त्यांची दिवाळी ..

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
9 Oct 2014 - 11:32 am

आज मिटिंग. जिल्हा अधिक्षक नवरेसाहेबांची केबिन खचाखच भरून गेली होती. ऑफिसच्या कानाकोपऱ्यातून जमा करून आणलेल्या खुर्च्या केबिनमध्ये मावत नव्हत्या अन त्यावर बसलेले वजनदार अधिकारी खुर्च्यांमध्ये मावत नव्हते. आजच्या मिटींगला जिल्ह्यातले सर्व क्षेत्रिय अधिकारी आले होते. मिटिंग तशीच महत्त्वाची होती. दिवाळी तोंडावर आलेली. ग्राहकांच्या खिशात पैसे खुळखुळत होते. व्यापाऱ्यांचे गल्ले भरून वाहत होते. दिवाळीपूर्व काही दिवस म्हणजे वसुलीचा नामी सीझन. वाहत्या गंगेचा लाभ घेऊन वर्षाची थकबाकी निल करण्यासाठी मोर्चे कसे बांधायचे याच्या सूचना नवरेसाहेब जातीने देणार होते आणि त्यासाठीच खास मिटिंगचे आयोजन केले होते.
प्रेझेन्टेशन वाल्याने पडद्यावर 'Welcome' स्लाईड टाकून मिटिंगचा ओनामा करून ठेवला होता.
पंधराएक मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर नवरेसाहेब आणि त्यांचे सहाय्यक उगवले. प्रेझेन्टेशन वाल्याने उगीचच पडद्यावरचा वेलकम खालीवर केला.
'हं, करा सुरु..' पान चघळत नवरेसाहेब वदले. प्रेझेन्टेशनवाल्याने पहिली स्लाईड टाकली.
'पहिला तालुका, नवलपूर ? हं, उठा सातपुतेसाहेब !'
सातपुतेसाहेब उठून उभे राहिले.
'किती वसुली झाली ?'
'पस्तीस लाख साहेब..'
'बिलं कितीची फाडली होती ?'
'सत्त्याण्णव लाख..'
'म्हणजे पन्नास टक्के पण नाय वसुली ? हजामती करता काय फिल्डवर राहून ?'
'नाही, साहेब.'
'आज तारीख बावीस. राहिलेल्या सत्तावन्न लाखाचं काय ?'
'साहेब चार दिवसात सगळी बिलं वसूल करतो.'
'करायलाच पाहिजेत, काय उपकार करता काय कंपनीवर ?'
'होय साहेब, ...नाही, म्हणजे बिलं करतो वसूल.'
'...चला, दुसरी स्लाईड, कासारगाव . सबनीस उठा. किती तुमचा आकडा ?'
'बावन्न..'
'डिमांड ?'
'सदुसष्ट.'
'...याखेपी काम केलेलं दिसतंय. नायतर मागच्या महिन्यात नुसतंच सुमोतनं बोंबलत फिरत होतास.'
,नाही, साहेब, जरा बाकी वाढली तेवढी मागच्या महिन्यात. पण आता तीपण काढतो. ..'
'काढा. राहिलेली वसुली एक तारखेच्या आत आवरा. काय ?
'होय साहेब'
'...बसा. पुढचा कोण आहे ?'
डोळेसाहेब उभे राहिले.
'आकडा बोला.'
'डिमांड एक सत्तावीस, वसुली पंच्याहत्तर..'
'म्हणजे अजून बावन्न लाख बाकी ? आणि मागच्या महिन्याची बाकी किती तुझी ?'
'पंचवीस..'
'डोळ्या, तुझे डोळे कधी उघडणार ? एवढे दिवस का झोपला होतास ? '
'साहेब माझी माणसं रोज चौदा तास फिरताहेत वसुलीला..'
'आणि तुझ्या **खाली गाडी कशाला दिलीये मग ?'
'मीपण जातो ना.'
'तू मला मिटिंग झाल्यावर भेट आणि अॅढक्शन प्लॅन दे तुझा. काय ?'
