भारत हा सेक्यूलर देश आहे
असे असतानाही आमचे अनेक नेते देवळात काय जातात, देवाचा आशीर्वाद काय घेतात... काही विचारू नका...
.
लक्ष्मणासारखा भाऊ, रामबाण उपाय, रामराज्य असे शब्दप्रयोग आमच्या देशात आजही केले जातात...
आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर बिनधास्तपणे 'रामजाने' म्हटले जाते
पण यामुळे हळव्या लोकांच्या भावना दुखावत असतील याची कुणालाच पर्वा नाही...
असो...
अशी रामबाण, रामराज्य सारखी आणखी काही उदाहरणे सांगता येतील का...
.
प्रतिक्रिया
22 Apr 2014 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा
==========================
मी पैला! =))
22 Apr 2014 - 12:26 am | आयुर्हित
भारत हा सेक्यूलर देश आहे: हो बरोबर आहे. म्हणूनच भारताला देवळात जातांना मी तरी बघितले नाही.
असे असतानाही आमचे अनेक नेते देवळात काय जातात, देवाचा आशीर्वाद काय घेतात... काही विचारू नका...
हो बरोबर आहे.कारण नेते सेक्यूलर कसे असतील? ते(पवार साहेब सोडून)कोठल्या तरी एका धर्माचे पालन करतील कि नाही?
आमच्या पवार साहेबांना चर्च आणि मस्जिद (आणि त्यांच्या जमिनी)जाम आवडतात बरं.
पुण्यातले शारदा सेंटरच घ्याना. कसे मस्त चर्च च्या जागेवर उभे आहे!
22 Apr 2014 - 1:42 am | आत्मशून्य
आँ ? चर्चच्या जागेवर तर चर्च व्यवस्थित उभे आहे की अन, रस्त्याच्या पल्याड महादेवाचे मंदीरही.
22 Apr 2014 - 7:52 pm | माहितगार
साहेबराज्याची जवळन माहिती दिसते आहे. मागच्या लोकसभे नंतर मंत्रीपद घेण्याच्या आसपासच्या काळात, आम्ही साहेबांची सकाळ मध्ये ते अष्टविनायका पैकी एका मंदीरात सहकुटूंब जाऊन आल्याची चारोळीची बातमी आणि एक लो रिझोल्यूशन छायाचित्र पाहील्याचे आठवते.
केंद्रात मंत्री झाल्या नंतर एक महाराष्ट्रीय मंत्री तीरूपतीला सहकुटूंब जाऊन हाय रिझोल्यूशन छायाचित्रेही काढून आल्याचेही पाहीले.
स्वगत प्रार्थना :
इश्वरा अशी मनापासूनची भक्ती काही जणांनाच कशी रे जमते ?
ते काही असूदे(त) जोजे वांछील तो ते लाहो म्हणून (त्यांना) पाव म्हणजे झाले.
दुसर काहीच नाही तर मराठी माणूस कधीतरी पंतप्रधान झाल्याचे दाव म्हणजे झाले,
बाकी काहीच नाहीतर मराठी माणसाला आभिमानाने मराठी पंतप्रधान
झाल्याच्या अभिमानाने उर फुगवण्याची संधी दे म्हणजे झाले !
22 Apr 2014 - 12:59 am | माईसाहेब कुरसूंदीकर
बाबा रे आशू, मोठा हो असे म्हणेन.सेक्युलर म्हणजे देवळात न जाणे असे नसून प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा असा आहे हो.
शनिवार असेल तर खुशाल मारुतीरायाच्या देवळात जावू शकतोस कोनीही अडवणार नाही तुला.अगदी शाही ईमामसुद्धा.
मंगळवारच्या उपवासाला आस्था चॅनेल पाहत खुशाल साबुदाणा खिचडी खावू शकतोस.सोनिया,मुलायम कोणीही आड येणार नाही.
स्वतःच्या धर्मात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्यची मुभा असणे,दुसर्याच्या धर्मात नाक न खुपसणे अशी मी तुमच्या त्या सेक्युलॅरिझमची व्याख्या करेन.
(सेक्युलर्)माई
22 Apr 2014 - 9:44 pm | संजय क्षीरसागर
सेक्युलरचा खरा अर्थ `इहलौकीक किंवा जे धार्मिक नाही ते' असा आहे. (Worldly or material, not religious or spiritual)
पण भारताच्या संदर्भात `सेक्युलरिझम' म्हणजे धर्म ही वैयक्तिक बाब आहे ती प्रत्येकानं आपल्या मर्जीनुसार `घरात आचरणे' असा आहे.
22 Apr 2014 - 7:22 pm | आशु जोग
हो पण माहिती कुणालाच कशी नाही
22 Apr 2014 - 7:54 pm | धन्या
सेक्युलरीझमचा राजकारणी आपल्या सोयीचा अर्थ लावतात. मात्र आता तर मिपावर धागा काढणारेही सेक्युलरीझमचा आपल्या सोयीचा अर्थ लावू लागले आहेत.
25 Feb 2015 - 1:35 am | आशु जोग
जमुना किनारे मेरी ऊंची हवेली
मै ब्रिज की गोपिका नवेली....
शास्त्रीय संगीतातही राम आणि कृष्ण ... कुणीतरी धर्महीन चीजा बनवणार आहे की नाही