एक आगळा Lesbian विवाह सोहळा !

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
20 Nov 2013 - 7:16 pm
गाभा: 

सर्वप्रथम या सुंदर फ़ोटोग्राफ़्स वर एक नजर टाका !

http://www.stephgrantphotography.com/blog/shannon-seema-indian-lesbian-w...

काही दिवसांपुर्वीच शॅनॉन आणि सीमा या दोन स्त्रियांमधील हा सुंदर लेस्बीयन विवाहसोहळा लॉसएंजल्स या अमेरीकेतील शहरात थाटामाटात संपन्न झाला. हा एका अर्थाने क्रांतीकारी विवाह म्हणावा लागेल. कारण हा नेहमीसारखा एक स्त्रि व एक पुरुष यांच्यातील विवाह नव्हता. तर एका स्त्रि ने केलेला दुसरया स्त्रि बरोबर चा विवाह होता. हा अनेक अर्थांनी वेगळा असा विवाहसोहळा म्हणता येईल याची कारणे अशी की
एक तर हा विवाह अतिशय मोकळेपणाने संपन्न झाला. असे समलैंगिक विवाह क्वचितच इतक्या निर्भयतेने संपन्न होतात. याच्या अगदी नेहमीच्या विवाहासारख्या पत्रिका छापण्यात आल्यात. अनेक प्रतिष्ठीत लोकांना आमंत्रणे पाठविण्यात आली. आणि मोठ्या संख्येने अगदी प्रतिष्ठीत लोकांनी या विवाहाला हजेरी लावली. आणि आपला पाठींबा एक प्रकारे जाहीर केला. असे विवाह सामान्यत: छुपेपणाने होतात त्या पार्श्वभुमीवर यातील आयोजकांचा मोकळेपणा आणि हजेरी लावणारयांचा देखील मोकळेपणा विशेष असाच होता.
दुसरी एक खासियत म्हणजे हा विवाह अगदी व्यवस्थित असा विधीवत पार पाडण्यात आला. दोन्ही वधुंनी अग्निला साक्षी मानुन छान वैदिक पध्दतीने सात फ़ेरे वगैरे घेतले. मेंदी ,मेकअप, वधुला भावांनी डोली त बसवुन आणणे आदी सर्व अगदी साग्रसंगीत करण्यात आलं. आणि त्याच बरोबर ख्रिश्चन पध्दतीने देखील विवाहाचे विधी पाळण्यात आले. एक वधु ख्रिश्चन आणि एक हिंदु असे असुनही कुठेच काहीच अडचण आली नाही. दोन्ही कडचे हिंदु आणि ख्रिश्चन पाहुणे या विवाहात सामील झाल्याने दोन्ही धर्माच्या लोकांना एकमेकांच्या विधीची छान माहीती करुन घेता आली व परंपरेतील वैविध्या चा आनंद ही लुटता आला.
यात विशेष म्हणजे या हिंदु मुलीचे भाउ आई आणि वडिल यांचा या विवाहाला पाठिंबा च नव्हे तर तो धुमधडाक्यात आणि अतिशय शानदार पध्दतीने करावा असे मत होते आणि तसा त्यांनी तो करुनही दाखविला. याचे फ़ोटोग्राफ़्स एका प्रसिध्द फ़ोटोग्राफ़र स्टेफ़ ग्राफ़ हीने काढलेले असुन ते ओपनली सर्वत्र प्रसिध्द देखील केलेले आहेत.फ़ोटोग्राफ़्स पण अतिशय सुंदर जमुन आलेले आहेत. असाच सपोर्ट दुसरया मुलीच्या घरच्यांचा ही होता.हे सर्वात विशेष ! यात सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी ज्या सुंदर उमदेपणाने व माणुसकीने प्रेमाने आपापल्या मुलींच्या लैंगिकतेचा जो बिनशर्त स्वीकार केला. व त्यांच्या आनंदातच आपला आनंद मानुन अगदी पुर्ण सपोर्ट देउन त्यांना आपले आयुष्य आपले स्वातंत्र्य जपु दिले ही आहे.
हे सर्व करतांना त्यांनी बुरसटलेल्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव पडु दिला नाही. प्रत्येक व्यक्तीला माणुस म्हणुन आपल्या लैंगिकतेची निवड करावयाचा हक्क आहे व त्याचा सम्मान केला पाहीजे ही जाणीव या पालकांनी दाखविली हे महत्वाचे आहे.हा बदल सुखावह आहे. शाल्मली पालेकर ( अमोल पालेकरांची पहील्या पत्नीपासुन झालेली मुलगी) ही देखील ओपनली लेस्बीयन आहे. तिच्या आईला जेव्हा हे प्रथम कळले. तेव्हा तिला चित्रा पालेकरांना थोडा धक्का स्वाभाविकपणे बसला. परंतु नंतर त्यांनी ही आपल्या मुलीला समजावुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तिच्याकडुन या विषयावरची पुस्तके मागविली आणि लेस्बीयन म्हणजे नक्की काय असते त्यांची जीवनशैली काय असते हे समजुन घेतले. आणि आज त्या ठामपणे तिच्या पाठीशी उभ्या आहेत. आज त्यांना आपली मुलगी लेस्बीयन आहे या गोष्टीची अजिबात लाज वाटत नाही. इनफ़ॅक्ट घटनेचे जे एक कलम ३७७ समलैंगिकांच्या नैसर्गिक हकांवर गदा आणते त्या विरोधातील लढ्यात त्या समलैंगिकाचे पालक या नात्याने सक्रिय रीत्या उतरल्या आहेत. हा बदल निश्चितच आनंददायी आहे.खालील लिंक बघा.

http://www.indianexpress.com/news/-read-books-to-understand-daughter-s-s...

आजपर्यंत ही लोक केवळ अल्प्संख्य आहे म्हणुन यांना विकृत ठरविण्यापासुन ते माणुसकीचे साधे हक्क ही नाकारण्यात आलेले आहेत. खर तर आज ही हे सर्व सुरु आहे. या लैंगिकतेला अनैसर्गिक ठरविण्याचा प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.अर्थात यातील बरेच दावे पोकळ सिद्ध झालेले आहे
या विवाहाची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही मुली या सुशिक्षीत आहेत. स्वत:चे स्वतंत्र विचार असणारया आणि करीयर असणारया आहेत.दोघांची कुटुंबेही सुसंकृत आहेत.आणि वयाने ही इनफ़ मोठ्या आहेत. आणि सर्वात शेवटी या मुलींच्या बॉडी लॅंग्वेज कडे नीट बघा काय निर्भय आणि दुरदुरपर्यंत कुठेही अपराध गंड अथवा लज्जा यांच्या चेहरयावर दिसत नाही.
दिसतोय फ़फ़्त जबरदस्त आत्मविश्वास आणि एकमेकांवरील निखळ अनिर्बंध प्रेम !
त्यांच्या प्रेमाला सलाम ! त्यांच्या हिंमती ला सलाम !

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

20 Nov 2013 - 7:29 pm | पिलीयन रायडर

दोन स्त्रीयांमधले (किंवा पुरुषांमधले) आकर्षण समजु शकत नाही पण तरीही स्वतःच्या लैंगिकतेबद्दल शरम न बाळगता आणि लोक काय म्हणतील ह्या आणि असल्या फालतु मुद्द्यांना फाट्यावर मारुन लग्न केल्या बद्दल शॅनॉन आणि सीमा ह्यांचे अभिनंदन..!!

मारवा's picture

20 Nov 2013 - 7:34 pm | मारवा

पिलीयन रायडर

तुमच्या मताशी पुर्णपणे सहमत आहे !

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2013 - 7:46 pm | टवाळ कार्टा

पत्रिका जुळली वाटते ;)

पत्रिका आणि ३६ गुण पण जुळले हो

छान !! आता त्यांच्या आनंददायी मंधुचंद्राचा वृतांत आणि जमल्यास बरेच फोटु असलेली लिंक ही टाका ...

धन्यवात !!

शिद's picture

20 Nov 2013 - 7:55 pm | शिद

वधु-वधु (आता वर कोण आणि वधु कोण हा एक संशोधनाचा विषय आहे =)) ) एकमेकांना अगदी अनुरुप आहेत हे निरीक्षण नमूद करतो. ;)

वाटाड्या...'s picture

20 Nov 2013 - 9:22 pm | वाटाड्या...

वर ती गोरी बया आणि वधु ती दुसरी बया आहे.

- वाट्या...

त्याबद्दल पण अपडेट देत चला.

वाटाड्या...'s picture

20 Nov 2013 - 9:22 pm | वाटाड्या...

खरं तर सगळंच अगम्य आहे. हा निसर्गाचा चमत्कार मानावा का शाप हेच कळत नाही. वैयक्तीक मताचा झालेला नको इतका उदो उदो असावा की सामाजीक/कौटुंबीक दडपणाचा ढीलेपणा मानावा? समाजाच्या संकेताला विरोध मानावा की खरच शास्त्रीय कारण मानावं? असे अनेक प्रश्न घेऊन इथेच थांबावे ते बरे.

- वाट्या...

राजेश घासकडवी's picture

21 Nov 2013 - 12:20 am | राजेश घासकडवी

हा निसर्गाचा चमत्कार मानावा का शाप हेच कळत नाही.

प्रत्येक गोष्टीकडे चमत्कार किंवा शाप म्हणून बघण्याची काही गरज नाही. आता एक उदाहरण देतो. पूर्वी अनेक डावऱ्या मुलांना मारून मुटकून उजव्या हाताने सर्व गोष्टी करायला लावायचे. का, तर समाजात डाव्या हाताने काही गोष्टी करणं शिष्ट, शुभ समजलं गेलेलं नाही म्हणून. समजा, त्या काळात सगळेच असे मारून मुटकून उजवे झालेले असताना कोणीतरी डाव्या हाताने लिहिताना दिसलं तर असाच प्रश्न विचारणं कितपत योग्य ठरलं असतं?

थोडक्यात जे आहे हे असं आहे. शाप-चमत्कार नाही, तर सत्य वास्तव आहे. चला, नुसतेच प्रश्न विचारून थांबण्यापेक्षा स्वीकारूया आणि पुढे जाऊया.

देवांग's picture

21 Nov 2013 - 11:45 am | देवांग

कायच्या काय उदाहरण आहे …. डावा उजवा आणि लेस्बिअनचे लग्न काही तरी संबध आहे का ? हे म्हणजे असे आहे मला जुलाब होत आहेत कारण काल तीन वेळा लाईट गेली होती.

आनन्दा's picture

21 Nov 2013 - 1:25 pm | आनन्दा

काल लाइट गेली, मी पाचक चूर्णाच्या ऐवजी जुलाबाचे चूर्ण घेतले.. आणि.

जेपी's picture

20 Nov 2013 - 9:32 pm | जेपी

अस हाय का सगळ .

मी समजत व्हतो की जेंडर रेशो कमी आसल्यामुळ आमाला लग्नासाठी पोरी मिळत् नायत .

=))

:-)

मालोजीराव's picture

20 Nov 2013 - 9:36 pm | मालोजीराव

धन्यवाद, एक अप्रतिम फोटोग्राफी ब्लॉग सापडला तुमच्यामुळे

सुहास झेले's picture

21 Nov 2013 - 12:02 am | सुहास झेले

यप्प... बेस्ट एकदम :) :)

प्यारे१'s picture

20 Nov 2013 - 9:48 pm | प्यारे१

चान चान!

- बुरसटलेल्या विचारांचा.

हे सगळं चांगलय हो पण अजून वेळ लागेल मनानं स्विकारायला.

