बर्याच दिवसापासून पडलेला प्रश्न.
हल्लीच नाही तर खूप आधीपासूनच मिसळपाववर अवांतर खूप खूप सुरु अस्तं. कधी विषयाला अनुसरुन, कधी अगदीच्च अवांतर. अनेकदा चर्चा देखील झाल्या असाव्यात. मला नक्की आठवत नाही.
लेखन सकस असेल तर त्याला किती प्रतिसाद आले वगैरे गौण ठरतं. एकही प्रतिसाद न मिळता अथवा फार कमी प्रतिसाद मिळणारा एखादा लेख भिडणारा असू शकतो. कारण ते इतकं आतवर भिडलं जातं की त्यावर काय बोलायचं ते समजत नाही. तेव्हा खरंच मौन हाच खरा प्रतिसाद असतो.
तर शेकड्यानं प्रतिसाद मिळून देखील एखादा लेख आपल्याला काय 'देतो' हे ठरवणं कठिण!
आता कुठल्या लेखनाला सकस म्हणायचं ह्या बाबतच शंका असेल तर त्याला मात्र सलाम आहे आपला.
प्रतिसादांचं शतक व्हावं म्हणून स्वतःच स्वत:च्या दर्जेदार धाग्यावर उगाच्च राळ उडवून का घ्यावी / का घ्यावी हा देखील मला पडलेला प्रश्न आहे.
ह्यातून आज मजा वाटत असली तरी त्यातून मिळणारं आऊटपुट काय दर्जाचं असेल ह्याबाबत शंकाच वाटते आहे.
माझ्या मते लेखन हे मला गणपतीच्या मूर्तीसारखं वाटतं. नि प्रतिसाद म्हणजे आरास.
कुठलंही लेखन हे लेखन म्हणून केंद्रस्थानी असावं. त्या अनुषंगानं येणारे प्रतिसाद, प्रतिक्रिया, सुधारणा, सुचवण्या हे आराशीसारखे असावेत. कधी सुसंगत रंगसंगती देखील खुलते, कधी विसंगती देखील भावते. पण म्हणून उगाचच मोजक्या फुलां-दुर्वां ऐवजी फुलांचे नि गवताचे भारेच्या भारे गणपतीला झाकत असतील तर काय उपयोग?
बर्याचदा लेख बाजूला पडून प्रतिसादच एवढे मोठे (म्हणजे निव्वळ आकारानं नाही) त्याउप्पर विसंगत असतात की लेख झाकोळला जातो. अशा वेळी थोडी समंजस बाजू घेऊन नवा लेख लिहीला जाणं जास्त श्रेयस्कर ठरेल का? नव्या लेखाची सुरुवात कशी झाली ह्याबद्दल थोडी पार्श्वभूमी देता येऊ शकेल. ह्यामध्ये प्रतिसादा द्वारे अधिक नेटकी, व्यवस्थित माहीती मिळू शकेल. (उदाहरणादाखल कोकण ट्रीपचा गविंचा प्रतिसाद)
आपल्याला काय वाटतं? चर्चा झालेली असेल तर का कू उडवला तरी चालेल.
(सदरहू काथ्याकूट हा लेखकाला स्वतःला देखील तंतोतंत लागू पडतो.)
प्रतिक्रिया
27 Nov 2013 - 3:01 pm | सुहास..
सुरु कोणी केले ...याचा आधी अभ्यास करा ...
अवांतर : चांदण्याच चांदण्या मिळालेला
वाश्या
27 Nov 2013 - 3:09 pm | अनिरुद्ध प
फारच गंभीर आहे,मार्गदर्शक उत्तराच्या प्रतिक्षेत.
27 Nov 2013 - 3:09 pm | प्रचेतस
:)
27 Nov 2013 - 3:11 pm | प्यारे१
कणिक मळून ठेवलेली. पोळ्या केल्या काय किंवा पुर्या केल्या काय. चालतंच की! ;)
27 Nov 2013 - 3:12 pm | पैसा
ते तुमच्याकडे तळणीसाठी तूप आहे का नाही त्यावर अवलंबून आहे.