'येस्सर !'
'ये पाटला, उठ !'
पाटीलसाहेब मोबाईलमधून तोंड बाहेर काढून उठून उभे राहिले.
'काय काम केलंस का या महिन्यात तरी ?'
'केलं की साहेब.'
'बोल आकडे बोल.'
'पासष्ट डिमांड आणि वसुली त्रेचाळीस .'
'ह्याला काम म्हणतोस होय तू ?'
'साहेब, माझ्या तालुक्यात पूर आलेला या महिन्यात !'
'मग ? पूर सगळीकडेच आला होता. '
'माझी मशिनरी फेल झाली साहेब, पाण्याचा वेढा बसला..आणि माणसं सगळी तिकडं लागली..'
'येवढ्याशा पाण्यानं फेल झाली ? आणि स्टँडबाय मशीनरी काय झाली ?'
'तिथं लै अडचण आहे साहेब...स्टँडबाय लावायला पण जागा नाही.'
'खोतवाडीत अडचण आहे ? जरा त्या बिरडेवाडीला जाऊन बघ ! कसल्या जंजाळात मशीनरी लावलीय ते. नुसतं बघून चक्कर येऊन पडशील ! '
'पण ते जेसीबी लावून बसवलंय साहेब.'
'मग तूपण आण की जेसीबी. तुला कोण नाही म्हटलंय ?'
'....'
'कोण तुझा साहेब ? ओ चुडमुंगेसाहेब, ह्या पाटलाला पिकनिकला पाठवा उद्या बिरडेवाडीला, कंपनीच्या खर्चानं ! बघून येउदे कसं मशीन बसवायचं ते !'
'होय साहेब' चुडमुंगेसाहेबांनी मान डोलावली.
' पाटला, मला चार दिवसात वसुली पायजे. नायतर जा घरी. तुला फुकट पोसायला कंपनी पगार देत नाही मला. काय ?'
'होय साहेब..'
''चुडमुंगे, थकबाकीच्या फिगर्सची स्लाईड लावा.'
'येस सर.'
'कोण आहेत टॉप थ्री ? चला या इकडं. अहं, तिथं नाही, माझ्या समोर या. हां अस्सं ! '
ठोकळे, बारटक्के अन गोंदील तिघे ओळीत नवरेसाहेबांच्या टेबलसमोर उभे राहिले.
'लेकांनो, तुम्ही काय नुसतं खुर्चीत बसून अंडी घालता काय हापिसात ? वसुली कोण करणार ? ठोकळ्या, तुझ्या खिशाची भर जरा कमी कर अन कंपनीचा खिसा भरायचं बघ ! गोंदील, तुला मागच्या महिन्यात जादा कुमक दिली होती ना वसुलीला ? त्या रेवणकर बाईला सुमोत घालून फिरत होतास की आठ दिवस ! '
इतक्यात शिपाई आत आला आणि अदबीनं साहेबांच्या कानात काही कुजबुजला. साहेबांनी मान हलवली, खुर्चीतच जरा ताठ बसले आणि म्हणाले,
'ठीक आहे, पाठव त्यांना आत.'
दोन गांधी टोपीवाले वजनदार इसम आत आले. त्यापैकी एकाच्या हातात हार होता आणि दुसऱ्याच्या गुच्छ.
साहेबांच्या समोर एका लायनीत उभ्या असलेल्या तिघा ऑफिसरांना बघून ते अंमळ दबकले.
'काय खाजगी चाललंय , सायेब ?' हारवाला म्हणाला.
'नाही हो, आपलं नेहमीचंच !'
' हुबे ऱ्हायची शिक्षा करताव व्हय आमच्या सायेब लोकान्ला ?'
'नाय नाय, जरा मास्तरकीची हौस भागवतोय !'
टोपीवाल्या पाव्हण्याचे समाधान झाले नाही. तो साशंक नजरेने त्या तिघांकडे एक कटाक्ष टाकून साहेबांकडे वळला. आकर्ण हास्य करून त्याने साहेबांच्या गळ्यात हार घातला.
'साहेब, तुमी युन सा म्हैने झाले, तरी आमाला हिकडं याया झालंच नै बगा. आमी जरा दौऱ्यावर हुतो. म्हनून आत्ता हार आणलाय.