विवेक वाघमारे's picture

22 Nov 2013 - 6:59 pm | विवेक वाघमारे

बाकीच्यांच्या स्वीकारण्याचा प्रश्नच कुठे येतो हो! बिवी-बिवी राझी तो क्या करेगा काझी! हा लग्न, प्रेम ह्या ज्याच्या त्याच्या वैयक्तिक बाबी आहेत. आपल्याला (समाजाला) हस्तक्षेप करण्याचा काही-एक हक्क नाही.

अर्धवटराव's picture

20 Nov 2013 - 10:00 pm | अर्धवटराव

>>हे सर्व करतांना त्यांनी बुरसटलेल्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव पडु दिला नाही.
-- हे अत्यंत अनावष्यक आणि अपरिपक्व मनोवृत्तीचं प्रदर्शन.

समलैंगीकतेला समाजमान्यता मिळतेय म्हणजे समाज उत्क्रांतीच्या फार मोठ्या टप्प्यावर आला आहे हा आणखी एक कुतर्क.

समलैंगीकतेला लग्नसंस्थेत प्रवेश मिळाला म्हणजे लग्नसंस्था आणि त्याआधारीत कुटुंबव्यवस्थेला फार काहि क्रांतीकारी सुधारणा आणणारी पर्वणी असा विचार तर प्रचंड विनोदी.

विवेक वाघमारे's picture

22 Nov 2013 - 7:08 pm | विवेक वाघमारे

>>समलैंगीकतेला समाजमान्यता मिळतेय म्हणजे समाज उत्क्रांतीच्या फार मोठ्या टप्प्यावर आला आहे हा आणखी एक कुतर्क.

>>समलैंगीकतेला लग्नसंस्थेत प्रवेश मिळाला म्हणजे लग्नसंस्था आणि त्याआधारीत कुटुंबव्यवस्थेला फार काहि क्रांतीकारी सुधारणा आणणारी पर्वणी असा विचार तर प्रचंड विनोदी.

मी तुमच्या मताशी २००% सहमत आहे!!!
असे असेल तर मग विधवा पुनर्विवाह ही तरी कशी काय सुधारणा म्हणता येईल? मुलगी वयात आल्यावर लग्न न लाऊन देता १८ वर्षांची होऊ देण्याची वाट पाहणे हि तरी कसली सुधारणा! हि सगळी लग्नव्यवस्थेला आणि समाजाला वाममार्गाला लावायची लक्षणे आहेत. जातीबाह्य लग्ने, विधवा पुनर्विवाह बेकायदेशीर ठरवा! सतीची प्रथा पुन्हा चालू करा. मुलींची वयात येताच लग्ने करा. तेव्हाच समाजाची घडी सुरळीत राहील.

अर्धवटराव's picture

22 Nov 2013 - 10:40 pm | अर्धवटराव

>>असे असेल तर मग विधवा पुनर्विवाह ही तरी कशी काय सुधारणा म्हणता येईल?
-- विधवा स्त्रिचे शरीर संबंधातुन संतती, संगोपन, याला सामाजीक मान्यता. हि ती सुधारणा.

>>मुलगी वयात आल्यावर लग्न न लाऊन देता १८ वर्षांची होऊ देण्याची वाट पाहणे हि तरी कसली सुधारणा!
-- अपत्य पालन आणि संगोपनासाठी शारीरीक आणि मानसीक तयारी.

>>हि सगळी लग्नव्यवस्थेला आणि समाजाला वाममार्गाला लावायची लक्षणे आहेत.
-- हो ना. डोण्ट टेक दॅट वाम मार्ग.

>> जातीबाह्य लग्ने, विधवा पुनर्विवाह बेकायदेशीर ठरवा!
-- घ्या ना पुढाकार.

>>सतीची प्रथा पुन्हा चालू करा.
-- अवष्य. तुमच्यापासुनच सुरुवात करुया काय?

>>मुलींची वयात येताच लग्ने करा.
-- इतकं फ्रस्टेट व्हायचं कारण काय? तुम्हालाही मिळेल कि लग्नाला मुलगी. थोडं सबुरीने घ्या. नाहितर एखादा बाप्या पकडा... हा.का.ना.का. पण बारशाला बोलवा हां समस्त मिपाकरांस.

>>तेव्हाच समाजाची घडी सुरळीत राहील.
-- तुमचा कळवळा बघुन आनंद वाटला.

आता मुळ मुद्दा:
>>थिंक अगेन..
-- प्रतिसाद देण्यापुर्वी आपण हि तसदी घेतली होती काय? तसं वाटत नाहि.

१-विधवा स्त्रिचे शरीर संबंधातुन संतती, संगोपन, याला सामाजीक मान्यता. हि ती सुधारणा.
ज्या देशात या समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता आहे त्या कायद्यात सर्व प्रकारच्या प्रोव्हिजन्स केलेल्याच असतात. त्यात अशा जोडप्यांनी क्रुत्रीम पध्दतीने गर्भधारणा करणे, अशा संतती ला कायदेशीर मान्यता, सामाजिक हक्क इत्यादी आनुषंगिक सर्व बाबींचा उहापोह झालेलाच असतो.मुळात कायदा जेव्हा मान्यता देतो तेव्हाच हे सर्व विचार चिंतन करुनच आनुषंगिक प्रोव्हिजन्स आलेल्याच असतात. प्रस्तुत विवाह जेथे झालेला आहे तेथे तो पुर्णपणे कायदेशीर आहे. व तसाच जगात सर्वत्र व भारतात होईल तेव्हा मग लेस्बीयन्स वर अन्याय होणार नाहीत. आणि ही सर्व लढाई कायदा लागु करण्यासाठीची च आहे.

अर्धवटराव's picture

23 Nov 2013 - 7:33 pm | अर्धवटराव

पण सद्यः विवाहसंस्था स्त्रि+पुरुष या नैसर्गीक पुनरुत्पादन सिस्टीमवर आधारलेली आहे. नव्या पिढीची जबाबदारी तिला जगात आणणार्‍या दोन्हि घटकांना देण्याचं प्रयोजन विवाहसंस्थेत आहे. शिवाय भिन्नलिंगी व्यक्तींना परस्परांप्रती जे काहि व्यक्त करायचं आहे त्याला शक्य तितका मोकळेपणा देण्याचा त्यात प्रयत्न आहे. हि संस्था निर्माण होताना त्यात कृत्रीम गर्घधारणेचा विचार नव्हता म्हणुन तिला बुरसटलेली म्हणावं काय ? समलिंगी विवाह, पॉलीगॅमी आज ना उद्या सर्वमान्यता पावेलच, पण म्हणुन आजची परिस्थिती सती प्रथेसारखी भयावह आहे असं म्हणावं काय ? आणि सर्वात महत्वाचं, या सर्व घडामोडी नवीन समाज धारणांच्या संदर्भातुन प्रगल्भपणे हाताळाव्या कि त्यात ग्लॅमर शोधुन उथळ थिल्लरपणा करावा?

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Nov 2013 - 10:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

अमोल पालेकर दिसत नाहीत कुठे?

विद्युत् बालक's picture

20 Nov 2013 - 10:12 pm | विद्युत् बालक

मला पडलेले काही प्रश्न

१. ह्या सीमा वाहिनी भारतात राहणाऱ्या भारतीय आहेत कि भारतीय वंशाच्या आहेत?
२. ह्या लग्नाला ह्या ब्लॉग मध्ये "भारतीय समलैंगिक विवाह " असेच का फक्त म्हटले आहे ? शेनोन वाहिनी भारतात स्थायिक होणार आहेत का?
३ हे बड्या लोकांचे मेक अप करणारे कायम बायले का असतात ?
४ हे सर्व बघता उद्या "Zoophilia" असणाऱ्या लोकांचे पण लग्न होणार का ? झालेच तर प्राण्याच्या बाजूने कोण कोण येणार ?

विवाह सोहळा एन्जोय करणारे सर्व पब्लिक हे कमरेचे काढून डोक्यावर बांधणारे दिसत आहे .
ह्या शेनान वाहिनी तर फेमेल नाही तर शिमेल दिसत आहेत

प्यारे१'s picture

20 Nov 2013 - 10:20 pm | प्यारे१

ए विद्युत, वाहिनी नसतंय रे तुमच्यातल्या विद्युतवाहिनीसारखं. वहिनी अस्तंय.

तीन तीन ठिकाणी वाहिलंय्स म्ह णून बोललो!

विद्युत् बालक's picture

20 Nov 2013 - 10:58 pm | विद्युत् बालक

थ्री फेज !!

मृत्युन्जय's picture

21 Nov 2013 - 12:42 am | मृत्युन्जय

ह्या शेनान वाहिनी तर फेमेल नाही तर शिमेल दिसत आहेत

एखाद्या बाईचा बांधा पुरुषी आहे म्हणुन असले उद्गार काढले जाणे अप्रशस्त ठरते. "शिमेल " हा खासकरुन खुप अप्रस्तुत उद्गार वाटतो. नुसतेच पुरुषी दिसणे किंवा बायल्या दिसणे म्हणणे वेगळे. पण हे मर्यादा ओलांडुन लिहिल्यासारखे वाटले.

हे सर्व बघता उद्या "Zoophilia" असणाऱ्या लोकांचे पण लग्न होणार का ? झालेच तर प्राण्याच्या बाजूने कोण कोण येणार ?

"Zoophilia" शब्द मी पहिल्यांदा ऐकला पण एकुण संदर्भावरुन यातुन तुम्हाला एका प्राण्याचे आणि मानवाचे असलेले शरीरसंबंध सुचित करायचे असावेत. याबाबतीत २ गोष्टी लक्षात घ्याव्यातः

१. २ समलिंगी मानवांमधले शरीरसंबंध हे परस्पर संमतीने होत असतात (अपवादात्मक बलात्कार सोडुन द्या). माणूस - पाणी प्रकारात मात्र प्राण्याच्या रुकाराचा प्रश्न येत नाही . हे संमतीने झालेले प्रणय म्हणता येणार नाही. त्यामुळे तुलना अप्रस्तुत आहे.

२. समलिंगी संबंध हे केवळ शारीर पातळीवर असत नाहित तर ती मनाची एक गरज असते. मुळात प्रेमसंबंधातुन निर्माण झालेले बहुतेक सगळे शरीरसंबंध शरीराइतकीच मनाची भूक देखील भागवतात. माणूस - प्राणी शरीरसंबंधात असे होत नसते. भिन्नलिंगी व्यक्ती शारीर पातळीवर उदात्त असतात आणि समलिंगी लिंगपिसाट असतात असा काहिसा समज झाला असल्यास तो पुर्णपणे चुकीचा आहे. माणूस - प्राणी संबंध मात्र माणसाची विकृत लैंगिक इच्छा पुर्ण करण्यासाठीच असतात. आपल्या पाळीव प्राण्यावर आपल्या बायको / नवर्‍यासारखा प्रेम कराणारा (री) पुरुष / बाई खुपच अपवादात्मक गणला(ली जावा (वी)

शुचि's picture

21 Nov 2013 - 12:50 am | शुचि

बर्‍याच वेळा रुढीविरुद्ध काही गोष्टी पाहून काहींच्या मनात येते की ही मोकळीक कुठवर जाणार - प्राणी/लहान मुले/अचेतन शरीर यांच्यापर्यंत तर ही मोकळीक जाऊन ठेपणार नाही ना? वगैरे चिंता वाटतात. पण एक लक्षात घेतले की "निरामय संबंध" = उभयतांच्या परस्पर संमतीतून प्रस्थापित झालेला संबंध की या चिंता वाटण्याचे कारण नाही.