27 Nov 2013 - 3:14 pm | प्रचेतस
केलीत ना अवांतराला सुरुवात =))
27 Nov 2013 - 3:17 pm | पैसा
ते प्यारे विचारतंय पोळ्या करायच्या की पुर्या!
27 Nov 2013 - 3:23 pm | प्यारे१
हे हेच्च ते. असं सुरु होतंय. गैरसमज नुस्ता.
आम्ही म्हणतोय काय तुमचं चाल्लंय काय?
आम्ही विचारलं कुठं? कच्चा माल तयार होता 'स्टोअर' मध्ये त्याचा वापर 'असा' केला एवढंच म्हणालो.
27 Nov 2013 - 3:33 pm | पैसा
अवांतर कसं होतं याचं सोदाहरण प्रात्यक्षिक!
28 Nov 2013 - 12:50 pm | मालोजीराव
प्यारेकाकांना पुरी आवडते कि पोळी यावर धाग्याचं भवितव्य आहे :P
29 Nov 2013 - 12:04 am | भीडस्त
मोबाईलवर बघताना
शीर्षक
प्यारेकाकांना परी आवडते का
असं दिसलं ना राव.
अन खाली त्याचा उत्तरार्ध
की परा ?
असा असेल की काय असं वाटलं....
(शंकित) भीडस्त
27 Nov 2013 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा
27 Nov 2013 - 3:12 pm | प्रचेतस
:) :)
27 Nov 2013 - 3:20 pm | अनिरुद्ध प
सुद्धा करता येईल की ?
27 Nov 2013 - 3:29 pm | त्रिवेणी
पण गव्हाच्या पीठाची भाकरी कशी करता येईल.
(अवांतर-त्यांनी प्रतिसादात पोळी की पुरी असे लिहिले आहे त्यावरून अंदाज बांधला की ती गव्हाची कणीक होती.
27 Nov 2013 - 6:51 pm | विजुभाऊ
गव्हाच्या पिठाच्या भाकर्या होणार नाहीत पण तेलात मळल्यामुळे त्याच्या दशम्या निश्चितच करता येतील.
रच्याकने: दशम्या करता येत नसतील तर रेशीपी लवकरच देतो.
27 Nov 2013 - 8:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
आमच्या इथे मिळतात अरबी खुब्ज... गव्हाच्या भाकर्याच असतात त्या अरबी तंदूरमध्ये भाजलेल्या !
(वेळप्रसंगी लष्करच्या भाकर्या बडवाव्या अश्या मताचा) इए
27 Nov 2013 - 9:23 pm | जेनी...
इस्पु कका अरबी खुब्ज ची रेशिपि टाकाना
28 Nov 2013 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे
आमाला फक्त खाय्ची रेसिपी येते बन्वाय्ची नाय्बा +D
28 Nov 2013 - 12:14 pm | अनिरुद्ध प
गजानन महाराज सन्स्थान शेगाव येथे दुपारी प्रसादाला दिली जाणारी भाकरी ही सुद्धा गव्हाच्या कणकेची असते असे ऐकुन आहे.
27 Nov 2013 - 3:14 pm | विटेकर
गुणपूर्णता आणि लोकप्रियता यांचे प्रमाण व्यस्त असते ! अपवाद : पु.ल.
तस्मात अधिक प्रतिसाद म्हणजे अधिक चांगला लेख असे मुळीच नाही. आणि बर्याच वेळा प्रतिसादच मूळ लेखापेक्षा चांगले अधिक माहीती देणारे अधिक आनंद देणारे असतात. त्यामुळे त्याचा व्यत्यास ही चूकच !
मूर्ती आणि आरास अशी तुलना करता येणार नाही , फार तर मुख्य पदार्थापेक्षा डावे- उ़जवे अधिक भाव खाउन जातात असे म्हणता येईल.
