून या सगळ्याला एक दिशा आहे असे जाणवू लागले आहे. हा एक षड्यंत्र सिद्धांत काहींना वाटू शकतो, मलाही सुरुवातीला हेच फिलिंग होते पण माध्यमांच्या धोरणात झालेला बदल ठळक आहे. प्रसून जोशी हा मनुष्यविशेष मला परवापर्यंत जरा 'सुलझा हुवा' वाटत होता...पण दाभोलकर हत्येनंतर याने च्यानलावर आणि त्याच्या चेपुवर जो काही वैचारिक जुलाब केलाय त्याने याच्या पत्रकार म्हणून लायकीवर संशय यावा. हल्ली हगल्या मुत्ल्याचाही जो ताणून कुंथून मोदीशी समंध लावला जात आहे त्याला बुरखाही ('मुखवटा' या अर्थाने- मोदींचे समर्थकांना अखंड सावध राहावेच लागते.) नेसवत नाहीयेत हि मंडळी. इतका टोकाचा विरोध का ? या प्रश्नाने बरेच दिवस माझे डोके खाल्ले होते...२००२ वगैरे मध्ये काही तथ्य नाही हे तर आता साक्षात काँग्रेस च्या राज्यात सर्वोच्च न्यायालयाने बसवलेल्या समितीने स्पष्ट केले. भट्टाचेही आरोप राजकीय दृष्टीने प्रेरित होते, त्याला राजकीय फूस होती हेही सांगितले***. वांजाराला तर सीबीआय नेच हाड म्हटले****. असे सगळे होवूनही स्वकियांचाच मोदींना विरोध? हे काही पटत न्हवते आणि 'हा' लेख वाचनात आला. त्याचे भाषांतर(लायकीनुसार केलेले)खाली देत आहे. यात तथ्य असावे असे वाटते आहे.

An outsider in a private club by Tavleen Singh.

मोदींचे कालचे भाषण हे मोदींच्या ऐवजी राहुल गांधींनी दिले असते तर राहुल हे देशाची तेजपुंज 'आशा' ठरले असते. जर ते भाषण लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी दिले असते तर भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ काही काळ विसरली जावून कदाचित थोडा आशावाद निर्माण झाला असता. एवढेच काय तर देशातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी तेच भाषण केले असते तर राजकीय पंडितांनी ते लक्षपूर्वक ऐकले तरी असते. पण केवळ भाषण मोदींनी केल्यामुळेच त्यावर टीका होणे अपरिहार्य होवून गेले. भाषणातले त्यांचे मुद्दे तर चोख होते म्हणून मग मूळ भाषणावर चर्चा, टीका करायची सोडून काहीतरी तिसरेच बोलून त्यांना निशाण्यावर धरणे हे गरजेचे झाले. मोदींना स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधानांना झाकोळून टाकण्याची गरज काय होती? एक लक्षात घेणे महत्वाचे आहे कि, स्वातंत्र्यदिनाची जादू हळूहळू ओसरत जावून तो दिवस आता सरकार दरबारी उपचारमात्रच उरला आहे. या दिवसाला स्फूर्तीदायक भाषणे देणारे नेते आपल्याला हवे आहेत पण हि कल्पना मोदींना सुचली याने काही लोकांना मिरची झोंबली. ती इतकी कि त्यांचे पूर्वाश्रमीचे राजकीय गुरु, अडवाणी यांनीही त्यांना 'या दिवशी तरी नेत्यांनी टीका टाळली पाहिजे' असे सुनावले. काय कारण??

शिवाय असे म्हणून अडवाणी लगेच राष्ट्रपती भवनात सोनियांच्या सोबतीत चहापानाच्या कार्यक्रमाला गेले. ही घटना विशेषेकरून मला विचारप्रवण करते. या मंथनातून मी या निष्कर्षाप्रत आलेलो आहे कि दिल्लीतल्या तारांकित नेत्यांना मोदी हे घोड्यांच्या शर्यतीत रेडा घुसवल्यासारखे खुपतात. मोदी (त्यांच्या दृष्टीने) 'चुकीच्या' वर्गातून (class) आणि जातीतून आलेत, त्यांना अस्खलित इंग्रजी बोलता येत नाही, भारतातल्या महनीय घराण्यावर टीका करण्याची त्यांची हिम्मत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारतातल्या तथाकथित समाजवादाला आणि सर्वधर्मसमभावाला ते कवडीत मोजतात.
समाजवाद आणि सर्वधर्मसमभाव या दोन कल्पना लुत्येन दिल्ली मधल्या वलयांकित भागात ज्यांची उठबस असते अशा लोकांना अतिशय पवित्र अशा आहेत. सर्वच उच्च राजकीय नेत्यांना किंवा महत्वाच्या संसदीय महारथींना या पंचतारांकित 'क्लब' मध्ये प्रवेश मिळेलच असे नाही. तुम्हाला राजकीय राजपुत्र असणे किंवा थंड हवेच्या रमणीय ठिकाणांहून इंग्रजी भाषेत तुमचे वलयांकित शिक्षण झालेले असणे या गोष्टी सहज वाजतगाजत प्रवेश मिळवून देतात. अशा वातावरणातून आलेल्या हुच्च लोकांना इथले नियमही समजण्यास सोपे जातात. त्यातला एक अधोरेखित नियम म्हणजे सेक्युलर आणि लिबरल मते'च' व्यक्त करायची असतात आणि महनीय घराण्याबाबत उगी राहावयाचे असते.
असे उगी राहिले कि कौटुंबिक लोकशाहीमुळे अतिशय स्पष्ट दिसणारी हानी देशाला होत असूनही माध्यमांमध्ये त्याचा गवगवा होत नाही.