इष्टुर फाकडा's picture

20 Nov 2013 - 10:19 pm | इष्टुर फाकडा

फोटो आवडले. लेस्बियन तर आवडतातच म्हणजे त्या प्रकाराबद्दल लैगिक दृष्टीने समजून घेऊ शकतो (कदाचित पुरुष असल्याने) होमो लोकांच्या बाबतीतली लैंगिकता इम्याजीन करून किळस येते. अर्थात सामान्य जीवनात त्यांना वेगळे काढणारातला मी नाही. कदाचित बायकांनाही असेच काहीसे वाटत असावे.
रच्याक्ने, दोघींचाही बांधा मजबूत आहे. शिवाय स्माइल इतकी अंगावर येते आहे कि दात कृत्रिम आहेत असं वाटतंय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Nov 2013 - 10:25 pm | राजेंद्र मेहेंदळे

लग्न हाच एक प्रॉब्लेमॅटिक विषय आहे,तर लेस्बियन लग्नात किती काँप्लिकेशन्स असतील?
सत्यनारायण,पहीला दिवाळसण,पाडवा, झालेच तर अधिक मास ,डोहाळेजेवण यांचे काय?

घटस्फोट झाल्यास प्रॉपर्टीचे वाटप कसे? मुलांची कस्टडी कोणाकडे? (दत्तक घेतलेल्या /घेतल्यास)
पुढे ४९८ अ लावायचे झाल्यास कोणाला लावणार वगैरे....

जाणकारांनी प्रकाश टाकावा

स्पंदना's picture

21 Nov 2013 - 4:08 am | स्पंदना

घटस्फोट झाल्यास प्रॉपर्टीचे वाटप कसे? मुलांची कस्टडी कोणाकडे? (दत्तक घेतलेल्या /घेतल्यास)

लग्नाचा अट्टाहास फक्त एकमेकाला बांधण्यासाठी नाही तर एकमेकाला प्रोटेक्ट करण्यासाठी केला जातो. लिगली जर ते दोघे कपल असतील तर आपल्या नंतर आपल्या जोडीदाराला आप्ले सग्ळे हक्क अन प्रॉपर्टी मिळावी असा हेतु असतो.
तेच मुलांचही. डायवोर्स मात्र बघायला हवा.
अर्थात रिलेशशिप घट्ट जुळल्यानेच विवाहाच पाऊल उचलल जात, आणि पाश्चिमात्त्य लग्नात, लग्नाच्या वेळीच एक कॉट्रॅक्ट साएन कराव लागत वधूवरांना, की इफ धिस डज नॉट वर्क ऑउट हाऑ शुड वी पार्ट. विच थिंग्ज आय वुड लाइक टु शेअर अ‍ॅन्ड विच नॉट.

शुचि's picture

20 Nov 2013 - 10:43 pm | शुचि

जोरदार पाठींबा आहे. विचार व मने न जुळलेल्या भिन्नलिंगी विवाहांपेक्षा विचार व मने जुळलेला समलैंगिक सोहोळा सॅक्रीड (मराठीत?) नक्कीच म्हणावा.
सीमा व शॅनन यांना शुभेच्छा.

अर्धवटराव's picture

20 Nov 2013 - 11:08 pm | अर्धवटराव

समलैंगीकतेला विवाहाची आवष्यकता का पडावी? लैंगीक संबंधातुन जन्मणार्‍या नव्या पिढीची** जबाबदारी स्विकारणार्‍या सामाजीक संकेताचं नाव म्हणजे विवाह. आता आडातच नसेल तर पोहर्‍याला कशाला उगाच सामाजीक संकेताच्या ओझ्याखाली दाबायचं आणि कॉम्प्लीकेशन्स वाढवायचे?

** नवी पिढी जन्माला आलिच पाहिजे, किंवा विवाह झालेल्या जोडप्यांचच मुल हवं, नसल्यास विवाह रद्द असं काहि होत नाहि. पण विवाह व्यवस्था नेमकी आहे काय? स्त्री आणि पुरुष हे निसर्गाने निर्माण केलेले डायपोल्स. त्यांच्या संयोगातुन जी ऊर्जा निर्माण होते कि भूतकाळाचा वर्तमानाशी आणि वर्तमानाचा भविष्याशी सांधा जुळवते. या सांधा जुळवण्याच्या प्रक्रियेला सशक्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याची व्यवस्था म्हणजे लग्नसंस्था. समलैंगीकतेचा य व्यवस्थेशी काहिच जोड बसत नाहि. मग विवहाची उठाठेव कशाला??

कवितानागेश's picture

20 Nov 2013 - 11:30 pm | कवितानागेश

इतरांच्या लग्नात किती मिरवणार? शेवटी स्वतःचा लग्नसोहळा जास्त छान असतो!

इन्शुरन्स (मिनेपोलीस मध्ये काही महीन्यापूर्वी समलैंगिक विवाहास मान्यता मिळाली. माझी इन्श्युरन्स कंपनी आहे त्यांना काही अपडेट करावे लागले.), इस्टेट आदि बाबींमुळे लग्नबंधन आवश्यक वाटत असावे हा कयास.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Nov 2013 - 2:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

ह्याला मराठित मंगलमय किंवा शुचिर्भूत म्हणता येइल काय?

पिशी अबोली's picture

20 Nov 2013 - 11:23 pm | पिशी अबोली

मला 'फ्रेंड्स' या मालिकेत बघितलेलं सुझान आणि कॅरोलचं लग्न आठवलं.. ते इतकं सुंदर दाखवलंय, की हा विषय हेटाळणीचा वाटेनासा झाला तेव्हापासून...

>>वधुला भावांनी डोली त बसवुन आणणे आदी सर्व अगदी साग्रसंगीत करण्यात आलं.

थट्टा नाही, पण दोन्ही वधूच!! नक्की कोणतीला डोलीत बसवून आणलंनीत??

विवाह वैगरे मान्य. पण हे फक्त लैंगिक आकर्षण असेल तर ते असं किती दिवस टिकणार, कारण लग्न म्हणजे फक्त तेवढी एकच गोष्ट नव्हे. प्रेमच असेल तर मग लग्न कशासाठी? लग्नाशिवायही एकमेकींसोबत राहू शकल्या असत्या की !!

मृत्युन्जय's picture

21 Nov 2013 - 12:47 am | मृत्युन्जय

प्रेम् असलेल्या भिन्नलिंगी व्यक्ती देखील लग्नाशिवाय एकत्र राहु शकतातच की. कितीजण असे राहतात. नगण्यच ना? तेवढ्या प्रमाणात समलिंगी व्यक्ती सुद्धा लग्नाशिवाय एकत्र राहतात. पण लग्न हा एक विधी आहे. कुठल्याही धर्मातला असु देत. आपण म्हणतो तसे ते बंधन नाही. ते एक वचन आहे, ती एक कमिटमेंट आहे. या सगळ्या गोष्टी लग्नाशिवायदेखील होउ शकतात. पण तरीदेखील भिन्नलिंगी व्यक्ती लग्न करतातच ना? ते केवळ एक सामाजिक गरज नाही. त्यातुन अजुनही भावनिक संबंध प्रस्थापित होतात. भिन्नलिंगी विवाहसंबंधात देखील नेमके असेच होते.

मृत्युन्जय's picture

21 Nov 2013 - 12:52 am | मृत्युन्जय

भिन्नलिंगी विवाहसंबंध हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध नसुन ते निसर्गनियमानुरुप आहेत असे नमूद करु इच्छितो. ज्या निसर्गाने माझ्यासारख्या सामान्य माणसात भिन्नलिंगी व्यक्तींविरुद्ध आकर्षण निर्माण केले त्यानेच समाजातील काही व्यक्तींमध्ये समलिंगी आकर्षण निर्माण केले आहे. त्या आकर्षणाला आणि ओढीला मनाविरुद्ध मारुन आणि डावलुन भिन्नलिंगी व्यक्तीमध्ये जीवनाचा आनंद शोधणे हे मुळात विकृत आणि निसर्गनियमाच्या विरुद्ध आहे असे वाटते. पुर्वी समलिंगी व्यक्तींबद्दल कीव वाटायची. आता असे वाटते की त्यात कीव वाटण्यासारखे काहिच नाही. त्या व्यक्तीही जीवनाचे सुख पुरेपुर उप्भोगत आहेत. फक्त वेगळ्या मार्गाने. निसर्गत: त्यांची आवड वेगळी असेल तर त्यात कीव किंवा घृणा वाटण्यासारखे काही नाही.

शॅनोन आणि सीमाला सुखी सहजीवनाच्या शुभेच्छा.

चौकटराजा's picture

22 Nov 2013 - 8:14 pm | चौकटराजा

आपलं मत अगदी असंच ! कम्युनिस्ट म्हणतात डेमोक्रसी परव्हर्ट आहे आणि डेमोक्रसी वाले असेच म्हणत असतात कम्युनिस्टा बद्द्ल. ते लेस्बो व होमो आपल्या सगळ्याना अशीच विकृत माणसे समजत असतील !

निनाद's picture

21 Nov 2013 - 3:30 am | निनाद

सुंदर सोहळा!
नवपरिणित जोडप्याचे अभिनंदन...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2013 - 5:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवपरिणित जोडप्याला शुभेच्छा....! सोहळ्यातील फोटो छानच. प्रत्येकाला आपापल्या मनाप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. आता आपल्या भारतीय आणि पारंपरिक मनाला असं काही पचवनं तसं अवघड जातं. 'आता त्यांचं पुढं कसं' या प्रश्नाच्या भोवती फिरत राहीलो की प्रश्नांचा गुंता निर्माण होतो त्याचीही उत्तरं त्यांच्याजवळ आहेत. लग्नसंस्था, कुटुंबसंस्था, समाज मान्यता अशा या आणि नव्या विचाराप्रवाहात आजची सामाजिक परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे असे वाटायला लागते. आपल्या आजूबाजूला नित्य नियमाने अशा गोष्टीं घडत गेल्या की त्याचं अप्रुप वाटणार नाही. प्रत्येकाला सन्मानानं जगता यावं हे महत्त्वाचं.

-दिलीप बिरुटे

जोवर तुम्ही अश्या लोकांच्या सहवासात येत नाही तोवर तुम्हाला काहीतरी वेगळी भावना असते.
मी सिंगापुर् मध्ये अस एक जोडप अगदी त्यांच्य घरात जाउन येउन पाहिलय. सुरवतीला खूप एंबॅरॅस व्हायच मलाच, पण मग हळु हळु त्यांचा एकमेकाबद्दलचा स्नेह पाहिला. त्या दोघी ज्या पद्धतिने एकमेकाला स्पर्श करायच्या ते पाहीलं (स्पर्ष इन द सेन्स ऑफ व्हाईल कम्युनिकेटींग). आन भावनिक पातळीवरची त्यांची एकमेकाबरोबरची ओढ ही जाणवली. मग खरच मी माझ्या लग्नाकडे पाहू लागले. इट वॉज जस्ट अ कंपेरिझम ऑफ रिलेशन्शिप. इट वॉज अमेझींग! त्यांच्यात वर्चस्व अस नव्हत. रिलेशन सांभाळायची धडपड नव्हती. एल रिलॅक्स असा अ‍ॅटीट्युड होता. दोघीही माझ्यापेक्षा दहाबारा वर्षाने मोठ्या होत्या, अन त्या काळात त्यांच्या विशीत त्यांनी हे वास्तव स्विकारल होत, अन त्याच्यानुरुप त्या दोघी एकमेकाबरोबर राहील्या होत्या. त्यातल्या एकीलाही पुरुष कधी पुरुष म्हणुन आवडलाच नाही. अन सुरवातीपासून त्या, प्रेमात पडायच्या वयात; एकमेकीच्याच प्रेमात पडल्या.
बाकी असे विवाह थाटमाटात का करतात? त्यामुळे कदाचित प्रसिद्धी मिळते म्हणुन लहाण मुले असल्या त्यांच्यात नैसर्गिकरित्या नसलेल्या भावना उगाचच स्वतःवर लादून घेउ शकतात.

