प्रत्येक स्त्रीच्या मनात एक क्वीन असते म्हणे. ती सापडण्याचा क्षण टिपणं आवश्यक असतं. पुरुष तरी का अपवाद असावेत? क्वीन सापडणं हा स्वत्व गवसण्याचा क्षण असावा असं तो चित्रपट पाहिलेल्या लोकांची मतं वाचताना जाणवलं. तसंच असेल!
..................
सातवीच्या वर्गात असलेला पण वर्गात कधीच न बोलणारा मुलगा शिक्षकांच्या आग्रहामुळं एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतो. स्पर्धेवेळी सगळ्यांची भाषणं ऐकून हातपाय गळपटलेला, काय बोलायचं ते न आठवता जसं सुचेल तसं धाडकन बोलून खाली बसतो. नंतर स्पर्धेत तिसरा मिळालेला क्रमांक. इथं 'किंग' सापडत असेल का?
-----------------
नुकताच दहावीला चांगले मार्क मिळवून कॉलेजला आलेला तो. आतापर्यंत मराठी माध्यमात शिकलाय. अकरावी च्या पहिल्या युनिट टेस्टला फारच कमी गुण. इंग्रजी समजत नाही हो नीट. घरच्यांची सॉलिड बोलणी खाल्लीत. नंतर अचानक कधीतरी आपल्याकडं पाहताना दिसलेला चेहरा बघताना सुखावलेला तो. ठरवून अभ्यास करुन फर्स्ट टर्म ला पहिल्या पाचात येतो. इथं 'किंग' सापडत असेल का?
------------------
नुकतीच अरेन्ज्ड मॅरेज झालेली मुलगी. सासरचे कसे आहेत फार ठाऊक नाही. नव्याचे नऊ दिवस सरतात नि एक दिवस सासू चार दिवस बाहेर जायला निघते. जातानाच्या सूचना सांगितलेल्या आहेतच तरी कुकरला भात लावताना तांदूळ किती घ्यावेत हे सासूला विचारत असलेली ही जमेल तसा स्वैपाक करुन सासर्यांना जेवायला वाढते. घाबरतच जेवायला वाढताना 'मस्त झालाय स्वैपाक म्हणणारे' सासरे. इथं क्वीन सापडत असेल काय?
------------------
कॉलेजात हॉस्टेलला असताना, विद्यार्थ्यांना वेळेवर नीटसं काही मिळत नाहीये, अनागोंदी कारभार सुरु आहे असं वर्तमानपत्रात छापून आल्यावर नाही, असं काही नाही तुम्ही आमच्या कॉलेजची माफी मागितली पाहिजे असं वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन सांगताना सांगणारा सुसंगत सांगतोय, बोलतोय म्हणताना आपसुकच संवादाची सूत्रं एका आतापर्यंत दुर्लक्षित विद्यार्थ्याच्या हाती येतात तेव्हा त्याला 'किंग' सापडत असेल काय?
-------------------
एखाद्या कामामध्ये काही गोष्टी करताना बारीक गोष्टींचा विचार घडून कामाची सुसूत्रता नि त्यानुसार अम्मलबजावणी करवून घेताना एखादा नकळतच 'किंग' बनत असेल काय?
....................
मला काही तरी करायचंय, आत्मविश्वास वाढवायचा आहे, मोठं व्हायचंय ह्याचा काही नक्की फॉर्म्युला असतो? काही सूत्र असतं? नसावं बहुधा.
परवापेक्षा काल नि कालपेक्षा आज एखादं पाऊल थोडं मोठं नि दमदार टाकलं, एखादी छान कृती केली की सहजच आपल्याला एखादी गोष्ट जमते नि त्या कृतीद्वारे आपण आपल्याला सिद्ध केलेलं असतं. ते सिद्ध करणं अथवा होणं हेच आत्मविश्वासाचं दृढीकरण लक्षण.