आण़खी एक , प्रतिसादांनी लिहिणार्याचा उत्साह वाढतो हे ही खरे त्यामूळे नवोदितांना आश्वासक प्रतिसाद जरुर द्यावेत. ( अगदी लगेच बाजार उठवू नये !) आणि "लेख-पाडू" लोकेषणावाल्यांचा उत्साह २-४ लेखांच्यापलिकडे जात नाही हे ही तितकेच खरे !
27 Nov 2013 - 3:18 pm | सुहास..
काल आमच्या इथे ' मैंने प्यार किया ' मधलं कबुतर पाण्याच्या टाकीला धडकलं , दोन थेंब गळुन ...आपल हे....दोन पंख गळुन पडले ...पडले म्हणजे काय ...साक्षात रामकाका प्रेमात पडले ...आधी त्यांना टक्कल पडले मग प्रेमाच्या खड्ड्यात पडले...गाडीतले पेट्रोल संपले असताना फटाके कसे वाजविणार म्हणुन ते विणाताईंकडे गेले ...कोण विणाताई ...रिना ताई ची बहीण ...बहीण ..वहीणी नव्हे ...सविता वहीणी (पक्षी : भाभी ) राष्ट्रीय भाभी आहेत ...आता राष्ट्रीय काय ते विचारू नकोस ...
आणी कितवा ते पण ;)
27 Nov 2013 - 6:50 pm | जेनी...
काय भारी प्रतिसादे =))
27 Nov 2013 - 7:16 pm | राजेंद्र मेहेंदळे
हे म्हणजे शाळेतल्या निबंधासारखे झाले
गाय दूध देते. त्याचे दही,ताक ,लोणी करतात.गाय पवित्र अस्ते.पवित्र वस्तूची पूजा करतात. पूजा माझ्याशेजरच्या बाकावर बस्ते.ती मला फार आवडते...वगैरे वगैरे
27 Nov 2013 - 7:19 pm | बॅटमॅन
बाकी सवितावहिणींचा उल्लेख काळजाला भिडून वगैरे गेला.
29 Nov 2013 - 12:15 am | भीडस्त
सविता वहिनींना या धाग्यावर बोलावता येईल का ??
नाही म्हणजे त्यांचा 'विषय' निघालाच आहे म्हणून आपलं...
विषयासक्त (नसलेला) भीडस्त
27 Nov 2013 - 3:26 pm | वडापाव
चांगल्या विषयावरील बाष्कळ आणि टुकार प्रतिसाद...
हे पटलं.
27 Nov 2013 - 3:29 pm | सुहास..
धाग्यावरचा प्रतिसाद लागला वाटत ;)
27 Nov 2013 - 3:37 pm | वडापाव
छे हो... स्पष्ट मत मांडलेलं मला केव्हाही आवडतं. मग ते मी कोणाबद्दल मांडलेलं असो, किंवा इतर कोणी माझ्या धाग्यावर/प्रतिसादावर... तुमचा प्रतिसाद तर विशेष आवडला होता... :) पण हा नाही आवडला... असो. इथे अजून अवांतर नको. कारण इथल्या धाग्याकर्त्याचं म्हणणं पटलंय. हवं तर खव किंवा व्यनि मध्ये बोलू :)
27 Nov 2013 - 3:52 pm | सुहास..
कारण इथल्या धाग्याकर्त्याचं म्हणणं पटलंय. >>>
अरे मॅच बघु का नको आज !!
पेर्या , लेका नशीबवान आहेस ;)
( आज हसुन मरणार आहे मी !!! )
27 Nov 2013 - 6:51 pm | जेनी...
:-/
27 Nov 2013 - 3:30 pm | पैसा
अवांतराबद्दल बहुसंख्य सदस्यांना कुतुहल असेल की नक्की कसं धोरण असतं. संपादक मंडळातर्फे सांगायचं तर त्याबाबत अगदी कडक धोरण नसतं. बरंच लवचिक असतं. म्हणजे असं की टवाळ कार्ट्याचा एक धागा होता, मुली अशा का वागतात? आणखी एक धागा होता, गुळांब्याच्या राहिलेल्या पाकाचं काय करावं? अशा धाग्यांवर मौलिक प्रतिसाद येणं अवघडच असतं.