राजेश घासकडवी's picture

21 Nov 2013 - 6:27 am | राजेश घासकडवी

बाकी असे विवाह थाटमाटात का करतात? त्यामुळे कदाचित प्रसिद्धी मिळते म्हणुन लहाण मुले असल्या त्यांच्यात नैसर्गिकरित्या नसलेल्या भावना उगाचच स्वतःवर लादून घेउ शकतात.

हे खरं तर सर्वसाधारण भिन्नलिंगी विवाहांनाही लागू पडतं की. ज्यांच्या मनात भिन्नलिंगी भावना नसतात त्यांच्यावर इतका काळ हे 'वास्तव' लादलं जायचंच.

स्पंदना's picture

21 Nov 2013 - 7:35 am | स्पंदना

भिन्न लिंगी विवाहांचा जगभर बोभाटा नसतो राघा. या असल्या विवाहांचा फार बोभाटा केला जातोय अस माझ म्हणन.

राजेश घासकडवी's picture

21 Nov 2013 - 8:15 am | राजेश घासकडवी

लहान मुलांना वृत्तपत्रातल्या बोभाट्याशी काहीच संबंध नसतो. त्यांच्यासाठी संस्कारक्षम वयात जे मोठ्या हौसेमौजेने करतात तोच खरा बोभाटा. या बोभाट्यापोटी कितीतरी समलैंगिकांना यापलिकडे काहीतरी असू शकतं याचा प्रत्येकाला शोध लावावा लागतो. त्यापोटी स्वतःशी झगडा द्यावा लागतो. अनेकांना हा ताण सहन न होऊन ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.

'Researchers have found that attempted suicide rates and suicidal ideation among lesbian, gay, bisexual, transgender, queer, and questioning (LGBTQQ) youth is comparatively higher than among the general population.[1][2][3][4][5][6] LGBT teens and young adults have one of the highest rates of suicide attempts.[7][8][9] According to some groups, this is linked to heterocentric cultures and institutionalised homophobia in some cases, including the use of LGBT people as a political wedge issue like in the contemporary efforts to halt legalising same-sex marriages.'

मी तर म्हणेन की होऊदे अजून बोभाटा.

हे खरं तर सर्वसाधारण भिन्नलिंगी विवाहांनाही लागू पडतं की. ज्यांच्या मनात भिन्नलिंगी भावना नसतात त्यांच्यावर इतका काळ हे 'वास्तव' लादलं जायचंच.

हॅट्स ऑफ़ टु यु !!!

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2013 - 9:05 am | प्रसाद गोडबोले

अष्टपुत्रा(प्रत्येकी) सौभाग्यवतीभव !!

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2013 - 9:18 am | प्रसाद गोडबोले

१)लग्न आणि सेक्स ह्या दोन पुर्ण भिन्न गोष्टींचा घोळ कुणा गाढवाने घातला ?
२) कोणत्याही धर्माला / देशाला लोकांच्या बेडरुम मधे डोकावण्याचा काय अधिकार ?
३) LGBT समर्थक पॉलीगॅमी पॉलीअ‍ॅन्ड्री ला समर्थन देतात काय ?( रादर त्यांनी विरोध का करावा ?)
४) रीप्रॉडक्शन जर कॉन्ट्रॅक्ट बेसीस वर करता आले तर लग्न संस्था मोडकळीत काढता येईल काय ?
५) होमोसेक्युअल लोक हे १००% होमो सेक्स्युअल असतात की बाय क्युरीयस असतात?( तसेच हेटेरो सेक्स्युअल लोक १००% हेटेरो सेक्स्युअल असतील काय ??
६) एका लेस्बीयन कपल मधील पोरीने कोणा परपुरुषाशी संबंध ठेवले तर (आजच्या कायद्याने ) त्याला व्यभिचार म्हनता येईल काय ( मुळात जिथं लग्नच इल्लीगल तर बाकीचे काय ?)

वगैरे वगैरे

मृत्युन्जय's picture

21 Nov 2013 - 10:55 am | मृत्युन्जय

याला व्यभिचार म्हनता येईल काय

व्याभिचार ही एक नैतिक संकल्पना आहे. कायदेशीर नाही (कायदेशीर पण आहे तशी. पण मूळ नैतिक). त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या अपरोक्ष केलेले कुठलेही विवाहबाह्य संबंध हे व्याभिचार मानायला हरकत नाही. अर्थात जोडीदाराच्या संमतीने दुसर्‍याशी संबंध ठेवले तर त्याला व्याभिचार म्हणावा की नाही ( उदा. स्वॅपिंग ) हा एक मजेशीर प्रश्न असु शकेल. :)

जेसिका ब्राउन's picture

21 Nov 2013 - 11:16 am | जेसिका ब्राउन

१)लग्न आणि सेक्स ह्या दोन पुर्ण भिन्न गोष्टींचा घोळ कुणा गाढवाने घातला ?
कोणी एकाच गाढव याला जबाबदार नसावं..

२) कोणत्याही धर्माला / देशाला लोकांच्या बेडरुम मधे डोकावण्याचा काय अधिकार ?
अधिकार नसलाच पाहिजे.. पण दुर्दैवाने जगात सगळीकडे हे घडते.. :(

३) LGBT समर्थक पॉलीगॅमी पॉलीअ‍ॅन्ड्री ला समर्थन देतात काय ?( रादर त्यांनी विरोध का करावा ?)
प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकेल.. विरोध केलाच तर तो अशा प्रकारचा नात्यांमधल्या complicationsमुले असवा..

४) रीप्रॉडक्शन जर कॉन्ट्रॅक्ट बेसीस वर करता आले तर लग्न संस्था मोडकळीत काढता येईल काय ?
मला लग्न ही मानसिक गरज वाटते.. बाकी प्रत्येकाचा मत वेगळ असू शकेल..

५) होमोसेक्युअल लोक हे १००% होमो सेक्स्युअल असतात की बाय क्युरीयस असतात?( तसेच हेटेरो सेक्स्युअल लोक १००% हेटेरो सेक्स्युअल असतील काय ??
http://en.wikipedia.org/wiki/Kinsey_scale
या व्यतिरिक्त कल्पना नाही..

६) एका लेस्बीयन कपल मधील पोरीने कोणा परपुरुषाशी संबंध ठेवले तर (आजच्या कायद्याने ) त्याला व्यभिचार म्हनता येईल काय ( मुळात जिथं लग्नच इल्लीगल तर बाकीचे काय ?)
मृत्युन्जयरावांशी सहमत

६) एका लेस्बीयन कपल मधील पोरीने कोणा परपुरुषाशी संबंध ठेवले तर (आजच्या कायद्याने ) त्याला व्यभिचार म्हनता येईल काय ( मुळात जिथं लग्नच इल्लीगल तर बाकीचे काय ?)

अहो हे लग्न ज्या ठिकाणी झालेल आहे तिथे लग्न पुर्णपणे कायदेशीर आहे
आणि म्हणुन वारस डिव्होर्स आदिंच्या प्रोव्हिजन्स ही कायदयात अर्थातच आहेत.आणी
बरयाच युरोपीय देशात कायदेशीर आहेत हे विवाह.

पैसा's picture

21 Nov 2013 - 11:08 am | पैसा

पाश्चात्य्/ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न हे करार या स्वरूपात असते. तिथे इस्टेट वगैरे गोष्टींसाठी अशा जोड्यांना लग्न करणे आवश्यक असते का? भारतात विधीवत लग्न न झालेल्या जोडप्याच्या मुलांना आणि पत्नीला नवर्‍याच्या मालमत्तेत हक्क आहे. मग वैयक्तिक स्वातंत्राबद्दल कमालीचे जागरूक आणि संपन्न अमेरिकेत तो तसा नाही का?

हिंदू पद्धतीनुसार लग्न हा करार नसतो तर संस्कार असतो. आणि चांगली संतती निर्माण करणे हाच लग्नाचा हेतू समजला जातो. विवाह विधीतले मंत्र त्या अर्थाचेच आहेत. समजा ते विवाह विधी कोणाला मान्य नसतील पण ते हजारों वर्षे तसे आहेत हे नाकारता येणार नाही. मग या अशा समलैंगिक लग्नातून नैसर्गिकरीत्या संतती निर्माण होणे जर शक्य नाही तर हिंदू पद्धतीचे विवाह संस्कार हे केवळ फॅशन म्हणून त्याचा अर्थ समजून न घेता केलेले कृत्य आहे. एखाद्या हिंदी सिनेमात दाखवलेले हिरो-हिरॉइनचे लग्न जितपत खरे असते तितपतच हे हिंदू पद्धतीचे लग्न आहे असे मला वाटते.

विटेकर's picture

21 Nov 2013 - 12:39 pm | विटेकर

मग या अशा समलैंगिक लग्नातून नैसर्गिकरीत्या संतती निर्माण होणे जर शक्य नाही तर हिंदू पद्धतीचे विवाह संस्कार हे केवळ फॅशन म्हणून त्याचा अर्थ समजून न घेता केलेले कृत्य आहे

सहमत ! थिल्लरपणा आहे झालं , रहायचं आहे एकत्र तर रहा ना , लग्नाची बोंब कशाला? चीप पोप्युलरिटी आहे नुसती. वास्तविक " लग्न " ही संज्ञाच येथे लागू होत नाही . शयनेषु रंभा इतकीच त्याची व्याप्ती असू शकेल पुन्हा दोन्ही रंभाच ! शरिर संबंध हा महत्वाचा भाग आहे पण त्यापेक्षा अनेक मह्त्वाच्या बाबी लग्न संस्थेत अंतर्भूत आहेत. तो एक संस्कार आहे. हिन्दू धर्माचे सौदर्य त्यातील निसर्गानुरुपता मध्ये आहे. त्याचा व्यतास ताणायचा झाला तर जे नैसर्गिक नाही ते हिंदू नाही. म्हणजे लेस्बियन ( अथवा तत्सम अन्य) यांच्याबदल आदर नाही असा नव्हे.) प्रत्येक जीवाबद्दल ( प्राणीसुद्दा) आदर आहेच , सर्वेपि सुखिनं सन्तु .. पण तरिही अनैसर्गिक ते हिंदू नाही !
हिंदू पद्धतीने लग्न झाले याची हिंदू म्हणून लाज वाटते.

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 12:58 pm | बॅटमॅन

हे अनैसर्गिक ते हिंदू नाही या व्याख्येनुसार गे-लेस्बियनगिरी हिंदूच पाहिजे. त्यात अनैसर्गिक काय आहे ???

रहायचं आहे एकत्र तर रहा ना , लग्नाची बोंब कशाला?

लग्न म्हणजे एक कायदेशीर करार आहे. जो केल्याने एकमेकांच्या प्रॉपर्टिवर जोडीदाराच्या पश्चात अधिकार मिळतो, तसेच दत्तक घेणे, मुलांना कायदेशीर पालकत्त्व, आपल्या मालमत्तेवर त्यांचा हक्क जन्माने स्थापित होतो. थोडक्यात लग्न कायदेशीर 'लेजिटिमसी' व त्यायोगे मिळणारे हक्क मिळवून देते.

या गोष्टी नको असतील तर भिन्नलिंगी जोडप्यांनाही लग्न करायची अजिबात गरज नसते.

तरी देखिल समाज भिन्नलिंगी जोडप्याचा पण छ्ळ करतो. भारतात लग्नाशिवाय सेक्स करायचा म्हटला तर जोडप्याना पोलिस खुप त्रास देतात.अगदी चोरुन त्याना सर्व गोष्टी कराव्या लागतात.