..परवा वाड्यावर कारेक्रम ठेवलाय. आमच्या नातवाच्या बारशाचा ! याचं बर्का !'
'हां, हां, येणार की !'
चहा मागवला गेला. तीन शिलेदारांच्या पहाऱ्यात साहेब अन पाहुण्यांनी चहा घेतला. मग, बाकावर उभे केलेल्या शाळकरी पोरांकडे पहावे, तशा नजरेने तिघांना न्याहाळत पाहुणे बाहेर गेले.
साहेबांची गाडी पुन्हा लाईनवर आली.
'लेकानो, नुसती तुमचीच दिवाळी करता काय ? कंपनीची पण करा की कधीतरी !
..ते काय नाय, तुम्ही तिघांनी मागची बाकी प्लस चालू बिलं, पाच दिवसात वसूल करायची. काय ? तिघं पण थांबा मिटिंग झाल्यावर भेटा मला , अॅक्शन प्लॅन घेऊन ...'
तिघे माना डोलावून खुर्चीवर जाऊन बसले.
'चुडमुंगे, आता तीन हुशार विद्यार्थ्यांची नावं सांगा. '
'माईनकर, पवार आणि कोकणे.'
आता हुशार विद्यार्थ्यांना लायनीत उभे केले गेले. हुशार विद्यार्थ्यांचे हात कॉलरी ताठ करायच्या तयारीत !
'...हे बघा, तुमचे टार्गेट वाढवले आहे. तुम्ही या महिन्यात प्रत्येकी वीस वीस लाख रुपये आधीच्या टार्गेटपेक्षा जादा आणायचे आहेत. समजलं ?'
तिघांचा फुगा एकदम फुटला.
'प्रयत्न करतो.' तिघे एका सुरात म्हणाले.
'नो. प्रयत्न नको. अॅवश्शुरन्स पाहिजे.'
'साहेब दहा देतो.'
मग मासळीबाजार टाईप घासाघीस होऊन अखेर प्रत्येकी पंधरा लाखाची बोली ठरली.
मग दिवाळीच्या मुहर्ताआधी वसुलीची कशीकशी फील्डिंग लावायची, पुढाऱ्यांच्या पित्त्यांना हात न लावता धुरळा न उठवता कार्यभाग कसा साधायचा, कुणाचं नाक कसं दाबायचं याबद्दल नवरेसाहेबांनी सविस्तर मार्गदर्शन केलं.
... अशी सगळ्या वसुलीची विल्हेवाट लावून झाल्यावर मग जनरल विषय सुरु झाले.
नवरे साहेबांनी सेक्रेटरीला खूण केली. त्यानं डायरी आणून साहेबांच्या हातात दिली.
'हं, सुरतेकर, पाटील, ठोकळे, वाघमोडे, खैरनार आणि सपकाळ. चला या तुमचा सत्कार करायचा आहे. '
याखेपी लाईनची लांबी वाढली.
नवरे साहेबांनी सभेकडे तोंड करून पहिली काडी टाकली.
'हे सगळे राजे. यांच्या फिल्डमध्ये यांचा मान मोठा. प्रजा फोन करते आणि हे घेत नाहीत. अननोन नंबर दिसला की राजांचे कान बहिरे होतात. का हो राजे ?’
राजे हातातले कागद किंवा मोबाईल सांभाळत उभे.
‘मग आता यांच्यासाठी माझ्याकडे एक जंक्शन स्कीम आहे. इथे येणाऱ्या आउटसाईडर्सपैकी कुणाचापण मोबाईल घेऊन हा पिंपळ्या यांना रोज दहा फोन करणार. दोनपेक्षा जास्त नो रिप्लाय आले तर यांचं पार्सल ऑफीसातनं थेट गावाकडे बॅक टू पॅव्हेलियन ! पेन्शन नाय अन फंडपण नाय ! कसं काय राजे ?'
सगळ्या राजांचे भजे झालेले. मूग गिळून गप्प उभे राहिले.
'भ**हो, सुधरा जरा. मी नुसती वॉर्निंग देतोय. उद्या एमडी ला तक्रार गेली तर जाग्यावर सस्पेंड व्हाल लेको.'