एखादी गोष्ट नाही जमली तरी ती गोष्ट करण्यासाठी केलेली खटपट, धडपड नि त्या गोष्टीच्या यशस्वीतेसाठी केलेली वाटचाल आपल्याला आवश्यक ती नियोजनाची नि आवश्यक कष्टांची कल्पना देत असतं. ध्येयाकडं जाताना केलेला प्रवास सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतोच.
प्रत्येकामधल्या क्वीन अथवा किंगचा शोध घ्यावा, मागोवा घ्यावा, हुडकून काढावं. मात्र नंतर सापडलेल्या क्वीनला अथवा किंगला वारंवार 'चेक' करत रहावंच. काय म्हणता?
प्रतिक्रिया
12 Apr 2014 - 2:57 pm | तुमचा अभिषेक
आपसुकच संवादाची सूत्रं एका आतापर्यंत दुर्लक्षित विद्यार्थ्याच्या हाती येतात तेव्हा त्याला 'किंग' सापडत असेल काय?
हे असे होते खरे, मी स्वताही अनुभवलेय बरेचदा. इतरांचेही अनुभव पाहिलेत. अगदी गली क्रिकेटमध्येही असला अनुभव घेतलाय.
12 Apr 2014 - 3:02 pm | बालगंधर्व
मत्स! परशात्न अव्ले.. तुमचे महनने पतले. पर्ति एक मन्सच्य्ह मनाअत एक किनग किनव ॑उईन लपलेलीई असते जेवह केवह तुमे अयुय्श्याआची एकदी लदाअई पहिल्यद्नाअ केहेलुन जिनकता ते पन अति अनत अनपेअकशिअत पने, तेह्वा तुमे तय कशनाचे रजा किनव रानीए बनलेले असतात. इत इस थे मोतिवाशनल पार्त ओफ लैफ. यु केरि ओन परशनत. यु मके अ गूद जोब.
12 Apr 2014 - 3:11 pm | प्यारे१
तेम्क यु.
12 Apr 2014 - 3:11 pm | इरसाल
कमीत कमी बालगंधर्व धाग्यावर प्रतिक्रिया देवुन गेलेत याने तुमचे समधान व्हावे.
(मोकलाया दाही दिश्या)इरसाल.
13 Apr 2014 - 12:40 am | बॅटमॅन
बाकी इर्सालभौंशी सहमत आहे.
(मोकलायाच्या आठवणीने धाय मोकलणारा) बॅटमॅन.
12 Apr 2014 - 3:16 pm | यशोधरा
मुक्तक आवडले.
12 Apr 2014 - 3:33 pm | मृगनयनी
खूप सुन्दर प्रशन्त'जी!!!!.. आवडले!!!!
12 Apr 2014 - 3:37 pm | आत्मशून्य
अर्थात टॉप ऑफ द वर्ल्ड ही भावना तुफानच असते... यात साँशय नाई.
12 Apr 2014 - 6:12 pm | कवितानागेश
साँशय तर मलापण कधीच नसतो.
पण तुम्हाला ही इतकी चमत्कारीक भावना कुठून सापडली?
12 Apr 2014 - 11:13 pm | आत्मशून्य
12 Apr 2014 - 5:31 pm | मितान
वेचक उदाहरणे आवडली.
12 Apr 2014 - 5:53 pm | शुचि
मीही अनुभवलंय ..... १० वी ला डाके क्लासच्या रोहिणी डाके बाईंचे शिकवणे त्यातून मला आलेला आत्मविश्वास अन मग पुढे आय आय टी मध्ये Maths karataa मिळालेली admission यात कमालीचे कनेक्शन आहे, १००% कनेक्शन आहे.
_____________________
"ओटोबायोग्राफ़ॆ ऑफ अ योगी" पुस्तकात एक खूप छान वाक्य आहे - लहान बाळाला पहिली वाहिली पावले टाकत असताना जे कौतुक आजूबाजूचे (विशेषता: आई) करतात, त्यातच त्याच्या मोठेपणीच्या आत्मविश्वासाची बीजे पेरलेली असतात - अशा अर्थाचे ते आहे.