अशा क्लाबांचे तुम्ही एकदा सभासद झालात तुम्हाला जवळजवळ रोजच अलिशान बंगल्यांमध्ये किंवा हॉटेलांमध्ये डिनर पार्ट्यांची अवताणे येवू लागतात. संसदेत एकमेकांच्या धोतराच्या चिंध्या करायला सरसावलेले वेगवेगळ्या पक्षातले लोक वर्गामित्रांसारखे गळ्यात गळे घालून मेडीयामधल्या धुरिणांना आपल्या बोलण्यात 'ऑफ द रेकॉर्ड' सामावून घेत असतात. एखाद्या माझ्यासारख्या मुर्ख माणसाने या क्लबांचे नियम मोडले कि मणिशंकर अय्यर सारख्या अतिशय मोठे थोबाड असलेल्या गांधी घराणे भक्त माणसाला माझ्यावर सोडले जाते. असो, विषयांतर होते आहे.

या स्तंभाच्या शब्दमर्यादेमुळे मी इथे एकच मुद्दा नोद्वू शकतो आणि आजच्या आठवड्यातला तो मुद्दा हा आहे कि मोदींच्या बोलण्यातले मुद्दे त्यांना गोत्यात आणत नाहीत, गुजरात दंगलींच्या वेळेस त्यांनी जे केले किंवा नाही केले तेही त्यांना अडचणीत आणत नाही कारण १९८४ च्या नंतर राजीव गांधी सुद्धा स्वीकार्ह्य राहिले होतेच. नरेंद्र मोदींचे नरेंद्र मोदी असणे हीच त्यांची समस्या आहे.

ते भारतातल्या एका अशा वर्गाचे प्रतिनिधित्व करतात कि जो वर्ग ल्युतेन दिल्लीतल्या या क्लबांपासून काळजीपूर्वक बाजूला ठेवला गेला आहे. कारण हा रांगडा, चिडलेला आणि अतिशय मनस्वी असा वर्ग या पंचतारांकित खासगी क्लबांचे अस्तित्व जुमानितच नाही. याच वर्गाच्या बंडामुळे ब्रिटिशांनी जन्माला घातलेल्या आणि सर्व भारतातल्या राजकीय सत्तेच्या चाव्या जवळ असलेल्या बंद भिंतीतल्या साहेबी थाटांवर गंडांतर येण्याचा धोका तयार होत असतो. हा धोका या इंग्रजाळलेल्या धुरिणांना सध्या अस्वस्थ करतो आहे.

साहजिकच, काँग्रेस पार्टीतल्या सर्व हालचाली सध्या मोदींना दिल्लीपासून दूर ठेवायच्या दृष्टीनेच चालू आहेत. आणि या हालचालींना भाजपमधल्या सर्वोच्च नेत्यांचीही साथ मिळत आहे. त्यामुळेच काल पर्यंत बाबरी मशिदीच्या पतनाला कारणीभूत ठरलेले अडवाणी काँग्रेस ला अचानक 'मध्यममार्गी' मवाळ वाटू लागले आहेत. प्रत्यक्षात सर्वांनाच, कदाचित खुद्द अडवाणींना सुद्धा हे माहितीये कि जर याही निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचाराची सूत्रे अद्वानिन्च्याच हातात राहिली तर भाजप पुन्हा पाच वर्षांसाठी विरोधी पक्षात बसेल पण निदान त्यामुळे त्यांना मोदींपासून दिल्लीतल्या क्लबांच्या भिंती तरी सुरक्षित ठेवता येतील.

--तवलीन सिंग, द इंडिअन एक्स्प्रेस. Sun Aug 18 2013, 05:45 hrs

* http://www.loksatta.com/sampadkiya-news/the-real-story-behind-muzaffarna...
** http://www.loksatta.com/desh-videsh-news/rahul-gandhi-slams-narendra-mod...
*** http://maharashtratimes.indiatimes.com/nation/sanjeev-bhatt-forged-evide...
**** http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Vanzaras-letter-has-only-p...

प्रतिक्रिया

महेश_कुलकर्णी's picture

12 Sep 2013 - 2:13 pm | महेश_कुलकर्णी

आपण उत्तम लेख लिहिला आहे पण एक शंका आहे ...माझ्यामाहितीनुसार कुमार केतकर सध्या लोकसत्ता मध्ये नाही तर दिव्यमराठी मध्ये लेख लिहीत असतात. लोकसत्ताचे लेख गिरीष कुबेर लिहीत असतात.

इष्टुर फाकडा's picture

12 Sep 2013 - 2:21 pm | इष्टुर फाकडा

लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद ! संपादकांनी कृपया तिथे केतकरांना काढून गिरीष कुबेर नेमावेत हि विनंती :)

अनिरुद्ध प's picture

12 Sep 2013 - 2:27 pm | अनिरुद्ध प

लोक्सत्ताचे सद्ध्याचे सम्पादक गिरीश कुबेर आहेत.

तिरकीट's picture

12 Sep 2013 - 2:30 pm | तिरकीट

प्रसून जोशी हा मनुष्यविशेष मला परवापर्यंत जरा 'सुलझा हुवा' वाटत होता...