सुहासदवन's picture

21 Nov 2013 - 1:57 pm | सुहासदवन

मला वाटतं की पार्कात, कठड्यावर बसलेल्या किंवा अगदी हॉटेलात झोपणाऱ्या जोडप्यांना त्रास देणाऱ्या पोलिसांना ह्या अश्या कायद्यांबद्दल काही माहीत असावं. त्यांना या ना त्या मार्गाने पैसे खायला मिळणार असतील तरच ते असा त्रास देतात.

हां… सार्वजनिक जागी मात्र त्यांनी काही बेशिस्तीचे चाळे करू नये म्हणून कदाचित जोडप्यांना हटकत असावेत.
पण तरीही ती जोडपी जर सज्ञान आणि थोडी धमक असणारी असतील तर बिनधास्त पोलिसांना नडू शकतात.

ऋषिकेश's picture

21 Nov 2013 - 2:02 pm | ऋषिकेश

भारतात लग्नाशिवाय सेक्स करायचा म्हटला तर जोडप्याना पोलिस खुप त्रास देतात.

लग्न केल्यानंतरही उघड्यावर सेक्स केलात तर पोलिस त्रास देतीलच.

जरठ कुमारी विवाह हा पण निसर्गानुरूप/ नैसर्गिक होता काय?

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 12:56 pm | बॅटमॅन

हिंदू लग्नात अशा विवाहाचा विचारच केलेला नाहीये. हिंदूच का, कुठल्याही धार्मिक प्रकारे लग्न केले तरी तोच प्रकार आहे. अन ते लिमिटेशन आहे धर्माचे. त्यामुळे मूळ उद्देश साध्य होत नसेल तरी कल्चरल प्रॅक्टिस म्हणून विधी केले, इतकेच. त्यामुळे मंत्रबिंत्र म्हणणे हा निव्वळ उपचार आहे. केला काय न केला काय, विशेष फरक पडू नये. शेवटी त्या संस्कारात प्रजा वाढवणे सोडून दुसरे आहे तरी काय? उगीच मंगलबिंगलाची लेबले लावण्यात अर्थ नै.

अनिरुद्ध प's picture

21 Nov 2013 - 1:08 pm | अनिरुद्ध प

+१ सहमत

अनिरुद्ध प's picture

21 Nov 2013 - 1:13 pm | अनिरुद्ध प

यांच्याशी सहमत.(प्रतिसाद बट्ट्मण्ण यान्च्यानन्तर प्रकाशीत झाला म्हणुन)

पिशी अबोली's picture

21 Nov 2013 - 2:15 pm | पिशी अबोली

चांगली संतती निर्माण करणे हाच लग्नाचा हेतू समजला जातो. विवाह विधीतले मंत्र त्या अर्थाचेच आहेत.

पैसातै, लग्नाचा स्वानुभव नसल्याने खरोखर सिरियसली विचारतेय, हिंदू विधींमधे 'मी तुला आयुष्यभर साथ देईन, तुझ्या प्रत्येक सुखदु:खात, संकटात तुझ्यासोबत उभा/उभी राहीन' असं कुठेच नसतं का? हेतू संतती हाच असतो हे मान्य, पण त्यापलीकडे सहधर्मचारिता हा उद्देशही विधींमधे एक्स्प्लिसिटली सांगितलेला नसतो का?

सौंदाळा's picture

21 Nov 2013 - 2:30 pm | सौंदाळा

असतो.
पाणिग्रहण, कन्यादान, झाल वगैरे विधी. जाणकार अधिक सांगतीलच.

पैसा's picture

21 Nov 2013 - 2:34 pm | पैसा

"धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च नातिचरामि" "सखा सप्तपदी भव" तेही आहेच की! पण बहुतेक मंत्र आहेत ते संततीविषयक आहेत. ही कन्या संततीसाठी वरत आहे, अशा अर्थाचे मंत्र आहेत.

माझा मुद्दा इथे समलैंगिक विवाह करावेत की नाही हा नाहीच, तर अर्थ समजून न घेता केवळ उपचार म्हणून हिंदू पद्धतीने लग्न करणे हा आहे. मग त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले म्हणूनही काही बिघडत नव्हते. मात्र हिंदू विवाहविधी हे वर आणि वधू यांच्यासाठी आहेत. इथे त्या अर्थाच्या मंत्रांचे काही प्रयोजनच नाही! म्हणजे हिंदू पद्धतीचे लग्न या शब्दांनाच इथे काही अर्थ नाही.

राहिली गोष्ट निव्वळ मौजमजेची. ते तर मेहंदी, भांगडा डोली इ गोष्टीत झालेच. मात्र या सगळ्या गोष्टी मूळ विवाहविधीत येत नाहीत. तर उत्तर भारतीयांच्या रूढी म्हणून येतात.

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 2:39 pm | बॅटमॅन

जर डोली भांगडा चालतं तर मंत्रांनी काय घोडं मारलंय? मंत्रही निव्वळ प्रिमिटिव्ह आहेत. "विवाहसंस्थेचा इतिहास" पाहिलात तर हेटेरोसेक्शुअल लग्नातले मंत्र म्हणतानाही जीभ अडखळते. चिकित्सा कुठवर करावी एवढाच प्रश्न आहे.

टेक्निकली बरोबर असेल पण मग टेक्निकली चिकित्सा करायची तर बाकी गोष्टी 'नॉर्मल' केसमध्येही गंडतात.

पैसा's picture

21 Nov 2013 - 2:44 pm | पैसा

मला काय चालतं अन काय नाही याचा प्रश्नच नाही! जे आहे ते असं आहे एवढंच मी सांगितलं. अर्थात हिंदू पद्धतीने लग्न करणारे कितीजण त्या मंत्रांचा अर्थ तपासायला जातात हा प्रश्नच आहे.

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 2:47 pm | बॅटमॅन

बेट्या

हा कोण?

बाकी, जे आहे ते त्याची या केसमध्ये चिकित्सा करण्यात अर्थ नाही असे मला वाटते.

खटपट्या's picture

22 Nov 2013 - 2:42 am | खटपट्या

चांगला मुद्दा आहे.
आपण लग्नात उच्चारल्या जाणाऱ्या प्रत्येक मंत्राचा अर्थ भटजींना विचारू शकतो. लग्न थोडे लांबेल एवढेच.
मी तर म्हणेन सर्व मंत्र संस्कृत मध्ये असल्यामुळे बऱ्याच लोकांना कळत नाहीत. सर्व लग्न विधी शुद्ध मराठीत भाषांतर करायला काय हरकत आहे

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2013 - 2:45 pm | प्रसाद गोडबोले

"विवाहसंस्थेचा इतिहास" पाहिलात तर हेटेरोसेक्शुअल लग्नातले मंत्र म्हणतानाही जीभ अडखळते

उदाहरणार्थ ? एखादा मंत्र ??

कॉपी आत्ता माझ्याकडे नाही. घरी गेलो की मंत्र उद्धृत करतो. जेवढे आठवते त्यानुसार अग्रभोगाच्या संकल्पनेशी राजवाड्यांनी काही मंत्रांचा संबंध जोडलेला आहे. ते एक आहेच, शिवाय प्रजननावर दिलेला भर हाही आजच्या काळात टीकार्ह आहेच ;)

पिशी अबोली's picture

21 Nov 2013 - 3:28 pm | पिशी अबोली

वर आणि वधू यांच्यासाठीच हे विवाहविधी असले तरी स्थलकालाप्रमाणे मंत्र बदलतात त्याप्रमाणे बदलत्या काळानुसार विधींमधे असा काही बदल हीसुद्धा एक गरज वाटू शकते असेही म्हणता येईल ना? शेवटी मानणे-न मानणे हाच भाग येतो असे एकूणात दिसतेय...

शेवटी मानणे-न मानणे हाच भाग येतो असे एकूणात दिसतेय...

बलीवर्दनेत्रभञ्जक!!

"तर अर्थ समजून न घेता केवळ उपचार म्हणून हिंदू पद्धतीने लग्न करणे हा आहे."

पण कशावरून अर्थ समजून न घेता त्यांनी सर्व विधि केले असतील ? कदाचित संततिसंदर्भातील मंत्र वगळून विधि पार पडला असेल असे समजण्यास वाव का नसावा ? आणि त्यांना पुढे मूल दत्तक घ्यायचे असेल तर ?

असेही विवाह पाहिले / ऐकले आहेत जे हिन्दू पध्दतीने झाले आहेत आणि ज्यात जोडप्यांनी मूल नको असे आधीच ठरवलेले होते

पैसा's picture

23 Nov 2013 - 12:48 am | पैसा

मग त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले म्हणूनही काही बिघडत नव्हते. मात्र हिंदू विवाहविधी हे वर आणि वधू यांच्यासाठी आहेत. इथे त्या अर्थाच्या मंत्रांचे काही प्रयोजनच नाही! म्हणजे हिंदू पद्धतीचे लग्न या शब्दांनाच इथे काही अर्थ नाही.

आजच्या घटकेला विवाहविधीचे मंत्र तो वर आणि ती वधू असेच आहेत. उद्या कोणाला आवश्यकता वाटल्यास त्यात पाहिजे तसे बदल करावेत. नंतर काही काळाने ते रूढी म्हणून चालून जातील. पण आज तरी त्या मंत्रांना अशा विवाहासंदर्भात काही अर्थ नाही.

निदान या केसमधे किंवा अशा प्रकारच्या दुसर्‍या कोणत्या केसमधे विवाहविधीचे मंत्र नव्याने लिहिल्याचे वाचले नाही. कोणी लिहिल्यास स्वागतच आहे. रूढी आणि परंपरा या काळाबरोबर हळूहळू बदलत असतात.

असेही विवाह पाहिले / ऐकले आहेत जे हिन्दू पध्दतीने झाले आहेत आणि ज्यात जोडप्यांनी मूल नको असे आधीच ठरवलेले होते

त्या लोकांनीही केवळ हिंदू पद्धतीचा उपचार पाळला असेच म्हणेन. आतिवास यांनी म्हटल्याप्रमाणे लोक एका रूढीतून सुटण्यासाठी दुसर्‍या रूढीचा आधार कशाला घेतात हे कोडंच आहे!

राजेश घासकडवी's picture

24 Nov 2013 - 6:24 am | राजेश घासकडवी

आजच्या घटकेला विवाहविधीचे मंत्र तो वर आणि ती वधू असेच आहेत.

नाही हो, हिंदू विवाहपद्धतीतली सात फेऱ्यातली सात वचनं फारच जनरल आहेत. ती कुठच्याही विवाहांसाठी चांगलीच आहेत. आपल्या परंपरा कशा समृद्ध आहेत, आणि सर्वव्यापी आहेत हे सांगण्याऐवजी त्या कोत्या आहेत असं का म्हणणं हे विचारजंतीच नाही का?

या वेबसाइटनुसार

पहिलं वचन - एक जण म्हणतो मी तुझी आणि मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी घेईन. दुसरी व्यक्ती म्हणते मी तुझ्या घराची काळजी घेईन. (हे वचन तर आता कालबाह्यच झालेलं आहे, कारण दोघेही बऱ्याच वेळा नोकऱ्या करतात.)
दुसरं वचन - पहिली व्यक्ती म्हणते तू मला आधार दे. दुसरी व्यक्ती म्हणते ठीक आहे, तू मला प्रेम आणि लक्ष दे.
तिसरं वचन - जोडीने ते दोघे शहाणपण आणि समृद्धी मागतात. एकमेकांशी निष्ठा मागतात.
चौथं वचन - त्यातली एक व्यक्ती दुसरीला मांगल्य, पावित्र्य आणल्याबद्दल धन्यवाद देते. दुसरी व्यक्ती पहिलीला आनंद देण्याची शपथ घेते. जोडीने ते मोठ्यांचा मान राखण्याची शपथ घेतात.
पाचवं वचन - जगाचं भलं होवो, आपली मुलं चांगली होवोत, आपल्या नातेवाईकांचं भलं होवो इत्यादी इत्यादी.
सहावं वचन - एक व्यक्ती म्हणते मी तुझं भलं करेन, दुसरी व्यक्ती म्हणते मी तुला चांगल्या कार्यात साथ देईन.
सातवं वचन - दोघे एकमेकांना म्हणतात की आपलं नातं दीर्घकाळ टिको, आणि निष्ठा आणि सामंजस्य राहो. आपल्या जीवनात प्रेम राहो, आणि याच जन्मापुरतं नाही, तर पुढचे जन्मही टिकून राहो.