थोडा वेळ त्यांची इस्त्री करून झाल्यावर साहेबांच्या इशाऱ्यासरशी सगळे राजे खाली माना घालून सिंहासनावर जाऊन बसले.
'हां, आताची यादी मोठ्ठी आहे मघापेक्षा. चला...'
साहेबांनी पटापट सात-आठ नावे घेतली. लाईन आणखी लांब झाली.
'ए पिंपळ्या' साहेबांनी सेक्रेटरीला फर्मावले, 'यांच्या मोबाईलच्या कंपन्या लिहून घे. सांगा रे !'
'नोकिया..'
'सॅमसंग ..'
'सोनी'
'मॉडेल नंबर पण सांगा रे.'
'गॅलॅक्सी..'
'मोटो जी..'
...आठही जणांच्या मोबाईलचे मेक आणि मॉडेल नंबर यांची यादी साहेबांनी पान चघळता चघळता डोळ्याखालून घातली. मग पान गिळून ते बोलले.
'आयला, एवढे भारी मोबाईल माझ्याकडं पण नाहीत ! बँका लुटता का काय ?
...तर, या सगळ्यांना मी कंपनीच्या नव्हे, माझ्या खर्चानं मोबाईलच्या स्पेअर ब्याटऱ्या देणार आहे. कारण दिवसाच्या कुठल्याही वेळी फोन केला तरी यांची ब्याटरी संपलेलीच असते. आयला, माझी ही गत, तर ग्राहकांना काय करत असतील ?'
मग साहेबांनी सुमारे पंधरा मिनिटे त्यांचीपण उभी आडवी सालं काढली.
अखेर स्लाईडवर Thank You अशी ठसठशीत अक्षरे उमटल्यावर त्यांनी समारोपाचे भाषण आवरते घेतले.
'तर मित्रहो, ही दिवाळी आपणा सर्वांना सुखसमृद्धीची अन आनंदाची जावो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. अन कंपनीची दिवाळी चांगली करावी असे तुम्हा सर्वांना आवाहन !'
मिटिंग संपली. पास झालेले अधिकारी बाहेर पडले. मिटिंगनंतरच्या पार्टीच्या ठिकाणी जाण्यासाठी सगळे बाहेरच्या हॉलमध्ये उभे राहून साहेबांची वाट पाहू लागले. काहींनी गाड्या आणण्यासाठी आपापल्या ड्रायव्हरना फोन लावले.
केबिनमध्ये साहेबांच्या भोवती अॅक्शन प्लॅनवाल्यांचा वेढा पडला.
..डोळेला पनिशमेंट म्हणून ड्रिंक्सच्या बाटल्या आणण्याची कामगिरी सोपवली गेली.
..तिघा थकबाकीवीरांनी साहेबांच्या मुलीला फ्रीसीटमधून मेडिकलला अॅमडमिशन घेण्याची जबाबदारी सहर्ष स्वीकारली.
...स्पेअर ब्याटरीवाल्यांनी साहेबांची दिवाळीनंतरची सिंगापूर वारी फॅमिलीसहित स्पॉन्सर करण्याचा प्रस्ताव मांडला.
..उरलेल्यांनी चिकन-मटणाचे विविध उत्तम प्रकार मिळण्याची ठिकाणे शोधण्याची गोड कामगिरी स्वीकारली. थोडी चर्चा होऊन त्यातलेच एक नामांकित ठिकाण पार्टीकरता फिक्स झाले.
साहेब आतल्या रेस्टरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आले. साहेब, अधिकारीवर्ग आणि इतर लवाजमा भराभरा गाड्यांमध्ये बसून पार्टीवाल्या फार्महाउसवर येऊन स्थानापन्न झाले . बाटल्या रिकाम्या होऊ लागल्या. चखणे सर्व्ह करणाऱ्यांची लगबग उडाली...
...आणि दिवाळीच्या दणक्यात खरी मिटिंग सुरु झाली !