तिथे प्रसन्न जोशी पहिजे.....
प्रसून बिचारा कविता लिहितोय....लिहु दे

इष्टुर फाकडा's picture

12 Sep 2013 - 2:57 pm | इष्टुर फाकडा

नाव आणि व्यक्तिमत्वाच्या परसेप्शन मध्ये विरोधाभास असल्याने चुकलं बहुतेक ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Sep 2013 - 11:01 am | llपुण्याचे पेशवेll

२७ ऑगस्टला कोर्टात काय झाले हे वाचण्यास उत्सुक आहे.

इष्टुर फाकडा's picture

13 Sep 2013 - 5:34 pm | इष्टुर फाकडा

छे छे ! तुमचं आपलं काहीतरीच हा पुपे. असं असतं का कधी ;)

आशु जोग's picture

12 Sep 2013 - 3:33 pm | आशु जोग

प्रसन्न जोशी ह बर्‍याचदा बालवाडी मुलगा वाटतो. समोर कितीही मोठा माणूस असला तरी त्याला किम्मत न देणे. स्वतःला सर्वज्ञ समजणे हे गुण त्याच्यात आहेत. कधी कधी त्याला चर्चेमधे अलिप्त राहणे त्याला जमत नाही. अशा वेळी सुधीर गाडगीळ यांच्यासारख्यांची फार कमतरता जाणवते.

असो

अरुण टिकेकर, गिरीश कुबेर, विजय कुवळेकर, कुमार केतकर अशी माणसे कायमची लक्षात राहतात. प्रसन्ना काय आज आहे उद्या नाही. दुसरा तो नि वा. ("माधव भंडारी मला उत्तर हवय" किंवा "जिंतेंद्र आव्हाड, ब्रेकनंतर मी तुमच्याकडे येणार आहे") खोटा आक्रमकपणा दाखवत नौटंकी करत असतो

तिरकीट's picture

12 Sep 2013 - 3:36 pm | तिरकीट

प्रसन्न काय, नि. वा काय....बरेचदा चर्चेचा निर्णय ठरवूनच चर्चा चालू करतात....राजीव खांडेकर त्यामानानं जरा ठिक बोलतो...

आशु जोग's picture

12 Sep 2013 - 3:45 pm | आशु जोग

प्रसन्न आणि निवा पेक्षा WWF बरे

देवांग's picture

13 Sep 2013 - 9:16 pm | देवांग

एकदा निखिल वागळे साहेब आजचा सवाल संपवुन घरी येतात. घरातले वातावरण गरम दिसते. श्रीमती रागावलेल्या असतात.

श्रीमती : रोज रात्री 12 , 1 वाजतात यायला तुम्हाला, घराची तर काही काळजीच नाही. जेव्हा बघावं तेव्हा हातवारे करत बातम्या देता. रात्री झोपेत सुद्धा भाई एक मिनिट थांबा, चांदुलकर पूर्ण करा, अण्णा बोला बोला, मेधा ताई याच उत्तर द्या अशी नावं घेता. स्वतः झोपत नाहीच, मलाही झोपु देत नाही.

वागळे(हातवारे करत) - काय मागण्या आहेत आपल्या? यावर आपणाला शांततेच्या मार्गाने उपाय काढता येणार नाही का ?

श्रीमती - मलाही वाटतं, तुम्ही कधी तरी प्रेमाचेदोन शब्द बोलावे माझ्याशी, एखादी छानशी चारोळी लिहावी माझ्यासाठी, पण तुमचं आपलं फक्त आँफिस आणि बातम्या हं हं हअअअअअअ

वागळे - ठीके, अहो तुम्ही रडु नका. यावर उपाय आहे. मला उत्तर देऊ द्या. हे माझं घर आहे, मला बोलु द्या. उत्तर देण्यापूर्वी आपण घेउया एक ब्रेक. ब्रेकवर जाण्यापुर्वी माझा प्रश्न पहा
घरातील लोकांना मि वेळ देत नाही हा आरोप योग्य आहे का ?
होय म्हणतात 99 टक्के लोक,
जनता श्रीमतीच्या बाजुने आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी माझे उत्तर देखील ऐका, श्रीमतीजींसाठी एक चारोळी,

तेरे प्यार में लिखे मैने हजारो खत,
तेरे प्यार में लिखे मैने हजारो खत,
अचूक बातमी ठाम मत पहा फक्त आयबीयन लोकमत....​

आशु जोग's picture

13 Sep 2013 - 11:58 pm | आशु जोग

खत लिखा तो पोस्ट भी करना पडता है.

बा द वे

कुठलाही प्रश्न पडला की दहिहंडी फेम आव्हाडांना विचारावे. ते अतिशय धीरोदात्तपणे उत्तर देतात.

आशु जोग's picture

16 Jul 2015 - 10:31 pm | आशु जोग

आजही हा धागा तितकाच रीलेव्हंट आहे म्हणून उजाळा दिला

पिंपातला उंदीर's picture

12 Sep 2013 - 3:45 pm | पिंपातला उंदीर

मोदी यांचे टीकाकार त्यांचे जेव्ढे नुकसान करित नाहित तेवधे त्यांचे आन्धळे समर्थक करत आहेत. बाकी चालू दया

अनिरुद्ध प's picture

12 Sep 2013 - 3:58 pm | अनिरुद्ध प

कोणाचेही समर्थक हे आन्धळेच असतात.