राजकीय्/सामाजिक विषयांवर धागे असतात, त्यात अनेकदा धाग्यापेक्षा प्रतिसाद उत्तम अशी अवस्था असते. कधी अवांतर मूळ विषयाला पोषक असतं. कधी अवांतर चर्चा चांगली झाली असेल तर ती मूळ धाग्यापासून वेगळी काढून त्याचा नवीन धागा करण्यात येतो. अशी चर्चा बॅटमन, पिशी अबोली आणि वल्ली (बहुधा) इ. यांनी काही दिवसांपूर्वी भाषाशास्त्रावर केलेली सहजच आठवते आहे.
कधी कधी एखाद्या गंभीर विषयावर धागा असताना त्यावर प्रतिसादात अवांतर झाले तर धागाकर्ता सं.मं. ला विनंती करतो. त्यानुसार ते अवांतर उडवण्यात येते. मग भले त्यात संपादकांनी केलेले अवांतर का असेना! नवीन लेखकांना हतोत्साहित करण्याचे प्रकार आता खूप कमी झाले आहेत. मात्र वारंवार सांगून शुद्धलेखन इ. मधे काही सुधारणा होत नसतील तर इतर सदस्यांनी चेष्टा केली तर त्याला काही उपाय नसतो.
सदस्य म्हणून बोलायचं तर मला मिसळपाव यासाठीच (अवांतरासाठी आणि तिरप्या होत जाणार्या प्रतिसादांसाठीच) फार्फार आवडतं. अनेकदा माझे प्रतिसाद सुद्धा या दुष्ट संपादकांनी अवांतर म्हणून उडवले आहेत! काय सांगू तुम्हाला!! :-/
27 Nov 2013 - 4:55 pm | टवाळ कार्टा
हायला आठवण आहे वाटते अजुन ;)
27 Nov 2013 - 3:34 pm | सुहास..
तु काही म्हण ज्यो !!
या अश्या धाग्यांवर सगळ्यात मोठा प्रतिसाद टंकणारे दोन च असणार ..
एक म्हणजे सल्लाकाका आणि दुसरे प्रतिसाद काका ....;)
27 Nov 2013 - 3:47 pm | बॅटमॅन
=))
27 Nov 2013 - 3:51 pm | इरसाल
एक ठराविक खाका मान्य केलाय लोकांनी, कदाचित काही कंपुबाजांनी, की ज्याला जास्त प्रतिसाद तो जास्त भारी किंवा लोकप्रिय लेखक्/लेखिका इ.इ.
म्हणुन धाग्याने शंभरी गाठावी यासाठी लोक काय काय करतात ते मिपावर अलगदच कळते.
पण ह्या थेरांमधे एखादा उत्कृष्ट धागा दुर्लक्षिला जातो.
वात्रट लेकाचे
27 Nov 2013 - 3:55 pm | सुहास..
म्हणुन धाग्याने शंभरी गाठावी यासाठी लोक काय काय करतात ते मिपावर अलगदच कळते >>
आपल्याला ईर्याचे प्रतिसाद याच मुळे आवडतात ...कसा सरळ लिहितो हा खानदेशी ...मुळात आपला एरियाच असा आहे :)
सिल्लोडचा
वाश्या
27 Nov 2013 - 5:12 pm | इरसाल
सगळी कडे चपाटा मिरची वापरुन चालत नाही.
हो की नाही सुहाससाहेब ?
27 Nov 2013 - 3:56 pm | प्यारे१
हे सध्याच्या समाजमनाचं प्रतिक तर नव्हे?
अत्यंत टुकार चित्रपट करोडोंचा बिझनेस करतात.
आंतरजालावर ४-५ वर्षांमध्ये पिढी बदलतेय की काय असं वाटू लागलंय.
27 Nov 2013 - 3:51 pm | अग्निकोल्हा
संपादक झालात की काय ?