डिस्क्लेमर : सदर लेखातील घटना व व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचे वास्तवात कोणत्याही प्रकारे साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

मांडणीकथाप्रकटन

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

9 Oct 2014 - 11:37 am | स्पंदना

मी पयली!! :D

किसन शिंदे's picture

9 Oct 2014 - 11:46 am | किसन शिंदे

सगळं वाचून पयली कि न वाचताच?? :D

स्पंदना's picture

9 Oct 2014 - 11:49 am | स्पंदना

त्ये खाली मबा बघा वाचत बसले.

किसन शिंदे's picture

9 Oct 2014 - 11:52 am | किसन शिंदे

सगळं वाचून प्रतिसाद टाकला तरच तो खरा पयला, नुसता प्रतिसाद म्हणजे शेवटून पयला म्हणायला पायजे मग आता ;)

सगळं वाचून प्रतिसाद टाकला तरच तो खरा पयला, नुसता प्रतिसाद म्हणजे शेवटून पयला म्हणायला पायजे मग आता
मग ! *YES*

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

इरसाल's picture

21 Oct 2014 - 5:26 pm | इरसाल

इथ मी पयला असा युएसपी आहे मी पयली बार झाला !

मदनबाण's picture

9 Oct 2014 - 11:42 am | मदनबाण

जबराट !

'आणि तुझ्या **खाली गाडी कशाला दिलीये मग ?'
हॅहॅहॅ... ;)

दुष्ट अपर्णा तै ने माझा १यला नंबर हिसकावुन घेतला ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

किसन शिंदे's picture

9 Oct 2014 - 11:45 am | किसन शिंदे

हाहाहाहा..
त्याशिवाय पर्यायच नसतो. प्रसंग अगदी नेमका उतरवलाय. तू पण अशी एखादी मिटिंग अटेन्ड केली आहेस की काय? ;)

स्पंदना's picture

9 Oct 2014 - 11:47 am | स्पंदना

कश्याबद्दल लिहीलय त्याचा नक्की अंदाज नाही आला, पण सायबांची हँडल करायची पद्धत आवडली. ते अननोन नंबर तर एकदम भारी.
अशी हजेरी घेण म्हणजे काही खायच काम नाही.
पण खातं कोणत? प्रायव्हेट असाव अस वाटतय पण नक्की कशाबद्दल ते काही कळल नाही गो बाय.
पण काही म्हण डोळ्यासमोर उभ राहीलं माणसांच खजील होणं, साहेबांच झाडणं.

अगदी डोळ्यासमोर हजेरी घेतोय साहेब असं वाटत होतं वाचताना!! मस्त!मजा अाली वाचायला!!

गुलाबाचे काटे तसे सायबाचे धपाटे ;)

मस्तच आवडली कथा

तिमा's picture

9 Oct 2014 - 12:03 pm | तिमा

या हरामखोर साहेबाला उभा सोलून काढावा असं वाटलं.

विजुभाऊ's picture

9 Oct 2014 - 12:09 pm | विजुभाऊ

काय कळ्ळं नाय भो

एस's picture

9 Oct 2014 - 12:18 pm | एस

जबरदस्त लिहिलंय.

त्रिवेणी's picture

9 Oct 2014 - 12:20 pm | त्रिवेणी

मी आठवी

हाण तेजायला. हे तो प्रचीतीचे बोलणे!!!!! त्याशिवाञ इतके जबर्‍या लिखाण शक्यच नाही.

माहितगार's picture

21 Oct 2014 - 6:56 pm | माहितगार

+१

बाबा पाटील's picture

9 Oct 2014 - 1:17 pm | बाबा पाटील

या पेक्षा वेगळ काही असुच शकत नाही.