इष्टुर फाकडा's picture

12 Sep 2013 - 4:05 pm | इष्टुर फाकडा

समर्थन आंधळे कि डोळस हे या लेखावरून ठरवत आहात काय? लेख मोदींच्या समर्थनासाठी नाही. लेख मोदींना त्यांच्याच पक्षातून विरोध का होत असावा याचा आढावा घेण्यासाठी एक नवीन बाजू प्रकाशात आणतो कि जी या आधी लक्षात माझ्यातरी आली न्हवती. बाकी जनरलायझेशनच करायचे असेल तर काय म्हन्ना नाय आमचा :)

पिंपातला उंदीर's picture

12 Sep 2013 - 4:26 pm | पिंपातला उंदीर

मी कधि म्हन्तल की तुम्ही आन्धले समर्थक आहात अस. कैचया कई. मी तर सध्या सर्वत्र मोदी समर्थकान मध्ये जो उन्माद आहे त्या बद्दल बोलत होतो. बाकी उग्रवादी नेत्याना त्यांचयाच पक्षामधुन नेहमिच विरोध होतो. हिटलर ला सुद्धा विरोध zआला होता त्याचया पक्षामधुन.

इष्टुर फाकडा's picture

12 Sep 2013 - 5:17 pm | इष्टुर फाकडा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

आता कस ब्वल्लाव ? उसिरा समजलाव उत्तर कोनाला हाय ते कस ?

क्लिंटन's picture

14 Sep 2013 - 7:16 pm | क्लिंटन

मोदी यांचे टीकाकार त्यांचे जेव्ढे नुकसान करित नाहित तेवधे त्यांचे आन्धळे समर्थक करत आहेत.

याची मोदी समर्थकांपेक्षा मोदी विरोधकांनाच चिंता का असते हे मला न उलगडलेले कोडे आहे.मध्यंतरी काही चॅनेलवर ओपिनिअन पोल्स आले होते आणि त्यातून त्रिशंकू लोकसभा येणार असे निष्कर्श निघाले.त्यातून मग मोदींना इतर पक्षांचे समर्थन मिळणार नाही आणि सरकार स्थापन करायचे असेल तर भाजपला मोदींऐवजी वेगळा पंतप्रधान द्यावा लागेल अशा स्वरूपाचे चित्र उभे राहिले. असे झाल्यास नमो-नमो असा जप करणाऱ्या मोदी समर्थकांचे नंतर काय होणार अशा स्वरूपाचे किमान १२ फेसबुक पोस्ट मी स्वत: बघितलेले आहेत.मला एक प्रश्न नेहमी पडतो मोदी समर्थकांचे जे काय व्हायचे ते होईल त्याची चिंता इतरांनी करायचे काय कारण आहे?

बाकी चालू द्या.

पिंपातला उंदीर's picture

14 Sep 2013 - 8:03 pm | पिंपातला उंदीर

हात तिच्या ! तुम्ही आकाशाखालील प्रत्येक गोष्टिवार मत मोठ मोठे प्रतिसाद पाडुन दयायची. इतारानी तस करायला गेल तर तुम्ही फिकीर का करता म्हनून विचारपुस करता? भले!

क्लिंटन's picture

14 Sep 2013 - 8:13 pm | क्लिंटन

तुम्ही आकाशाखालील प्रत्येक गोष्टिवार मत मोठ मोठे प्रतिसाद पाडुन दयायची.

अच्छा म्हणजे आकाशाखाली केवळ अर्थशास्त्र, राजकारण अशा स्वरूपाच्या ४-५ गोष्टीच आहेत तर.याची कल्पना नव्हती. धन्यवाद.

आशु जोग's picture

14 Sep 2013 - 11:19 pm | आशु जोग

मोदीसमर्थकांची आपण काळजी करतो आहोत असे भासवून अंतस्थ हेतू त्यांच्या खच्चीकरणाचाच असतो.

मला एक प्रश्न नेहमी पडतो मोदी समर्थकांचे जे काय व्हायचे ते होईल त्याची चिंता इतरांनी करायचे काय कारण आहे?

नेमके =)) अहो चिंता करितो विश्वाची छाप मतपिङ्का टाकून वर प्रतिपक्षाला झोडण्याचे एक विकृत सुख मिळते त्याची बरोबरी कशानेही होऊ शकत नै.

क्लिंटन's picture

15 Sep 2013 - 8:28 am | क्लिंटन

चिंता करितो विश्वाची छाप मतपिङ्का टाकून वर प्रतिपक्षाला झोडण्याचे एक विकृत सुख मिळते त्याची बरोबरी कशानेही होऊ शकत नै.

अगदी अगदी.हा ढोंगी प्रकार त्याच्यामुळे अगदी भयंकर डोक्यात जातो. बहुदा अशा ढोंग करणाऱ्या अहो रूपम अहो ध्वनीम छाप प्रतिसादांना "मार्मिक" इत्यादी श्रेणी इथे मिळत नाही हे कारण असावे कदाचित :)

क्लिंटन's picture

15 Sep 2013 - 8:31 am | क्लिंटन

अरे मधले एक वाक्य चुकून डिलिट झाले की काय? सुधारित प्रतिसादः

अगदी अगदी.हा ढोंगी प्रकार त्याच्यामुळे अगदी भयंकर डोक्यात जातो. असे प्रकार हल्ली मिपावर त्यामानाने कमी दिसतात. बहुदा अशा ढोंग करणाऱ्या अहो रूपम अहो ध्वनीम छाप प्रतिसादांना "मार्मिक" इत्यादी श्रेणी इथे मिळत नाही हे कारण असावे कदाचित :)

इष्टुर फाकडा's picture

15 Sep 2013 - 12:45 pm | इष्टुर फाकडा

तुमचे टंकन श्रम फुकट आहेत.