ही वचनं इतकी सुंदर आहेत, की तो आणि ती किंवा ती आणि ती किंवा तो आणि तो यांनी एकमेकांना दिली तरी काहीही फरक पडत नाही.

प्यारे१'s picture

24 Nov 2013 - 12:24 pm | प्यारे१

समलिंगी विवाहाबद्दल विचार करताना पहिल्या पावलावरच ठेचकाळलो!

>>>तुझी आणि मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी

तुझी ठीक आहे पण 'मुलांची'- ही कुठून आणणार नि कशी आणणार?
दुसर्‍याची दत्तक घ्या नि सांभाळा? काळजी घ्या? का?
एकमेकांची काळजी घेऊ शकतील मे बी पण ह्यात पुन्हा अगदी समान पातळीवर दोघे असू शकतात का?
कधीनाकधी एक 'नरा'च्या नि दुसरा 'मादी'च्या स्वरुपात असेलच की.
मग आकर्षण समलिंगी कसं? काय लॉजिक असतंय कुणाला माहिती.
असो!
त्या गावाला जाण्याची इच्छा नाही.

सुहास..'s picture

24 Nov 2013 - 12:46 pm | सुहास..

एक मिनीट !!

.
.
.
.
.
. माझे पॉपकॉर्न संपलेत ..

घेवुन येतो ..

प्यारे१'s picture

24 Nov 2013 - 12:51 pm | प्यारे१

माझ्यासाठी पण!

आणच ;)

राजेश घासकडवी's picture

25 Nov 2013 - 2:54 am | राजेश घासकडवी

अहो भाऊ नर-मादी काय करताय, भावनाओं को समझो. सातही वचनांचा रोख आपलं नातं, आणि त्यातून निर्माण होणारी नवीन नाती सुंदर करू, आपण एकमेकांवर प्रेम करू, एकमेकांचं भलं करू असा आहे. हे उदात्त विचार अंगीकारून नवीन नात्यासाठी वापरायचा की 'त्यात एक स्त्री- एक पुरुष नाहीत' असा फुटकळ तांत्रिक मुद्दा काढायचा?

राजेश घासकडवी's picture

24 Nov 2013 - 6:34 am | राजेश घासकडवी

दुसऱ्या एका वेबसाइटवर मला हे भाषांतर सापडलं.

Seven Vows In Hindu Wedding

The bride and the groom take the first step of the seven vows to pledge that they would provide a prospered living for the household or the family that they would look after and avoid those that might hinder their healthy living.
During the second step of the seven pheras, the bride and the groom promise that they would develop their physical, mental and spiritual powers in order to lead a lifestyle that would be healthy.
During the third vow, the couple promises to earn a living and increase by righteous and proper means, so that their materialistic wealth increases manifold.
While taking the fourth vow, the married couple pledges to acquire knowledge, happiness and harmony by mutual love, respect, understanding and faith.
The fifth vow is taken to have expand their heredity by having children, for whom, they will be responsible. They also pray to be blessed with healthy, honest and brave children.
While taking the sixth step around the sacred fire, the bride and the groom pray for self-control of the mind, body and soul and longevity of their marital relationship.
When the bride and the groom take the seventh and the last vow, they promise that they would be true and loyal to each other and would remain companions and best of friends for the lifetime.

दोघींचेही मनःपूर्वक अभिनंदन!

एक रुढी मोडताना इतर रुढींच्या बंधनात अडकायची (थाटामाटात, विधीपूर्वक विवाह) माणसांना किती हौस असते ते पाहून गंमत वाटली. मानवी स्वभाव हे एक कोडं आहे हे पुन्हा एकदा पटलं!

ते रुढी ला मजा म्हणुन एन्जॉय करीत आहेत. नाहीतरी सात फ़ेरयामध्ये समलैंगिकांनी
परस्परांसाठी काय वचने द्यावी घ्यावी याचा थोडी उल्लेख आहे. ते मुळात धर्मसंमत च नाही
तर काय. आणी दुसरा हेतु हा की त्याविषयी चे गैरसमज दुर करुन त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा तो एक स्तुत्य प्रयत्न आहे.म्हणुन लपुन छपुन न करता त्यांनी टीपिकल हेट्रो मॅरेज सारखी मौजमजा करुन केलेल ते एक सरळ सेलीब्रेशन आहे.जस आपला काही संबंध नसतांना ही आपण गरबा अथवा भांगडा चा लग्नात समावेश करुन धमाल करतो तस. आणि त्या निमीत्ताने त्या खिश्चन लोकांना ही आपल्या इकडल्या परंपरा ची माहीती होते .

लेस्बियन किंवा गे अथवा होमो मुळात सेक्सची गरज म्हणुनच जवळ येतात.त्यातुन त्याच्या मध्ये जवळिक होत असावी. त्यामुळे लग्नानंतर त्याचा सेक्स कायदेशिर होत असावा इतकेच्. विवाह ही एक मानसिक गरज आहे हे पन्नाशी नंतर ठिक आहे.परंतु तरुन तरुणी फक्त मानसिक स्वाथ्य लाभावे म्हणुन लग्न करत असतील असे वाटत नाही.

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 12:53 pm | बॅटमॅन

मग भिन्नलिंगी विवाह काय मानसिक गरज म्हणूनच करतात काय? तिथे सेक्स करावासा वाटत नसता तर इतकी लोकसंख्या वाढली असती का =))

मालोजीराव's picture

21 Nov 2013 - 2:17 pm | मालोजीराव

जुन्या काळी लग्न पत्रिकेत 'शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे' असे लिहित असत

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 2:25 pm | बॅटमॅन

अन हा जुना काळ लै जुनाही नव्हता, सत्तरेक वर्षांपूर्वीपर्यंतचे तरी कन्फर्म माहिती आहेच.

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2013 - 2:47 pm | प्रसाद गोडबोले

'शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे

>>> काय सांगता ? अनबिलिव्हेबल !!

निनाद's picture

21 Nov 2013 - 4:01 pm | निनाद

जुन्या काळी लग्न पत्रिकेत 'शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे' असे लिहित असत

+ १ असा मजकूर असलेली जुनी पत्रिका मी पाहिली आहे.

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 4:04 pm | बॅटमॅन

येस! ही पत्रिका मी स्वतः पाहिली नसली तरी तशा मजकुराचे उल्लेख लै पाहिले आहेत. खाली निनाद यांनी तशी पत्रिका स्वतः पाहिल्याचेही लिहिले आहे. जरा शोधाशोध केली तर अशी पत्रिका मलाही सापडेल कुठेतरी असे वाटते.

पिलीयन रायडर's picture

21 Nov 2013 - 4:07 pm | पिलीयन रायडर

माझ्या कडे आहे.. माझ्या आई बाबांचीच बहुदा...
मी जाऊन मग आईला ती रीतसर दाखवुन हा काय प्रकार आहे हेही विचारलं होतं..
आई नी एका नजरेतुनच "गप बस.. नाही तर थोबाड फोडीन" असा दम दिला..!!

हम्म, असे प्रसंग अनुभवले आहेत. दम दिला नसला तरी "तुला कशाला पाहिजे" इ.इ. ऐकलेलं आहेच. अर्थात तेव्हा राग येत असला तरी आज ओके वाटतं, समजा जे कळायचं ते सगळं कळालंही त्या वयात तरी नक्की फायदा काय जोपर्यंत प्रत्यक्ष काही होत नै तोपर्यंत? जरा समज येईपर्यंत तो सगळा एक खेळ वाटायचीच शक्यता जास्त.

मृत्युन्जय's picture

21 Nov 2013 - 1:21 pm | मृत्युन्जय

अमान्य. कुठल्याही लग्नामागची भूमिका केवळ आता ठोकायला मिळणार अशी असेल तर त्या व्यक्ती विकृत आहेत असे समजावे. लग्न केवळ शरीराची गरज नाही. त्यासाठी लग्न करायची खरेच गरजही नाही. लग्न एक मानसिक गरज आहे. प्रेम ही देखल अशारीर पातळीवरची मानसिक गरज आहे. संभोग हा प्रेमाचा केवळ एक भाग झाला किंवा एक पुढची पायरी झाली.

बरंचसं आदर्शवादी. योग्य देखील. मात्र वास्तव बहुतांश वेगळं आहे.
वय झालं म्हणून बरेच सुशिक्षित लग्न करतात.
मात्र सुसंस्कारित असतीलच असं नाही.
प्रेमाच्या अभिव्यक्ती म्हणून संभोग वगैरेचा विचार होईल अशी बर्‍याचदा पोच/झेपच नसते.
कधी पोच असून देखील तशी परिस्थिती नसते.

वेताळ's picture

21 Nov 2013 - 1:30 pm | वेताळ

लग्न ही मानसिक गरज आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर लग्न केल्याने कोणते मानसिक समाधान मिळते त्यावर लिहा ना राव. काय सकृत आनि काय विकृत ह्याची चिरफाड नंतर करुया.मानसिक गरजेसाठी लग्न करण्याची देखिल काय गरज आहे?अहो भाउ भारतात लग्नाशिवाय सेक्स मान्य नाही म्हणुन लग्न करावे लागते.आमच्या समाजात लग्नाशिवाय सेक्स ग्राह्य धरला जात नाही. तुमच्या समाजाविषयी माहिती नाही म्हणुन विचारतो आहे.

मृत्युन्जय's picture

21 Nov 2013 - 2:16 pm | मृत्युन्जय

प्यारेचा प्रतिसाद वाचल्यावर ते " विकृत " वगैरे थोडे जास्त होते हे मान्य. ती विकृती आपण अमान्य ठरवुयात. पण लग्नाचा संबंध केवळ संभोगाशी आहे हे विधान अगदीच चुकीचे आहे. आनंद काय मिळतो हा प्रश्न विनोदात विचारणे वेगळे. पण लग्नातुन कुठलाही आनंद मिळत नसेल तर माणसाने लग्न करुच नये. समलिंगी आणि भिन्नलिंगी दोन्हीही. यात मग sexual orientation चा मुद्दाच आणु नये. मुळात या केसमध्ये दोन्ही समलिंगी व्यक्ती शारिरीक पातळीवर आधीपासुनच एकरुप झाले असावेत असे गृहीत धरुयात. ज्या समाजात ते राहत आहेत तिथेही समलिंगी संबंध अगदीच कॉमन नसले तरीही एक "अहो पापम" प्रकातातले कृत्यही मानले जात नाही. लिव्ह इन तिथे सर्वमान्य आहे. असे असताही त्या दोघींना जर लग्न करावेसे वाटले असेल तर ते नक्कीच शारिरीक गरजेसाठी असु शकत नाही. मग तो दोन मनांच्या मिलनांचाच मामला असु शकतो. शारिरिक गरजा तर काय अश्याही पुर्ण होउ शकतातच की.

तुम्ही विवाहसंस्थेच्याच विरोधात असाल तरची गोष्ट वेगळी. मग त्यावर वेगळ्या पातळीवर चर्चा करुयात.

ता.क.: ते विकृती वगैरे वाचुनही न भडकता प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभार.

मृत्युन्जय's picture

21 Nov 2013 - 2:17 pm | मृत्युन्जय

आमच्या समाजात लग्नाशिवाय सेक्स ग्राह्य धरला जात नाही. तुमच्या समाजाविषयी माहिती नाही म्हणुन विचारतो आहे.