स्पंदना's picture

9 Oct 2014 - 1:19 pm | स्पंदना

इतकी चकाचक हजामत झाल्यावर पार्टीला माणस कशी लखलख चमकत असतील नै?

प्यारे१'s picture

9 Oct 2014 - 1:23 pm | प्यारे१

परतेक्ष हाजरी लागली गा मीटींगला.
आमी नंतर नुस्ता चखना हाननार.

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Oct 2014 - 2:05 pm | माम्लेदारचा पन्खा

प्रसंग भन्नाट रंगवलाय... मजा आली....

कसला मस्त रंगवलाय ग !! भन्नाट !!

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2014 - 3:16 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gifhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gifhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

सविता००१'s picture

9 Oct 2014 - 3:19 pm | सविता००१

खरच जबरी लिहिल आहेस गं!धम्माल आली वाचायला

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Oct 2014 - 3:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

जबरी प्रत्यक्षदर्शन :)

भारी! डोळ्यासमोर सगळ्या लोकांची लैन लाग्लेली! लेखन आवडलं.

खेडूत's picture

9 Oct 2014 - 6:04 pm | खेडूत

निव्वळ धमाल! :)
तुमच्या कंपणीच्या लै सुरस कथा प्रचलित आहेत.

एखाद्याला खरं नाई वाटणार अशी भाषा वापरतात म्हणून!

सामान्यनागरिक's picture

9 Oct 2014 - 6:05 pm | सामान्यनागरिक

ही मीटींग निवडणूकीच्या पूर्वतयारीची असावी. हे आकडे म्हणजे निवडणूकीसाठी पैसे गोळा करण्याबद्दलचे वाटताहेत. नक्की कोणी दादा किंब्वा भाऊ असावेत. नवरे हे नांव एकदम समर्पक आहे.
प्रत्यक्ष पार्टीतील संवाद प्रत्यक्ष फुल्या फुल्या मारुन लिहावे लागले असते.
रेवणकर बाईंच काय झालं असावं ?

दिपक.कुवेत's picture

9 Oct 2014 - 6:55 pm | दिपक.कुवेत

परत एकदा ढासू...

लेख आवडला... हेवेसांनल.....

खटपट्या's picture

10 Oct 2014 - 6:03 am | खटपट्या

मस्तय !!

अनुप ढेरे's picture

10 Oct 2014 - 7:06 am | अनुप ढेरे

मस्तं लिहिलय. आवडलं!

लक्ष दिवे उजळवून दिवाळी साजरी केली की सर्वान्नी ...

छान आहे कथा ...

नाखु's picture

10 Oct 2014 - 9:50 am | नाखु

प्रत्यक्ष "धावते वर्णन"

कुंपनीच्या मिटिंगाचा गॅलरी प्रेक्षकः
एक दोन वेळा वस्त्रहरण केल्याने आम्हाल फक्त प्रेक्षक नेमेले.

काउबॉय's picture

10 Oct 2014 - 12:07 pm | काउबॉय

सायब हवा तर असा.

मधुरा देशपांडे's picture

10 Oct 2014 - 12:15 pm | मधुरा देशपांडे

खासच लिहिलंय.

पिलीयन रायडर's picture

10 Oct 2014 - 12:21 pm | पिलीयन रायडर

मस्त लिहीलय..!!!

अमित खोजे's picture

10 Oct 2014 - 10:29 pm | अमित खोजे

भारीच

पैसा's picture

21 Oct 2014 - 1:35 pm | पैसा

खिखिखि! खुखुखु!! खोखोखो!!!

स्वाती दिनेश's picture

21 Oct 2014 - 5:57 pm | स्वाती दिनेश

मिटिंग लै भारी!डोळ्यासमोर चित्र उभे राहिले एकदम!
स्वाती

तुमचा अभिषेक's picture

26 Oct 2014 - 2:22 am | तुमचा अभिषेक

छान लिहिलेय.. नेहमीप्रमाणेच :)