चिगो's picture

12 Sep 2013 - 4:46 pm | चिगो

एकाच वृत्तसंस्थेचे मराठी वृत्तपत्र काँग्रेसधार्जिणी भुमिका घेते आणि इंग्रजीतले काँग्रेसला हाणते..

अनिरुद्ध प's picture

12 Sep 2013 - 4:51 pm | अनिरुद्ध प

होनारच कारन त्याना माहीत हाय म्हारात्रात हिन्ग्रजी लै कमी लोकास्नी समजता,काय मी जे बोल्लु ते बराबर का न्है ?

अशोक पतिल's picture

12 Sep 2013 - 4:55 pm | अशोक पतिल

राजकारणाची इनसायडर स्टोरी ! खरेतर राजकारण वरून दिसते तसे नसते हेच खरे .आपण सामान्याच्या हे ल़क्षात येत नाही .

चेतनकुलकर्णी_85's picture

12 Sep 2013 - 7:30 pm | चेतनकुलकर्णी_85

(पेड )मेडिया लोकशाहीचा चौथा खांब असतो म्हणे !

चेतनकुलकर्णी_85's picture

12 Sep 2013 - 7:36 pm | चेतनकुलकर्णी_85

ह्या काथ्याकुट चे शिर्षक "मेडिया मोदीविरोध व कॉंग्रेस चा मलावरोध " असे हवे होते !

पैसा's picture

12 Sep 2013 - 9:18 pm | पैसा

"आउटसायडर्सं"ना पाय रोवायला नेहमीच त्रास होतो.

मालोजीराव's picture

12 Sep 2013 - 9:26 pm | मालोजीराव

'महाराष्ट्रच गुंतवणुकीत नंबर वन'

चावटमेला's picture

13 Sep 2013 - 10:17 am | चावटमेला

सुमार 'घेत'करी परंपरा अबाधित असल्याचे पाहून डोळे पाणावले. तसंही लोकसत्ता कधीच आवडला नाही. आपले अस्सल ब्रँड तीनच - पुढारी,पुण्य नगरी आणि संध्यानंद ;)

आशु जोग's picture

13 Sep 2013 - 7:30 pm | आशु जोग

लोकसत्ता - मुंबईकरांना काही आवडते, पुणेकर कसा चोखंदळ...

देवांग's picture

13 Sep 2013 - 9:13 pm | देवांग

राजनाथ : आडवाणी जी , अब मान भी जाइए
आडवाणी : ना , मैं ना मानूंगा
राजनाथ : ऐसा क्या करते हैं आडवाणी जी , मेरी बात रख लीजिये
आडवाणी :बिलकुल नहीं , मैं मोदी से सहमत नहीं
राजनाथ : देखिये जनता चाहती हैं मोदी को , हमें जनहित में चलना होगा
आडवाणी : कदापि नहीं , अगर मोदी आये तो मैं इस्तीफा दे दूंगा
राजनाथ : देखिये अब मोदी ही पीएम कैंडिडेट होंगे ,आप माने या ना माने
आडवाणी : आपको मोदी और मुझमे से किसी एक को चुनना होगा
राजनाथ : ह्म्म्म..ठीक हैं फिर, मैं चलता हु आगे आपकी मर्जी..मैं मोदी के साथ हु
आडवाणी :hmmmm ...........

राजनाथ जाने को खड़े हुए , दरवाज़े तक पहुचे ही थे की पीछे से आवाज़ आई

आडवाणी :राजनाथ जी |
राजनाथ : जी , आडवाणी जी
आडवाणी : ऐसे क्या जा रहे हैं , अरे मैंने ना मानने की कसम थोड़े ही ना खा रखी हैं , थोडा जोर देकर मनाइए आई-शपथ मैं मान जाऊंगा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Sep 2013 - 11:37 pm | निनाद मुक्काम प...

लेखातील भावना आवडल्या पण मुद्दे पटले नाही.
ह्याच दिल्लीला स्वदेशी शिक्षण घेतलेले साधे वाजपेयी चालले अगदी देवी गौडा ते वि पी सिंग चालले त्यामुळे मोदी
ह्यांना लेखात दिलेल्या निकषात ते बसत नाही म्हणून विरोध होत नसावा.
किंबहुना भारतातील ७० टक्के कंपन्यांचे सी इ ओ ह्यांनी मोदी ह्यांच्या नावाला पसंती दिली
युवराजांना ५०० कोटीचे कंत्राट द्यावे लागले.
आज सगळ्यात हायटेक नेता म्हणून मोदी ह्यांचे नाव आहे.
मोदी ह्यांना विरोध ह्यासाठी की हाच एक नेता जनतेला आपल्या पाठी उभा करू शकतो ह्याला व्यवस्थेत परिवर्तन आणायचे आहे गुजरात सारखा भारताचा विकास करायचा आहे.
त्यांचे विकासाचे मॉडेल परिपूर्ण नसेल कदाचित त्यांच्या विचारसरणीवर काहीच आक्षेप असेल पण सध्याच्या नेत्यांच्या मांदियाळीत तेच उजवे आहेत.
त्यांना तुलना देणारा देशी व विदेशी लोकप्रियता व हवा असलेला नेता सध्या भारतात नाही
येथे कोण कोण पंतप्रधान होऊन गेले मग मोदी ह्यांनी काय पाप केले आहे.