27 Nov 2013 - 5:11 pm | पिलीयन रायडर
प्रतिसांदा मधलं भांडण जाऊ दे.. स्वाक्षरी मधलं भांडण जास्त इंटरेस्टींग आहे..!!!
बाकी अवांतर नाही केलं तर मि.पा ची कळा जाईल.. ग्लॅमर जाईल.. ट्यार्पी जाईल.. आमचा टाईमपास जाईल..
असं कोण सिरेसली आणि सिन्सिअरली वागत असतं का बे मि.पा वर?
27 Nov 2013 - 5:25 pm | प्यारे१
>>>स्वाक्षरी मधलं भांडण जास्त इंटरेस्टींग आहे..!!!
माझी स्वाक्षरी माझ्या स्वतःसाठी आहे. खुलासा संपला.
27 Nov 2013 - 5:34 pm | पिलीयन रायडर
न मागता खुलासा दिल्याने न विचारलेल्या गोष्टींचा पण खुलासा झालेला आहे!!
धन्यवाद!
27 Nov 2013 - 5:53 pm | प्यारे१
;)
27 Nov 2013 - 5:38 pm | सूड
तुमच्या स्वाक्षरीकडे पाह्यलंच नाही मी. वय आणि पगार चारचौघात विचारु नये. ;)
27 Nov 2013 - 5:58 pm | प्यारे१
>>>आजचा सुविचारः सूड दुर्गेऽऽऽ सूड !!
हे आवडण्यात आलेलं आहे. ;)
27 Nov 2013 - 5:36 pm | बॅटमॅन
अगदी अगदी. मिपा म्हणजे आन्लैन शाळा नै.
27 Nov 2013 - 5:47 pm | पिलीयन रायडर
शाळा तर आहेच रे उलट.. असला धमाल बालीशपणा अजुन कुठे केला होतास सांग बर!!
27 Nov 2013 - 5:49 pm | बॅटमॅन
मित्र जिथे असतील तिथे सगळीकडे...शाळाच नव्हे तर बाहेरही.
27 Nov 2013 - 5:12 pm | मुक्त विहारि
खरी गोष्ट...
27 Nov 2013 - 5:28 pm | यशोधरा
दुरुस्त आनेसे मतलब. :)
27 Nov 2013 - 5:41 pm | चौकटराजा
एक संपादक श्री वल्ली जे जवळच रहात असल्याने लेखांची गुणवत्ता ई गोष्टींवर चर्चा होते. बाबासाहेबाना ( बाबासाहेब आम्बेडकर बाबासाहेब भोसले नव्हेत ) अपेक्षित नसलेली लोकशाही जशी चालू आहे.तसेच तात्या वा नीलकांत याना ( कदाचित) अपेक्षा नसलेले मिपा ते हेच.
काही लोक नर्म विनोदासाठी येथे येत असल्याने सर्वांच्याच हातून ( अगदी संपादक पदावर असलेल्यांच्या सुद्धा) अवांतर
लिहिले जाते. चालायचंच !
माझी लेखाची कल्पनाच अशी आहे की ते एक दस्तावेज व्हावे. म्हणजे असे की लेख व प्रतिक्रिया असे त्याचे स्वरूप असूच नये तर लेख व प्रतिलेख असे असावे. असा प्रतिलेख मूळ विषयात भर टाकणारा असावा अगर त्यातील त्रूटी दाखविणारा असावा. आस्वादातील आवडले व नावडले या मोघम प्रतिसादापेक्षा का आवडले नाही वा का आवडले याचे
प्रतिसाद असावेत. उगीच आणखी येउ द्या. वाचत आहे आहे मस्तच रे खपल्या गेलो आहे. जबराट वगैरे प्रतिसादात काही अर्थ नाही.
27 Nov 2013 - 6:28 pm | यसवायजी
अत्यावांतर- :D (हघ्या)
------------------
सगळेच कसे बागेमधे
व्यायाम करत असणार?
किंवा हातात गीता घेउन
चिंतन करित बसणार?
बागेतल्या कोपर्यात कुणी
घट्ट बिलगुन बसतंच नां?