हे विधान अप्रस्तुत वाटले. आपण दोघेही एकाच समाजात राहतो.

परंतु समाजात लग्न हे शरिरसंबधाला कायदेशिर मंजुरी देण्याकरिताच केले जाते हे माझे मत आहे आणि राहिल

तुम्हाला दुखवण्याचा कोणताहीहेतु नाही.

सुहास..'s picture

21 Nov 2013 - 1:08 pm | सुहास..

आनंदाची बातमी , या दोन जीवांचे , या संस्थळावर...माफ करा ...प्रगल्भ संस्थळावर, प्रतिसादांमधुन पुन्रमिलन झाले आहे ;) ;)

प्रभाकर पेठकर's picture

21 Nov 2013 - 1:49 pm | प्रभाकर पेठकर

हे सर्व करतांना त्यांनी बुरसटलेल्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव पडु दिला नाही.

अजून कांही शतकांनंतर, पुन्हा एकदा, स्त्री-पुरुष संबंध प्रस्थापित व्हायला लागले तर आजच्या ह्या पुढारलेल्या(?) लेस्बियन आणि होमो संबंधांच्या विचारसरणीला 'बुरसटलेली विचारसरणी' असे संबोधावे का?

मारवा's picture

22 Nov 2013 - 12:19 pm | मारवा

तुमची समलैंगिक विवाहा विषयी नेमकी भुमिका काय आहे ?
ते जरा विस्ताराने सांगणार का ?

प्रभाकर पेठकर's picture

23 Nov 2013 - 1:53 am | प्रभाकर पेठकर

तुमची समलैंगिक विवाहा विषयी नेमकी भुमिका काय आहे ?

समलैंगिक विवाह स्विकारण्याची अजुन माझी मानसिक तयारी नाही.

विवेक वाघमारे's picture

22 Nov 2013 - 7:28 pm | विवेक वाघमारे

पुन्हा एकदा, स्त्री-पुरुष संबंध प्रस्थापित व्हायला लागले तर

मग आता काय १००% सगळे विवाह समलिंगी होत आहेत काय? जे नैसर्गिकरीत्या समलिंगी आहेत त्यांनी ते जाहीर केले तर काय सगळा समाज समलिंगी होईल अशी भीती वाटते का तुम्हाला? काय राव चेष्टा करता का? तुम्ही समलिंगी नाही म्हणून दुसऱ्यांनाही व्हायला परवानगी नाही का? का या पृथ्वीतलावर फक्त एकाच प्रकारची, एकाच लैंगिकतेची, एकाच धर्माची, एकाच भाषेची, एकाच देशाची लोकं राहू शकतात का? जे अल्पसंख्य आहेत त्यांना जगण्याचा, प्रेम करण्याचा, लग्न करण्याचा, मुलं वाढवण्याचा हक्क नाही का? का तुमच्यासारख्या 'सरळ' किंवा 'नॉर्मल' लोकांनी मक्तेदारी घेऊन ठेवलीये सगळ्या हक्कांची?

प्रभाकर पेठकर's picture

23 Nov 2013 - 2:37 am | प्रभाकर पेठकर

मग आता काय १००% सगळे विवाह समलिंगी होत आहेत काय?

असं मी कुठे म्हंटलय? तुम्हाला तसं आजूबाजूला दिसतं आहे का?

जे नैसर्गिकरीत्या समलिंगी आहेत त्यांनी ते जाहीर केले तर काय सगळा समाज समलिंगी होईल अशी भीती वाटते का तुम्हाला?

उद्या जर सगळ्या समाजाने खरोखरंच समलिंगी व्हायचे ठरविले तर तो समाज प्रभाकर पेठकरला काय वाटते ह्याचा विचार करणार आहे का?

काय राव चेष्टा करता का?

होय. आवडली नाही का?

तुम्ही समलिंगी नाही म्हणून दुसऱ्यांनाही व्हायला परवानगी नाही का?

असं मी कुठे म्हंटलय? व्हा नं तुम्ही समलिंगी. कोण अडवणार आहे तुम्हाला?

का या पृथ्वीतलावर फक्त एकाच प्रकारची, एकाच लैंगिकतेची, एकाच धर्माची, एकाच भाषेची, एकाच देशाची लोकं राहू शकतात का?

जरी मी तसं म्हंटलं तरी तसं घडण्याची सुतराम शक्यता आहे का?

जे अल्पसंख्य आहेत त्यांना जगण्याचा, प्रेम करण्याचा, लग्न करण्याचा, मुलं वाढवण्याचा हक्क नाही का?

भारतात तरी अल्पसंख्यांकांना इतरांपेक्षा जास्त अधिकार आहेत आणि ते त्याचा सुखनैव उपभोग घेत आहेत.

का तुमच्यासारख्या 'सरळ' किंवा 'नॉर्मल' लोकांनी मक्तेदारी घेऊन ठेवलीये सगळ्या हक्कांची?

असं मी कुठे म्हंटलय? बाकी तुम्ही दिलेले 'सरळ' आणि 'नॉर्मल' असण्याचे प्रशस्तीपत्र मी फ्रेम करून भिंतीवर टांगून ठेवतो. तुमच्या प्रशस्तीपत्रकामुळे निदान इतरांना तरी समजेल की मी 'सरळ' आणि 'नॉर्मल' आहे. धन्यवाद.

माझ्या दिड ओळीच्या प्रतिसादातून तुम्हाला बरेSSSSSSSSSच कांही वाचता आले त्यामुळे मला आनंदच झाला आहे.

तर काय सगळा समाज समलिंगी होईल अशी भीती वाटते का तुम्हाला?

सगळे होमो किंवा लेस्बी झाले तर काही काळात समाजच संपेल!* IN LOVE*

मुळात नैतिकता आणि नैसर्गिकता यात घोळ झाला की हे प्रश्न निर्माण होतात.
घडते ती कृती असते. त्या-त्या व्यक्तीच्या (स्थळ-काळ-व्यक्ती सापेक्ष) नैतिकतेच्या कल्पनांनी हे ठरतं की त्याला तुम्ही प्रकृती म्हणता की विकृती. शेवटी प्रत्येक कृती ही 'नैसर्गिक' असतेच!

पैसा's picture

21 Nov 2013 - 2:48 pm | पैसा

या विषयावर एक "भयानक" चर्चा पाहिली होती. "बलात्कार ही नैसर्गिक गोष्ट आहे का?" इ.इ.

नगरीनिरंजन's picture

22 Nov 2013 - 9:30 pm | नगरीनिरंजन

होय आणि माणूस व निसर्ग असा भेद मान्य नसलेल्यांनी नैतिक व नैसर्गिक असा भेद केलेला पाहून नैतिकता नैसर्गिक नाही असा निष्कर्ष निघेल की काय असे वाटते. :-)

पैसा's picture

24 Nov 2013 - 12:07 pm | पैसा

:)

मोझेसच्या दहा आज्ञांमधली आठवी म्हटते मनुष्याने मनुष्याशी अथवा प्राण्यांशी अनैसर्गिक शरीरसंबंध करायचा नाही .याचा अर्थ ही गोष्ट दोन हजार वर्षांपासूनच आहे .भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांत प्रचलित होती (सुका मेवा खाण्याचा परिणाम असावा )

मृत्युन्जय's picture

21 Nov 2013 - 4:18 pm | मृत्युन्जय

ही गोष्ट फार पुर्वीपासुन आहे राजे. कित्येक शिल्पांमध्ये घोडा आणि इतर प्राण्यांबरोबर संभोग करणारे स्त्री पुरुष सापडतील भारतात. पुरुषांमधले समलिंगी संबंध तर फारच जुने. अगदी पुराणे खोदुन काढली तर काही संदर्भे देखील मिळतील. पण त्याविषयी (खासकरुन पुराणांविषयी) चर्चा करणे इथे अप्रस्तुत ठरेल त्यामुळे लिहित नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Nov 2013 - 3:49 pm | बिपिन कार्यकर्ते

या निमित्ताने हे आठवले... http://www.misalpav.com/node/3827

विवेक वाघमारे's picture

22 Nov 2013 - 7:39 pm | विवेक वाघमारे

खूप छान दुवा वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद!

स्पा's picture

21 Nov 2013 - 4:05 pm | स्पा

जेवणात जिलबि होती क?

निनाद's picture

21 Nov 2013 - 4:11 pm | निनाद

दोन हजार वर्षांपुर्वी बॅन झाली. त्या आधी होती. समाज मान्य होती असे म्हणा कंजुसराव.

समलैंगिकता हा विषय प्राचीन ग्रीक समाजात सर्व मान्य होता. (ख्रिश्चनोत्तर समाजात नव्हता).
ग्रीक देव झ्युस याचे इरा नावाच्या देवतेशी लग्न झालेले असताना त्याने त्याच्या सेवकाशी समलैंगिक संबंध ठेवले होते. हे इराला समजल्यावर ती त्या सेवकाच्या मागे लागली (म्हणजे सूड घ्यायला मागे लागली)
म्हणून झ्युसने त्याला पक्षाचे स्वरूप देऊन सदैव आपल्या जवळ ठेवले.

प्राचीन ग्रीसच्या काही भागात तर पुरुषी समलैगिकता मान्य नसेल तर समाजाच्या प्रमुख प्रवाहात मिसळता येत नसे...
ग्रीस मध्येच लेसवोस (ग्रीक उच्चार) (Lesbos) नावाचे बेट आहे. तेथूनच लेस्बियन हा शब्द आला आहे.
त्याच बेटावरची साफ्फो (ख्रिस्तपूर्व ७०० वर्षे) ही कवयत्री समलैंगिक होती असे म्हणतात.

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 4:22 pm | बॅटमॅन

नेमके!!! लेस्बियन हा शब्द मूळचा भूगोलवाचक आहे पण सॅफोमुळे तो लैंगिक कलवाचक झाला.

तुम्हाला अजुन माहीत आहे का प्लॅटो हा महान तत्ववेत्ता साफ़ो ला टेन्थ म्युझ म्हणत असे ? आणि जीच्या कवितांचा अभ्यास करण (इतर ९ क्लासिकल पोएट्स बरोबर ) हा त्याकाळी स्वत:ला सुशिक्षीत सिध्द करण्यासाठी साठी चा एक महत्वाचा निकष होता.साफ़ो ने केलेल्या या कविता बघा यांचा इंग्रजी अनुवाद ही त्यांच सौंदर्य दाखवुन देतो मुळ भाषेत काय काव्यानंद मिळत असेल ? वानगीदाखल या काही कवितांचा इंग्रजी अनुवाद देतो तो बघावा ! आणि साफ़ो चे विकीपेडीया चे पेज येथे आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Sappho
[१]

I shall be ever maiden,
If thou be not my lover,
And no man shall possess me
Henceforth and forever.
But thou alone shalt gather
This fragile flower of beauty,--
To crush and keep the fragrance
Like a holy incense.
Thou only shalt remember
This love of mine, or hallow
The coming years with gladness,
Calm and pride and passion.

[२]

With your head thrown backward
In my arm's safe hollow,
And your face all rosy
With the mounting fervor;

While the grave eyes greaten
With the wise new wonder,
Swimming in a love-mist
Like the haze of autumn;

From that throat, the throbbing
Nightingale's for pleading,
Wayward, soft, and welling
Inarticulate love-notes,

Come the words that bubble
Up through broken laughter,
Sweeter than spring-water,
"Gods, I am so happy!"

[३]

Love shakes my soul, like a mountain wind
Falling upon the trees,
When they are swayed and whitened and bowed
As the great gusts will.

I know why Daphne sped through the grove
When the bright god came by,
And shut herself in the laurel's heart
For her silent doom.