इष्टुर फाकडा's picture

14 Sep 2013 - 5:20 pm | इष्टुर फाकडा

वाजपेयी हे नेमस्त, व्यवस्थेला आव्हान न देता कलाकलाने जाणारे नेते म्हणून ओळखले जात होते. बाकी देवेगौडा हा शुद्ध अपिरीहार्यतेतून झालेला अपघात होता हे कोणीही मान्य करेल. व्ही पी सिंग- माहित नाही. मुख्य आक्षेप महा'रथी' वर आहे.
शिवाय, मोदी हा माणूस सत्तेवर आला कि दिल्लीतली परिमाणे बदलून जातील कि काय हि भीती बाकी नेत्यांना आहे असा लेखातला भाव आहे ज्याला मी तरी सहमत आहे.

मंदार कात्रे's picture

14 Sep 2013 - 3:14 pm | मंदार कात्रे

||सध्या भारतात दाढ्या कुरवाळणाऱ्या तर महाराष्ट्रात शेंड्या पिरगाळणाऱ्या लोकांना अनुक्रमे धर्मनिरपेक्ष व पुरोगामी असे म्हणतात.||

मंदार कात्रे's picture

14 Sep 2013 - 3:15 pm | मंदार कात्रे

सहमत

आशु जोग's picture

14 Sep 2013 - 3:18 pm | आशु जोग

स्वतः स्वतःशीच सहमत !

मंदार कात्रे's picture

14 Sep 2013 - 3:33 pm | मंदार कात्रे

चेतन कुलकर्णी यान्चेशी सहमत

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Sep 2013 - 7:23 am | निनाद मुक्काम प...

फाकडा साहेब
तुम्ही तुमच्या लेखाशी सहमत असालच त्यात नवल ते काय
समाजवाद आणि सर्वधर्मसमभाव या दोन कल्पना लुत्येन दिल्ली मधल्या वलयांकित भागात ज्यांची उठबस असते अशा लोकांना अतिशय पवित्र अशा आहेत. सर्वच उच्च राजकीय नेत्यांना किंवा महत्वाच्या संसदीय महारथींना या पंचतारांकित 'क्लब' मध्ये प्रवेश मिळेलच असे नाही. तुम्हाला राजकीय राजपुत्र असणे किंवा थंड हवेच्या रमणीय ठिकाणांहून इंग्रजी भाषेत तुमचे वलयांकित शिक्षण झालेले असणे या गोष्टी सहज वाजतगाजत प्रवेश मिळवून देतात. अशा वातावरणातून आलेल्या हुच्च लोकांना इथले नियमही समजण्यास सोपे जातात. त्यातला एक अधोरेखित नियम म्हणजे सेक्युलर आणि लिबरल मते'च' व्यक्त करायची असतात आणि महनीय घराण्याबाबत उगी राहावयाचे असते.
असे उगी राहिले कि कौटुंबिक लोकशाहीमुळे अतिशय स्पष्ट दिसणारी हानी देशाला होत असूनही माध्यमांमध्ये त्याचा गवगवा होत नाही.
मला हे मुद्दे पटले नाहीत.
मुळात मोदी हे गुजरात चे मुख्यमंत्री गुजरात जो आधीपासून विकसित होता त्याला त्यांनी अजून विकसित केला.
राहिला प्रश्न परदेशात , शिक्षण , ते विंग्रजी भाषा न बोलणे व उच्चभ्रू संस्कृती त न झालेले बालपण
तर गुजराती धीरु भाई अंबानी सुद्धा ह्या निकषात बसत नव्हता तरी त्यांनी दिल्ली व तेथील नेते आपल्या मुठीत ठेवले.
आज अंबानी भाऊ ते टाटा असे भारतातील उद्योग जगतातले दोन प्रमुख खेळाडू ,
दोघांच्या मानसिकता , व्यापारिक धोरणे ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे
मात्र दोघांच्या लेखी आदर्श नेता नरेंद्र मोदी आहेत.
जागतिक पातळीवर बोलबाला असलेले आजच्या घडीला मोदी हे एकमेव नाव आहे ,
मनमोहन ह्यांची आंतरराष्ट्रीय जगतात त्याच्या हुशारीमुळे कौतुक होते , पण ते राजकारणी नाहीत हे परदेशात काय देशात सुद्धा सगळ्यांना माहिती आहे
तेव्हा जागतिक पातळीवर नावाजलेला आजच्या मितीत एकमेव नेता म्हणजे नमो

इष्टुर फाकडा's picture

15 Sep 2013 - 12:36 pm | इष्टुर फाकडा

निनाद, लेख माझा नाही. प्रस्तावना माझी आहे. लेख इंडिअन एक्स्प्रेस च्या तवलीन सिंघ यांचा आहे. बाकी तुमच्या मताचा आदर आहेच.

गुजरात जो आधीपासून विकसित होता त्याला त्यांनी अजून विकसित केला.

यासाठी काही आकडे आकडे
या दुव्यावरून थोडी कल्पना यावी...