12 Apr 2014 - 6:14 pm | कवितानागेश
मात्र नंतर सापडलेल्या क्वीनला अथवा किंगला वारंवार 'चेक' करत रहावंच. >
हे अगदी बरोबर आहे.
12 Apr 2014 - 6:15 pm | पैसा
एवढ्या मोठ्या आयुष्यात आपणच आपल्याला अनेकदा सापडत असतो.
12 Apr 2014 - 6:32 pm | कवितानागेश
अवांतरः आपल्यातल्या किंग किंवा क्वीनसोबत कधीकधी आपल्यातल्याच जोकरपण सापडतो! ;) आपण स्वतः किती गमतीदार( पक्षी:मुर्खासारखे! ) वागू शकतो हे कळल्यावर.
अर्थात ते किस्से इथे लिहिण्यासारखे नाहीत. :)
12 Apr 2014 - 6:49 pm | तुमचा अभिषेक
लिहा :)
12 Apr 2014 - 6:51 pm | यशोधरा
छान नाव ठेवले की! :)
12 Apr 2014 - 7:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
डिप्लोमा पहिल्या वर्षाला न्युमरेटर, डिनॉमिनेटरचं टेरर आणि ग्राफिक्स ला पॅराबोला, हायपरबोला बरोबरची हाणामारी आठवली. आणि दुसर्या वर्षीपासुन डिप्लोमा आणि ईंजिनिअरींग पुर्ण होईपर्यंत किंग मधलं रुपांतर आठवलं. नाही म्हणायला एम-३ नी सिंहाची शेळी केलेली. क्रिटिकल ला जाउन एकदा वाय.डी. होऊन रडवलं पण सुटला एकदाचा ;).
12 Apr 2014 - 8:21 pm | धन्या
अप्रतिम लिहिले आहे.
12 Apr 2014 - 9:58 pm | मुक्त विहारि
आवडले.....
12 Apr 2014 - 10:18 pm | राही
सूंदर लिहिले आहे.
"प्रत्यक्ष यशापेक्षा यशापर्यंतचा प्रवास अधिक रोमहर्षक असतो."
12 Apr 2014 - 10:25 pm | आतिवास
आवडले.
13 Apr 2014 - 3:13 am | आयुर्हित
वा व्वा भाई! अपुनके बात मे तो सॉलिड दम है!
13 Apr 2014 - 9:36 am | सूड
ह्म्म्म!! दिसामाजि काहितरि लिहावे !!
13 Apr 2014 - 1:08 pm | कवितानागेश
तुम्हाला दिसामाजी काहीतरी लिहावे असं म्हणायचंय का? :D
14 Apr 2014 - 1:51 pm | सूड
ह्म्म!! असोच्च्च्च!!
13 Apr 2014 - 12:56 pm | प्यारे१
वाचक, प्रतिसादक, ह्यांचे आभार. :)
आत्मशून्य ह्यांचे खास तर सूड ह्यांचे विशेष आभार. ;)
13 Apr 2014 - 1:10 pm | अत्रुप्त आत्मा
@आत्मशून्य ह्यांचे खास तर सूड ह्यांचे विशेष आभार.>>> =)) आत्म-शून्यातून घेतलेला सूड अवडला! ;)
13 Apr 2014 - 4:19 pm | आत्मशून्य
याचा खरोखर नेम नाही.
13 Apr 2014 - 2:45 pm | नगरीनिरंजन
सेन्सिबल. किंग/क्वीन होण्यासाठी हातोडा घेऊन प्रतिमाभंजक व्हायची गरज नाही हे छान सांगितलंय.
13 Apr 2014 - 8:31 pm | स्वप्नांची राणी
छान छान हो...परेषानजी!
14 Apr 2014 - 11:27 am | मधुरा देशपांडे
आवडले. सगळी उदाहरणे अगदी मनाला भावणारी.
+१. सहमत
14 Apr 2014 - 2:15 pm | दिव्यश्री
लेखन आवडले . विचार पटले .