गालाला गाल लाउन
गुलु गुलु करित असतंच ना?
असं काही दिसलं की
यांचं डॊकं सणकलंच!
यांच्या अध्यात्माचं गळू
अवघड जागी ठणकलंच!!
नैतिक सामर्थ्याचं यांच्या
वेगवान घोडं असतं
पण यांना मुलं होतात
हे एक कोडंच असतं!!
27 Nov 2013 - 6:30 pm | बॅटमॅन
ठ्ठो!!!!!!!! काय जबराट कडवं आहे तेच्यायला, मान गये!!
27 Nov 2013 - 6:35 pm | यसवायजी
कवीवर्यांचं नाव टाकायचं र्हाउन गेलं. सोरी.
27 Nov 2013 - 7:13 pm | बॅटमॅन
पाड-गाव-कर _/\_ तावडीत गावलेल्याला पार पाडून टाकले एकदम =))
27 Nov 2013 - 6:50 pm | प्यारे१
___/\___
पाडगावकरांना सलाम...!
27 Nov 2013 - 6:59 pm | सूड
दंडवत स्वीकारा हो !! =))
27 Nov 2013 - 7:15 pm | जेनी...
=))
सय्ज्या कुठनं रं शोधुन आणतोस
एकदम नेम धरुन हाणतोस =))
27 Nov 2013 - 7:29 pm | अत्रुप्त आत्मा
@नैतिक सामर्थ्याचं यांच्या
वेगवान घोडं असतं
पण यांना मुलं होतात
हे एक कोडंच असतं!! >>>
28 Nov 2013 - 12:25 pm | थॉर माणूस
ज-ब-रा-ट... _/\_
एक नंबर आहे.
28 Nov 2013 - 1:03 pm | आदूबाळ
क्या प्रतिसाद हय! (टाळ्या)
27 Nov 2013 - 7:35 pm | वेल्लाभट
आराशीचं उदाहरण आवडलं. विचार काहीसा पटला, बराचसा नाही पटला.
27 Nov 2013 - 9:00 pm | जेपी
अवांतर प्रतिसादच दु:ख नाही ,
पण माझा मोबाईल 25 प्रतिसाद झाले की गंडतो त्याच वाईट वाटत .
अतिअंवातर - याला म्हातारी मेल्याच दु:ख नाय पण काळ सोकावतोय या चालीवर वाचा . =))
29 Nov 2013 - 8:43 am | सुहास..
म्हातारी मेल्याच दु:ख नाय पण काळ सोकावतोय या चालीवर वाचा . >>>
चुकुन " सोक्या काळवतोय " असे वाचले आणि तिकडे चेन्नई च्या उन्हाने काळवंडलेल्या सोक्याचे चित्रच समोर आले ;)
=))
29 Nov 2013 - 7:52 pm | सोत्रि
वाश्या, लेका का माझ्या सुखी चेन्नै वास्तव्यावर घसरतो आहेस उगाच? शाप देऊ का तुला ??
असो, लैच अवांतर करुन राह्यलो ह्या धाग्यावर. स्वारी शक्तीमान प्यारे!
- (अजूनही गव्हाळ वर्णाचाच असलेला) सोकाजी
28 Nov 2013 - 10:55 am | मृत्युन्जय
मिपावर अवांतर प्रतिसाद येतात? काहितरीच काय? मिपा प्रतिसादांसाठीच प्रसिद्ध आहे. धागेच अवांतर असावेत बहुधा. (लोक मूळ लेख पण वाचतात का?)
28 Nov 2013 - 1:28 pm | पैसा
यग्जॅक्टली! माझ्या माहितीचे बरेच जण प्रतिक्रिया कोणी काय दिल्यात हे बघतात आणि मग लेख्/धागा वाचतात!
28 Nov 2013 - 1:58 pm | इरसाल
वैसाच कर्ता.
पय्ले पर्तिक्रिया देख्ता, जिदर ज्यादा उदर हंगामा होयेला ये पक्का फिर वोईच्च खोल्ता.