लिओ's picture

17 Jul 2015 - 12:49 am | लिओ

नेत्याचे आंधळे समर्थक आंधळेपणाने व नेत्याबद्दल फक्त चांगले बोलतात. मे २०१४ पासुन समर्थक असे बोलतात की जणु काहि याआधील सरकारने गेल्या ६० वर्षात फक्त न फक्त वाइट गोष्टी केल्या आहेत कोणत्याही चांगल्या गोष्टी केल्या नाहीत. (सोयिस्करपणे भा. ज. प. पंतप्रधान वाजपेयी यांच्या कालखंडातील चुका , भ्रष्टाचार विसरतात )

कट्ट्र देशभक्तीसाठी आपण इस्राएल चे उदाहरण हमखास उल्लेखले जाते. इस्राएला कधी त्याच्या शत्रुपक्षाबद्दल चांगले बोलताना एकतो का आपण.

उदो उदो ची वैयक्तिक चीड येते, कारण मे २०१४ पासुन सोशल मिडिया व मेसेंजिंग अॅपवरून असे सांगण्याचा प्रयत्न होत आहे कि जर तुम्हि पंतप्रधान समर्थक नाही तर तुम्हि हिन्दु नाहि, कट्टर हिन्दु फार दुरची बाब (मला आलेल्या वैयक्तिक मेसेजवरून वरुन बोलत आहे.). मी हिन्दु आहे, माझा धर्म ही माझी वैयक्तिक बाब आहे.

म. टा. दिनाक २६ जुलै २०१४ (link : http://maharashtratimes.indiatimes.com/archivelist.cms?year=2014&month=7...) उघडुन " संजय राऊत " यांच्याविषयी एक बातमी आहे ती वाचा. पंतप्रधान नाराज का होतात ??

माझ्या धर्मावर का बोट करता ?? एक पक्ष/ व्यक्ती माझा धर्म ठरवु शकत नाहि,

पंतप्रधान काश्मीरमध्ये इफ्तार मेजवानी देण्याची शक्यता अशी बातमी वाचली जर इफ्तार मेजवानी झाली तर मी हसु का रडु ??

श्रीगुरुजी's picture

17 Jul 2015 - 2:32 pm | श्रीगुरुजी

>>> कट्ट्र देशभक्तीसाठी आपण इस्राएल चे उदाहरण हमखास उल्लेखले जाते. इस्राएला कधी त्याच्या शत्रुपक्षाबद्दल चांगले बोलताना एकतो का आपण.

इस्राएलच्या शत्रुपक्षाबद्दल (पॅलेस्टाईन, इराक, इराण, जॉर्डन, सीरिया, लेबानन, लीबिया इ.) चान्गले बोलण्यासारखे काही असेल तर त्याची माहिती द्यावी. पराकोटीची धर्मान्धता, देशात व जगभर पसरवलेला दहशतवाद, रक्तपात, सातत्याने होणारे बॉम्बस्फोट, स्त्रियान्ची सर्व बाजूने गळचेपी व अत्याचार, हुकूमशाही, ६ व्या शतकात देण्यात येणार्‍या क्रूर शिक्षा (दगडाने ठेचून मारणे, हातपाय तोडणे, शिरच्छेद करणे, चाबकाचे फटके इ.), लोकसन्ख्यावाढीचा प्रचन्ड वेग, . . . याव्यतिरिक्त या देशात काही आहे का?

>>> पंतप्रधान काश्मीरमध्ये इफ्तार मेजवानी देण्याची शक्यता अशी बातमी वाचली जर इफ्तार मेजवानी झाली तर मी हसु का रडु ??

ही बातमी खोटी होती हो. मोदी व भाजपबद्दल अशा अनेक खोट्या बातम्या पसरविल्या जातात. काही उदाहरणे -

(१) मे २०१४ च्या निवडणुकीत 'प्रियान्का माझ्या मुलीसारखी आहे' अस मोदी एका मुलाखतीत म्हटल्याचे पसरविले गेले. या बातमीवर प्रियान्काची प्रतिक्रिया विचारल्यावर तिने जाहीर सन्ताप व्यक्त केला. शेवटी भाजपने या मुलाखतीची कोणतीही काटछाट नसलेली चित्रफीत प्रसिद्ध केल्यावर असे दिसून आले की मोदी असे अथवा त्याच्या जवळपास अर्थ होईल असे काहीही म्हटले नव्हते.

(२) २०१४ मध्ये भाजप सत्तारूढ झाल्यावर जे पहिले अन्दाजपत्रक आले, त्यात कॅन्सरवरील कोणत्यातरी विशिष्ट औषधाची किन्मत ८ हजार रू. वरून १ लाख रू. पर्यन्त वाढविल्याचे माध्यमान्नी पसरविले. प्रत्यक्षात अशी कोणतीही वाढ झाली नसल्याचे सिद्ध झाले.

(३) नीलगायीन्च्या शिकारीला परवानगी दिली आहे, असे प्रकाश जावडेकर म्हटल्याचे एका वृत्तपत्राने छापले. प्रत्यक्षात असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

(४) 'अच्छे दिन' येण्यास २५ वर्षे लागतील असे अमित शहा म्हटल्याचे २-३ दिवसान्पूर्वी अनेक माध्यमातून जाहीर केले गेले. शेवटी भाजपने अमित शहान्च्या भाषणाची चित्रफीत दाखविल्यावर त्या सम्पूर्ण भाषणात 'अच्छे दिन' हा शब्दच नव्हता व भारताला 'सर्वोच्च सत्ता' बनण्यास २५ वर्षे लागतील असे म्हटल्याचे स्पष्ट दिसून आले. त्या भाषणात अमित शहान्नी असे म्हटले होते की ५ वर्षात गरीबी, बेरोजगारी, महागाई इ. कमी करता येईल परन्तु भारताला सर्वोच्च स्थान मिळण्यासाठी २५ वर्षे लागतील.

