मधल्यामध्ये....

ज्ञानव's picture
ज्ञानव in काथ्याकूट
10 Nov 2013 - 9:37 am
गाभा: 

परवा एक नाग पलंगाच्या डोक्याकडच्या भागाकडे वळवळत होता आणि खाली सासूबाई फुल टू पसरल्या होत्या. फुल डेडली सिचुएशन, माझ्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. नागाला शुक शुक केले... एक क्षण दुर्वासमुनींना जसा समाधी भंग केल्यावर आला असता तसा त्याला राग आला जोरात फुत्कारून काय घेतले, शेपाटीपण वेळावली पण मी जीवावर उदार होऊन त्याला म्हंटले "अरे हीच संधी आहे चाव त्यांना (हो मी त्यांच्या मागेही आहोजाहोच करतो ) डसून घे".... पण ह्याक....तो शांत होता जरा वेळाने निघाला तेव्हा त्याला म्हंटले " तू पण घाबरलास ना ??!!!!! मग कशाला बसलास जाऊन त्यांच्या डोक्यावर ? हुडूत " त्यावर रागाने फणा बिणा काढून म्हणाला "जातो का आता ? चावायला नव्हतो आलो विष भरून घ्यायला आलो होतो...टेस्ट करू का तुझ्यावर?"
गर्भितार्थ लक्षात घ्या स्वप्न नको सासू मग नवर्याची असो कि बायकोची ती इतकी जहरीली का असते. बायको जेव्हा "तुमची आई असे म्हणाली.... तसे म्हणाली" "त्या अश्याच आहेत त्या तश्याच आहेत" असे म्हणून त्रास देते तेव्हा नवर्याला होणारा त्रास किंवा "तू बायकोच्या ताटाखालचे मांजर होतो आहेस रे बाबा " हि विधाने आई करते तेव्हा दोघांनाही मुलाच्या किंवा नवर्याच्या मनाची काय स्थिती होते हे समजत नसेल का?
पुरुषांच्या मागे सासू - सुनेची एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी चाललेली प्लानिंग हीसुद्धा त्रासदायक होत नाही का एकीने घडवले म्हणून आणि एकीबरोबर आयुष्य काढायचे म्हणून आमची अडकित्त्यात सुपारी का?

पण वास्तवात पुरुषांना आरडा-ओरडा, भांडणे नको असतात बायकांना ती हवी असतात असे नाही पण ती होऊ नयेत म्हणून प्रयत्न काय? का सासू सून पटत नाही? वैचारिक gap, मुलावरचा/नवर्यावरचा हक्क प्रस्थापित करण्याबाबतचा संघर्ष ह्यापैकी नक्की काय?
सध्या जरा भंजाळून गेलोय त्यामुळे विषय नीट मांडता येत नाहीये....पण सासू सून ह्या विषयावर स्त्रीवर्गाने आणि पुरुषवर्गाने आपली मार्ग दर्शनपर मते मांडावीत असे वाटते

पुरुष म्हणून मी कसे वागावे हे सासू आणि सून दोघांनी सांगावे. "माझी सासू खाष्ट होती मी म्हणून निभावले हो आणि आता माझी सून जरा ज्यादाच आहे मी म्हणून समजून घेतेय" हे माझ्या एका मैत्रिणीची सासू मला सांगत होती..."अरे काय आहे हे ?"

प्रतिक्रिया

खटासि खट's picture

10 Nov 2013 - 9:49 am | खटासि खट

उजवा पाय (उपाय) :
मुलीला नांदवण्यापेक्षा मुलाने नांदायला जावे.