Love fills my heart, like my lover's breath
Filling the hollow flute,
Till the magic wood awakes and cries
With remembrance and joy.

Ah, timid Syrinx, do I not know
Thy tremor of sweet fear?
For a beautiful and imperious player 15
Is the lord of life.

[४]

When I pass thy door at night
I a benediction breathe:
"Ye who have the sleeping world
In your care,

"Guard the linen sweet and cool, 5
Where a lovely golden head
With its dreams of mortal bliss
Slumbers now!"

[५]
Softer than the hill-fog to the forest
Are the loving hands of my dear lover,
When she sleeps beside me in the starlight
And her beauty drenches me with rest.

As the quiet mist enfolds the beech-trees,
Even as she dreams her arms enfold me,
Half awaking with a hundred kisses
On the scarlet lily of her mouth.

[६]

Soul of sorrow, why this weeping?
What immortal grief hath touched thee
With the poignancy of sadness,--
Testament of tears?

Have the high gods deigned to show thee
Destiny, and disillusion
Fills thy heart at all things human,
Fleeting and desired?

Nay, the gods themselves are fettered
By one law which links together
Truth and nobleness and beauty,
Man and stars and sea.

And they only shall find freedom
Who with courage rise and follow
Where love leads beyond all peril, 6
Wise beyond all words.

[७]

It never can be mine
To sit in the door in the sun
And watch the world go by,
A pageant and a dream;

For I was born for love, 6
And fashioned for desire,
Beauty, passion, and joy,
And sorrow and unrest;

And with all things of earth
Eternally must go,
Daring the perilous bourn
Of joyance and of death,

A strain of song by night,
A shadow on the hill,
A hint of odorous grass,
A murmur of the sea.

[८]

My lover smiled, "O friend, ask not
The journey's end, nor whence we are.
That whistling boy who minds his goats
So idly in the grey ravine,

"The brown-backed rower drenched with spray,
The lemon-seller in the street,
And the young girl who keeps her first
Wild love-tryst at the rising moon,--

"Lo, these are wiser than the wise.
And not for all our questioning
Shall we discover more than joy,
Nor find a better thing than love!

"Let pass the banners and the spears,
The hate, the battle, and the greed;
For greater than all gifts is peace,
And strength is in the tranquil mind."

आपल्या भर्तुहरी च्या श्रुंगार-शतक सारख साफ़ो च ही शंभर कवितेच कलेक्शन आहे त्यातील काही कविता वर दिलेल्या आहेत.

निनाद's picture

22 Nov 2013 - 3:47 am | निनाद

याच साफोचे स्वातंत्र्य मात्र या पुढारलेल्या ग्रीक समाजाने मान्य केले नाही. तिची लैंगिकता किंवा त्यावरची काव्य मांडणी ही तिच्यावर झालेल्या अन्यायातून आली असावी. तिचे प्रेम हे स्त्री व पुरुष दोघांवरही होते असे काव्यात दिसते. पण या काव्यात शारीर वर्णने नाहीत. किंवा तसे पुरावे सापडलेले नाहीत त्यामुळे काही इतिहासकार तिला तिला लेस्बियन मानत नाहीत.

तिचे फॉन नावाच्या व्यक्तीवर प्रेम होते 'तो' मिळाला नाही म्हणून तिने आत्महत्या केली असाही एक प्रवाद आहे.
पण प्राचीन ग्रीक मध्ये फॉन हा प्रेमाचा देवही मानला जातो. त्यामुळे ती शक्यताही पूर्णपणे मान्य होत नाही.
तिला काहीकाळ लेस्वोस वरून सिसिलीला हद्दपार करण्यात आले होते.
शेवटी तिने या सर्वाला कंटाळून आत्महत्या केली असाही प्रवाद आहे.

असो,
साफो लेस्बियन होती की नाही हे बाजूला ठेऊन तिच्या काव्याचा आनंद घेता आला म्हणजे पुरे... :)

कवितानागेश's picture

21 Nov 2013 - 4:30 pm | कवितानागेश

पण नक्की प्रॉब्लेम काय झालाय?
फोटो तर छान आलेत. :)

शिल्पा ब's picture

22 Nov 2013 - 12:32 am | शिल्पा ब

मुख्य म्हणजे यात अनैसर्गिक काय वाटत तेच मला समजलेल नाही. निसर्गतःच जर स्वलीन्गी आकर्षण असेल तर ते अनैसर्गिक कसं ? अन कोणी कोणाशी लग्न करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न.

असो. दोघींना शुभेच्छा.

अवांतर: काही लोकांच्या मानसिकतेचा अंदाज येउन त्यांच्यापासून लांब राहण्यास काही प्रतिसादांची मदत झाली

हुप्प्या's picture

22 Nov 2013 - 3:25 am | हुप्प्या

जर पुरुषाने स्त्रीशीच लग्न करावे ही कल्पना बुरसटलेली, प्रतिगामी, मागासलेली असेल. आणि कुणीही कुणाशीही लग्न करावे अशी कल्पना मूळ धरत असेल तर बहुपत्नित्व बेकायदेशीर का? कायद्याने सज्ञान य पुरुष आणि क्ष स्त्रिया (य : एक, दोन, तीन, चार इत्यादि कितीही, क्ष: एक, दोन, तीन, चार इत्यादि कितीही ) एकमेकांशी लग्न करु शकले पाहिजेत. लग्न हे दोघांचेच असले पाहिजे हीही कल्पना हळूहळू केराच्या टोपलीत टाकावी आणि जास्त खुल्या दिलाने विचार करुन कुणीही, कुणाशीही, कितीही लोकांशी लग्न करु शकले पाहिजे.

त्याहून पुढचे पाऊल म्हणजे ह्या लग्न बंधनात केवळ मनुष्य प्राणीच असणे हेही मागास, जुनाट, प्रतिगामी आहे. त्यामुळे ह्या पवित्र लग्नबंधनात प्राणीसृष्टीही यावी म्हणजे कसे सगळे बंधमुक्त होईल.

हुप्प्याजी, तसे नव्हे. स्त्री पुरुष विवाह तर ठीक आहेतच पण त्याचप्रमाणे समलिंगी विवाहही तेवढेच नैसर्गिक समजले जातायत त्याबद्दल चालले आहे सगळे! यात बहुपत्नित्व कुठे आले? अगदी समलिंगी विवाहातही बहुपत्नीत्व्/पतित्व (जे काय असेल ते) नकोच! बाकी शक्यता काय कितीही असू शकतातच.

हुप्प्या's picture

22 Nov 2013 - 7:10 am | हुप्प्या

बहुपत्नीत्व, बहुपतीत्व हे निसर्गातही आढळते. तेव्हा त्याला नैसर्गिक म्हणायला प्रत्यवाय नसावा. जुन्या काळात हिंदू, ख्रिस्ती समाजात, आणि आजही मुस्लिम समाजात बहुपत्नित्व आहे.
आणि समजा एक पुरुष आणि काही स्त्रिया ज्या कायद्याने सज्ञान आहेत अशा लग्नबंधनात जाणून बुजून अडकून घेत आहेत तर कायद्याची ना का असावी?
जर पुरुषाने स्त्रीशीच लग्न करावे ह्या कल्पनेला आपण सुरुंग लावू शकतो तर एका पुरुषाने एकाच व्यक्तीशी लग्न करावे ह्या कल्पनेला का नाही लावू शकत?
य व्यक्तीला क्ष व्यक्तीच्या वैवाहिक संकल्पना पटत नसतील म्हणून क्ष ला तसे करण्याचा हक्कच नसावा असे का?

बहुपत्नित्वाने मोठाच घोळ होतो असे मला वाटते. पुरुषांसाठी हा तिढा निस्तरता आला नाही तरी एकवेळ चालेल (जर तो मनुष्य कामानिमित्ताने घराबाहेर राहणे , प्रवास यामध्ये असेल तर). हाच मनुष्य चार बायकांबरोबर एका घरात राहतोय हे चित्र जरी डोळ्यासमोर आले तरी मोठा प्रश्न लक्षात येईल. एकंदरीतच नवरा बायको, जोडीदार, किंवा जवळचे नाते यात पझेसिव्हनेस असतोच. म्हणूनतर जो राडा होतो, कायदेशीर अडचणी, याशिवाय आणखी अनेक मुद्दे आहेत. हे टाळावे म्हणून नेहमीचे लग्न असो नाहीतर समलिंगी विवाह असोत त्यात बहुपत्नित्व/ बहुपतित्व नको असे वाटते. हां, आता एका जोडीदाराबरोबर पटले नाही तर कायदेशीररित्या वेगळे झाल्यावर दुसरा विवाह करणे, त्या जोडीदाराशी पटले नाही तर तिसरा जोडीदार निवडणे, नंतर चौथा याला कोणाची हरकत असणार नाही पण अशा मनुष्यप्राण्याचे आयुष्य म्हणजे काय असेल? (बाकीही बरेच मुद्दे आहेत पण जाऊदे!)

निनाद's picture

22 Nov 2013 - 4:11 am | निनाद

https://mr.wikipedia.org/wiki/साफो

या लेखाची सुरुवात झाली.
या लेखात भर घालणारांचे स्वागत आहे...

मदनबाण's picture

22 Nov 2013 - 3:01 pm | मदनबाण

ह्म्म... व्यक्ति सापेक्ष पहयचे ठरवले तर ते गैर वाटु नये.जर एखाद्या स्त्रीला पुरुषा ऐवजी स्त्रीच आवडत असेल तर तीच्या नैसर्गिक इच्छा तशाच असाव्यात असे मानण्यास चूक ठरु नये. हेच पुरुषां विषयी देखील म्हणता येइल. त्यांच्यासाठी ज्या भावना नैसर्गिक आहेत त्या समाजासाठी विकॄत असु शकतील.समाजाच्या दॄष्टीने ही गोष्ट स्वीकार्यह ठरेलच की नाही हे सांगता आणि ठरवता येणे कठीण.

जाता जाता :- हिंदुस्थानात मला वाटतं दक्षिणेत हिजड्यांचे एक मंदिर आहे {या मंदिराचा आणि बहुतेक महाभारतातील कथेचे काही तरी संबंध आहे म्हणे},जिथे बहुधा वर्षातुन एकदा देशातल्या सर्व भागातुन हिजडे एकत्र येतात आणि त्यांच्या आवडत्या सहचार्‍या बरोबर लग्न करतात.हिजडे असले तरी काय झाल त्यांना देखील "मन" आहेच की !
मुनुष्य प्राण्याच्या ह्या भूतलावरील आयुष्यास भोग हे आहेच ! मग समलिंगी असो वा विषयलिंगी.

नैर्सगिकतेचा आणि नैतिकतेचा काय संबंध.. लोक बर्‍याचदा हे दोन शब्द समानार्थी असल्यासारखे का वापरतात?
उ.दा.: एखाद्या विवाहीत पुरुषाचे सुंदर स्त्रीकडे आकर्षित होणे हे नैर्सगिक असेल पण नैतिक असेलच असे नाही. तसेच लग्न होईपर्यंत ब्रह्मचर्य सांभाळणे नैतिक असेल पण नैर्सगिक खचितच नाही.

विवेक वाघमारे's picture

22 Nov 2013 - 7:46 pm | विवेक वाघमारे

दोघींनाही भावी आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा! =)

विवेक वाघमारे's picture

22 Nov 2013 - 7:58 pm | विवेक वाघमारे

पण एक शंका येते: भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत जाऊन श्वेतवर्णीयांशीच का लग्न करतात, कृष्णवर्णीयांशी का नाही? किंवा पूर्वेकडच्या आशियायी लोकांशी का नाही?
एक अजून एक उदाहरण: रिशी आणि डॅन चे लग्न