माध्यमान्नी हे वाक्य ट्विस्ट करून 'अच्छे दिन' येण्यास २५ वर्षे लागतील असे अमित शहा म्हणल्याचे दिवसभर सान्गत होते.

(५) २०१४ मधील निवडणुक प्रचारात मोदीन्नी एका भाषणात असे सान्गितले होते की, "भारताबाहेर इतका काळा पैसा आहे की जर तो सगळा काळा पैसा भारतात परत आणता आला तर प्रत्येक कुटुम्बाला १५-२० लाख रूपये मिळू शकतील." या भाषणाची चित्रफीत तूनळी वर उपलब्ध आहे.

माध्यमान्नी या वाक्याचा असा प्रचार केला की "काळा पैसा परत आणून मोदी प्रत्येक भारतीयाला १५ लाख रूपये देणार असे म्हणाले."

भाजप/मोदी इ. ची वाक्ये मुद्दाम ट्विस्ट करून चुकीचा प्रचार करणे हे पूर्वीपासूनच सुरू आहे. त्यात आता भर पडली या इफ्तार पार्टीची. मोदी काश्मिरमध्ये इफ्तार मेजवानी देणार असा खोटा प्रचार माध्यमान्नीच सुरू केला. प्रत्यक्षात अशी कोणतीही योजना नव्हती. पन्तप्रधान कार्यालयानेही असा कोणताही कार्यक्रम ठरविला नव्हता. आज मोदी काश्मिरमध्ये आहेत व असा कोणताही कार्यक्रम ठरलेला नाही. रमझान महिना सम्पलेला असल्याने असा कोणताही कार्यक्रम होण्याची शक्यता नाही.

मोदी अशी मेजवानी देण्याचा कोणताही अधिकृत कार्यक्रम नव्हता. उलट मोदीन्नी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीन्नी आयोजित केलेल्या इफ्तार मेजवानीला दान्डी मारली होती. http://www.loksatta.com/sampadkiya-news/modi-not-going-to-iftar-party-11...

माध्यमे भाजप/मोदी इ. बद्दल सातत्याने अपप्रचार करीत आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले.

हे वाचा ...
Indian Media Watch.... Changing The Way We Consume News हा त्यांचे ब्रिद आहे.
लेखक त्याच्या ब्लॉग वर उत्तमोत्तम लेख लिहीत असतात. काही नमुने
१. अर्णबगेट भाग १ व २ अर्णबगेट भाग १
व अर्णबगेट भाग २
२. तिस्ता रुदाली तिस्ता रुदाली
३. भक्तोफोबिया भक्तोफोबिया
४. CNN-IBN CNN IBN

वैगेरे अवश्या वाचा
लेख मुळात इंग्रजीत वाचण्यातच मजा आहे.

कापूसकोन्ड्या's picture

17 Jul 2015 - 6:03 pm | कापूसकोन्ड्या
श्रीगुरुजी's picture

17 Jul 2015 - 6:23 pm | श्रीगुरुजी

जबरदस्त लेख आहे. तिस्ता सेटलवाड्चे कट्टर हिन्दूविरोधी चेहरा अगदी बरोबर समोर आणला आहे.

माध्यमे एखाद्याला कशी फाडून खातात याचे अजून एक उदाहरण म्हणजे अडवाणी. अडवाणीन्नी २००५ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. तिथे जिनाच्या थडग्याला भेट दिल्यावर ते पत्रकारान्शी बोलताना म्हणाले की, "पाकिस्तानच्या स्थापनेनन्तर पाकिस्तानी सन्सदेत जिनान्नी जे पहिले भाषण केले त्या भाषणात धर्मनिरपेक्ष सरकार व देश कसा असावा याचे उत्कृष्ट वर्णन होते. जर पाकिस्तान भाषणात वर्णिलेल्या मार्गावर चालला असता, तर आज पाकिस्तान धर्मनिरपेक्ष देश बनला असता."

वरील वाक्यान्चा माध्यमान्नी विपर्यास करून असा गहजब माजवला की 'अडवाणीन्नी जिनाला धर्मनिरपेक्ष असे प्रमाणपत्र देऊन स्तुती केली'. प्रत्यक्षात ते म्हणाले होते की जिनाचे धर्मनिरपेक्षतेवरील भाषण (जिना नव्हे, त्याचे भाषण) उत्कृष्ट होते व ते असेही म्हणाले की पाकिस्तानने त्या मार्गावर चालायला हवे होते (पाकिस्तान धर्मनिरपेक्षतेच्या मार्गावर न चालल्यामुळे धर्मान्ध देश बनला हेच त्यातून सूचित केले होते.). परन्तु माध्यमान्नी त्यान्च्या वाक्यान्ना इतका विचित्र ट्विस्ट देऊन गहजब केला की त्याची अडवाणीन्ना मोठी किम्मत द्यावी लागली. पक्षाध्यक्षपद गेलेच व 'जिनाची स्तुती केली' अशी अवहेलना सर्वत्र सहन करावी लागली.